Home Blog Page 1531

देशांतर्गत विमानसेवेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 42.85% ची वाढ

देशांतर्गत विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी सादर केलेल्या प्रवास विषयक आकडेवारीनुसार, प्रवाशांची संख्या, विक्रमी 503.92 लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 352.75 लाख होती. त्यामुळे यात 42.85% ची लक्षणीय वार्षिक  वाढ दिसून येते.

प्रवासी संख्येतील ही उल्लेखनीय वाढ भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची मजबूती आणि लवचिकता प्रतिबिंबित करते. संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी आणि आपल्या देशातील नागरिकांना सोयीचे प्रवास पर्याय देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे हे निदर्शक आहे.

या शिवाय, एप्रिल 2022 आणि एप्रिल 2023 दरम्यान MoM वाढीचा दर 22.18% ने वाढला आहे. तो देशांतर्गत विमान उद्योगाची सातत्यपूर्ण गती अधोरेखित करतो.

प्रवासी संख्येतील लक्षणीय वाढीव्यतिरिक्त, एप्रिल 2023 महिन्यासाठी नियोजित देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा एकूण दर 0.47% इतका उल्लेखनीयरित्या कमी राहिला आहे. तसेच,  10,000 प्रवाशांमागे मोजली जाणारी तक्रारींची संख्या एप्रिल 2023 मध्ये जवळपास 0.28 इतकी कमी आहे. नागरी विमान वाहतुक मंत्रालय आणि विमान कंपन्यांच्या सूक्ष्म नियोजन, कार्यक्षमता आणि सक्रिय उपाययोजनांमुळे हे यश मिळाले आहे. प्रवाशांना सुविहित  प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी दोन वर्षांच्या कोविड-19 मंदीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामाचेच हे फलित आहे.

“विमान वाहतुक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासाठी सर्व सहभागींचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. मंत्रालय अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या उद्योगाच्या भरभराटीसाठी वातावरण आणि शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी तसेच सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांसोबत मंत्रालय सहयोग सुरू ठेवेल” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल; रश्मी व उद्धव ठाकरेंनी केली विचारपूस

मुंबई-माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन मनोहर जोशींच्या तब्येतीची विचारपूस केली.सोमवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉ चारुलता सांकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेचे नेते आहेत.बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे ,बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राज्यभर पसरविण्यासाठी,सरपोतदार ,साबीर भाई शेख ,दत्ताजी साळवी यांच्यासमवेत काम केलेले नेते आहेत. काल संध्याकाळी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.

UPSC नागरी सेवेचा निकाल जाहीर; टॉप 4 मध्ये चारही मुली, इशिता किशोर ठरली अव्वल, 933 विद्यार्थांची निवड

नवी दिल्‍ली, 23 मे 2023-केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात.

https://upsc.gov.in/FR-CSM-22-hindi-230523.pdf

या परीक्षेत टॉप 4 मध्ये मुली पुढे आहेत, त्यापैकी इशिता किशोरने अव्वल स्थान मिळवले आहे.

दुसरा क्रमांक गरिमा लोहियाने तर तिसरा क्रमांक उमा हरती एन हिने पटकावला. स्मृती मिश्रा चौथ्या आणि गेहाना नव्या जेम्स पाचव्या स्थानावर आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील.

अंतिम निकालात एकूण 933 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यापैकी 345 उमेदवार ओपन, 99 EWS, 263 OBC, 154 SC आणि 72 ST प्रवर्गातील आहेत. 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. IAS पदांवर निवडीसाठी 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

निवडलेल्या अव्वल 10 उमेदवारांची यादी

1. इशिता किशोर 2. गरिमा लोहिया 3. उमा हरती एन 4. स्मृती मिश्रा 5. मयूर हजारिका 6. गहना नव्या जेम्स 7. वसीम अहमद 8. अनिरुद्ध यादव 9. कनिका गोयल 10. राहुल श्रीवास्तव

1011 पदांसाठी भरती
UPSC ने नागरी सेवा 2022 उमेदवारांच्या 03 टप्प्यांत वैयक्तिक मुलाखती घेतल्या, ज्याचा तिसरा आणि अंतिम टप्पा 18 मे 2023 रोजी संपला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जाहीर केलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस मेन 2022 च्या निकालानुसार, नागरी सेवा प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. UPSC ने नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत IAS, IPS सह 1011 पदांची भरती केली आहे.

निकाल कसा पाहताल

  • अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • पेजवर, UPSC, CSE मुख्य निकाल 2022 (अंतिम) लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर एक PDF फाईल उघडेल.
  • पीडीएफ फाइलमध्ये UPSC नागरी सेवा मुख्य अंतिम निकाल 2022 असेल.
  • गुणवत्ता यादी तपासा आणि डाउनलोड करा.


केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2022 मध्ये घेतलेल्या लेखी नागरी सेवा परीक्षेच्या निकालाच्या आधारावर त्यानंतर जानेवारी ते मे 2023 या कालावधीत व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखती या दोन्हीमधून, जो अंतिम निकाल आहे, त्यातील गुणवत्ता यादीनुसार, उत्तीर्ण उमेदवारांना खालील नियुक्त्या देण्याची शिफारस करण्यात आली आहे:

  1. भारतीय प्रशासकीय सेवा (आय ए एस);
  2. भारतीय परदेश सेवा (आय एफ एस);
  3. भारतीय पोलिस सेवा (आय. पी. एस); आणि
  4. केंद्रीय सेवा, श्रेणी अ आणि ब.

एकूण 933 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे:  

GENERALEWSOBCSCSTTOTAL
345(incl.08 PwBD-1,    06 PwBD-2,08 PwBD-3 &05 PwBD-5)99(incl.01 PwBD-1,     Nil PwBD-2,Nil PwBD-3 & Nil PwBD-5)263(incl.05 PwBD-1,     Nil PwBD-2,02 PwBD-3 & 02 PwBD-5)154(incl.Nil PwBD-1,     Nil PwBD-2,02 PwBD-3 &01 PwBD-5)72(incl.Nil PwBD-1,     01 PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)933(incl.14 PwBD-1,     07 PwBD-2, 12 PwBD-3 & 08 PwBD-5)

नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार, आयोगाने उमेदवारांची एक समग्र आरक्षित सूची तयार केली आहे. ती खालीलप्रमाणे :

GENERALEWSOBCSCSTTOTAL
8928520504178

विविध सेवा विभागातील नियुक्त्या तिथे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार केल्या जातील. त्यासाठी परीक्षेच्या नियमांमध्ये असलेल्या तरतुदींचा विचार करण्यात येईल. सरकारने सूचित केलेल्या रिक्त जागांवर खालीलप्रमाणे भरती केली जाईल. ही यादी पुढीलप्रमाणे :

SERVICESGENEWSOBCSCSTTotal
I.A.S.7518452913180
I.F.S.150410060338
I.P.S.8320533113200
Central Services Group ‘A’201451226936473
Group ‘B’ Services6012331907131
Total43499263154721022*

* includes 41 PwBD vacancies (14 PwBD-1, 07 PwBD-2, 12 PwBD-3 & 08 PwBD-5)

खालील परीक्षाक्रमांक असलेल्या 101 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस तात्पुरत्या स्वरूपातील आहे:

010871308245680866859121028135386496302488
011479108252020871153121426835419336405507
011954708256970880516121900138050096502635
034085308257110889422122518238056646503657
050879208260271002593131076041016776504214
051251508281721031783141957241276346601286
051447208282491101257150136143004976616317
061116208349391111285160101145008316618012
070362408357971115899190634454097036620529
080213008504671126720262324457065846630495
080306808510781200935340115458078586911938
080441408512101202953340590358085907002342
080590908527141205413340661858103487002904
080748508535811205834351009058132507004921
080754508545141206064351021159062477905846
080915508599191208975351622059189268700599
08110460862616120946735327366205956 

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्राच्या परिसरातच एक ‘सुविधा केंद्र’ आहे. उमेदवार तिथे जाऊन, त्यांच्या परीक्षा / भरती संबंधी कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 5 या  दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 23385271 / 23381125 / 23098543 वर मिळवू शकतात. निकाल  आयोगाच्या http//www.upsc.gov.in. या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/may/doc2023523201601.pdf

2 महिन्यांपासून महाराष्ट्रात नवीन ड्रायव्हिंग लायसन्सचा पुरवठा ठप्प ..नितीन गडकरींना पाठविणार १ लाख पत्रे ..

पुणे-उडत्या हवाई बसेस ची कल्पना प्रत्यक्षात उतरवू पाहणारे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी २४ तास पाणी पुरवठ्याच्या नावाने गेली ७ वर्षे पुणेकरांना लुटणाऱ्या महापालीकेला उडत्या हवाई बसेस साठी डीपीआर करण्याचे आदेश दिल्याचे सर्वांना ठाऊक आहे . आता याच गडकरींना .. महाराष्ट्र राज्यभर नवीन ड्रायव्हिंग लायसन्सचा पुरवठा ठप्प झाल्याचे कळवून तातडीने व्यवस्था करण्यासाठी सुमारे १ लाख्पत्रे पाठविण्याचा संकल्प विठ्ठल मेहता यांनी केला आहे.

मेहता हे महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालकसंघटनेचे उपाध्यक्ष आणि मेहता मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आहेत. ‘माय मराठी’ ला त्यांनी सांगितले कि,’स्मार्ट कार्ड छपाई होत नसल्यामुळे गेली 2 महिने महाराष्ट्र राज्यात मोटार ड्रायव्हिंग लायसन्सचा तीव्र तुटवडा जाणवत असून अशा प्रकारच्या तक्रारी राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल,संचालक व नागरिक महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेकडे आल्या आहेत.वाहन चाचणी परीक्षा दिल्यानंतर 3 आठवड्याचा आत लायसेन्स पोस्टाने घरी येणे अपेक्षित असते पण तसे होत नसल्यामुळे ज्यांनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल मार्फत अथवा स्वतः प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वाहन चाचणी परीक्षा दिली ते 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी लायसेन्स येणे सोडा , पण प्रणाली छपाई झाली नसल्याचेही दाखवत नसल्याचे पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत.पोलिसही अत्यंत विश्वासार्ह असलेली ई प्रिंट मान्य करीत नाहीत.पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दरमहा वाहन चाचणी परीक्षा उत्तीर्ण,नूतनीकरण,दुय्यम प्रत,नाव ,पत्ता बदल ई.कारणास्तव दरमहा 30000 च्या जवळ पास स्मार्ट कार्डची गरज भासते.
महाराष्टातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक,विविध संघटना,नागरिक,लोकप्रतिनिधी ई. आप आपल्या विभागातील प्रादेशिक/उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात या बाबत जोरदार पाठपुरावा करूनही अद्याप स्मार्ट कार्ड लायसेन्स पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.
त्यामुळे आता मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक,वंचित लायसेन्स धारक ,सेवा भावी / वाहतूक विषयक संस्था, ई मार्फत केंद्रीय परिवहन मंत्री .नितीन गडकरी,राज्याचे परीवहन मंत्री.शंभूराज देसाई,परिवहन आयुक्त यांना 1 लाख पत्रे पाठवून तत्काळ लायसेन्स पुरवठा सुरळीत व्हावा ,व 8 दिवसाच्या आत लायसेन्स पोस्टाने घरी येण्याबाबत मागणी करण्यात येणार असल्याचे,असे उपाध्यक्ष विठ्ठल मेहता यांनी कळविले आहे.याकरिता ज्यांची स्मार्ट कार्ड अद्याप आलेले नाहीत त्यांनी प्रतिसाद देण्यासाठी पुढे यावे असेही ते म्हणाले.

नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे सर्वोत्कृष्ट खेळाडू

पुणे जिल्हा पुरुष व महिला संघ ‘टीम चॅम्पियनशिप’चे मानकरी

पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवचित्रपती क्रीडा नगरीत दि.२१ मे पासून तीन दिवस सुरु असलेल्या ७१व्या राजपथ महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेच्या सांगता समारंभात सर्वोत्तम अॅथलेटिक्सचा मान पुरुष गटात नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी संपादन केला. तसेच टीम चॅम्पियनशिप चा मान पुणे जिल्हा पुरुष व महिला संघाला मिळाला. या स्पर्धेत एकूण ३३ जिल्ह्यातील ७१५ खेळाडूंचा समावेश होता. त्यामध्ये तेजस शिरसे, सर्वेश कुशरे, निधी सिंग, पूर्वा सावंत, शर्वरी परुळेकर, अवंतिका नराळे अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंचा सहभाग हेदेखील आकर्षण होते. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल उपस्थित होते.

पुण्यात झालेल्या ७१व्या राजपथ महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्र टीममध्ये निवड लवकरच जाहीर होईल. ही महाराष्ट्र टीम ओरीसाची राजधानी भुवनेश्वर येथे दि. १५ ते १८ जून २०२३ या दरम्यान संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतील अशी माहिती महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल यांनी दिली.

आज संपलेल्या या स्पर्धांमधील महत्वाच्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे.

·        पुरुषांच्या २०० मीटर स्पर्धेत मुंबई उपनगरच्या जय शहा याने २१.७४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई शहरच्या अक्षय शेट्टी याने २१.८४ आणि मुंबई शहरचा रिदय जना याने २२.१२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत साताराच्या शुभम देशमुख याने ४७.६४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या श्यामराव दौंडकरने ४८.९८ आणि पुणेच्या शुभम पाटणकर याने ४९.२१ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या ८०० मीटर स्पर्धेत अकोल्याचा चैतन्य होल्गरे याने १:५४:३७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या सत्यजित पुजारी याने १:५४:५४ आणि धुळेच्या प्रथमेश देओरे यांने १:५४:५७ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेत कोल्हापूरच्या ओमकार कुंभार याने ३:४८:८२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरीच्या संदीप जोयाशी याने ३:५४:०५ आणि मुंबई उपनगरच्या कार्तिक कारकेराने ३:५४:१६ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या १०००० मीटर स्पर्धेत सोलापूरच्या अरुण राठोडने ३१:०९:७६ वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या उत्तम पाटीलने ३१:१८:५६ आणि परभणीच्या विष्णू लव्हाळे याने ३१:३०:६९ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत औरंगाबादच्या तेजस शिरसे याने १३.९७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या विकास खोडकेने १४.७३ आणि मुंबई शहरच्या साहिल गेदामने १५.२२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अकोलाच्या निर्मल यादवने ५२.१७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या रोहन कांबळे याने ५२.४२ आणि पुणेच्या सिद्धेश चौधरीने ५२.५२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या 4X १०० मीटर रिले स्पर्धेत बॉम्बे सिटी-बी टीमने ४३.०७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणे- एल ने ४३.५५ आणि धुळे-सी टीमने ४३.८९ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या 4X ४०० मीटर रिले स्पर्धेत पूना-जी टीमच्या पी.कदम, प्रफुल्ल लाटे, एस. पाटणकर, एस. दौंडकर यांनी ३:२०:२३ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पालघर- एफ च्या अनुज यादव, आशिषकुमार सिंग, प्रीत दास, पी. यादव यांनी ३:२२:३० आणि परभणी- पी च्या व्ही.शिंदे, व्ही.केंद्रे, एच. भालेकर, एस.शिंदे यांनी ३:२३:१८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत नाशिकच्या शुभम भंडारे याने ८:४९:४५ वेळ नोंदवून प्रथम कमांक मिळविला. कोल्हापूरच्या सिद्धांत पुजारीने ९:०३:७२ आणि नागपूरच्या राजन यादव याने ९:०५:६८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत नाशिकच्या सतीश देशमुखने ४७.९५ मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या पृथ्वीराज नलावडे याने ४७.९० मीटर आणि अहमदनगरच्या श्रीनिवास कारळेने ४४.८२ मीटर नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशरे याने २.२० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. सांगलीच्या ऋषिकेश काटेने २.०० मीटर आणि पुणेच्या धैर्यशील गायकवाडने २.०० मीटर नोंदवली.    

·        महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत सातारच्या सुदेष्णा शिवणकर हिने २५.१३ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्याच्या ख़ुशी उमेशने २५.३० आणि मुंबई शहरच्या सरोज शेट्टी हिने २५.६८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत पालघरच्या शिवानी गायकवाड हिने ५४.९८ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणेच्या निधी सिंगने ५६.०९ आणि पुणेच्या देवश्री लव्हे हिने ५८.५७ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या ८०० मीटर स्पर्धेत नाशिकच्या यमुना लडकत हिने २:०७:३२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या ताई बाम्हणे हिने २:१०:६९ आणि पुणेच्या अर्चना आढाव हिने २:१३:१६ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या १०००० मीटर स्पर्धेत नाशिकच्या पूनम सोनूने हिने ३४:०५:४८ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले हिने ३४:३१:०७ आणि साताराच्या रेश्मा केवटे हिने ३४:४०:०१ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाणेच्या क्रिस्टल वडाकेल हिने १६.७६ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. पुणेच्या स्नेहा गर्जे हिने १७.३७ आणि पुणेच्या दीपाली बांदल हिने १८.११ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.  

·        महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाण्याच्या निधी सिंगने १:०२:३० वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या श्रावणी सांगळे हिने १:०४:३२ आणि कोल्हापूरच्या श्वेता चिकोडीने १:०५:१२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या तिहेरी उडी स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शर्वरी परुळेकर हिने १२.७९ मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई उपनगरच्या पूर्व सावंतने १२.७४ मीटर आणि रायगडच्या त्रिवेणी तावडे हिने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

·        महिलांच्या ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत साताऱ्याच्या सानिका नलावडे हिने ११:४९:६१ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. साताऱ्याच्या वैष्णवी सावंत हिने ११.४९.६२ आणि उस्मानाबादच्या योगिनी साळुंके हिने १२:१२:८४ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे-कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे बाणेरमध्ये नवे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले असून, रविवार दि. २१ मे रोजी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे पाटील, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, राहूल कोकाटे, रोहन कोकाटे, स्थानिक भाजपा कार्यकर्त्या उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, सचिन पाषाणकर, ॲड. मिताली सावळेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनानंतर नामदार पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. हे कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही यावेळी दिली. त्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी नामदार पाटील यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या कार्य कुशलतेबाबत समाधान व्यक्त केले.

पाषाण मधील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

थेट भेट द्वारे पाषाणमधील नागरिकांशी संवाद

पुणे-पाषाण मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यातील अडथळे लवकरच दूर करुन पाषाणमधील नागरिकांना बाणेर-बालेवाडीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. थेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पाषाणमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहूल कोकाटे, सनी निम्हण, रोहन कोकाटे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे यांच्या सह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पोलीस गस्त वाढविणे, योग अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे आदी समस्या स्थानिक नागरिकांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना नामदार पाटील यांनी केली‌‌.

त्यासोबतच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश नामदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच योग अभ्यासासाठी आयुक्तांसोबत चर्चा करुन केंद्र सुरू करण्याचे निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केल्याबाबत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महामार्गालगत काहीजण राडारोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे, नामदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नालेसफाईत कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा- मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई
मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाई करूनही पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे मुंबईची तुंबई होते. त्याचा फटका सर्वच मुंबईकराना बसतो. यंदाही मुंबईत पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेवून सद्यस्थितीत चालू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत संपूर्ण माहिती दिली. नालेसफाईचे केलेले काम आणि त्यातील चुकांबाबत कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

नुकताच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवकांसह मुंबई महापालिकेने स्वतः व कंत्राटदारांच्या मार्फत शहरासह, उपनगरातील अनेक ठिकाणी केलेल्या नालेसफाई कामांचा सलग तीन दिवस पाहणी दौरा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर आज आमदार अँड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.

याबाबत बोलताना आ. अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले, शहरातील पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा ही मुंबईकरांची गेली वर्षानुवर्षे अपेक्षा आहे. आम्ही यंदाच्या नालेसफाई कामाबाबत असमाधानी आहोत. कंत्राटदार गाळ मोजणीतच हातचलाखी करत आहेत. बहुतांश ठिकाणी कामाचा दर्जा शंकास्पद आहे. आम्ही जे चित्र पाहिले त्यावरून प्रशासनाने सांगितलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये तफावत दिसते आहे. बहूसंख्य ठिकाणी नुकतीच कामाला सुरुवात झाली आहे. तर अजूनही गाळाचे ढीग नाल्यात दिसून येत आहेत. नालेसफाईबाबत मुंबई करांच्या डोळ्यात कुणी धूळफेक करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची गरज आहे, असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

भारतीय तायक्वांदाे संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव शिरगावकर यांची निवड

मुंबई :- क्रीडा विश्वातील आपला कुशल नेतृत्वाचा दबदबा कायम ठेवताना नामदेव शिरगावकर पुन्हा एकदा भारतीय तायक्वांदाे फेडरेशनच्या अध्यक्षपदावर दिमाखदारपणे विराजमान झाले आहेत. त्यांची रविवारी बिनविराेध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथे भारतीय तायक्वांदाेच्या वतीने विशेष सर्व साधारण बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीत २५ राज्य संघटनेचे सदस्यही सहभागी झाले हाेते. निवृत्त न्यायमुर्ती भगवंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक पार पडली. धर्मादाय आयुक्त शरद मांडके यांच्या सुचनेप्रमाणे गायकवाड यांनी या निवडणुकीचे निरीक्षण केले.
यादरम्यान महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्या नावावर अध्यक्षपदाचा शिक्कामाेर्तब करण्यात आला. पंजाबच्या वीणा अराेरा यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची सुत्रे साेपवण्यात आली. त्यापाठाेपाठ तामिळनाडूचे साॅक्रेटिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
तसेच सेक्रेटरी जनरलपदी महाराष्ट्राच्या अमित धमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशचे रजत दीक्षित हे खजिनदार असतील. कार्यकारी समिती सदस्यपदी आसामच्या गितीका तालुकदार आणि गुजरातच्या विकास कुमार यांची निवड करण्यात आली.

पुन्हा एकदा तायक्वांदाेमध्ये भारताचे वर्चस्व राहणार : शिरगावकर
तायक्वांदाे खेळ प्रकारात जागतिक स्तरावर आता पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहणार आहे. यासाठी आम्ही खास पद्धतीने तंत्रशुद्ध प्रशिक्षणांसह खास प्रशिक्षकांची निवड करणार आहाेत. तसेच या युवांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी माेठ्या संख्येत स्पर्धां आयाेजावर आमचा भर असेल. यातून देशभरातील युवांना यातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची माेठी संधी मिळेल. याशिवाय देशाच्या कानाकाेपऱ्यात गुणवंत असे तायक्वांदाेचे खेळाडू तयार हाेतील, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी विजयानंतर दिली.

गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले.
त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.

चोर, बेवकूफ, मूर्ख म्हणणे अ‌ॅट्रॉसिटी कायद्याच्या कक्षेत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली-एखाद्या व्यक्तीस चोर, बेवकूफ अथवा मूर्ख म्हटल्याने अनुसूचित जाती-जमाती कायद्याच्या कक्षेत येत नाही. जातिवाचक शिवीगाळ, टिप्पणी असेल तरच या कायद्यांतर्गत येऊ शकेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मारहाण व अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत दाखल झालेला खटला रद्द करताना न्या. एस. रवींद्र भट व दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हे स्पष्टीकरण दिले अाहे. अनुसूचित जाती-जमातीमधील व्यक्तीस मारहाण अथवा मूर्ख, चोर, बेवकूफ म्हटल्याने अॅट्रॉसिटी कायद्यांंतर्गत दुसऱ्या पक्षाविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही हे पोलिसांनी समजून घेतले पाहिजे. सार्वजनिक साक्षीदार गरजेचा उत्तर प्रदेशात जानेवारी २०१६ मध्ये २ कुटुंबांतील वादानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांकडे केवळ ३ साक्षीदार होते. आरोप सिद्ध होण्यासाठी एखादा सार्वजनिक साक्षीदार गरजेचा होता. पोलिसांनी तक्रारदाराच्या प्रभावाखाली घिसाडघाईने कारवाई केली असे न्यायालयाने नमूद केले आहे.

जीवे मारण्याची धमकी तरीही राहुल गांधींचा ट्रक प्रवास, दिल्लीहून चंदीगडला पोहोचले..पहा फोटो

राहुल सोनियांना भेटण्यासाठी शिमल्यात

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एका ट्रकमधून दिल्लीहून चंदीगडला पोहोचले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, १२ तासांपूर्वीच राहुल गांधींना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.असे असताना ट्रक चालक आणि आम माणसाचे जीवन नेमके कसे आहे ते थोडेफार तरी समजेल या हट्टाने राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांचा सल्ला नाकरून हा प्रवास केला

ढाब्यावर ट्रक चालकांशी थेट भेट थेट संवाद राहुल गांधींनी साधला .

राहुल गांधींच्या ट्रक प्रवासाबाबत हरियाणा काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ते सोनिया गांधींना भेटण्यासाठी शिमला येथे पोहोचले आहेत. सध्या सोनिया प्रियांका गांधी यांच्या शिमल्यातील फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही त्यांनी सिमल्यात राहून घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल आईपासून दूर होते, त्यामुळे ते दिल्लीहून चंदीगडला पोहोचले, तेथून ते त्यांच्या वाहनाने शिमल्याला रवाना झाले.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना भेट. कारण त्यांना या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत.

ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे-केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समन्स जारी केल्यानंतर का स्वतः जयंत पाटील ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला.आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे,हर्षवर्धन दीपक मानकर,प्रदीप गायकवाड़,किशोर कांबळे,सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है”,”ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला.तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख याना निवेदन देन्यात आले.

डाॅ. स्मिता घुले यांचा लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव

पुणे :डाॅक्टरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करणाऱ्या जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या (जीपीए) वतीने वीमेन्स काॅन्फरन्स आयोजित करण्यात करण्यात आली होती. या कार्यक्रमात ‘ लेडी जीपी ऑफ द इयर’ पुरस्काराने डाॅ. स्मिता घुले यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा केल्याबद्दल डॉ. घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जीपीएच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा नाईक, तर प्रमुख पाहुण्या म्हणून कांचन पाटील-वडगावकर उपस्थित होत्या. यावेळी जीपीएचे अध्यक्ष डाॅ. श्रीराम जोशी, सचिव डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता, खजिनदार डाॅ. सुनील भुजबळ, माजी अध्यक्ष डाॅ. हरिभाऊ सोनवणे, प्रियदर्शिनी विंगच्या चेअरमन डाॅ. आरती शहाडे व इतर महिला डाॅक्टर उपस्थित होत्या.
डाॅ. श्रीराम जोशी यांनी जीपीएच्या विभिन्न कार्याची माहिती यावेळी दिली. महिला डाॅक्टर आपल्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वैद्यकीय सेवा करीत असतात. तसेच सामाजिक कार्यातदेखील असतात. अशा वेळी महिला डाॅक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डाॅ. स्मिता घुले यांनी जीपीएच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली व त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. जीपीए डाॅक्टरासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रमुख अतिथी असलेल्या डाॅ. मनीषा नाईक यांनी एक अधिकारी म्हणून आपण सातत्याने डाॅक्टरांना सहकार्य करीत राहू, असे आश्वासन दिले. या पुरस्कार सोहळ्यापूर्वी विविध तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञ डाॅक्टरांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. भाग्यश्री मुणोत-मेहता यांनी केले. तर आभार डॉ. राजेश दोषी यांनी मानले.

2000 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ,नोटा खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही

देशातील सर्व बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला आजपासून म्हणजेच मंगळवारपासून (23 मे) सुरू होत आहे. 3 दिवसांपूर्वी 19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 ची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलून किंवा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात.

आरबीआयच्या मुदतीनंतरही 2000 ची नोट कायदेशीर राहील. म्हणजेच सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. लोकांना या नोटा लवकरच बँकांमध्ये परत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे.

नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही
आरबीआय आणि एसबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोटा बदलण्यासाठी कोणत्याही आयडीची आवश्यकता नाही आणि कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एका वेळी 20,000 रुपयांच्या फक्त 10 नोटा बदलल्या जातील, परंतु या नोटा खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. बँका 2000 च्या नोटा जारी करणार नाहीत.

नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याऐवजी नव्या पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. RBI ने 2018-19 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे.

आयडीविना नोट बदलण्यास विरोध, कोर्टात जनहित याचिका
कागदपत्रांशिवाय नोटा बदलून देण्याच्या रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँकेच्या आदेशाविरोधात भाजप नेते आणि वकील अश्वनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी कोणत्याही ओळखीच्या पुराव्याशिवाय 2000 च्या नोटा बदलून देऊ नयेत अशी मागणी केली आहे.

चलन व्यवस्थापनाअंतर्गत घेण्यात आला निर्णय : RBI गव्हर्नर
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक दिवसापूर्वी नोटा बदलण्यासाठी लोकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, असे म्हटले होते. आम्ही ४ महिन्यांची मुदत दिली आहे. नोट्स बदलण्यास मोकळ्या मनाने, परंतु वेळेची मर्यादा गांभीर्याने घ्या. चलन व्यवस्थापनांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. 2000 ची नोट चलनातून काढून टाकण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. चलनात असलेल्या एकूण चलनापैकी फक्त 10.8% चलन 2000 च्या नोटांमध्ये आहे.

लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर केल्या जातील

  • आरबीआयने सोमवारी आणखी एक मार्गदर्शक सूचना जारी केली. यामध्ये बँकांना उष्मा लक्षात घेऊन सावलीची जागा आणि लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. किती नोटा बदलल्या आणि किती जमा झाल्या याचा रोजचा हिशोब ठेवा.
  • दास म्हणाले होते, ‘जे काही संकट येईल ते आम्ही दूर करू. बँकांमार्फतही आम्ही या प्रक्रियेवर लक्ष ठेवू. काळजी करण्यासारखे काही नाही. चलन व्यवस्थापन ऑपरेशन अंतर्गत, आम्ही चलनातून 2000 च्या नोटा काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे.
  • यापूर्वीही लोक दुकानात 2000 च्या नोटा स्वीकारत नव्हते. आमच्या घोषणेनंतर कदाचित त्यात वाढ झाली आहे. ती कायदेशीर निविदा राहील, असे आम्ही सांगितले होते. तुम्ही 2000 च्या नोटांनी खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरपर्यंत बहुतांश नोटा आमच्याकडे येतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.

2 हजाराच्या नोटा कशा बदलता येतील? 6 प्रश्नांमध्ये नोटा बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या…

1. प्रश्न: या 2 हजाराच्या नोटा कोठून बदलता येतील?
उत्तर: तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता.

2. प्रश्न: माझे बँक खाते नाही त्यामुळे मी त्याशिवाय नोटा बदलू शकतो का?
उत्तर: होय, तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकता. त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक नाही. तुम्ही थेट काउंटरवर जाऊन नोटा बदलू शकता. दुसरीकडे, जर तुमचे त्या बँकेत खाते असेल, तर तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.

3. प्रश्न: एका वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?
उत्तरः ₹ 2000 च्या नोटा एका वेळी ₹ 20,000 च्या मर्यादेपर्यंत दुसर्‍या मूल्यासाठी बदलल्या जाऊ शकतात. दुसरीकडे, तुमचे खाते असल्यास, तुम्ही कितीही 2000 च्या नोटा जमा करू शकता.

4. प्रश्न: नोटा बदलण्यासाठी बँकेला काही शुल्क आकारावे लागेल का?
उत्तर: नाही, तुम्हाला नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. ते पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही बँक अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता.

५. प्रश्नः 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा न केल्यास काय होईल?
उत्तर: ₹2000 च्या नोटा व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि पेमेंट म्हणून देखील प्राप्त केल्या जाऊ शकतात. तथापि, RBI ने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या बँक नोटा जमा करण्याचा किंवा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.

६. प्रश्नः हा नवा नियम कोणाला लागू आहे?
उत्तर : हा निर्णय सर्वांना लागू आहे. 2000 च्या नोटा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने बँकेच्या कोणत्याही शाखेत त्या जमा कराव्या लागतील किंवा 30 सप्टेंबरपर्यंत त्या इतर नोटांसाठी बदलून घ्याव्या लागतील.