Home Blog Page 3075

त्याने नमाज अदा केली, दुवा मागितली अन…काही वेळातच…

0

पुणे-शुक्रवारचा दिवस…. दुपारी त्यांनी नेहमीप्रमाणे आपली नमाज अदा केली आणि आपल्या कामावर जायला निघाले. मात्र, आज त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. कामावर जात असताना जुना बाजाराच्या चौकात ते सिग्ननला थांबले. त्याचक्षणी त्यांच्या अंगावर लोखंडी होर्डिंगचा मोठा सांगाडा कोसळला अन… क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पुण्यातील जुना बाजार परिसरात कोसळलेल्या होर्डिंगच्या सांगाड्यामुळे ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली यात जावेद खान यांचाही समावेश आहे. जावेद यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे.

जावेद खान (वय ४८, रा. घरकुल, पिंपरी-चिंचवड) यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रोडवरील मेन्य अव्हेन्यू या कपड्यांच्या मोठ्या दालनात ते कामाला होते. दर, शुक्रवारी जावेद जुना बाजार येथील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी येत असत. आज देखील नेहमीप्रमाणे ते नमाज अदा करून दुकानात कामावर निघाले होते. त्यानंतर ते जुना बाजारच्या चौकात सिग्नलला थांबले. त्यानंतर ही भीषण घटना घडली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. जावेद यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हा प्रसंग सांगितला.

मात्र, त्यांच्या मागे असलेल्या चार मुलांचा आणि पत्नीचा मुख्य आधार हिरावला आहे. अल्लाहकडे सर्वांसाठी दुवा मागतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जुना बाजार भागातील शाहीर अमर शेख चौकात अनेक मोठे होर्डिंग लावण्यात आले असून यातील एका होर्डिंगचा मोठा लोखंडी सांगाडा दुपारी सिंग्लला थांबलेल्या वाहनांवर कोसळला. दुपारी लोखंडी होर्डिंगचे कटिंग सुरु असताना ही घटना घडली. या होर्डिंगखाली एकूण ११ जण सापडले होते. यातील चौघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत : पालकमंत्री गिरीश बापट

0
पुणे : होर्डिंग कोसळून जुना बाजार परिसरात झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमी व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या संदर्भात आपले खासदार अनिल शिरोळे यांच्याशी नवी दिल्ली येथे बोलणे झाले असून अशी मदत केंद्रातर्फे देण्यात येईल असे आश्वासन शिरोळे यांनी दिले आहे.
दरम्यान पालकमंत्री या नात्याने मी आज दुर्घटनाग्रस्त स्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच नजीकच्या पोलीस चौकीत जाऊन अपघाता संबंधी तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर ससून रुग्णालयात जाऊन जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारा संबंधी माहिती घेतली. रेल्वेच्या विभागीय कार्यालयात जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ही घटना दुर्देवी असून त्याची संपुर्ण चौकशी करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने मला दिले. असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुण्याच्या विक्रम मक्कर यांची नियुक्ती

0

पुणे- ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम मक्कर यांची ‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या (एआयआरआयए) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही घोषणा गेल्या २८ सप्टेंबरला कोलकाता येथे झालेल्या ‘एआयआरआयए’च्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. पुणे-स्थित विक्रम मक्कर हे रसायन अभियंता (केमिकल इंजिनिअर) असून त्यांनी युनायटेड किंग्डममधून (युके) रबर टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तंत्रज्ञ असलेल्या विक्रम यांना रबर उद्योगाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पश्चिम जर्मनीतील सीम्पेलकाम्प, तसेच अन्य प्रतिष्ठित कंपन्यांतून पूर्ण केले आहे. मकर यांनी याआधी ‘एआयआरआयए’च्या तंत्रशिक्षण समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले असून आजवर त्यांनी ‘एआयआरआयए’च्या उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

रबर उद्योगातील उत्तम कामगिरीचा पूर्वेतिहास असलेल्या विक्रम यांना प्रकल्प अंमलबजावणी, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्याकडे प्रक्रिया व संमिश्रण यातील तांत्रिक स्पर्धात्मकता, तसेच उत्पादन व खरेदी यातील कौशल्यही आहे. श्री. मक्कर हे तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज कंपनी भारतातील कन्व्हेयर बेल्ट्सची एक सर्वांत मोठी उत्पादक म्हणून उदयाला आली आहे.

‘एआयआरआयए’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना श्री. मक्कर म्हणाले, “एआयआरआयए पुढील वर्षाच्या सुरवातीस इंडिया रबर एक्स्पो प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सज्ज होत असतानाच माझी या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे प्रदर्शन आशियातील अशा स्वरुपाचे सर्वांत मोठे असून ते मुंबईत १७ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. रबर उद्योगातील बहुप्रतिक्षीत कार्यक्रमांपैकी ठरलेले हे प्रदर्शन आम्हाला याखेपेसही प्रचंड यशस्वी करुन दाखवायचे आहे.”

व्यंगात्मक चारोळ्यांनी ‘गणेशकला’त हास्यकल्लोळ

0
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे पद्मश्री सुरेंद्र शर्मा व सहकाऱ्यांचे हास्य कवी संमेलन
पुणे : राजकारणापासून समाजकारणापर्यंत, संस्कृतीपासून अध्यात्मापर्यंत, व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत अनेक गोष्टींवर व्यंगात्मक टिपण्णी करत त्यांनी श्रोत्यांना हसायला लावतानाच अंतर्मुख व्हायला लावले. छोट्या छोट्या चारोळ्यांतून झालेल्या विनोदांनी गणेश कला क्रीडा मंच हास्यमय झाला. कवींचे अफलातून सादरीकरण आणि पोटभर खळाळून हसत, टाळ्यांच्या गजरात श्रोत्यांची मिळालेली दाद यामुळे सभागृह कवितेच्या विश्वात रममाण झाले.
निमित्त होते, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग यांच्या वतीने आयोजित, सिस्का एलईडी प्रायोजित हास्यकवी संमेलनाचे. क्लबच्या वतीने गरिबांसाठी चालविण्यात येणाऱ्या ‘सारस डायलिसिस सेंटर’च्या निधी उभारणीकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या दोनशे रुपयांत डायलिसिसची सुविधा या सेंटरवर उपलब्ध करून दिली जाते. पद्मश्री सुरेंद्र शर्मा, शंभू शिखर, महेंद्र अजनबी, पद्मिनी शर्मा व चिराग जैन यांनी ‘एकसे बढकर एक’ कविता सादर करीत श्रोत्यांची ‘वाहवा’, ‘बहोत अच्छे’ अशी उत्स्फूर्त दाद मिळवली. जवळपास २००० श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्तम केटरर्स यांनी उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
या कार्यक्रमावेळी धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल, सचिव संतोष पटवा, खजिनदार दीपाली गांधी, उत्कर्ष गांधी, आशा ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारस डायलिसिस सेंटरला भरघोस देणगी देणाऱ्या दिलेर ग्रुपचे सबीरभाई दिलेर, अष्टेकर ज्वेलर्सचे नितीन अष्टेकर, अशोक अष्टेकर, योगेंद्र अष्टेकर, उत्तम केटरर्स, नगराज गुंदेचा, श्रीजी फौंडेशनचे हरिभाई पटेल, जगदीश जैन, रमेश सोनिग्रा, जयंतीभाई ओसवाल, आशा-प्रवीण ओसवाल, विक्रम ओसवाल यांच्यासह गेली १० वर्षे मोफत डायलिसिस करणारे डॉ अभय सदरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
शंभू शिखर यांनी दिल्ली, बिहारमधील राजकारणासह देशातील राजकीय वातावरणावर बिहारी शैलीत टिप्पणी करीत श्रोत्यांना हसवले. त्यांच्या गायकी स्वरातील कवितांनी कार्यक्रमात रंगात आणली. पद्मिनी शर्मा यांनी कवितेतून शृंगार, त्यागभावना, प्रेम, कोमलता, स्त्रीचे कर्तृत्व प्रकट केले. पती-पत्नीच्या नात्यावर हळुवार फुंकर घालत सगळ्याच वयोगटातील पुरुषी आणि स्त्री मानसिकतेवर त्यांनी भाष्य केले. महेंद्र अजनबी यांनी विसरभोळेपणा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद यावर भाष्य करीत सभागृहाला हसवले. चिराग जैन यांच्या आईवरील कवितेने श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले, तर राजकीय भाष्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. सुरेंद्र शर्मा यांच्या ‘एंट्री’लाच उपस्थितांनी दाद देत स्वागत केले. सर्वच क्षेत्रातील व्यंगावर भाष्य करीत सुरेंद्र शर्मा यांनी प्रकाश टाकला. बदलती संस्कृती, तारुण्यातील दिवस, कुटुंबव्यवस्था, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदींवर भाष्य करीत श्रोत्यांना अंतर्मुख व्हायला लावले.
रमेश शहा म्हणाले, “गरिबांना २०० रुपयांत डायलिसिसची सुविधा माझ्या प्रांतात मिळत आहे, याचा आनंद आहे. अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा या सेंटरमुळे हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अतिशय मोठे सामाजिक काम उभारून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य सारसबाग क्लब करीत आहे.”
श्री देशमुख म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून डायलिसीस सेंटरचे काम पाहत आहे. अतिशय उत्तम पद्धतीने हे काम सुरु आहे. धकाधकीच्या जीवनातून तणावमुक्त होण्यासाठी आजचा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम महत्त्वाचा असून, दानशूर लोक पुढे आले तर ही डायलीसीस सुविधा मोफत देणे शक्य होईल.”
सुरेंद्र शर्मा म्हणाले, “डायलिसीस सेंटर हे एक मंदिर आहे. येथे जीवनदान मिळालेल्या व्यक्तीत ईश्वर आहे. त्यामुळे दगडी देवाच्या मंदिरात देणग्या देऊ नका. दोनशे रुपयात डायलिसीस करणाऱ्या या संस्थेला देणगी द्या. दुसऱ्याना हसवले, दुसर्‍याचे अश्रू पुसले तर ईश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो.” प्रवीण ओसवाल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. फतेचंद रांका यांनी सूत्रसंचालन केले.

महिन्यातील प्रत्येक रविवारी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

0

पुणे- 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित, 1 सप्टेंबर,2018 ते 30 ऑक्टोबर,2018 या
कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक विभागातर्फे हाती घेण्यात आला आहे.
जिल्हयातील नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी फॉर्म क्रमांक 6,7,8 व 8अ वाटप करुन, आलेले फॉर्म या
मोहिमेमध्ये जमा करुन घेण्यात येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजेच दिनांक 7,14,21 व
28 ऑक्टोबर,2018 रोजी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिम दिन राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, पुणे यांनी
दिलेले आहे.
त्यानुसार, ऑक्टोबर-2018 महिन्यातील सर्व रविवारी, जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर 7,14,21 व 28
ऑक्टोबर,2018 रोजी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून सकाळी 10 ते सायंकाळी 5
वाजेच्यादरम्यान फॉर्मचे वाटप करण्यात येऊन, आलेले फॉर्म जमा करुन घेणार आहेत. त्याचप्रमाणे 18 ते 19
वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये ऑक्टोबर,2018 मध्ये प्रत्येक
मंगळवारी मोहिम घेण्यात येऊन, नवमतदारांचे फॉर्म जमा करुन घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घेऊन
मतदार यादीमध्ये नांव नोंदवावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.

रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले ‘तू अशी जवळी राहा’चे शीर्षक गीत

0

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे झाली आहे कारण नुकतंच झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ‘तू अशी जवळी राहा’ ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीरची भूमिका निभावत आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारत आहे,  जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. दोघांच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोरील आव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे.

या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकच श्रवणीय आहे. त्याची एक झलक झी युवाच्या सोशल मीडियावर टिझर रूपात पोस्ट केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या भलतच पसंतीस पडलं आहे. हे गाणं संगीत सम्राट पर्व १ चा निवेदक आणि सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन कौर यांनी गायलं आहे. मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी गाणी देऊ केलेल्या संगीतकार अविनाश विश्वजित या जोडीने या शीर्षक गीताला चालबद्ध केले आहे. गाण्याला त्याच्या शब्दांमुळे अर्थ येतो आणि या गाण्याचे बोल तितकेच सुंदर आहेत जे वैभव जोशी यांनी लिहिलेत.

या शीर्षक गीताबद्दल बोलताना रोहित राऊत म्हणाला, “तू अशी जवळी राहा मालिकेचं शीर्षक गीत हे मालिकेला अगदी साजेसं आहे आणि ते प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. संगीत सम्राट पर्व २ची स्पर्धक हरगुनसोबत मी पहिल्यांदा गाणं गायलं आहे आणि हरगुनने तिला मिळालेल्या या संधीचं सोनं केलंय. आम्ही दोघे देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.”

संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन म्हणाली, “संगीत सम्राट पर्व २ मुळे मला ही सुवर्णसंधी मिळाली. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश विश्वजित आणि लोकप्रिय गायक रोहित राऊत या महारथींसोबत गायचा माझा पहिला अनुभव होता आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी झी युवाची आभारी आहे.”

कोल्हापुरात महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा !

0

8 व 9 ऑक्टोबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार प्रयोग

कोल्हापूर – महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत यंदाच्या दोन दिवशीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी सकाळी पुणे, दुपारी कोल्हापूर तर मंगळवारी बारामती परिमंडल असे एकूण तीन नाट्यप्रयोग सादर होणार असून, नाट्यरसिकांसाठी प्रवेश विनामुल्य असणार आहे.

सोमवारी सकाळी 10.30 वाजता प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या हस्ते ‘आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 2018-19’चे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर लगेच सकाळी 11 ते 2 या वेळेत पुणे परिमंडलाचे वसंत कानेटकर लिखीत ‘प्रेमात सगळंच माफ’ नाटक सादर होईल. सायंकाळी 5 ते 8 या वेळेत कोल्हापूर परिमंडलाचे शिवाजी देशमुख लिखीत तुफान विनोदी ‘कार्टी नं-1’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

मंगळवारी (दि.9) सकाळी 11 ते 2 कालावधीत बारामती परिमंडलाचे प्रा. अनिल सोनार लिखित ‘वाट चुकलेला नवरा’ हे नाटक सादर केले जाणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तर सायंकाळी 4.30 वाजता प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल. यावेळी मुख्य अभियंते श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. सुनिल पावडे (बारामती) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाटकासाठी प्रवेश विनामुल्य असून महावितरण कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, निमंत्रित व नाट्यरसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, अधीक्षक अभियंते श्री. शैलेंद्र राठोर, श्री. संजय साळे, श्री. मनोज विश्वासे यांनी केले आहे.

वार, दिनांक वेळ नाटक
सोमवार, 8 ऑक्टो. स. 11 ते  2 प्रेमात सगळंच माफ
सायं.  5 ते  8 कार्टी नं-1
मंगळवार, 9 ऑक्टो स. 11 ते  2 वाट चुकलेला नवरा

स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍यस्‍तरीय दिवाळी अंक स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण कराडला -दिवाळी अंक संपादक अधिवेशन

0

कराड,  (प्रतिनिधी) – सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे येत्‍या रविवार दिनांक 7 आक्‍टोबर रोजी 15 वे दिवाळी अंक संपादक अधिवेशन व स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍यस्‍तरीय दिवाळी अंक स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

दिवा प्रतिष्‍ठान, सा. कराड वैभव, आणि कराड वैभव चॅरीटेबल फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महाराष्‍ट्र राज्‍य दिवाळी अंक संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन आणि पारितोषिक वितरण समारंभ कराड एस.टी. स्‍टॅण्‍ड समोरील  हॉटेल अलंकार सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे.

कार्यक्रमास राज्‍याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तथा सातारा जिल्‍ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सिक्‍कीमचे माजी राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, कराडच्‍या नगराध्‍यक्षा रोहिणी शिंदे, पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक अरूण सावळेकर, ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते आण्णासाहेब जाधव, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरत, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत हिडकल, ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

याच अधिवेशनात ‘दिवाळी अंक ‘काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्‍ये हास्‍यधमाल दिवाळी अंकाचे संपादक महेंद्र देशपांडे, निहार दिवाळी अंकाच्‍या संपादिका डॉ. स्‍नेहसुधा कुलकर्णी, गुंफण दिवाळी अंकाचे संपादक डॉ. गजानन चेणगे, मुंबईच्‍या नंदा फाऊंडेशनचे अध्‍यक्ष स्‍वप्‍नील वाडेकर, माजी सहायक पोलीस आयुक्‍त विनायकराव जाधव, बदलापूरच्‍या ग्रंथसखाचे अध्‍यक्ष श्‍याम जोशी हे सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्राचार्य गणपतराव कणसे हे करणार आहेत.

दिवसभर चालणा-या या अधिवेशनास उपस्थित राहण्‍याचे आवाहन दिवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये, कराड वैभव चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्‍यक्ष अॅड. धनंजय सिंहासने, प्रा.सुहास चवहाण, प्रा. गणपतराव कणसे यांनी केले आहे. अधिवेशनास आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर, वेदातंश्रीचे संपादक सुनील गायकवाड, साहित्‍य संपदाचे संपादक शिवाजीराव यादव,  मारुती विश्‍वास, विजय रणदिवे, अजित पडवळ, उल्‍हास पाटकर आदींसह इतर मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.

कोकण परंपरेतील ‘शक्ती -तुरे ‘ महामुकाबल्यात पुणेकर दंग !

0
पुणे :
अस्सल कोकणाच्या परंपरेतील शाहीरी अनुभव असलेल्या ‘शक्ती -तुरे’ महामुकाबल्याचा अनुभव घेताना पुणेकर दंग झाले !
शिवसेना पर्वती विभाग आणि सुरज लोखंडे (शिवसेना पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख) आयोजित या जंगी महामुकाबल्याने पुणेकरांची मने जिंकली.
शाहीर पूनम आगरकर आणि शाहीर सुरज हरेकर यांच्या ‘शक्ती- तुरे’ संघात हा महामुकाबला झाला. पारंपारिक स्तवन, गण, गवळण, पद याने कार्यक्रमाला रंगत आणली.खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे यांनी लोकनृत्य कलाकारांचा सत्कार याप्रसंगी केला. यावेळी निलेश गिरमे (शिवसेना विभाग प्रमुख खडकवासला मतदारसंघ) हे उपस्थित होते.
‘शक्ती’ म्हणजे आदी माया पार्वती चे रूप तर ‘तुरे’ म्हणजे श्रीकृष्ण चे रूप. प्रथम शक्तीवाले यांनी नृत्य सादर केले, त्यानंतर  तुरेवाले यांनी आपले सादरीकरण केले .
महिला शाहीर चमूचे (शक्तीवाले) नेतृत्व शाहीर पूनम आगरकर यांनी केले. तर पुरुष शाहीर चमूचे नेतृत्व सुरज हरेकर ( तुरेवाले ) यांनी केले.
या दोन्ही शाहिरी चमूंचा सत्कार शिवसेनेचे पर्वती मतदार संघ विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी केला.
पुण्यातील कोकणवासीयांचा मेळाच जणू या निमिताने गणेश कला क्रिडा केंद्र येथे भरला होता.

शनायाचा हटके अंदाज

0

आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच झी मराठी वरील प्रेक्षकांच्या आवडत्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या यशाचं गमक आहे. नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आहे. रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

ईशा खऱ्या आयुष्यात ईशाला देखील शनायासारखीच शॉपिंगची आवड आहे. ईशाचा स्टाईल सेन्स देखील शनायासारखाच एकदम हटके आहे. याचा अंदाज नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ नामांकन सोहळ्यात सगळ्यांना आला. या सोहळ्याची थीम निऑन आणि पॉप अशी होती आणि ईशा त्या थिमला अगदी अनुसरून तयार होऊन आली. इतकंच नव्हे तर तिची स्टाईल सगळ्या कलाकारांपेक्षा वेगळी असल्यामुळे ईशाने संपूर्ण सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ईशाने या सोहळ्यात एक निऑन फ्लोरोसंट कलरचा आऊटफिट परिधान केला असून त्यावर तिने एक गुलाबी रंगाचा बोआ आणि गुलाबी रंगांचा विग देखील घातला होता. ईशाची ही हटके स्टाईल सगळ्यांना आवडली आणि ईशाने तितक्याच कॉन्फिडन्टली तिचा लुक कॅरी केला. ईशाला या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोकृष्ट खलनायिका आणि सर्वोकृष्ट विनोदी व्यक्तिरेखा या विभागात नामांकनं आहेत.

प्रत्येकाच्या आतील गांधी बाहेर आला तर हुकूमशाही भूईसपाट होईल: निखिल वागळे

0
पुणे :’२o१४ नंतर देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असून , नागरी स्वातंत्र्यांवर घाला येत आहे, या बेबंद सत्तेचा फटका प्रत्येकाला बसल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सर्वांनी विरोधात लोकशक्ती उभी केली पाहिजे,प्रत्येकाच्या मनातील गांधी जागृत होऊन असंतोष व्यक्त होईल, तेव्हा हुकूमशाही भूईसपाट होईल ‘,
असे प्रतिपादन पत्रकार निखिल वागळे यांनी केले.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ मध्ये ‘ अघोषित आणीबाणीचे आव्हान ‘ या विषयावर ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ.कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.
हा कार्यक्रम गांधीभवन येथे शुक्रवारी सायंकाळी झाला.
निखिल वागळे म्हणाले, ‘आजूबाजूची परिस्थिती श्वास कोंडावा अशी आहे. नागरिकांचे मूलभूत, घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. इंदिरा गांधींनी बहुमत वापरुन घटनात्मक मार्गाने आणीबाणी आणली, आणि नागरी स्वातंत्र्यावर आघात केला. तशी आणीबाणी आणणे आता नेत्यांना शक्य नाही.
आणीबाणीत माध्यमांनी अपवाद वगळता लढा दिला नव्हता, आताही माध्यमे अघोषित आणीबाणीत घाबरत आहेत. तेव्हाही अनेक आदरणीय मंडळी आणीबाणीयुक्त हुकूमशाहीच्या प्रेमात होती.आजही मध्यमवर्ग झोपलेला आहे. अवतीभवती काय घडते आहे, याची कल्पना त्याला येत नाही .
कॉंग्रेसच्या अनेक चुका घडत होत्या. मनमोहन सिंह राजकारणी म्हणून कमी पडले. म्हणून जनता मोदींच्या प्रेमात पडली.’स्ट्राँग ‘ वाटणारया नेत्याने प्रश्न सोडवले असते, तर हिटलरला आत्महत्या करावी लागली नसते.
अंबानी सर्व पक्षांच्या सरकारांबरोबर होते , या सरकारबरोबर देखील आहेत .इतके की,एक दिवस या देशाचे नाव ‘ अंबानी इंडिया ‘ झाले तर आश्चर्य वाटणार नाही .२०१४ ची निवडणूक मोदी, क्रोनी कॅपिटलिस्ट आणि मीडियाने लढवली.
मोदींच्या काळात पी. साईनाथ , वरद राजन, बॉबी घोष, पुण्यप्रसून वाजपेयी पासून अनेक पत्रकारांना राजीनामे द्यावे लागले. २०१३ नंतर मालक मंडळींचे संपादकांना भाजपा नेत्यांच्या मर्जीप्रमाणेे  बदल केले.२०१४ नंतर चॅनेलमधील , वृत्तपत्रातील संपादक दबावाने बदलले गेले.
म्हणून असे वाटते की ,एक तरी रामनाथ गोएंका आजच्या काळात असायला हवा होता.
केवळ मोदीच नाही, तर फडणवीस पण सेन्सॉरशीप आणत आहेत. त्यांचे चॅनेलला फोन जात असतात. कॉंग्रेसच्या काळात दबाव येत असे, पण, ते नोकरीला हात लावत नव्हते. राणा अयूब, रवीश कुमार वर ट्रोलिंग होते. शिलाँगमध्ये संपादकाच्या घरावर पेट्रोल बॉंब टाकले गेले. काही पत्रकारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले. आता, पत्रकारांना सुरक्षितता राहिली नाही. आता ‘ प्रेस फ्रिडम ‘ नाही तर , ‘प्रेझ फ्रिडम ‘ आहे. ( स्तुतीचे स्वातंत्र्य आहे )
वायर, स्क्रोल सारखी पर्यायी माध्यमे, आणि समाज माध्यमांमुळे काही आशा आहे. पण, त्यावरही चीनसारखी बंधने येऊ शकतात.
ते पुढे म्हणाले, ‘कन्हैयाकुमार, उमर खालिद वर खोटे आरोप केले.अखलाख, मोहसिन शेख, जुनेद, रोहित ,भीम आर्मीचा प्रमुख चंदशेखर रावण यांचे नागरी स्वातंत्र्य कोणी हिरावले? रोहित वेमुलाला आत्महत्या करायला कोणी भाग पाडले.दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी,गौरी लंकेश  मारेकऱ्यांना शिक्षा झाली का ? एकबोटेना जामीन मिळतो, आणि भिडे मोकळे जाते, हे कसे काय. ‘ प्लॉट टू किल पीएम ‘ चे पुराव्यांचे चार महिन्यात काय झाले ?  न्या.धनंजय चंद्रचूड यांनी निकालपत्रात पुणे पोलिसांचे वस्त्रहरण केले आहे. तरी ‘ हा आमचा विजय आहे, असे तद्दन खोटे  फडणवीस बोलत आहेत.
 दोन ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा आवाज बंद केला जातो.केंद्रीय मंत्रीमंडळ स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही.
पण, हा वैविध्य असलेला बहुपेडी देश असल्याने हुकूमशाहीने चालवता येणार नाही.
गांधींबद्दल बोलताना वागळे म्हणाले, ‘गांधी हे बदलाला तयार असलेले व्यक्तीमत्व होते.स्वतंत्र भारतात गांधीवादी, आणि गांधी विरोधकांनीही गांधींचा खून केला, पण तरीही गांधी संपले नाहीत. गांधींवर टीका करता येते, हे त्यांचे मोठेपण आहे. ‘

जुना बाजारातील दुर्घटना -रेल्वेसह महापालिकाही अपराधी – अविनाश बागवे (व्हिडीओ)

0

पुणे- जुना बाजार चौकातील रेल्वेच्या भूखंडावरील ‘त्या ‘बेकायदेशीर होर्डींग्ज वर स्वतः कारवाई करून महापालिकेने ती काढून घेतली असती तर कदाचित आजची दुर्घटना घडली नसती .रेल्वे प्रशासनाबरोबर ,महापालिकेचे प्रशासनही आजच्या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप आज येथे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.

रेल्वे च्या जागेत सर्व नियम ,कायदे पायदळी तुडवून ,केवळ पैसे मिळतात म्हणून असे जाहिरात फलक लाव्यात आले . अशा बेकायदा ,नियम मोडून उभारलेल्या जाहिरात फलकांविषयी बागवे हे गेली काही वर्षांपासून महापालिकेच्या मुख्य सभेत आवाज उठवीत आले आहेत. अशा प्रकरचे बेकायदा  ९० टक्के फलक असयाचे त्यांचे म्हणणे आहे .सरकारने घालून दिलेले नियम अटी केवळ कागदावरच ठेवून केवळ पैसे मिळतात महसूल मिळतो म्हणून या फलकांवरील कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयाला देखील अशा फलकांविषयी चुकीची माहिती देवून धूळफेक केली जाते. असेही त्यांचे म्हणणे आहे .रेल्वेच्या जागेत असलेल्या या जाहिरात फलकावर कारवाई साठी महापालिकेने केवळ नोटीसा दिल्या . आणि प्रत्यक्षात कारवाई मात्र केली नाही . जर कारवाई करून ते महापालिकेने स्वतः काढून टाकले असते तर जास्त मनुष्यबळ ,आणि आवश्यक दक्षता घेवून योग्य वेळ ठरवून हे होर्डिंग निघाले असते . आणि अशी दुर्घटना घडू शकली नसती . रेल्वे तर बेकायदा फलक विषयी जबाबदार आहेच पण कारवाई च्या कामत निव्वळ दिखाऊपणा करून प्रत्यक्षात कारवाई टाळल्याने महापालिका देखील तेवढीच दोषी आहे असे म्हणणे बागवे यांनी मांडले आहे .पहा आणि ऐका ..बागवे यांनी काय म्हटले आहे . 

अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा कोसळला- निष्पाप जीव प्राणाला मुकले …(व्हिडीओ)

पुणे-.. घराबाहेर पडलेला माणूस किती सुरक्षित ? असा प्रश्न उपस्थित होईल अशा शहराकडे वाटचाल करू पाहणाऱ्या या शहरात आज अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे जुना बाजार चौकातील जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा चौकात सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनांवर आणि वाहनचालकांवर कोसळला आणि क्षणार्धात आपल्या आणि आपल्या व्यक्तींच्या पु ढील आयुष्याची स्वप्ने पाहणारी,त्यासाठी जीवनाशी झगडा देत असलेली काही निष्पाप जीव हकनाक अगदी निघृण रित्या बळी पडले. तर काही जखमी अवस्थेत आणखी आपल्या आयुष्यातील खडतर जीवनातल्या जीवघेण्या वळणावर पोहोचले .
जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी पावणेदोन च्या सुमारास कोसळले असून यात संध्याकाळ पर्यंत असे समजले कि तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊजण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
शाहीर अमर शेख चौकात ,रेल्वे च्या जागेत रस्त्याकडे तोंड करून अनेक मोठेजाहिरात फलक बेकायदेशीरपणे कित्येक वर्षांपासून बिनदिक्कत लावण्यात आले. यापोटी पैसा किंवा महसूल मिळतो म्हणून रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांनी यावर किरकोळ कातडीबचाउ ,दिखाऊ कारवाई सुरु ठेवली .आज रेल्वेशी करार संपल्याने येथील जाहिरात फलक खालून कापून काढण्यात येत होते ते हि भर दिवसा … आणि कोणाचीही परवानगी न घेता ..दक्षतेच्या उपाय योजना न करता .. यातील एक मोठे लोखंडी होर्डिंग दुपारी कोसळले. दुपारी लोखंडी होर्डिंगचे कटिंग सुरु असताना ही घटना घडली. या होर्डिंगखाली एकूण ११ जण सापडले होते. यातील तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे . तर नऊ जण जखमी झाल्याचे समजले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पुढील सोपस्कार सुरु झाले .
 
मृतांची नावे..समजल्यानुसार ..
शाम धोत्रे (वय ४८)
शामराव राव कासार (वय ७०)
शिवाजी देविदास परदेशी (वय ४०)
 
गंभीर जखमी
किरण ठोसर (वय २२)
यशवंत खोबरे (वय ४0)
महेश येशवेकर (वय ५०)
रुक्मिणी परदेशी (वय ५५)
देवांश परदेशी (वय ४)
समृद्धी परदेशी (वय 16)
जावेद खान (वय ४५ )
उमेश मोरे (वय ५५
कैलास गायकवाड (वय ३५ )
होर्डिंग कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली होती. चौकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोसळलेले लोखंडी होर्डिंग हे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने हे होर्डिंग काढण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले होते. होर्डिंग लावताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आक्षेप होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या पत्रांची दखलच घेतली नाही, असा आरोप महापालिका अधिकारी करत आहेत.
दरम्यान बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी किरण जाधव(वय ३६ रा. मुंढवा रोड )यांची फिर्याद दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक मुजावर अधिक तपास करीत आहेत.

…तर पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही -11 गावांच्या विकासासाठी आक्रोश आंदोलन (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेत नवीन 11 गावे समाविष्ट होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले मात्र हे गाव अजून देखील विकासापासून वंचित आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून या वर्षपूर्ती ऐवजी  सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालून आक्रोश आंदोलन करत , १०० कोटीच्या कामांना तातडीने सुरुवात करा अन्यथा पालकमंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला .

 राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .कमलताई ढोले पा.रवींद्र माळवदकर ,युवराज बेलदरे,नितीन कदम,सुनील टिंगरे ,दिलीप बराटे ,दत्ता धनकवडे ,योगेश ससाणे,रुपाली चाकणकर,बाप्पू पठारे ,संजय गाढे पा. योगेश वऱ्हाडे  आदी मान्यवर कार्यकर्ते आणि 11 गावांमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक

पाणीकपात म्हणजे पुणेकरांवर सूड उगविण्याचा प्रकार – चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)

0

पुणे- धरणे भरली असताना ,पुरेपूर पाऊस झाला असताना , केवळ २४ तास पाणीपुरवठा योजनेतील  भ्रष्टाचाराचे मनसुबे विरोधकांनी उधळून लावले आणि कालवा फुटी मुळे पाणी चोरी उघड होण्याची भीती निर्माण झाली … त्यामुळे उध्वस्त मनाच्या सत्ताधारी भाजपने पाणीकपात लादून पुणेकरांवर सूड उगविण्याचा पराक्र चालविला आहे असा आरोप विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे.जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री यांना नियोजन जमत नसल्याचा आरोप हि त्यांनी केला . पहा आणि ऐका नेमके  त्यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …