~ अहमदाबादचा इंडिया कोशंट खाद्यपदार्थांच्या बाबतीत सर्वाधिक (९५ टक्के)
~ भारतीय भौगोलिकतेबाबत सुरतची समज सर्वात चांगली (जिऑग्राफी कोशंट – ८२ टक्के)
मुंबई – जी२० चे अध्यक्षपद भारताकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही युनेस्को जागतिक वारसास्थळी रोषणाई करण्यात आली होती. या निमित्ताने भारताचा इतिहास, संस्कृती, भूगोल, निसर्ग आणि खाद्यपदार्थ यांचे सर्वोत्तम पैलू जगासमोर आणण्यात आले. क्लब महिंद्रा इंडिया कोशंट सर्व्हेने या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतीयांना आपल्या देशातील वैविध्य, संस्कृती, वारसा आणि खाद्यपदार्थ यांविषयी किती माहिती आहे हे मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार अहमदाबादमध्ये राहाणाऱ्या नागरिकांचा इंडिया कोशंट सर्वाधिक म्हणजेच ९५ टक्के आहे. कोईम्बतूरचा ७६ टक्के, मुंबईचा ७५ टक्के, दिल्लीचा ५९ टक्के, बेंगळुरूचा ५७ टक्के आहे, तर कोचीच्या नागरिकांचा इंडिया कोशंट ३१ टक्के आहे. सर्वच भौगोलिक प्रदेश, कला व संस्कृतीबाबत अहमदाबादचे ज्ञान सातत्याने सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे ८१ टक्के, ९३ टक्के आणि ९६ टक्के आहे.
कला व संस्कृतीबद्दल सखोल ज्ञान कोणाकडे आहे हे जाणून घेताना असे लक्षात आले, की ९९ टक्के अहमदाबादवासियांना खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश येथे भरतो हे माहीत आहे. मुंबईत हे प्रमाण ८० टक्के, दिल्लीत ६० टक्के, बेंगळुरूमध्ये ५४ टक्के आणि कोचीमध्ये २२ टक्के आहे. कोलकातामध्ये ९३ टक्के जणांना पश्मिना शाली काश्मीरमधून येतात हे माहीत आहे. हेच प्रमाण अहमदाबादमध्ये ९२ टक्के, मुंबईत ८७ टक्के, कोईम्बतूर येथे ८४ टक्केस तर पटनामध्ये ८२ टक्के आहे. पैठणी साड्या महाराष्ट्रात तयार होतात हे सुरतमधील ९३ टक्के जणांना, पुण्यातील ८९ टक्के जणांना, तर अहमदाबादमधील ८८ टक्के नागरिकांना माहीत आहे. हेच प्रमाण लखनौमध्ये ६५ टक्के व दिल्लीत ६० टक्के आहे. अहमदाबादमधील ९० टक्के लोकसंख्येला कथ्थक हा शास्त्रीय नृत्यप्रकार उत्तर प्रदेशचा असल्याचे माहीत आहे. हे प्रमाण पुण्यात ६१ टक्के, हैद्राबादमध्ये ५७ टक्के आणि जयपूरमध्ये ४४ टक्के आहे.
सुरतच्या नागरिकांचे भौगोलिक ज्ञान ८२ टक्के व अहमदाबादचे ८१ टक्के आहे. त्याशिवाय सुरतमधील ९८ टक्के सहभागींना कुंबलगढची भिंत चीनच्या भिंतीनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी असल्याचे व ती राजस्थान येथे वसल्याचे माहीत आहे. त्याच्रमाणे अहमदाबादच्या ९९ टक्के नागरिकांना दलाई लामा धरमशाळा येथे राहात असल्याची कल्पना आहे. हे प्रमाण मुंबईत ८१ टक्के, बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ६५ टक्के आणि कोचीत १३ टक्के आहे. अहमदाबादच्या नागरिकांना मसूरीला क्वीन ऑफ हिल्स म्हणतात याची कल्पना आहे. हेच प्रमाण लखनौमध्ये ७४ टक्के, चंदीगढमध्ये ७१ टक्के, दिल्ली आणि मुंबईत ७० टक्के आहे.
भारतीय संस्कृतीत खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व आहे आणि अहमदाबादमधील नागरिकांचे त्याबद्दलचे ज्ञान सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के आहे, तर कोलकातावासियांचे ज्ञान २५ टक्के आहे. अहमदाबादमधील नागरिकांना अप्पम हा केरळी पदार्थ असल्याचे माहीत आहे, तर हे प्रमाण मुंबईत ८० टक्के, दिल्लीत ४७ टक्के, बेंगळुरूमध्ये ४३ टक्के, कोलकातामध्ये २० टक्के आहे. अहमदाबादच्या ९१ टक्के नागरिकांना ऐपन हा उत्तराखंडमधील लोककलेचा प्रकार असल्याचे माहीत आहे. हेच प्रमाण अहमदाबादमध्ये ९१ टक्के, मुंबईत ७२ टक्के, हैद्राबादमध्ये ६४ टक्के आणि पुण्यात ५२ टक्के आहे.
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी प्रतीक मुझुमदार म्हणाले, ‘भारतीयांना आपल्या देशाची श्रीमंत संस्कृती आणि वारशाबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचे आहे. भारतात एकूण ३५ युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. क्लब महिंद्रा आपल्या ग्राहकांना भारतातील महत्त्वाच्या सांस्कृतिक स्थळी तयार करण्यात आलेल्या सुसज्ज रिसॉर्ट्समध्ये आमंत्रित करत आहे. तिथे पर्यटकांना देशाची कला, इतिहास, भौगोलिकता, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीविषयी माहिती मिळेल. अशाप्रकारच्या इतर ठिकाणी रिसॉर्ट्स उभारण्यावर व पर्यटकांना भारतीय संस्कृतीचा नवनवीन अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.’