पुणे-राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा फुटीला पालकमंत्र्यांना जबाबदार धरले आहे .यासंदर्भातील थेट प्रश्नाला ,’अजित पवारांनी काय दिवे लावलेत ते माहिती आहे’ असे स्पष्ट भाषेत उत्तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे .कालवा फुटीने पुण्यात हाहाकार उडालेला असताना पालकमंत्री कुठे आहेत ?कालवा फुटीला पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जबाबदार आहेत .असे आरोप विरोधी पक्षांकडून होत होते . एवढेच काय भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देखील पालकमंत्री बापट आणि खासदार शिरोळे यांनी येथे येणे हे त्यांचे कर्तव्यच होते , असे विधान कालच केले. या पार्श्वभूमीवर आज श्री बापट बोलत होते.
ते म्हणाले , मी सर्व परिस्थिती जाणून आहे . आणि तेथे जाण्यापेक्षा मदत काय करता येईल हे पाहणे गरजेचे होते .त्यानुसार आज मुंबईतून आल्यावर घेतलेल्या बैठकीत दुर्घटनाग्रस्तांना मदती साठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत .