Home Blog Page 1532

जीवे मारण्याची धमकी तरीही राहुल गांधींचा ट्रक प्रवास, दिल्लीहून चंदीगडला पोहोचले..पहा फोटो

राहुल सोनियांना भेटण्यासाठी शिमल्यात

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एका ट्रकमधून दिल्लीहून चंदीगडला पोहोचले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, १२ तासांपूर्वीच राहुल गांधींना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.असे असताना ट्रक चालक आणि आम माणसाचे जीवन नेमके कसे आहे ते थोडेफार तरी समजेल या हट्टाने राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांचा सल्ला नाकरून हा प्रवास केला

ढाब्यावर ट्रक चालकांशी थेट भेट थेट संवाद राहुल गांधींनी साधला .

राहुल गांधींच्या ट्रक प्रवासाबाबत हरियाणा काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ते सोनिया गांधींना भेटण्यासाठी शिमला येथे पोहोचले आहेत. सध्या सोनिया प्रियांका गांधी यांच्या शिमल्यातील फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही त्यांनी सिमल्यात राहून घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल आईपासून दूर होते, त्यामुळे ते दिल्लीहून चंदीगडला पोहोचले, तेथून ते त्यांच्या वाहनाने शिमल्याला रवाना झाले.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना भेट. कारण त्यांना या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत.

ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे-केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समन्स जारी केल्यानंतर का स्वतः जयंत पाटील ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला.आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे,हर्षवर्धन दीपक मानकर,प्रदीप गायकवाड़,किशोर कांबळे,सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है”,”ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला.तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख याना निवेदन देन्यात आले.

डाॅ. स्मिता घुले यांचा लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव

पुणे :डाॅक्टरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करणाऱ्या जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या (जीपीए) वतीने वीमेन्स काॅन्फरन्स आयोजित करण्यात करण्यात आली होती. या कार्यक्रमात ‘ लेडी जीपी ऑफ द इयर’ पुरस्काराने डाॅ. स्मिता घुले यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा केल्याबद्दल डॉ. घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जीपीएच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा नाईक, तर प्रमुख पाहुण्या म्हणून कांचन पाटील-वडगावकर उपस्थित होत्या. यावेळी जीपीएचे अध्यक्ष डाॅ. श्रीराम जोशी, सचिव डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता, खजिनदार डाॅ. सुनील भुजबळ, माजी अध्यक्ष डाॅ. हरिभाऊ सोनवणे, प्रियदर्शिनी विंगच्या चेअरमन डाॅ. आरती शहाडे व इतर महिला डाॅक्टर उपस्थित होत्या.
डाॅ. श्रीराम जोशी यांनी जीपीएच्या विभिन्न कार्याची माहिती यावेळी दिली. महिला डाॅक्टर आपल्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वैद्यकीय सेवा करीत असतात. तसेच सामाजिक कार्यातदेखील असतात. अशा वेळी महिला डाॅक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डाॅ. स्मिता घुले यांनी जीपीएच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली व त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. जीपीए डाॅक्टरासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रमुख अतिथी असलेल्या डाॅ. मनीषा नाईक यांनी एक अधिकारी म्हणून आपण सातत्याने डाॅक्टरांना सहकार्य करीत राहू, असे आश्वासन दिले. या पुरस्कार सोहळ्यापूर्वी विविध तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञ डाॅक्टरांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता यांनी केले. तर आभार डॉ. राजेश दोषी यांनी मानले.

2000 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ,नोटा खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही

देशातील सर्व बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला आजपासून म्हणजेच मंगळवारपासून (23 मे) सुरू होत आहे. 3 दिवसांपूर्वी 19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 ची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलून किंवा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात.

आरबीआयच्या मुदतीनंतरही 2000 ची नोट कायदेशीर राहील. म्हणजेच सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. लोकांना या नोटा लवकरच बँकांमध्ये परत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे.

नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही
आरबीआय आणि एसबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोटा बदलण्यासाठी कोणत्याही आयडीची आवश्यकता नाही आणि कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एका वेळी 20,000 रुपयांच्या फक्त 10 नोटा बदलल्या जातील, परंतु या नोटा खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. बँका 2000 च्या नोटा जारी करणार नाहीत.

नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याऐवजी नव्या पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. RBI ने 2018-19 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे.

आयडीविना नोट बदलण्यास विरोध, कोर्टात जनहित याचिका
कागदपत्रांशिवाय नोटा बदलून देण्याच्या रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँकेच्या आदेशाविरोधात भाजप नेते आणि वकील अश्वनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी कोणत्याही ओळखीच्या पुराव्याशिवाय 2000 च्या नोटा बदलून देऊ नयेत अशी मागणी केली आहे.

चलन व्यवस्थापनाअंतर्गत घेण्यात आला निर्णय : RBI गव्हर्नर
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक दिवसापूर्वी नोटा बदलण्यासाठी लोकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, असे म्हटले होते. आम्ही ४ महिन्यांची मुदत दिली आहे. नोट्स बदलण्यास मोकळ्या मनाने, परंतु वेळेची मर्यादा गांभीर्याने घ्या. चलन व्यवस्थापनांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. 2000 ची नोट चलनातून काढून टाकण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. चलनात असलेल्या एकूण चलनापैकी फक्त 10.8% चलन 2000 च्या नोटांमध्ये आहे.

लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर केल्या जातील

  • आरबीआयने सोमवारी आणखी एक मार्गदर्शक सूचना जारी केली. यामध्ये बँकांना उष्मा लक्षात घेऊन सावलीची जागा आणि लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. किती नोटा बदलल्या आणि किती जमा झाल्या याचा रोजचा हिशोब ठेवा.
  • दास म्हणाले होते, ‘जे काही संकट येईल ते आम्ही दूर करू. बँकांमार्फतही आम्ही या प्रक्रियेवर लक्ष ठेवू. काळजी करण्यासारखे काही नाही. चलन व्यवस्थापन ऑपरेशन अंतर्गत, आम्ही चलनातून 2000 च्या नोटा काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे.
  • यापूर्वीही लोक दुकानात 2000 च्या नोटा स्वीकारत नव्हते. आमच्या घोषणेनंतर कदाचित त्यात वाढ झाली आहे. ती कायदेशीर निविदा राहील, असे आम्ही सांगितले होते. तुम्ही 2000 च्या नोटांनी खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरपर्यंत बहुतांश नोटा आमच्याकडे येतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.

2 हजाराच्या नोटा कशा बदलता येतील? 6 प्रश्नांमध्ये नोटा बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या…

1. प्रश्न: या 2 हजाराच्या नोटा कोठून बदलता येतील?
उत्तर: तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता.

2. प्रश्न: माझे बँक खाते नाही त्यामुळे मी त्याशिवाय नोटा बदलू शकतो का?
उत्तर: होय, तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकता. त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक नाही. तुम्ही थेट काउंटरवर जाऊन नोटा बदलू शकता. दुसरीकडे, जर तुमचे त्या बँकेत खाते असेल, तर तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.

3. प्रश्न: एका वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?
उत्तरः ₹ 2000 च्या नोटा एका वेळी ₹ 20,000 च्या मर्यादेपर्यंत दुसर्‍या मूल्यासाठी बदलल्या जाऊ शकतात. दुसरीकडे, तुमचे खाते असल्यास, तुम्ही कितीही 2000 च्या नोटा जमा करू शकता.

4. प्रश्न: नोटा बदलण्यासाठी बँकेला काही शुल्क आकारावे लागेल का?
उत्तर: नाही, तुम्हाला नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. ते पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही बँक अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता.

५. प्रश्नः 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा न केल्यास काय होईल?
उत्तर: ₹2000 च्या नोटा व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि पेमेंट म्हणून देखील प्राप्त केल्या जाऊ शकतात. तथापि, RBI ने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या बँक नोटा जमा करण्याचा किंवा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.

६. प्रश्नः हा नवा नियम कोणाला लागू आहे?
उत्तर : हा निर्णय सर्वांना लागू आहे. 2000 च्या नोटा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने बँकेच्या कोणत्याही शाखेत त्या जमा कराव्या लागतील किंवा 30 सप्टेंबरपर्यंत त्या इतर नोटांसाठी बदलून घ्याव्या लागतील.

गौतम अदानी यांची खासगी मालमत्ता सोमवारी ३९.७ हजार कोटी रुपयांनी वाढली,शेअर बनले रॉकेट, दोन दिवसांतच 24% झेप 

6 शेअर्समध्ये अपर सर्किट-

मुंबई-अदानी समूहाचे शेअर्स सोमवारी रॉकेट बनले. समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागले. सर्वात चांगली कामगिरी प्रमुख कंपनी अदानी एंंटरप्रायझेसची राहिली. याचा शेअर दोन दिवसांत (शुक्रवार-सोमवार) २४.१९% वधारला. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी सोमवारचा दिवस सर्वात चांगला राहिला. याचे कारण ठरला सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल. त्यात अदानी समूहाला दिलासा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत सेबीने नियमांचे पालन केले आहे. हा अहवाल गुरुवारी आला होता. त्यानंतर शुक्रवारी समूहाचे शेअर्स वधारले.

दोन दिवसांत वृद्धी
अदानी एंटर. २४.१९%
अदानी विल्मर २०.२%
अदानी ट्रान्स. १५.४%
अदानी गॅस १४.८%
अदानी पाॅवर १४.६%
अदानी ग्रीन १३.८%
अदानी पोर्ट ९.४%
एनडीटीव्ही ९.०%
अंबुजा सिमेंट ७.१%
एसीसी ५.९%

गौतम अदानी यांच्या मालमत्तेमध्ये एकाच दिवसात झाली १० टक्क्यांची वृद्धी
अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये ३२ टक्के भागीदारी असलेल्या गौतम अदानी यांच्या खासगी मालमत्तेमध्ये सोमवारी ३९.७ हजार कोटी रुपयांची (१० टक्के) वाढ झाली आहे. एकूण ४.३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह आता गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांमध्ये २४वे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

प्रवास मोठा आहे… अदानी समूहाचा मार्केट कॅप ८.६४ लाख कोटींनी घटला होता, आतापर्यंत २.९६ लाख कोटींनी वाढला समूहाच्या कंपन्या मार्केट कॅप सर्वात नीचांकी सोमवारी रक्कम लाख कोटींत (२३ जानेवारी) पातळी (फेब्रु.) सकाळी* अदानी इंटरप्रायझेस ४.०१ १.७० २.७० अदानी ग्रीन एनर्जी ३.१९ ०.७७ १.५२ अदानी ट्रान्समिशन ३.१२ ०.८५ ०.९३ अदानी पोर्ट १.७१ १.१० १.६१ अंबुजा सिमेंट १.०४ ०.६९ ०.८१ अदानी विल्मर ०.७४ ०.४७ ०.५९ अदानी टोटल गॅस ०.७३ ०.४५ ०.७९ एसीसी ०.४५ ०.३२ ०.३४ एकूण १४.९८ ६.३४ ९.३० कारण… अहवालातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांबाबत सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून दिलासा

(हे आकडे फोर्ब्जचे आहेत. यात सोमवारी झालेली वाढ समाविष्ट नाही.)

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा 

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी  अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांची माहिती  भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ उज्वला बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.बीबीए ,बी ए (लेजिस्लेटिव्ह लॉ),एल एल बी  साठी प्रवेश परीक्षा  १७ जून रोजी आहे,त्यासाठी ६ जून ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे.  एल एल एम साठी १६ जुलै  रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.एल एल एम साठी ८ जुलै ही नाव नोंदणीची मुदत आहे. अधिक माहिती ९३५९४१७२६९ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच nlcpune@bharatividyapeeth.edu या ठिकाणी ईमेल करून मिळू शकेल.या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एम एच सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही,भारती अभिमत विद्यापीठाची सीईटी आवश्यक आहे .  

पुणे, पिंपरी शहरासह लगतच्या महामार्गावर आणखी इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

महावितरणचे संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची माहिती

पुणे: दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ होत असून महावितरणने देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीला वेग दिला आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सद्यस्थितीत १५ चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. यापुढे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील अशी माहिती महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी नुकतीच दिली.

येथील सेनापती बापट रस्त्यावरील गणेशखिंड उपविभाग कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारलेल्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन संचालक श्री. रेशमे यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी सांगितले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून व ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध आहे. तसेच इव्ही ग्राहकांसाठी पॉवर अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपमध्ये चार्जिंग स्टेशन्सचे लोकेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वापरलेले वीज युनिट, पेमेंटसाठी वॉलेट व बॅलन्स आदींची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत १५ उपकेंद्राच्या ठिकाणी महावितरणकडून इव्ही चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये संघवीनगर (औंध), रिजन्सी इन्फ्रा (ननावरे वस्ती, औंध), गणेशखिंड उपविभाग कार्यालय परिसर (सेनापती बापट रस्ता), अमर पॅरॅडिगम (बाणेर), बेंचमार्क उपकेंद्र (पुनावळे, मुंबई हायवे), प्राधीकरण स्विचिंग स्टेशन (पुनावळे मुंबई-पुणे हायवे), सीआयआरटी उपकेंद्र (कासरवाडी, पुणे-नाशिक हायवे), कुणाल आयकॉन स्विचिंग स्टेशन (पिंपळे सौदागर), सेक्टर १० स्विचिंग स्टेशन (भोसरी), सीडीसी स्विचिंग स्टेशन (स्पाईन रोड, शाहूनगर), ब्रम्हा सनसिटी (वडगाव शेरी), झेन्सार स्विचिंग स्टेशन (खराडी), कीर्ति कॅसल स्विचिंग स्टेशन (वडगाव शिंदे, लोहगाव), रेसकोर्स उपकेंद्र (रेस कोर्स), राजगुरुनगर उपकेंद्र (कडूस फाटा, चांडोळी, ता. खेड) येथील चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री शंकर तायडे, सतीश राजदीप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, प्रवीण पंचमुख, डॉ. सुरेश वानखेडे आदींसह अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सद्सद् विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम करणारे युवक हे सामाजिक कार्यकर्ते- डॉ. न.म. जोशी

 मैत्र युवा फाउंडेशन तर्फे ‘एक पणती तिच्यासाठी’ उपक्रमाचा शुभारंभ
पुणे : समाजातील दु:ख  समजून घेऊन, त्याबद्दल विचार करुन जो त्या लोकांसाठी काम करतो तो खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता. जोपर्यंत सद्सद् विवेकबुद्धी जागृत ठेऊन समाजासाठी काम करणारे युवक या देशात आहेत, तोपर्यंत देशाच्या भविष्याला धोका नाही, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.

मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने ‘एक पणती तिच्यासाठी ‘  या उपक्रमाची सुरुवात एरंडवण्यातील सेवासदन च्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी साहित्यिक वि.दा. पिंगळे,  सेवासदन चे चिंतामणी पटवर्धन, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉ. सचिन वानखेडे, सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, मैत्रयुवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे यावेळी उपस्थित होते.

वि.दा. पिंगळे म्हणाले, तरुणांची शक्ती ओळखणे आणि सकारात्मक बाजूने तीला पुढे घेऊन जाणे हे गरजेचे आहे. बल, धन, प्रतिष्ठा या गोष्टी गौण आहेत. आचार विचार आणि संस्कार यांचे धन असणे हे महत्त्वाचे आहे. माणूस कोणती जीवनमूल्ये घेऊन जीवन जगतो यातच त्याचे मोठेपण आहे.

पराग ठाकूर म्हणाले, तरुण वर्गाने बोलण्यासाठी पुढे यायला हवे. युवा बोलेल तेव्हाच देश सुधारेल. कोणतेही काम सुरु करणे सोपे असते, परंतु त्यात सातत्य ठेवणे कठीण असते. मैत्रयुवा मधील तरुणांनी अनेक वर्षांपासून काम सुरु ठेवले आहे, हे कौतुकास्पद आहे.

संकेत देशपांडे म्हणाले, मैत्रयुवा फाउंडेशन मधील तरुणाई ‘ एक पणती तिच्यासाठी ‘ या उपक्रमांतर्गत पणत्या रंगवण्याचे काम दिवाळीच्या सहा महिने आधीपासून सुरू करतात. या पणत्या विकून मिळालेला निधी हा वंचित विशेष मुलांची दिवाळी साजरी करण्यासाठी केला जातो. यामुळे तरुणाईचे या घटकाशी वेगळ्या प्रकारचे आपुलकीचे नाते जोडले जाते.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स: क्लासिक घड्याळांमध्ये फास्ट्रॅकच्या मॉडर्न टेकसह अपडेट करा तुमचा रिस्ट गेम

बंगलोर: भारतातील आघाडीचा युवा फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने आपले पहिले ऑटोमॅटिक वॉच कलेक्शन लॉन्च केले आहे. फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स हे आधुनिक लुक असलेले क्लासिक घड्याळ अशा व्यक्तींसाठी तयार करण्यात आले आहे ज्यांना त्यांचा प्रत्येक लुक अगदी परफेक्ट हवा असतो.

या कलेक्शनमधील घड्याळांची रेन्ज ऑटोमॅटिक मुव्हमेंटमधील कला आणि अचूकपणा व फास्ट्रॅकची अनोखी फॅशन स्टाईल दर्शवते.

यातील प्रत्येक घड्याळ उच्च दर्जाच्या प्रोप्रायटरी टायटन ऑटोमॅटिक मुव्हमेंटमार्फत संचालित केलेले आहे, जे सेल्फ-वाइंडिंग आहे. तुमची दिनचर्या जसजशी पुढे जाईल तसतसे हे घड्याळ पुढे जात राहील. ही घड्याळे तुम्हाला सक्रिय ठेवतात, इतकेच नव्हे तर, त्यांच्या कलरफुल प्लेटिंग तुम्हाला ट्रेन्डसेटिंग देखील बनवतात. तुमच्या आवडीच्या कोणत्याही आऊटफिटवर ही घड्याळे सर्वात मोठी स्टाईल पॉईंट्स बनतील.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गाईजमध्ये तीन प्रकार आहेत – यामध्ये मल्टी-लेयर्ड स्केलेटल डायल आहे जी घड्याळांना क्लासी व अनोखा लुक देते, उच्च दर्जाचे लेदर स्ट्रॅप्स, प्रीमियम लायनिंग यांना अजून छान लुक देतात. दिवस असो वा रात्र, प्रसंग कोणताही असो ही घड्याळे खूप खुलून दिसतात.     

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गाईज किंमत ९९९५ रुपये

फास्ट्रॅकचे मार्केटिंग हेड श्री अजय मौर्य यांनी सांगितलेफास्ट्रॅकचे नवे ऑटोमॅटिक वॉच कलेक्शन आले आहे. ही फुल स्केलेटल लुक वॉचेस स्टायलिश आणि उच्च कामगिरी बजावणारी असूनफॅशन-सॅव्ही तरुणांसाठी अगदी परफेक्ट आहेत. या बोल्ड व आधुनिक घड्याळांच्या किमती किफायतशीर असल्याने सर्वांच्या नजरा यांच्यावरच टिकून राहतील यात काहीच शंका नाही.”

मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या दोन प्रकारांमध्ये क्लासी रोज गोल्ड आणि बोल्ड ब्राऊन या दोन लोकप्रिय रंगांमध्ये स्टेनलेस स्टील केसेस व स्ट्रॅप्स बनवण्यात आले आहेत. बिझनेस कॉन्फरन्स असो किंवा बॅचलरेट पार्टी असोही घड्याळे तुमची स्टाईल खुलवतील. या वॉच फेसेसना स्केलेटल कटआऊट लुकसह डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये लेयर्ड डायल्स आहेतज्यामुळे फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्सना तुम्ही प्रत्येक आऊटफिटसोबत सहजपणे मॅच करू शकता.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गर्ल्स ब्राऊन प्लेटिंगमध्ये किंमत ८९९५ रुपये

ऑटोमॅटिक वॉच कलेक्शनच्या किमती ८९९५ रुपयांपासून पुढे आहेत. सर्व फास्ट्रॅक स्टोर्सटायटन वर्ल्ड स्टोर्सFastrack.in, Titan.co.in वर आणि लार्ज फॉरमॅट स्टोर्सएक्सक्लुसिव्ह अधिकृत डीलर्स आणि आमचे एक्सक्लुसिव्ह ऑनलाईन पार्टनर मिंत्रावर हे कलेक्शन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील ६८ अस्थायी पदांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना दि. १ मार्च  ते दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार आस्थापनांवरील मानसेवी बालरोगतज्ज्ञ यांची ४८ पदे आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील २० पदे अशा एकूण ६८ अस्थायी पदांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आली होती.

या अस्थायी पदांना अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने मुदतवाढ दिली असून या अटींनुसार ही मुदतवाढ सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांना लागू राहणार नाही. ही ६८ पदे ज्या अटी व शर्तींच्या अधीन मंजूर करण्यात आली आहेत, त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे. पोलीस महासंचालकांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावा. यानंतर आकृतीबंध निश्चित करण्याकरिता या पदांची मुदत वाढवून मिळणार नाही, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

प्रणव,  अवंतिका वेगवान धावपटू

पुणे-

प्रणव गुरव आणि अवंतिका नराळे या दोन्हीही पुण्याच्या खेळाडूंनी राजपथ ७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मी धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक जिंकून ‘वेगवान धावपटू’चा किताब जिंकला.

महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथील मुख्य स्टेडियमच्या ट्रॅकवर दि. २१ ते २३ मे या कालावधीत संपन्न होत असलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या प्रणव गुरवने १०० मी शर्यतीमध्ये १०.५६ सेकंदची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक जिंकला. अकोल्याच्या सौरभ नैतामने १०.६१ सेकंदची वेळ नोंदवून दुसरा तर मुंबई उपनगरच्या जय शहाने १०.७१ सेकंदची वेळ नोंदवून तिसरा क्रमांक संपादन केला.

महिलांच्या १०० मीटरच्या शर्यतीत पुण्याच्या अवंतिका नराळेने ११.७८ सेकंदची वेळ नोंदवून महिलागटात प्रथम क्रमांक पटकाविला. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने १२.१६ तर मुंबई शहरच्या सरोज शेट्टीने १२.३२ सेकंदची वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक जिंकला.

पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शुभम पाटेकरने ७.२२ मीटर लांब उडी मारून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणेच्या धीरज मिश्रा याने ७.०० मीटर आणि मुंबई शहरच्या अनिलकुमार साहूने ६.९४ मीटर लांब उडी मारून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

महिलांच्या लांब उडीमध्ये राजगडच्या कैशा मोदी हिने ५.७३ मीटर उडी नोंदवून प्रथम क्रमांक पटकविला. मुंबई उपनगरच्या शर्वरी परुळेकर हिने ५.६६ मीटर आणि मुंबई उपनगरच्या श्वेता ठाकूरने ५.६३ मीटर उडी नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.  

पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पुण्याच्या ऋषिकेश साखरे याने १६.१२ मीटर गोळाफेक करून प्रथम क्रमांक पटकाविला. सांगलीच्या प्रफुल्ल थोरातने १६.०९ मीटर आणि मुंबई उपनगरच्या प्रवीण गुप्ता याने १४.७८ मीटर गोळाफेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या गोळा फेक स्पर्धेत मुंबई शहरच्या हंसिका वासू हिने १२.४८ मीटर गोळा फेक करून प्रथम क्रमांक पटकविला. अमरावतीच्या विशाखा तुमाणे हिने ११.८२ मीटर आणि ठाणेच्या अग्रता मेळकुंडेने ११.६० मीटर गोळा फेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.  

पुरुषांच्या पोलव्हॉल्ट स्पर्धेत कोल्हापूरच्या महेश मांगले याने ३.७० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या समर्थ सावंत याने ३.६० मीटर आणि सोलापूरच्या सिद्राम विभूतेने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

महिलांच्या पोलव्हॉल्ट स्पर्धेत कोल्हापूरच्या सानिया कांजर हिने २.५० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सांगलीच्या उत्तम पाटीलने ७४.१३ मीटर लांब भालाफेक करून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई शहरच्या अक्षय घोंगे याने ७१.०५ मीटर आणि अहमदनगरच्या ऋषिकेश कुऱ्हे याने ६२.८९ मीटर भालाफेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.  

पुरुषांच्या ५००० मीटर स्पर्धेत सोलापूरच्या अरुण राठोडने १४.३९.३२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. सातारच्या सुशांत जेधेने १४.४२.९० आणि मुंबई उपनगरच्या कार्तिक करकेराने १४.४९.१५ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

महिलांच्या ५००० मीटर स्पर्धेत कोल्हापूरच्या प्राजक्ता शिंदेने १६.५९.२४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या रिंकी पावराने १७.१५.१८ आणि सातारच्या आकांक्षा शेलारने १७.५५.८४ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

पुरुषांच्या हातोडा फेक स्पर्धेत पुण्याच्या शंतनू उचलेने ५७.६६ मीटर हातोडा फेक करून प्रथम क्रमांक मिळविला. भंडाराच्या समीर देशमुखने ५०.१९ मीटर आणि राजगडच्या राज पाटीलने २५.९० मीटर असा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

महिलांच्या हातोडा फेक स्पर्धेत अमरावतीच्या वर्षा कानपुरेने ४९.३० मीटर हातोडा फेक करून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या वेदिका चवान्के हिने ३८.८७ मीटर  आणि पुणेच्या ईशा गुरवने ३६.२० नोंदवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत औरंगाबाद येथील तेजस शिरसे याने १३.९७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या विकास खोडकेने १४.७३ आणि मुंबई शहरच्या साहिल गेदामने १५.२२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाणेच्या क्रिस्टल वडाकेलने १६.७६ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या स्नेहा गर्जेने १७.३७ आणि पुणेच्या दिपाली बांदलने १८.११ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

लोकांचा इंडिया कोशंट म्हणजेचआयक्यू जाणून घेताना

अहमदाबादचा इंडिया कोशंट खाद्यपदार्थांच्या बाबतीत सर्वाधिक (९५ टक्के)

भारतीय भौगोलिकतेबाबत सुरतची समज सर्वात चांगली (जिऑग्राफी कोशंट – ८२ टक्के)

मुंबई – जी२० चे अध्यक्षपद भारताकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही युनेस्को जागतिक वारसास्थळी रोषणाई करण्यात आली होती. या निमित्ताने भारताचा इतिहास, संस्कृती, भूगोल, निसर्ग आणि खाद्यपदार्थ यांचे सर्वोत्तम पैलू जगासमोर आणण्यात आले. क्लब महिंद्रा इंडिया कोशंट सर्व्हेने या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतीयांना आपल्या देशातील वैविध्य, संस्कृती, वारसा आणि खाद्यपदार्थ यांविषयी किती माहिती आहे हे मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार अहमदाबादमध्ये राहाणाऱ्या नागरिकांचा इंडिया कोशंट सर्वाधिक म्हणजेच ९५ टक्के आहे. कोईम्बतूरचा ७६ टक्के, मुंबईचा ७५ टक्के, दिल्लीचा ५९ टक्के, बेंगळुरूचा ५७ टक्के आहे, तर कोचीच्या नागरिकांचा इंडिया कोशंट ३१ टक्के आहे. सर्वच भौगोलिक प्रदेश, कला व संस्कृतीबाबत अहमदाबादचे ज्ञान सातत्याने सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे ८१ टक्के, ९३ टक्के आणि ९६ टक्के आहे. 

कला व संस्कृतीबद्दल सखोल ज्ञान कोणाकडे आहे हे जाणून घेताना असे लक्षात आले, की ९९ टक्के अहमदाबादवासियांना खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश येथे भरतो हे माहीत आहे. मुंबईत हे प्रमाण ८० टक्के, दिल्लीत ६० टक्के, बेंगळुरूमध्ये ५४ टक्के आणि कोचीमध्ये २२ टक्के आहे. कोलकातामध्ये ९३ टक्के जणांना पश्मिना शाली काश्मीरमधून येतात हे माहीत आहे. हेच प्रमाण अहमदाबादमध्ये ९२ टक्के, मुंबईत ८७ टक्के, कोईम्बतूर येथे ८४ टक्केस तर पटनामध्ये ८२ टक्के आहे. पैठणी साड्या महाराष्ट्रात तयार होतात हे सुरतमधील ९३ टक्के जणांना, पुण्यातील ८९ टक्के जणांना, तर अहमदाबादमधील ८८ टक्के नागरिकांना माहीत आहे. हेच प्रमाण लखनौमध्ये ६५ टक्के व दिल्लीत ६० टक्के आहे. अहमदाबादमधील ९० टक्के लोकसंख्येला कथ्थक हा शास्त्रीय नृत्यप्रकार उत्तर प्रदेशचा असल्याचे माहीत आहे. हे प्रमाण पुण्यात ६१ टक्के, हैद्राबादमध्ये ५७ टक्के आणि जयपूरमध्ये ४४ टक्के आहे.

सुरतच्या नागरिकांचे भौगोलिक ज्ञान ८२ टक्के व अहमदाबादचे ८१ टक्के आहे. त्याशिवाय सुरतमधील ९८ टक्के सहभागींना कुंबलगढची भिंत चीनच्या भिंतीनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी असल्याचे व ती राजस्थान येथे वसल्याचे माहीत आहे. त्याच्रमाणे अहमदाबादच्या ९९ टक्के नागरिकांना दलाई लामा धरमशाळा येथे राहात असल्याची कल्पना आहे. हे प्रमाण मुंबईत ८१ टक्के, बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ६५ टक्के आणि कोचीत १३ टक्के आहे. अहमदाबादच्या नागरिकांना मसूरीला क्वीन ऑफ हिल्स म्हणतात याची कल्पना आहे. हेच प्रमाण लखनौमध्ये ७४ टक्के, चंदीगढमध्ये ७१ टक्के, दिल्ली आणि मुंबईत ७० टक्के आहे.

भारतीय संस्कृतीत खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व आहे आणि अहमदाबादमधील नागरिकांचे त्याबद्दलचे ज्ञान सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के आहे, तर कोलकातावासियांचे ज्ञान २५ टक्के आहे. अहमदाबादमधील नागरिकांना अप्पम हा केरळी पदार्थ असल्याचे माहीत आहे, तर हे प्रमाण मुंबईत ८० टक्के, दिल्लीत ४७ टक्के, बेंगळुरूमध्ये ४३ टक्के, कोलकातामध्ये २० टक्के आहे. अहमदाबादच्या ९१ टक्के नागरिकांना ऐपन हा उत्तराखंडमधील लोककलेचा प्रकार असल्याचे माहीत आहे. हेच प्रमाण अहमदाबादमध्ये ९१ टक्के, मुंबईत ७२ टक्के, हैद्राबादमध्ये ६४ टक्के आणि पुण्यात ५२ टक्के आहे.

महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी प्रतीक मुझुमदार म्हणाले, ‘भारतीयांना आपल्या देशाची श्रीमंत संस्कृती आणि वारशाबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचे आहे. भारतात एकूण ३५ युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. क्लब महिंद्रा आपल्या ग्राहकांना भारतातील महत्त्वाच्या सांस्कृतिक स्थळी तयार करण्यात आलेल्या सुसज्ज रिसॉर्ट्समध्ये आमंत्रित करत आहे. तिथे पर्यटकांना देशाची कला, इतिहास, भौगोलिकता, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीविषयी माहिती मिळेल. अशाप्रकारच्या इतर ठिकाणी रिसॉर्ट्स उभारण्यावर व पर्यटकांना भारतीय संस्कृतीचा नवनवीन अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.’

एयर इंडिया समूहातर्फे हजसाठी खास विमानसेवा

एयर इंडिया, एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे चार भारतीय शहरांतून १९,००० यात्रेकरूंना जेदा आणि मदिना येथे पोहोचवणार

नवी दिल्ली – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानसेवा आणि स्टार अलायन्स सदस्य व एयर इंडिया एक्सप्रेस या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बजेट विमानसेवा कंपनीतर्फे हजसाठी खास विमानसेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांतर्फे भारतातील चार शहरांतून १९,००० यात्रेकरूंना सौदी अरेबियातील जेदा आणि मदिना येथे पोहोचवले जाणार आहे. यावर्षीच्या हज विमानसेवेतील पहिल्या एयर इंडिया विमानाने AI5451 जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ११०५ वाजता उड्डाण केले आणि ते मदिना येथे १३५० वाजता (स्थानिक वेळ) पोहोचले.

या विमानसेवेच्या पहिल्या टप्प्यात एयर इंडिया जयपूर व चेन्नई येथून मदिना आणि जेदा येथे अनुक्रमे २१ मे ते २१ जून २०२३ दरम्यान सेवा देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एयर इंडिया यात्रेकरूंना जेदा आणि मदिनातून जयपूर व चेन्नईमध्ये परत आणणार आहे. त्यासाठी ३ जुलै ते २ ऑगस्ट २०२३ दरम्यान ४३ विमानसेवा उपलब्ध केली जाणार आहे. जयपूरमधून एयर इंडियाच्या माध्यमातून २७ विमानांद्वारे ५८७१ यात्रेकरू प्रवास करणार आहेत, तर चेन्नईतून १९ विमानांद्वारे ४४४७ यात्रेकरून प्रवास करतील. एयर इंडियातर्फे एकूण १०३१८ प्रवाशांची सौदी अरेबियापर्यंत वाहतूक केली जाईल. त्यासाठी बोईंग ७८७ आणि एयरबस ३२१निओ एयरक्राफ्टचा वापर केला जाणार आहे.

दुसरीकडे एयर इंडिया एक्सप्रेस ४ ते २२ जून २०२३ दरम्यान कोझीकोड आणि कन्नूरपासून B737-800 एयरक्राफ्ट तैनात करणार आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात कोझीकोड ते जेदा पर्यंत ४४ विमानांतून ६३६३ प्रवासी घेऊन जाणार आहे, तर कन्नूर ते जेदा मार्गावर १३ विमानांतून १८७३ प्रवासी प्रवास करतील. एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे पहिल्या टप्प्यात ५७ विमानांद्वारे ८२३६ प्रवाशांची वाहतूक केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात १३ जुलै ते २ ऑगस्ट २०२३ दरम्यान एयर इंडिया एक्सप्रेस मदिनातील सर्व प्रवाशांना कोझीकोड आणि कन्नूरमध्ये पोहोचवणार आहे.

या संयुक्त विमानसेवेविषयी एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘पवित्र धार्मिक स्थळ हजसाठी खास वार्षिक विमानसेवा सुरू करताना एयर इंडियाला आनंद होत आहे. एयर इंडियातर्फे चेन्नई आणि जयपूरमधून सेवा दिली जाईल, तर एयर इंडिया एक्सप्रेस कोझीकोड व कन्नूरमधून सेवा देईल. एयर इंडिया एक्सप्रेसच्या मदतीने प्रवाशांना आरामदायी व सोयीस्कर सेवा देता येणार आहे. संबंधित विमानतळावरील कर्मचाऱ्यांना या सेवेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते या विमानांतील प्रवाशांची खास काळजी घेतील.’

एयर इंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अलोक सिंग म्हणाले, ‘कोझीकोड आणि कन्नूर येथून हजसाठी खास विमानसेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे केरळमधील यात्रेकरूंची सोय होणार आहे. त्याशिवाय मुंबई, मेंगलुरू, तिरुवनंतपुरम, कोची, कोझईकोड आणि कन्नूर येथून सौदी अरेबियापर्यंत जाणारी आमची नेहमीची विमानसेवा सुरू राहाणार आहे. या खास उपक्रमाच्या माध्यमातून एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना त्यांच्या खास यात्रेसाठी आरामदायी सेवा मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे.’

दरम्यान हज विमानसेवेच्या प्रवाशांना सुरळीतपण सेवा मिळावी यासाठी एयर इंडिया व एयर इंडिया एक्सप्रेस आपल्या सर्व स्त्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करत आहे.

विशेष कर्मचारी वर्ग – कंपनीने भारतातील चारही स्थानकांवर तसेच जेदा व मदिना येथे विशेष कर्मचारी वर्ग तैनात केला आहे. हे कर्मचारी प्रवाशांच्या आगमनापासून परतीच्या प्रवासापर्यंत सर्व घटकांची काळजी घेतील. त्याशिवाय या विमानसेवांचा समन्वय आणि देखरेखीसाठी खास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्यवस्था – एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेसने ज्येष्ठ यात्रेकरूंची खास काळजी घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे.

सुलभ चेक इन व्यवस्था – सर्व यात्रेकरूंना सहजपण चेक इन करता यावे यासाठी एयर इंडिया त्यांना खास तयार केलेल्या पाकिटातून बोर्डिंग पास व इतर महत्त्वाची कागदपत्रे देणार आहे. एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे प्रवाशांना भारतात चेक इन करण्यासाठी जाताना व येतानाच्या प्रवासाची बोर्डिंग कार्ड्स ठेवण्यासाठी विशिष्ट रंगाची पाउचेस देणार आहे. त्याशिवाय मूळ व प्रवासाचे ठिकाण दर्शवणारे ठळक अक्षरांतले, रंगीत लगेज टॅग्ज दोन्ही विमान कंपन्यांतर्फे दिले जाणार आहेत.

बॅगेज हाताळण्यासाठी खास सुविधा – मदिनातील प्रवाशांसाठी जेदातील कंत्राटी वाहतूक ऑपरेटर्सकडून चेक इन करण्यात आलेल्या बॅग्ज गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या बॅग्ज विमानतळावर निघण्यासाठी २४ तास देण्यात येतील.

खानपानाची व्यवस्था – दोन्ही विमान कंपन्यांनी निवडक केटरर्सच्या माध्यमातून पुरेशी व्यवस्था केली आहे. त्यानुसार भारतात चेक इन ते बोर्डिंगदरम्यान प्रवासापूर्वी आणि जेदा व मदिना येथे उतरताना खाद्यपदार्थांचे बॉक्स दिले जातील.

झमझम पाणी उपलब्ध – एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेलतर्फे भारतात परतताना झमझम पाणी आणले जाणार आहे. कंपन्यांतर्फे भारतात सेवा दिली जाणार असलेल्या चारही ठिकाणी ते साठवले जाणार आहे. हे पवित्र पाणी प्रवाशांना प्रवास पूर्ण झाल्यावर विमानतळावर दिले जाणार आहे.

महावितरणमध्ये अधीक्षक अभियंतापदी अरविंद बुलबुले, युवराज जरग रूजू

पुणे- पुणे परिमंडलमध्ये रास्तापेठ शहर मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. अरविंद बुलबुले तर पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. युवराज जरग यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.

       रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. बुलबुले हे नोव्हेंबर १९९९ पासून महावितरणमध्ये कार्यरत आहेत. येथे रूजू होण्यापूर्वी ते ठाणे शहर मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याची रास्तापेठ शहर मंडलमध्ये प्रशासकीय बदली झाली आहे. तर पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. जरग हे जुलै १९९९ पासून महावितरणमध्ये कार्यरत आहेत. येथे त्यांची पदोन्नतीवर बदली झाली असून यापूर्वी ते पालघर मंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘ई-श्रम कार्ड’साठी शिबिरांचे आयोजन करावे- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी  ई-श्रम कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘ई-श्रम’ कार्ड

केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार,  फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.