नवीन डीलरशीप्स महाराष्ट्रातील ९६ वे टच पॉइंट्स आणि अशोक लेलँडसाठी पश्चिम भारतातील १२८ वे टच पॉइंट्स
पुणे, १३ मे २०२३ – अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची भारतातील प्रमुख कंपनी आणि व्यावसायिक वाहनांची भारतातील आघाडीची उत्पादक असून कंपनीने नुकतेच तीन नव्या डीलरशीप्सचे उद्घाटन केले. या दोन्ही डीलरशीप्स पुण्यातील मोशी आणि सोलापूर रस्त्यावर वसलेल्या पगारिया ऑटो प्रा. लि. च्या असून 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) प्रकारच्या आहेत. या दोन्ही डीलरशीप्स मोक्याच्या ठिकाणी अनुक्रमे ४०,००० आणि ६०,००० चौरस फुट जागेत वसलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद, सोलापूर, बेंगळुरू आणि हैद्राबाद अशा सर्व शहरांशी त्यांना चांगला कनेक्ट ठेवता येणार आहे. नव्याने लाँच करण्यात आलेले डीलरशीप आउटलेट एम अँड एचसीव्ही क्षेत्राला सेवा देईल. मध्य महाराष्ट्रामध्ये कंपनीचा विस्तार करण्यासाठी या डीलरशीप महत्त्वाच्या ठरणार आहेत.
या क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अशोक लेलँड पुण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुसज्ज डीलरशीप्स आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करणार आहे. दोन्ही डीलरशीप्समध्ये १० बे, आधुनिक साधने, जलद सेवा देणारे बे, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि चांगल्या ग्राहक अनुभवासाठी उपकरणे देण्यात आली आहेत. त्यामुळे कंपनीला आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा देणे शक्य होईल.
डीलरशीप लाँचविषयी अशोक लेलँडच्या एमएचसीव्ही विभागाचे प्रमुख श्री. संजीव कुमार म्हणाले, ‘अशोक लेलँडसाठी महाराष्ट्र महत्त्वाची बाजारपेठ आहे. या भागात मजबूत स्थान तयार करण्यासाठी दोन नव्या डीलरशीप्स लाँच करण्यात आल्या आहेत. पगारिया ऑटो प्रा. लि. आपल्या नव्या 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) सेवांच्या मदतीने ग्राहकांना चांगली सेवा देतील याची खात्री आहे. ग्राहक सेवा आणि समाधान उंचावण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी नव्या डीलरशीप सुरू करण्यात आल्या आहेत. या डीलरशीप्स कंपनीच्या जगातील पहिल्या १० सीव्ही उत्पादकांपैकी एक बनण्याच्या ध्येयाचाच एक भाग आहेत.’
याप्रसंगी पगारिया ऑटो प्रा. लि. चे प्रोप्रायटर श्री. राहुल पगारिया म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात अशोक लेलँडने आपले बळकट स्थान निर्माण केले आहे. नवी डीलरशीप दालने मोक्याच्या ठिकाणी वसलेली आहेत. अशोक लेलँडने त्यांची उत्पादने व तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. अत्याधुनिक 3एस (सेल्स/सर्व्हिस/स्पेयर्स) डीलरशीप्सच्या मदतीने कंपनी यापुढेही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत राहील.’
पगारिया ऑटो प्रा. लि. कंपनीच्या सर्वात विश्वासार्ह सपोर्ट सिस्टीम्सपैकी एक आहे. पगारिया ऑटोच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्रातील टच पॉइंट्सची संख्या ९६ वर गेली आहे.
अशोक लेलँडकडे सीव्ही क्षेत्रातील अतिशय मोठे आणि वेगाने विस्तारत असलेले नेटवर्क आहे. कंपनीच्या नेटवर्कमध्ये १७०० एक्सक्लुसिव्ह आउटलेट्स आणि प्रमुख हायवेवर प्रत्येक ७५ किलोमीटरवर अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. अतिरिक्त ५३,००० टचपॉइंट्सच्या मदतीने विक्रीपश्चात सेवा तसेच लेकार्ट, अलकेयर आणि आयअलर्टची टुल्स उपलब्ध करून जातात. यामुळे गरजेच्या वेळी ग्राहकांपर्यंत चार तासांत पोहोचण्याचे व केवळ ४८ तासांत त्यांचा प्रवास परत सुरळीत करण्याचे ‘अशोक लेलँड क्विक रिस्पॉन्स’चे आश्वासन जपण्यास मदत होते.