पुणे- महापालिकेत नवीन 11 गावे समाविष्ट होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले मात्र हे गाव अजून देखील विकासापासून वंचित आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून या वर्षपूर्ती ऐवजी सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालून आक्रोश आंदोलन करत , १०० कोटीच्या कामांना तातडीने सुरुवात करा अन्यथा पालकमंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .कमलताई ढोले पा.रवींद्र माळवदकर ,युवराज बेलदरे,नितीन कदम,सुनील टिंगरे ,दिलीप बराटे ,दत्ता धनकवडे ,योगेश ससाणे,रुपाली चाकणकर,बाप्पू पठारे ,संजय गाढे पा. योगेश वऱ्हाडे आदी मान्यवर कार्यकर्ते आणि 11 गावांमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .
पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक