Home Blog Page 1544

कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांना अश्रू अनावर ; म्हणाले – सोनिया मला तुरुंगात भेटण्यास आल्या होत्या

बंगळुरू-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. काँग्रेसच्या या विजयाबद्दल पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले – या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला.

असे म्हणतात राहुल गांधी यांनी असे जिंकले ..तेव्हाच विजय निश्चित झाला

डी के शिवकुमार यांचा त्यांच्या कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा पराभव केला. विजयाची माहिती मिळताच शिवकुमार यांनी ईश्वराचे आभार मानले. तसेच मंदिरात माथा टेकून आपल्या घराच्या बाल्कनीतून समर्थकांचे अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी रडतच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण काढली.

डी के शिवकुमार म्हणाले की, ‘मी या विजयाचे श्रेय यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना व नेत्यांना देतो. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. मी राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांना काँग्रेसच्या विजयाचे आश्वासन दिले होते.’हे बोलताना शिवकुमार आपल्या तुरुंगवासाची आठवण काढत भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले व गळाही भरून आला. ते म्हणाले – ‘सोनिया गांधी मला भेटण्यासाठी तुरुंगात आल्या होत्या. मी हे विसरू शकत नाही. मी पदावर राहण्यापेक्षा तुरुंगात राहण्याची निवड केली. पक्षाचा माझ्यावर एवढा विश्वास होता.’

डी के शिवकुमार यांना राजकारणात ‘कनकपुरचा अभेद्य दगड’ म्हणूनही ओळखले जाते. काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते असणारे डी के कायम हायकमांडच्या संपर्कात असतात. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा मोठा विश्वास आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे शिवकुमार 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेत. यावेळीही त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. डी के शिवकुमार विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय आहेत.

‘ये मोहब्बत कि जीत ..नफरत कि हार’म्हणाले राहुल गांधी

नवी दिल्ली-“आम्ही कर्नाटकत्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती. आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू”, अशा शब्दांत राहुल गांधींनी जनतेला आश्वस्त केलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. ‘कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,’ असे ते म्हणाले.

द्वेषाचा बाजार उठला, प्रेमाचा भरला

राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले – ‘सर्वप्रथम मी कर्नाटकच्या जनतेला, तथा या निवडणुकीत अपार कष्ट उपसणाऱ्या तेथील कार्यकर्त्यांना व नेत्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे धनदांडग्या भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीबांची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. यापुढे हेच संपूर्ण देशात घडेल. काँग्रेस या निवडणुकीत गरीबांच्या बाजूने उभी होती. हा सर्वांचा विजय आहे. हा कर्नाटकच्या विजयाचा विजय आहे. मतदारांचे मनस्वी आभार.’

मतदारांना दिलेली आश्वासने पहिल्याच बैठकीत पूर्ण

‘कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठला असून, प्रेमाचा बाजार भरला आहे. आम्ही ही निवडणूक घाणेरड्या शब्दांचा वापर करून लढली नाही. कर्नाटकच्या जनतेला आम्ही 5 आश्वासने दिली होती. ती पहिल्याच दिवशी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत पूर्ण केले जातील. मी पुनःश्च कर्नाटकच्या मतदारांचे आभार मानतो,’ असेही ते यावेळी म्हणाले.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणेकरांनी गाठला लाखाचा टप्पा

राज्यात आघाडी; १ कोटी २० लाख रुपयांची वार्षिक बचत

पुणे, दि. १३ मे २०२३: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे एक लाख सात वीजग्राहकांची तब्बल एक कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

गेल्या फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या पर्यावरणस्नेही ७ हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात ३ लाख ८७ हजार ७५७ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुणे परिमंडलामध्ये सर्वाधिक १ लाख ७ त्यानंतर कल्याण- ४२ हजार २१४ व भांडूप परिमंडलामध्ये ३७ हजार ३९६ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील ६ हजार ५०, वडगाव धायरी- ५ हजार १८४, धनकवडी– ४ हजार ९००, औंध- ४ हजार ३६५ आणि विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३ हजार ८५७ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘गो-ग्रीन’मध्ये २९ हजार २०५ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ९ हजार ४२, चिंचवड – ५ हजार ६६१ आणि आकुर्डी- ५ हजार ५२५ मोठ्या संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १७ हजार ५२९ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४ हजार ७१२ वीजग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

‘समृद्ध पर्यावरणासाठी ‘गो-ग्रीन’ योजना काळाची गरज आहे. ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल, भरणा तसेच मासिक वीज वापर आदींची माहिती महावितरण मोबाईल ऍप व वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून या योजनेत आणखी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे’.

 – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.

अशोक लेलँडचा महाराष्ट्रात विस्तार – पुण्यात दोन नव्या डीलरशीप्सचे उद्घाटन

नवीन डीलरशीप्स महाराष्ट्रातील ९६ वे टच पॉइंट्स आणि अशोक लेलँडसाठी पश्चिम भारतातील १२८ वे टच पॉइंट्स

पुणे१३ मे २०२३ – अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची भारतातील प्रमुख कंपनी आणि व्यावसायिक वाहनांची भारतातील आघाडीची उत्पादक असून कंपनीने नुकतेच तीन नव्या डीलरशीप्सचे उद्घाटन केले. या दोन्ही डीलरशीप्स पुण्यातील मोशी आणि सोलापूर रस्त्यावर वसलेल्या पगारिया ऑटो प्रा. लि. च्या असून 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) प्रकारच्या आहेत. या दोन्ही डीलरशीप्स मोक्याच्या ठिकाणी अनुक्रमे ४०,००० आणि ६०,००० चौरस फुट जागेत वसलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईनागपूरसुरतअहमदाबादसोलापूरबेंगळुरू आणि हैद्राबाद अशा सर्व शहरांशी त्यांना चांगला कनेक्ट ठेवता येणार आहे. नव्याने लाँच करण्यात आलेले डीलरशीप आउटलेट एम अँड एचसीव्ही क्षेत्राला सेवा देईल. मध्य महाराष्ट्रामध्ये कंपनीचा विस्तार करण्यासाठी या डीलरशीप महत्त्वाच्या ठरणार आहेत.

या क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अशोक लेलँड पुण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुसज्ज डीलरशीप्स आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करणार आहे. दोन्ही डीलरशीप्समध्ये १० बेआधुनिक साधनेजलद सेवा देणारे बेदर्जेदार पायाभूत सुविधा आणि चांगल्या ग्राहक अनुभवासाठी उपकरणे देण्यात आली आहेत. त्यामुळे कंपनीला आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा देणे शक्य होईल.

डीलरशीप लाँचविषयी अशोक लेलँडच्या एमएचसीव्ही विभागाचे प्रमुख श्री. संजीव कुमार म्हणाले, ‘अशोक लेलँडसाठी महाराष्ट्र महत्त्वाची बाजारपेठ आहे. या भागात मजबूत स्थान तयार करण्यासाठी दोन नव्या डीलरशीप्स लाँच करण्यात आल्या आहेत. पगारिया ऑटो प्रा. लि. आपल्या नव्या 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) सेवांच्या मदतीने ग्राहकांना चांगली सेवा देतील याची खात्री आहे. ग्राहक सेवा आणि समाधान उंचावण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी नव्या डीलरशीप सुरू करण्यात आल्या आहेत. या डीलरशीप्स कंपनीच्या जगातील पहिल्या १० सीव्ही उत्पादकांपैकी एक बनण्याच्या ध्येयाचाच एक भाग आहेत.’

याप्रसंगी पगारिया ऑटो प्रा. लि. चे प्रोप्रायटर श्री. राहुल पगारिया म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात अशोक लेलँडने आपले बळकट स्थान निर्माण केले आहे. नवी डीलरशीप दालने मोक्याच्या ठिकाणी वसलेली आहेत. अशोक लेलँडने त्यांची उत्पादने व तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. अत्याधुनिक 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) डीलरशीप्सच्या मदतीने कंपनी यापुढेही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत राहील.’

पगारिया ऑटो प्रा. लि. कंपनीच्या सर्वात विश्वासार्ह सपोर्ट सिस्टीम्सपैकी एक आहे. पगारिया ऑटोच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्रातील टच पॉइंट्सची संख्या ९६ वर गेली आहे.

अशोक लेलँडकडे सीव्ही क्षेत्रातील अतिशय मोठे आणि वेगाने विस्तारत असलेले नेटवर्क आहे. कंपनीच्या नेटवर्कमध्ये १७०० एक्सक्लुसिव्ह आउटलेट्स आणि प्रमुख हायवेवर प्रत्येक ७५ किलोमीटरवर अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. अतिरिक्त ५३,००० टचपॉइंट्सच्या मदतीने विक्रीपश्चात सेवा तसेच लेकार्टअलकेयर आणि आयअलर्टची टुल्स उपलब्ध करून जातात. यामुळे गरजेच्या वेळी ग्राहकांपर्यंत चार तासांत पोहोचण्याचे व केवळ ४८ तासांत त्यांचा प्रवास परत सुरळीत करण्याचे अशोक लेलँड क्विक रिस्पॉन्सचे आश्वासन जपण्यास मदत होते.

ॲप आधारीत वाहनांसाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

पुणे दि. १३: केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲप आधारित ॲग्रीगेटर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असून त्याविषयी नागरिकांनी आपले अभिप्राय कळवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

ॲप आधारीत वाहनांसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सुचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले अभिप्राय dvcommr.enf1@gmail.com या ई-मेलवर अथवा संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्षरित्या २० मे २०२३ पर्यंत सादर करावेत. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेऊन सूचना अंतिम करण्याविषयी शासनातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

जुन्नर-आंबेगाव उपविभागात राष्ट्रीय लोक अदालतीत १६४ प्रकरणे निकाली

पुणे, दि. १३: जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या मंचर येथील कार्यालयात महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी आयोजित केलेल्या विशेष लोक अदालतीत १६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे, अशी माहिती उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

या विशेष अदालतीत जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनिस, आंबेगावचे प्रभारी तहसिलदार अनंता गवारी, जुन्नर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गाडेकर, आंबेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गावडे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील अनेक विधिज्ञ व प्रकरणातील पक्षकार अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

या विशेष लोक अदालतीत ६९० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये तडजोड केली तसेच काही प्रकरणी लेखी युक्तीवाद दाखल करुन प्रकरण निर्णयासाठी ठेवण्यासाठी पक्षकारांनी मागणी केली. यावेळी दोन पक्षकारांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये तडजोड झाल्याने त्यांनी दाखल केलेला दावा पुढे सुरू ठेवायचा नाही असे सांगून अपील कामकाजातून निकाली काढावे म्हणून लेखी विनंती अर्ज दिला. त्यांच्या या सामंजस्याची दखल घेत सर्व गुबालपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या अदालतीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ व पक्षकार यांनी प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रचारक चित्रपटांचे बुमरँग:कॉंग्रेस १३० जागांवर पुढे तर भाजपा ६६ वर

बेंगलोर- एकीकडे पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरणारे ,मात्र दुसरीकडे जगभर फुशारकीचा दिंडोरा पिटवत अलिशान सफर करणारे पीएम अशी प्रतिमा तर दुसरीकडे प्रत्यक्षात महागाईने त्रस्त , बेरोजगारीने त्रस्त झालेल्या जनतेला कडव्या हिंदुत्वाचे डोस देऊन जातीयवादा कडे झुकविणारे प्रचारक चित्रपट आणि अन्य कृतीशील कार्यक्रम अशा बाबी भाजपच्या अंगावर येत असल्याचे दिसते आहे . तर कॉंग्रेसला मात्र राहुल आणि प्रियांका या बहिण भावाने सुरु केलेले प्रयत्न तारक ठरत असल्याचे दिसते आहे .आम जनतेवर , स्त्रियांवर बलाढ्य वर्गाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारी आक्रमक प्रियांका काही वर्षात जनतेने पाहिली तर रस्त्यावर घरोघरी, प्रवासात जन सामन्यात मिसळून त्यांच्याशी टीव्ही वरून नाही तर थेट संवाद करणारा राहुल जनतेने पहिला .या सर्व बाबीं निकालात प्रतिबिंबित होत असल्याचे दिसून येते आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावूनही त्यांना यावेळी काँग्रेसवर मात करता आलेली नाही . डबल इंजिन सरकारचे फायदे प्रत्येक ठिकाणी सांगण्याऐवजी पीएम मोदींना शिवीगाळ हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोही चालला नाही म्हणून बजरंगबलींना प्रचाराचा भाग बनवण्यात आले. मात्र, शनिवारी मतमोजणी सुरू असताना भाजपचे सारे आडाखे कोलमडलेले दिसून येत आहेत. काँग्रेसची बहुमताकडे वेगाने वाटचाल होताना दिसत आहे. 224 च्या विधानसभेत बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे. शनिवारी सकाळपासून काँग्रेसच्या जागा बहुमताच्या पुढे गेल्याचे हाती आलेल्या कलांवरून दिसत आहेत.

कर्नाटक निवडणुकीची तयारी भाजपने खूप आधीपासून सुरू केली होती. हिजाबचा वाद कर्नाटकातून सुरू झाला. बजरंग दल आणि विहिंप यांसारख्या संघटनांनी हिजाबबाबत तीव्र भूमिका घेतली. त्यानंतर तो देशभरात पसरला. हिजाबचा वाद हिंदू मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करेल, असे भाजपला वाटत होते. मात्र, तसे होताना दिसून आले नाही. निवडणुकीपूर्वी बसवराज बोम्मई यांच्या सरकारने मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मात्र, निकाल पाहता भाजपच्या या खेळीचाही काही उपयोग झाला आहे, असे वाटत नाही.

किशोर आवारे खून प्रकरण:राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे- तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ४८, ता. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांची शुक्रवारी (ता. १२) दुपारी पावनेदोनच्या सुमारास गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर व त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी फिर्याद दिली आहे.

किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. विशेष म्हणजे किशोर आवारे सुद्धा राजकारणात सक्रिय होते. त्यामुळेच त्यांचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यात अनेकदा खटके उडायचे. त्यामुळे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे किशोर आवारे यांनी आपल्या आईला सांगितले होते.

किशोर आवारे यांनी स्वतःचा वेगळा गट केला होता. त्यांनी आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांबाबत आंदोलनही केले होते. शिवाय ते संतोष शेळके यांच्यासोबत फिरत. आवारे यांचे वाढते राजकीय प्रस्थ पाहता त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

किशोर आवारे शुक्रवारी दुपारी मारुती मंदिरे येथील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेले होते. मुख्याधिकारी यांना भेटून झाल्यानंतर ते नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला, तर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. त्यात श्याम निगडकर आणि त्याचे तीन साथीदार असल्याचे समजते.

हल्ल्यात आवारे गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आवारे यांना सोमाटणे फाटा येथील पावना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हल्ल्याची माहिती मिळताच, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

अपेक्षेप्रमाणे कर्नाटकमध्ये काँग्रेसचाच बोलबाला,भाजपचा पराभव

काँग्रेस 122 जागांवर आघाडीवर

तमाम भारतातील थेट सामान्य लोकांशी भेटीगाठी घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न कॉंग्रेसच्या यशाचे खरे गमक आहे.त्याची एक झलक .भारत जोडो यात्रा तसेच प्रियांका गांधींनी काही राज्यात स्त्री हक्कासाठी आणि अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याची केलेली कृती अशा दोघा बहिण भावांचीच जनहितवादी ताकद कॉंग्रेसच्या पारड्यात यश टाकणार आहे.

बेळगाव-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघांतही काँग्रेसचाच बोलबोला दिसत आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय जवळपास निश्चत समजला जात आहे. सध्या काँग्रेस 122 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने मॅजिक फिगरच्या पुढे झेप घेतली आहे.12.10 वाजता हाती आलेल्या कलांनुसार भाजप 71 काँग्रेस122 आणि जेडीएस २५ जागांवर आघाडीवर असून इतर 6 जागांवर पुढे आहे. एकूणच काँग्रेसचा विजय दृष्टीपथामध्ये आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर देशातलं हे चौथं राज्य असेल.चलगिरा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार टी. रघुमूर्ती विजयी झाले आहेत. त्यांनी तब्बल 16 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

निकालापूर्वी प्रियांका गांधी यांचे सिमला येथे हनुमानाला साकडे

महापालिकेसमोर आपचे “कर वापसी आंदोलन”

पुणे-

” सवलत रद्द करून वाढीव मिळकत कर घेताना घाई आणि परत देताना मात्र दिरंगाई, जाचक अटी, 25 रुपये फी” अशा महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर “कर वापसी आंदोलन” करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच घोंगडं अजून भिजतच पडलेल आहे. स्वतः मिळकतीचा वापर करणाऱ्यांना मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत आधी काढून घेण्यात आली आणि नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर परत बहाल करण्यात आली. मात्र अजूनही ही सवलत कशा पद्धतीने द्यायची याच्या संदर्भात नेमकं कुणालाच काहीही कळत नाहीये. नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आता पुणे महापालिकेने यासाठी एक फॉर्म जारी केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ढीगभर कागदपत्रांची मागणी तसेच २५ रुपये फीची सुद्धा मागणी केलेली आहे. अगोदरच या महागाईच्या काळात सामान्य माणसाला या सरकारकडून गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सामान्य नागरिकांच्या कष्टाचे पैसे टॅक्स रुपी घेऊन आता तो परत करण्यासाठी नागरिकांकडून वाढीव माहिती मागत आहेत. मुळात यात नागरिकांचा काहीही दोष नाही. पुणे शहरातील नागरिकांना १९६९ पासून असलेली मिळकत करातील सवलत राज्य शासनाने २०१९ पासून बंद केली होती. आता पुन्हा सुरु केली. पण हे करताना भारतीय जनता पक्ष आणि मनपा प्रशासन या दोघांनी मिळून केलेला घातलेला हा गोंधळ आहे. आता या गोंधळामुळे नागरिकांची फरपट फरफट होत आहे.

अस्तित्वात असलेली सोपी मिळकत कर प्रणाली बदलून क्लिष्ट करण्याचा आणि अनेकांना मिळकत कराच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कष्टाचा पैसा प्रशासनाला परत द्यायचा आहे की नाही ? का फक्त नागरिकांसाठी काही तरी केल्याचा या प्रशासनाकडून आव आणला जात आहे ?

यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.

1) 2019 नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतदारांना 40% मिळकत कर सवलतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याचा आदेश रद्द करा. पुणे महापालिकेकडे सर्व मिळकतदारांची संपूर्ण ऑनलाईन माहिती आहे. असं असताना नागरिकांकडे वाढीव माहिती मागण्याची गरज नाही.

2) 2019 पासून घेतलेली वाढीव मिळकत कर रक्कम विनाअडथळा एकवट परत द्या. नागरिकांकडून वसूल केलेली वाढीव कराची रक्कम कोणताही अडथळा न आणता तातडीने परत द्यावी. त्यासाठी पालिकेने केलेले चार टप्पे हे नागरिकांच्या हिताच्या विरोधात आहेत.

3) नागरिकांकडून वाढीव कराच्या स्वरूपात तब्बल 250 कोटी रुपये वसूल केलेल्या पुणे महानगरपालिकेने स्व-मालकीच्या घरात राहणाऱ्या पुणेकरांवर कर सवलतीच्या अर्जापोटी अजून प्रत्येकी 25 रुपयाचा टाकलेला बोजा रद्द करा.

4) पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील मिळकतींना देखील 40% कर सवलत तातडीने लागू करावी.

पुणे महानगरपालिका समोर झालेल्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे राज्य संघटक, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सेंथिल अय्यर, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, साहील परदेशी, शेखर ढगे, रोहन रोकडे, अविनाश भाकरे, संजय भूमकर,अमित म्हस्के, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, मिताली वडावराव, उत्तम वडावराव, अमोल काळे, अक्षय दावडीकर, संजय कतारनवरे, चेंथील अय्यर, गणेश थरकुडे, तहसीन देसाई, मीरा बिघे, माधुरी गायकवाड, शिवाजी डॉलरे, फॅबियन अण्णा सेमसन, किशोर मजुमदार, सर्फराज मोमीन, अमोल मोरे, घनःश्याम मारणे, सूरज सोनावणे, जोगिंदर पाल तुरा, साजिद खान, राशीदा सिद्दिकी, समीर अरावडे, रऊफ शेख, राजू परदेशी, आरती करंजावने, धर्मेंद्र डोंगरे, अनिल घोणे, किरण कांबळे, निखिल नेरकर, मिलींद बागलकोटे, आनंद अंकुश, वीरेंद्र बिघे, ऋतूज बिघे, अनिल कोंढाळकर, हेमंत बिघे, विकास चव्हाण, निखिल देवकर, आसिफ बागवान, सुनिता शेरखाने, राजेंद्र साळवे, अमित राखपसरे, सुनंदा जाधव, सचिन कोतवाल, रवी लाटे, बाप्पू रणसिंग, निरंजन अडागळे, मनोज फुलावरे, नरेन्द्र गायकवाड, गणेश जांगमल्ली, अंजली इंगळे, रामभाऊ इंगळे, सुभाष जाधव, शंकर थोरात, ऋषिकेश मारणे, सुजित अग्रवाल हे उपस्थित होते.

मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात शिवाय महागाई, बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या आत्महत्या – नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई-

नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या 5 वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसून येत आहे. नाना पटोलेंनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, कर्नाटकमध्ये जनतेला काम करण्यासाठी 40 टक्के कमिशन द्यावे लागायचे. भाजप सरकारचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. ज्या लिंगायत समाजाच्या जीवावर भाजप याठिकाणी निवडून आले त्याच लिंगायत समाजाला आज वाळीत टाकले आहे. कर्नाटकात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. कृतिम महागाई लादली. भाजपच्या कामकाजावर जनता नाराज होती. आणि याचाच परिणाम निकालात दिसून येत आहे.

नाना पटोले म्हणाले, ईडीचा, सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही. कर्नाटकमध्ये जागरुक सरकार हवे आहे. या देशात लोकशाही सांभाळणारा, संविधान सांभाळणारा कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे. भाजपने मल्लिकार्जुन खर्गेंना मारण्याची धमकी दिली होती. आज याचठिकाणी 124 च्या वर जागा काँग्रेसला मिळत आहे. सुशिक्षित, शेतकरी, गरिबांचा कौल काँग्रेसच्या बाजूने आलेला आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले, भाजपने राजीव गांधींची चुकीची प्रतिमा निर्माण केली. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मिर पायीय चालले. त्यांनी लोकांची गळाभेट घेत त्यांची दुःखे जाणून घेतली. मोदींनी देवाच्या नावाने राजकारण केले. हीच मोदींची स्टाईल आहे. मोदींनी त्यांना किती शिव्या घातल्या याची यादी वाचली. मात्र गांधी घराण्याला तुम्ही किती शिव्या दिल्या, त्याचे काय? राहुल गांधी सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे देशासाठी लढण्याचा वारसा आहे.

बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली; संजय राऊतांचा मोदी-शहांना टोला

मुंबई- तथाकथित हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कलांमध्ये काँग्रेस 118, भाजप 75 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे. अपक्षांच्या खात्यात 6 जागा जाताना दिसत आहे. या निकालावरुन संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव मोदी आणि शहांनी मान्य करावा असा घणाघात केला आहे.

संजय राऊत म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळत आहे. मोदी, शहा यांनी आता हा पराभव स्वीकारायला हवा. महाराष्ट्रातून काही लोक प्रचाराला गेले होते. मात्र ज्या ज्या ठिकाणी हे लोक गेले त्याठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकात समोर आली.

संजय राऊत पुढे म्हणाले, भाजपच्या दबावाला कर्नाटकची जनता बळी पडली नाही. याठिकाणी कोणतीच स्टोरी चालली नाही फक्त लोकशाहीची स्टोरी चालली नाही. हनुमानाला प्रचारात उतरवले होते मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. काहींनी येथे खोके उतरवले मात्र खोके सरकारला कर्नाटकी जनतेने उलथवून लावले. याठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आपल्याच लोकांना पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पैशांचा महापूर ओतला, असा आरोप राऊतांनी केला आहे.

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने थांबवली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, बीजेपीचे वॉशिंग मशिन आहे. त्यामुळे परमबिर सिंग यांना क्लिन चीट दिली आहे. भाजप चोर लफंग्यांना समर्थन देते मग ते राजकारणातले असो की प्रशासनातले असो.

मंडई परिसरातील मेट्रोचे काम त्वरीत संपवा-गणेशोत्सवात गैरसोय होऊ नये

अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे निवेदन
पुणे : गणेशोत्सवाची शान असलेल्या विसर्जन मिरवणुकीची सुरूवात मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून केली जाते. गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असला तरी देखील मंडई येथील टिळक पुतळा ते बाबूगेनू चौक तसेच मंडई परिसरातील मेट्रोची कामे थांबली आहेत. ही थांबलेली कामे त्वरीत सुरू होऊन वेळेत संपणे अत्यंत आवश्यक आहे असल्याचे सांगत अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला निवेदन दिले आहे.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे संचालक अतुल गाडगीळ यांना निवेदन दिले. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून लक्ष्मी रस्त्याकडे मानाच्या पाच गणपतींची तसेच भाऊ रंगारी व अखिल मंडई मंडळ यांची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशोत्सावाचा महत्त्वाचा भाग असलेल्या गणेश विर्सजनाच्या मिरवणूका विनासायस सुरू होण्याकरिता या परिसरातील थांबलेले काम त्वरीत सुरू होऊन वेळेत संपणे अत्यंत आवश्यक आहे.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव ४ महिन्यांवर आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मंडई येथील टिळक पुतळा ते बाबूगेनू चौक येथे भुयारी मार्गाचे काम तसेच मंडई परिसरातील इतर मेट्रोची कामे थांबली आहेत, असे निदर्शनास आले. त्यामुळे येथील काम त्वरित सुरु करून लवकर संपवावे, अशी आम्हा गणेशोत्सव कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचा छापा

मुंबई-प्रसिद्ध अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. यासह इतरांवर बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील परिसराची झडती घेण्यात आली. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (मुंबई झोन) प्रमुख होते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.

समीर वानखेडे एनसीबीमध्ये असताना त्यांनी शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध ड्रग्ज प्रकरणाचा तपास केला होता. त्यावेळी ते एनसीबीचे प्रमुख होते. न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेतला.

समीर वानखेडे यांनी चुकीच्या मार्गाने काम मिळवल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे यांनी वय लपवून बारचा परवाना घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांना तरुण वयात परवाना मिळाला. नवी मुंबईतील हॉटेल सद्गुरु येथे बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे १७ वर्षांचे होते, असा दावा मलिक यांनी केला होता.

सुप्रीम कोर्टाची बंगाल – तामिळनाडू सरकारला नोटीस; विचारणा – द केरला स्टोरी संपूर्ण देशात सुरू, तुम्हाला काय अडचण

नवी दिल्ली-‘द केरला स्टोरी चित्रपट देशभर सुरू असताना तुम्हाला काय अडचण?’, असा तिखट सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगाल व तामिळनाडू सरकारला केला. कोर्टाने या प्रकरणी दोन्ही राज्यांना नोटीस बजावली आहे. पश्चिम बंगालमध्ये 12 मे रोजी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. तर तामिळनाडूतील थिएटर ऑपरेटर्सनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्ट म्हणाले – ‘पश्चिम बंगाल देशाबाहेर नाही. देशातील इतर राज्यांमध्ये हा चित्रपट शांततेत सुरू असताना बंगाल व तामिळनाडूमध्ये त्यावर बंदी का? चित्रपट पाहायचा की नाही हे प्रेक्षकांवर सोडले पाहिजे. दोन्ही राज्यांची भौगोलिक स्थिती इतर राज्यांसारखीच आहे. मग तिथे चित्रपट का दाखवला जात नाही. हे प्रकरण कलेच्या स्वातंत्र्याचे आहे.’

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड व न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली. ‘द केरला स्टोरी’च्या प्रोडक्शन टीमतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले- ‘बंगालमध्ये कोणतीही अडचण नसताना चित्रपटावर बंदी घालण्यात आली. तिथे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 3 दिवस शांततेत चालला. तमिळनाडूमध्येही हीच परिस्थिती होती. पण तिथे चित्रपटावर आंशिक बंदी घालण्यात आली आहे.’

दुसरीकडे, बंगाल सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा गुप्तचरांकडून अहवाल राज्याला मिळाला होता.