राहुल सोनियांना भेटण्यासाठी शिमल्यात
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एका ट्रकमधून दिल्लीहून चंदीगडला पोहोचले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, १२ तासांपूर्वीच राहुल गांधींना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.असे असताना ट्रक चालक आणि आम माणसाचे जीवन नेमके कसे आहे ते थोडेफार तरी समजेल या हट्टाने राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांचा सल्ला नाकरून हा प्रवास केला
राहुल गांधींच्या ट्रक प्रवासाबाबत हरियाणा काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ते सोनिया गांधींना भेटण्यासाठी शिमला येथे पोहोचले आहेत. सध्या सोनिया प्रियांका गांधी यांच्या शिमल्यातील फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही त्यांनी सिमल्यात राहून घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल आईपासून दूर होते, त्यामुळे ते दिल्लीहून चंदीगडला पोहोचले, तेथून ते त्यांच्या वाहनाने शिमल्याला रवाना झाले.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना भेट. कारण त्यांना या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत.