पुणे :
अस्सल कोकणाच्या परंपरेतील शाहीरी अनुभव असलेल्या ‘शक्ती -तुरे’ महामुकाबल्याचा अनुभव घेताना पुणेकर दंग झाले !
शिवसेना पर्वती विभाग आणि सुरज लोखंडे (शिवसेना पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख) आयोजित या जंगी महामुकाबल्याने पुणेकरांची मने जिंकली.
शाहीर पूनम आगरकर आणि शाहीर सुरज हरेकर यांच्या ‘शक्ती- तुरे’ संघात हा महामुकाबला झाला. पारंपारिक स्तवन, गण, गवळण, पद याने कार्यक्रमाला रंगत आणली.खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे यांनी लोकनृत्य कलाकारांचा सत्कार याप्रसंगी केला. यावेळी निलेश गिरमे (शिवसेना विभाग प्रमुख खडकवासला मतदारसंघ) हे उपस्थित होते.
‘शक्ती’ म्हणजे आदी माया पार्वती चे रूप तर ‘तुरे’ म्हणजे श्रीकृष्ण चे रूप. प्रथम शक्तीवाले यांनी नृत्य सादर केले, त्यानंतर तुरेवाले यांनी आपले सादरीकरण केले .
महिला शाहीर चमूचे (शक्तीवाले) नेतृत्व शाहीर पूनम आगरकर यांनी केले. तर पुरुष शाहीर चमूचे नेतृत्व सुरज हरेकर ( तुरेवाले ) यांनी केले.
या दोन्ही शाहिरी चमूंचा सत्कार शिवसेनेचे पर्वती मतदार संघ विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी केला.
पुण्यातील कोकणवासीयांचा मेळाच जणू या निमिताने गणेश कला क्रिडा केंद्र येथे भरला होता.

