एयर इंडिया, एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे चार भारतीय शहरांतून १९,००० यात्रेकरूंना जेदा आणि मदिना येथे पोहोचवणार
नवी दिल्ली – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानसेवा आणि स्टार अलायन्स सदस्य व एयर इंडिया एक्सप्रेस या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बजेट विमानसेवा कंपनीतर्फे हजसाठी खास विमानसेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांतर्फे भारतातील चार शहरांतून १९,००० यात्रेकरूंना सौदी अरेबियातील जेदा आणि मदिना येथे पोहोचवले जाणार आहे. यावर्षीच्या हज विमानसेवेतील पहिल्या एयर इंडिया विमानाने AI5451 जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ११०५ वाजता उड्डाण केले आणि ते मदिना येथे १३५० वाजता (स्थानिक वेळ) पोहोचले.
या विमानसेवेच्या पहिल्या टप्प्यात एयर इंडिया जयपूर व चेन्नई येथून मदिना आणि जेदा येथे अनुक्रमे २१ मे ते २१ जून २०२३ दरम्यान सेवा देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एयर इंडिया यात्रेकरूंना जेदा आणि मदिनातून जयपूर व चेन्नईमध्ये परत आणणार आहे. त्यासाठी ३ जुलै ते २ ऑगस्ट २०२३ दरम्यान ४३ विमानसेवा उपलब्ध केली जाणार आहे. जयपूरमधून एयर इंडियाच्या माध्यमातून २७ विमानांद्वारे ५८७१ यात्रेकरू प्रवास करणार आहेत, तर चेन्नईतून १९ विमानांद्वारे ४४४७ यात्रेकरून प्रवास करतील. एयर इंडियातर्फे एकूण १०३१८ प्रवाशांची सौदी अरेबियापर्यंत वाहतूक केली जाईल. त्यासाठी बोईंग ७८७ आणि एयरबस ३२१निओ एयरक्राफ्टचा वापर केला जाणार आहे.
दुसरीकडे एयर इंडिया एक्सप्रेस ४ ते २२ जून २०२३ दरम्यान कोझीकोड आणि कन्नूरपासून B737-800 एयरक्राफ्ट तैनात करणार आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात कोझीकोड ते जेदा पर्यंत ४४ विमानांतून ६३६३ प्रवासी घेऊन जाणार आहे, तर कन्नूर ते जेदा मार्गावर १३ विमानांतून १८७३ प्रवासी प्रवास करतील. एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे पहिल्या टप्प्यात ५७ विमानांद्वारे ८२३६ प्रवाशांची वाहतूक केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात १३ जुलै ते २ ऑगस्ट २०२३ दरम्यान एयर इंडिया एक्सप्रेस मदिनातील सर्व प्रवाशांना कोझीकोड आणि कन्नूरमध्ये पोहोचवणार आहे.
या संयुक्त विमानसेवेविषयी एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘पवित्र धार्मिक स्थळ हजसाठी खास वार्षिक विमानसेवा सुरू करताना एयर इंडियाला आनंद होत आहे. एयर इंडियातर्फे चेन्नई आणि जयपूरमधून सेवा दिली जाईल, तर एयर इंडिया एक्सप्रेस कोझीकोड व कन्नूरमधून सेवा देईल. एयर इंडिया एक्सप्रेसच्या मदतीने प्रवाशांना आरामदायी व सोयीस्कर सेवा देता येणार आहे. संबंधित विमानतळावरील कर्मचाऱ्यांना या सेवेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते या विमानांतील प्रवाशांची खास काळजी घेतील.’
एयर इंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अलोक सिंग म्हणाले, ‘कोझीकोड आणि कन्नूर येथून हजसाठी खास विमानसेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे केरळमधील यात्रेकरूंची सोय होणार आहे. त्याशिवाय मुंबई, मेंगलुरू, तिरुवनंतपुरम, कोची, कोझईकोड आणि कन्नूर येथून सौदी अरेबियापर्यंत जाणारी आमची नेहमीची विमानसेवा सुरू राहाणार आहे. या खास उपक्रमाच्या माध्यमातून एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना त्यांच्या खास यात्रेसाठी आरामदायी सेवा मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे.’
दरम्यान हज विमानसेवेच्या प्रवाशांना सुरळीतपण सेवा मिळावी यासाठी एयर इंडिया व एयर इंडिया एक्सप्रेस आपल्या सर्व स्त्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करत आहे.
विशेष कर्मचारी वर्ग – कंपनीने भारतातील चारही स्थानकांवर तसेच जेदा व मदिना येथे विशेष कर्मचारी वर्ग तैनात केला आहे. हे कर्मचारी प्रवाशांच्या आगमनापासून परतीच्या प्रवासापर्यंत सर्व घटकांची काळजी घेतील. त्याशिवाय या विमानसेवांचा समन्वय आणि देखरेखीसाठी खास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्यवस्था – एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेसने ज्येष्ठ यात्रेकरूंची खास काळजी घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे.
सुलभ चेक इन व्यवस्था – सर्व यात्रेकरूंना सहजपण चेक इन करता यावे यासाठी एयर इंडिया त्यांना खास तयार केलेल्या पाकिटातून बोर्डिंग पास व इतर महत्त्वाची कागदपत्रे देणार आहे. एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे प्रवाशांना भारतात चेक इन करण्यासाठी जाताना व येतानाच्या प्रवासाची बोर्डिंग कार्ड्स ठेवण्यासाठी विशिष्ट रंगाची पाउचेस देणार आहे. त्याशिवाय मूळ व प्रवासाचे ठिकाण दर्शवणारे ठळक अक्षरांतले, रंगीत लगेज टॅग्ज दोन्ही विमान कंपन्यांतर्फे दिले जाणार आहेत.
बॅगेज हाताळण्यासाठी खास सुविधा – मदिनातील प्रवाशांसाठी जेदातील कंत्राटी वाहतूक ऑपरेटर्सकडून चेक इन करण्यात आलेल्या बॅग्ज गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या बॅग्ज विमानतळावर निघण्यासाठी २४ तास देण्यात येतील.
खानपानाची व्यवस्था – दोन्ही विमान कंपन्यांनी निवडक केटरर्सच्या माध्यमातून पुरेशी व्यवस्था केली आहे. त्यानुसार भारतात चेक इन ते बोर्डिंगदरम्यान प्रवासापूर्वी आणि जेदा व मदिना येथे उतरताना खाद्यपदार्थांचे बॉक्स दिले जातील.
झमझम पाणी उपलब्ध – एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेलतर्फे भारतात परतताना झमझम पाणी आणले जाणार आहे. कंपन्यांतर्फे भारतात सेवा दिली जाणार असलेल्या चारही ठिकाणी ते साठवले जाणार आहे. हे पवित्र पाणी प्रवाशांना प्रवास पूर्ण झाल्यावर विमानतळावर दिले जाणार आहे.