पुणे -भाजपात जाउन स्वाभिमान विकलेल्या चाराणेंनी शिवसैनिकांना शिकवू नये.निष्ठावंत शिवसैनिक तुला तुझ्याच भाषेत कुस्तीच्या आखाड्यात अस्मान दाखवतील असे जाहीर आव्हान शिवसेनेचे शहर प्रमुख ,उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक संजय मोरे यांनी नितेश राणे यांना दिले आहे.
ते म्हणाले,’ शहरात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित आमदार नितेश राणे यांना पुणे शहरातील महिला पत्रकार यांनी विचारलेल्या कपडे बदलता तसे पक्ष बदलता प्रश्नांवर उत्तर नव्हतेच त्यामुळे देता आले नाही. राम गणेश गडकरी यांचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पुतळा काढताना RSS ला उद्देशून हाफ चड्डी म्हणालेला नितेश राणे भाजप मध्ये जाऊन हिंदुत्व चे गाणे गाऊ लागला. नितिमत्ता नसलेल्या नितू नारू तातू राणेला पुणेकर पत्रकारांना उत्तर देता येत नाही. विषयांतर करण्यासाठी वडीलधारे जेष्ठ नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांस पोलीस संरक्षण सोडून येण्याचे आणि त्यांचे पाय मोडण्याची भाषा करून आव्हान देणाऱ्या, तसेच सांस्कृतिक राजधानीत येउन पुणे शहराची शांतता भंग करणाऱ्या नितेश राणेवर महाराष्ट्राचे सरकार कारवाई करणार का ? याबाबत किमान विचारविनिमय करतील कि नाही याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच झोपा काढत आहेत. त्यांचा बोलबच्चन आमदार खुलेआम धमकी देत आहे, पुणे शहराच वातावरण बिघडवीत आहे असे असताना त्यावर कारवाई करण्याची हिम्मत फडणवीसांमध्ये आहे का ? इतर पक्षातील आमदार , पदाधिकारी ह्यांनी अशी भाषा वापरली असती तर त्यांच्यावर हक्कभंग , कारणे दाखवा नोटीस, पोलीस तक्रार असे प्रकार झाले असते. ह्याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, आणि गृहमंत्री पदाची गरीमा टिकवावी.शिवसेना पुणे शहराच्या वतीने आव्हान देण्यात येते की नितेशने दुसर्यांचे संरक्षण काढा म्हणण्यापेक्षा अगोदर आपल्या सरकारी आणि तुझे बिनसरकारी संरक्षण सोडून ये. समवयस्क निष्ठावंत शिवसैनिक तुला तुझ्याच भाषेत कुस्तीच्या आखाड्यात अस्मान दाखवतील. एकदा होउन जाऊ देत.. म्हणजे कायमची वायफळ बडबड बंद होईल. तू शिवसैनिक होतास भूतकाळात… आम्ही भूत, वर्तमान आणि भविष्य काळातही शिवसैनिकच आहोत आणि कायम राहू. असेही संजय मोरे यांनी म्हटले आहे.
डॉक्टरांचे योगदान समाजाकरिता तसेच गरिबांकरिता वाखणण्याजोगे आहे. गरीब रुग्णांमध्ये रोगांचे निदान करुन त्यावर वेळेत उपचार उपचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेची नवीन टीम यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. वंदना काटे यांची आयएमए नागपूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ग़डकरी यांनी आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नागपूर हे खऱ्या अर्थाने हेल्थ हब झालेले आहे. डॉक्टरांनी ज्या चांगल्या सेवा दिल्या आहेत त्यामुळे ही विश्वसनीयता वाढलेली आहे. या क्षेत्रात फार मोठी क्षमता आहे. नागपुरातील शासकीय महाविद्यालय आणि मेयोच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम सुद्धा प्रस्तावित आहे.नागपुरात अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञानसंस्था –एम्स तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये केंद्र शासनाचे तसेच येथील डॉक्टरांचे योगदान आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
गरीब रुग्णांना एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या सुविधा किफायतशीर दरात मिळावा याकरिता विशाखापट्टनम येथे मेडिकल डिव्हाईस पार्क मध्ये उत्पादने तयार केली जात आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.
पुणे-महात्मा गांधी यांचा दृष्टीकोनानुसार प्रत्यक्ष काम करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधमाशीपालनाच्या महत्त्वावर भर दिला आहे आणि ते म्हणाले आहेत: “श्वेत क्रांती सह मधुक्रांती देखील आवश्यक आहे”. हा संकल्प पुढे नेत, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी), मधमाशी पालक आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी मिशन मोडवर मधमाशी पालनाचा उपक्रम हाती घेतला आहे.
लोकांना निरोगी ठेवण्यामध्ये आणि विविध आव्हानांवर उपाय शोधण्यामध्ये मधमाशा आणि इतर कीटक बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी दर वर्षी 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने जागतिक मधमाशी दिनानिमित्त पुणे इथल्या केव्हीआयसीच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (CBRTl), मधमाशी संवर्धन आणि मध प्रक्रियेशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित करून आपला हीरक महोत्सव साजरा केला.
यावेळी हनी पार्लरचे (मध केंद्र) उद्घाटन आणि प्रदर्शन, साधनांचे वितरण, स्मरणिका प्रकाशन, केव्हीआयसीच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रवासावरील लघुपटाचे प्रकाशन, आणि मधमाशीपालन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल शास्त्रज्ञ, मधमाशीपालक आणि आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण, हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मधमाशी पालकांना 800 मध संकलन पेट्यांचे वाटप करून कार्यक्रमाची डिजिटल सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, यावर्षी 1,33,200 मेट्रिक टन मधाचे उत्पादन झाले असून मधाची विक्री 30,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पीएमईजीपी योजनेअंतर्गत सुमारे 300 कोटी रुपयांचे अनुदान (रु. 299.97) वितरित करण्यात आले.
यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंह वर्मा म्हणाले की, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) एक तृतीयांश योगदान देत आहे आणि एकूण निर्यातीत 48% योगदान देत आहे. यामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न 8500 वरून 1.95 लाख वर गेले आहे, असेही ते म्हणाले.
पुणे इथल्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त प्रशंसा करताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री म्हणाले की, या संस्थेने आर्थिक स्वावलंबना बरोबरच मधमाशी पालन आणि मध उत्पादनामध्ये मोठा पल्ला गाठला आहे.
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचेही त्यांनी यावेळी प्रकाशन केले.मधमाशीपालन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शास्त्रज्ञ, मधमाशीपालक आणि आयोगाचे कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
खादी आणि ग्रामोद्योगचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी, खादी आणि ग्रामोद्योग आयोग देशातील मधमाशीपालकांना स्वावलंबन आणि मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या मधमाश्या वाचवण्याचे कार्य करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हा उत्सव साजरा करत असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ऑगस्ट 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्वेतक्रांतीबरोबरच मधुक्रांतीचीही गरज आहे अशी साद दिली होती. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने या पारंपारिक मधमाशी पालन उद्योगाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “हनी मिशन” विकसित केले गेले आहे आणि ‘हनी मिशन’ सुरू झाल्यापासून 2017-18 या वर्षात 1,86,000 हून अधिक मधमाश्यांच्या पेट्या वितरित केल्या आहेत आणि 18,600 लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे कृषी उत्पादनात 25 ते 40% पर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी खादी कारागिरांच्या मजुरीमध्ये 35% वाढ करून त्यांच्या उत्पन्नात 150% वाढ करण्याची घोषणा केली. 819 लाभार्थ्यांना जवळजवळ 300 कोटी रुपये (299.97 रुपये) वितरित करण्यात आलेल्या तारण रक्कम अनुदानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्याअंतर्गत जवळजवळ 948 (947.60) कोटी रुपये कर्ज म्हणून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 54,552 म्हणजेच जवळजवळ 55 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने 50,000 हून अधिक लोकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “लोकल टू ग्लोबल” मोहीम यशस्वी करण्यासाठीचा एक व्यापक उपक्रम आहे, असे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी यावेळी सांगितले आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणार्या उच्च-गुणवत्तेच्या मधाच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रातील कारागिरांच्या उत्पन्नाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली.
मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला दहा हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच २७ हजार कुटुंबांना मदत करण्यात आली.सलग १५ दिवसात ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले. हे खर आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला सत्ता मिळाली नाही. हेही विनम्रतेने सांगू आणि त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली. त्याठिकाणी एक हजाराच्या खाली जागा गेल्या अशा पाच जागा आहेत. तीन जागा अशा आहेत ज्या दोन हजार मतांनी गेल्या, बावीस जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या आत अंतराने गेल्या आहेत. सहा सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा सोळा जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर ४७ होते. या ४५ जागा इथून तिथे झाल्या असत्या तर ८५ वर काँग्रेस आणि ११० वर भाजपा गेली असती. आम्हाला पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू. बेंगलोरमध्ये पूर्वी असलेल्या १५ जागा वाढवून आता त्या १६ जागा झाल्या आहेत. केवळ जागा नाही वाढल्या तर २०१४ मध्ये ३४.११ टक्के मते होती यामध्ये वाढ होऊन आता ही मते ४२.११ यात म्हणजेच साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई भाजपा कार्यकर्त्यानी ठरवलं मुंबईत ३२ वरून ८२ जागा आणतो. पटेल आंदोलनाचे पीक असतानाही संपूर्ण जागा निवडून आणतो. याखेरीज बेंगलोरमध्येही आपली ताकद दाखवून देतो. ही भाजपची ताकद आहे. मी, प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, याची सत्यता तुम्हीच पडताळून पहा असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
समाजविघातक कृत्य सहन करणार नाही
(यावेळी आ. आशिष शेलार यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवून याबाबतची सत्यता मीडियाने पडताळून पहावी असे स्पष्ट केले.) भाजप पराभूत झालं, यश मिळालं नाही तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप कशी काढली जाते त्याचा आनंद कर्नाटकात साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल तर आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धवजी तुम्ही बसणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे. एका बाजूला मानवतामूल्य, प्राण्यांचं महत्व, पर्यावरणाचे महत्त्व आणि डोंबलाचा आरे वाचवला सांगता, उद्या तुमची सत्ता महानगरपालिकेत आली, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आली तर भाजपला विरोध करण्यासाठी त्या आरे जंगलामधील म्हशी आणि गाई कापायला तुम्ही कमी करणार आहात का? हा मुंबईकरांच्या मनातला प्रश्न आहे. आपणाला या सर्व गोष्टींचा सामना प्रामाणिकपणे काम करून करायचा आहे. आपल्याला खोलवर जाऊन काम करणं मा. मोदींच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं लाभार्थ्यांशी संपर्क करणं, ‘नौ साल बेमिसाल’ मोदीजींच्या जनसंपर्क अभियानात केंद्र सरकारचे सर्व विषय पोहोचवणं गरजेचे आहे. केवळ मतदारांच्या अधिकारांसाठी नाही तर प्राणीमात्रांच्या जगण्याच्या अधिकारांसाठीसुद्धा तुम्हाला आणि मला लढावं लागेल, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
…म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले
१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की … उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे… पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
राज ठाकरेंना कानपिचक्या पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा आ. अॅड. आशिष शेलार यांनी दिला. २ हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे ‘क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते. ६ लाख ३२ कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील; जर व्यवस्थेत असतील तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचं काम आहे, हे जनतेला हवे आहे… चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही ते म्हणाले. मोदीजी जे करतात ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचं प्रामाणिकतेने स्थान मिळालं पाहिजे म्हणून करतात. टीका करणाऱ्यांच स्वागत तर आहेच पण कधी कधी असं वाटतं आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
काय होतास तू काय झालास तू… ते चित्र ज्यावेळी आम्ही टीव्हीवर वर्तमानपत्रात पाहिलं मविआची बैठक… सन्माननीय शरद पवार यांची होती. या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती त्यानंतर सोफ्यांची रांग होती… या सोफ्यावर बसलेल्या उद्धवजींना पाहिलं आणि मला गाणं आठवलं ‘कोण होतास तू काय झालास तू…’ ज्यावेळी आमच्यासोबत होतात; त्यावेळी देशाचं नेतृत्व तुमच्याकडे येत होतं. आज आम्हाला सोडून गेलात तर केजरीवाल ते केसीआरपर्यंत सतत सगळीकडे जावं लागतय. आमच्याबरोबर होतात तेव्हा खुर्चीचा सन्मान होता. आता तुम्हाला सोफ्याच्या रांगेत बसावं लागतंय. आमच्याबरोबर होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमच्या सभा व्हायच्या. बीकेसीची चार मैदाने भरायची. आम्हाला सोडून गेलात तर तीन पक्ष एक होऊनसुद्धा आम्ही जे मैदान पार्किंगसाठी वापरलं तिथे तुमची सभा होते. मुंबईकरांच्या प्रती आपलेपणा तुम्ही सोडला आहे आणि म्हणून आता ‘सरकार आपल्या दारी’ च्या माध्यमातून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर मुंबईकरांच्या समस्या गाऱ्हाणे ऐकून घेतात. पावसाआधी मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यावर भारतीय जनता पार्टीची माणसं जातात. एसी घरात बसलेले आदित्य आणि उद्धव ठाकरे याचे उत्तर देतील का? तुम्ही का नाल्यावर आला नाहीत? राज्यात सरकार हवं म्हणून आक्रोश करताय मुंबईकरांच्या समस्या ऐकून घ्यायला तुम्ही रस्त्यावर दिसत नाहीत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी १५१ चा आकडा भाजपा, शिवसेना, रिपाई आणि एनडीए भाजपा महापौराच्या नेतृत्वात दिसेल आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र ईव्हीएममध्ये गडबड आहे का ? याचे क्लास करत बसतील हे चित्र मी आजच स्पष्ट करतो. त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांची संपूर्ण ताकद लावा असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी केले.
मागील सरकारांनी नेहमीच ओबीसींना त्रास दिला आणि त्यांचा अपमान केला, पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आणि गेल्या 9 वर्षात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथे मोदी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि समाज आणि देश दोघांसाठी हे चांगले लक्षण आहे. आपले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सामर्थ्याच्या जोरावर या समाजाने आणखी प्रगती केली असून या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समाजाला भगवान शंकराने स्वतः आशीर्वाद दिला आहे, असे शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील प्रत्येक गावाला भेट देऊन तरुणांना प्रेरणा दिली आहे, आणि एक संघटना स्थापन करून गुजरातमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक अतुलनीय संरचना निर्माण केली आहे. ते म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या लोककल्याणकारी कामांच्या जोरावर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, आणि आता पंतप्रधान म्हणून ते जगभरात भारताचा गौरव वाढवत आहेत.
अमित शाह म्हणाले की, मागील सरकारांनी ओबीसी समाजाची नेहमीच उपेक्षा आणि अपमान केला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्यासाठी स्वतः पुढाकार घेत गेल्या 9 वर्षात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली. भाजपाने अनेक ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्री केले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा प्रदान केला आहे आणि पहिल्यांदाच ओबीसी समाजातील 27 मंत्र्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे, असेही अमित शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पूर्वी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि नीट परीक्षेत ओबीसींसाठी कोणतेही आरक्षण नव्हते, परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याची तरतूद केली आहे. ओबीसी प्रवर्गातील तरुण उद्योजकांसाठी भांडवली निधीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने ओबीसी यादीत सुधारणा करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. आधीच्या सरकारच्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीत ओबीसी समाजाचा सन्मान राखण्यासाठी एकही काम करण्यात आले नव्हते . मात्र, नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात ओबीसी समाजाचा विकास करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत कारण स्वतः मोदी हे गरीब कुटुंबात जन्मले आणि लोकशाही प्रक्रियेतून या देशाचे पंतप्रधान झाले. एवढी गरिबी पाहणारा माणूस पहिल्यांदाच या देशाचा पंतप्रधान झाला आहे. गरिबांचे दुःख समजून घेणारे मोदी यांनी गरिबांना सर्व सुविधा दिल्या. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्येक घटकासाठी कसा करता येतो हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबातील गरीबांपर्यंत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना थेट लाभ हस्तांतरणाशी जोडून आणि विविध योजनांचा फायदा थेट गरिबांच्या बँक खात्यात पाठवून भ्रष्टाचार संपवला आहे.
जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की “पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही अमेरिकेत खूप लोकप्रिय आहात आणि मला तुमची स्वाक्षरी हवी आहे, तेव्हा प्रत्येक भारतीयाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जी पूर्वी जगात 11 व्या क्रमांकावर होती, ती आज 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. पंतप्रधान मोदींनी 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
: ‘हत्या की आत्महत्या’ याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य’ हा नवा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पुष्कर जोग, सौरभ गोखले,अनंत जोग,मंजरी फडणीस,उषा नाडकर्णी, आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.
“अदृश्य” हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.
मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले.
सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर्शकाने बनलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्री मंजरी फडणीसने सांगितले.
मला खूप आनंद होत आहे की, मराठीत ओटीटी प्लॅाटफॅार्मवर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे, असे अभिनेता पुष्कर जोग यांनी सांगितले.
हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘अदृश्य’ या चित्रपटाच्या रुपात मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
“उत्तम कलाकारांनी बांधलेली “ अदृश्य” ह्या चित्रपटाची रहस्यमय कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. चित्रपटातील रहस्याचं गूढ उलगडताना प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. शिवाय, समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. ‘अल्ट्रा झकास ’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.
आनंद एल राय आणि कलर यलो प्रॉडक्शनच्या जवळच्या सूत्रा कडून अजून एका एक मनोरंजक तथ्य उघड केले आहे !
आनंद एल राय आणि कलर यलो प्रॉडक्शनने प्रेक्षकांना नेहमीच उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स दिले आहेत. यातले अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या मनात आज सुद्धा घर करून आहेत. तनु वेड्स मनू, निल बट्टे सन्नाटा, तुंबड, शुभ मंगल सावधान, एक अॅक्शन हिरो, रांझना ज्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईटमध्ये सात नामांकन मिळाले होते आणि अजून काही उत्तम प्रोजेक्ट्स जे प्रेक्षकांना आजही तितकेच भावतात.
2023 साठी यांच्याकडे ” आत्मपॅम्फ्लेट ” हा चित्रपट आहे जो बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता आणि प्रशंसा मिळवली होती, फिर आयी हसीन दिलरुबा आणि प्रादेशिक चित्रपट झिम्मा हे 2 चित्रपट येणार आहेत. आगामी प्रकल्पांची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आनंद एल राय यांच्या जवळच्या एका स्रोताने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
आनंद एल राय यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “एकाहून अधिक घोषणांवर एकाच वेळी काम केले जात आहे. आजच्या काळातील काही मोठी नावे आधीच समोर आली आहेत आणि घोषणा लवकरच होणार आहेत. चाहते काही खरोखरच उत्तम आणि मनोरंजक प्रोजेक्ट्स ची अपेक्षा करू शकतात. लवकरच काहीतरी बघायला मिळणार आहे.
काय नवीन गोष्टी घडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असून सगळेच उत्साहाने वाट बघतात. नवीन कथा काय असणार वास्तविक जीवनाची कथा आहे का, खूनाचे रहस्य आहे, एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आहे, प्रेमकथा आहे की अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट बघावी लागेल .
ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाला नॅक समितीकडून दुसऱ्या फेरीमध्ये ‘ए प्लस’ मानांकन प्राप्त झाले. बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची नुकतीच पाहणी करण्यात आली. दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम, भौतिक सोयी-सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली होती.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असावे, असे केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव यांचे ध्येय आहे. ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालय हे सन २०१० पासून सुरु झाले असून, आजपर्यंत अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक असून प्रशासकीय सेवेत व प्रतिष्ठित उद्योगातही अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.
केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाच्या यशाबद्दल कल्याणराव जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव-देशमुख, कार्यकारी संचालक मेजरल जनरल (नि.) समीर कल्ला यांनी प्राचार्य डॉ. निलेश ऊके, समन्वयक प्रा. डॉ. सतीश देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. निलेश उके यांच्या कुशल नेतृत्वात महाविद्यालय प्रगती करत असून, विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही संशोधनात्मक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती, सर्वाना मुक्तपणे काम करण्याची संधी देण्यातील त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरत आहे, अशा शब्दांत जाधव यांनी प्राचार्यांचे कौतुक केले.
उपाध्यक्षपदी निलेश केकाण, सचिवपदी श्रीकांत इप्पलपल्ली, तर खजिनदारपदी राहुल चिंचोळकर पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए नागेश भागणे यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष सीएमए प्रसाद जोशी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी सीएमए निलेश केकाण, सचिवपदी सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली आणि खजिनदारपदी सीएमए राहुल चिंचोळकर यांची निवड झाली आहे. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सीएमए हिमांशु दवे, सीएमए अमेय टिकले, सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए अनुजा दाभाडे आणि सीएमए निखिल अगरवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांचा समावेश आहे. ही कार्यकारिणी २०२३-२०२७ या कालावधीकरिता आहे. संदीप जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानत नागेश भागणे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट अभ्यासक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासह या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवणे आणि पात्र विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. सदस्यांसाठी आयपी, आरव्ही, इन्व्हेंटरी ऑडिट, सोशल ऑडिट आदी विषयांवर सत्रे, कार्यशाळा घेण्यावर भर दिला जाणार आहे.”
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ऋणनिर्देश व सत्कार सोहळा
पुणे : “आव्हानात्मक परिस्थितीतही सामान्य नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत, संवेदनशीलपणे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. याच वृत्तीमुळे कोणत्याही पदाचा, कामाचा दबाव राहिला नाही; उलट आनंददायी वातावरणात अनेक चांगली कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे,” अशी भावना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (आयएएस) यांनी व्यक्त केली.
भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब फाउंडेशन आणि शुगरटुडे मॅगेझीनच्या संयुक्त विद्यमाने शेखर गायकवाड (आयएएस) यांच्या शासकीय सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश व सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात कृषी महर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रसंगी गायकवाड यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आमदार अशोक पवार, सहकार आयुक्त अनिल कवडे, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता हनुमंतराव धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, सौ. वंदना गायकवाड, सौ. शालिनीदेवी मुळीक, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, उद्योजक बी. बी. जाधव, ज्येष्ठ संपादक आणि शुगर टुडे मॅगझिनचे प्रमुख नंदकुमार सुतार, फौंडेशनचे अध्यक्ष अतुल हिवाळे यांच्यासह साखर उद्योगातील अनेक मान्यवर, कारखानदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला.
शेखर गायकवाड म्हणाले, “मला मिळालेल्या प्रत्येक विभागात काम करताना सामान्य नागरिक आणि शेतकरी हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेत संवाद व समन्वयाने त्या सोडवल्या. संबंधित विभागाची प्रगती आणि प्रतिमा उंचावेल अशा स्वरूपाचे काम केले. हसत खेळत, सहज कामाचा आनंद घेतला. निरीक्षणातून, घडलेल्या प्रसंगातून लेखन केले. हे लेखन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले, याचे समाधान आहे.” आगामी काळात महाराष्ट्र जागतिक पातळीवर साखर उद्योगाचे नेतृत्व करेल, असेही यावेळी शेखर गायकवाड यांनी नमूद केले.
अनिल कवडे म्हणाले, “गायकवाड यांच्या प्रशासकीय सेवेला प्रामाणिकतेची झालर आणि लेखनाला धार आहे. नाविन्याची कास, ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा अधिकारी आहे. प्रशासनातून निवृत्ती घेतली, तरी कामातून निवृत्त होणार नाही. जनशिक्षण, लोकजागृतीचे काम त्यांनी केले. मानव निर्देशांकात सुधारणेसाठी काम व्हावे. कोणाशीही सहज संवाद, उत्तम निरीक्षण शक्ती, हजरजबाबी आणि विनोदी शैली यामुळे गायकवाड यांची वेगळी ओळख आहे.”
डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्या घटकाच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी गायकवाड यांना अनेकदा मिळाली. प्रामाणिक, सुसंवादी, सर्वांत मिसळण्याची त्यांची वृत्ती यामुळे प्रशासनात राहून, अनेक मंत्र्यांसोबत काम करूनही त्यांची प्रतिमा आदर्श घेण्याजोगी आहे. सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे, अभ्यासू व आकलनक्षमता असणारे फार मोजके अधिकारी आहेत. त्यामध्ये शेखर गायकवाड अग्रस्थानी आहेत.”
अशोक पवार यांनीही गायकवाड यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन मानसिंह पवार यांनी केले. आभार नंदकुमार सुतार यांनी मानले.
पर्यटन बससेवा क्र. ४ चा . पुणे स्टेशन स्थानक येथून शुभारंभ पुणे –महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर(ऑपरेशन) श्री. सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी श्री. चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर श्री. संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएमएल च्या पुणे स्टेशन बस स्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ करण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो. पर्यटन बससेवा क्र. ४ द्वारे हौशी पर्यटकांना खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण या धरणांची सफर करता येते. पीएमपीएमएल ने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता येईल.
पुणे पीजन मित्र नॅशनल असोसिएशनतर्फे कबुतर स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण
पुणे:
‘कबुतर पाळणाऱ्या समूहाच्या पीजन मित्र नॅशनल असोसिएशन या देशपातळीवरील एकमेव संस्थेच्या पुणे शाखेतर्फे कबुतरांची उडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण २०२२-२३ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. २०) कॅंप, पुणे येथे करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष व्ही. सत्या (चेन्नई)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेन्नई येथील इनकम टॅक्स विभागाचे अरुण कुमार, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागार अली दारूवाला,भाजपचे पुणे संघटन सरचिटणीस गणेश घोष, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बालवडकर, सचिव सलीम शेख उपस्थित होते. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे संयोजक अली दारूवाला यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘कबुतरांच्या या स्पर्धेला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे,त्याचा पाठपुरावा करू ” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार अली दारूवाला यांनी यावेळी बोलताना केले. २७५ किमीच्या पुणे- जालना या अंतराच्या कबुतर उडणे स्पर्धेत मुस्तफा पटेल यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर शैलेंद्र जाधव, सुनील अलकुंटे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले. इतर गटातील विजेत्यांना देखील यावेळी पारितोषिके देण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष व्ही.सत्या म्हणाले, ” देशभरात या स्पर्धेबाबत कुतूहल आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात अशा स्पर्धा होतात. हा पूर्णपणे एक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून यासंबंधीच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
अरुण कुमार म्हणाले, ‘२०१० ला हा कबुतर शो सुरू केला. तीन वर्ष यश मिळाले नाही. पण मी हार मानली नाही. स्पर्धा लवकर सुरू करा. ही पूर्ण कायदेशीर स्पर्धा आहे. चांगले पक्षी गोळा करा. थोडे ठेवा. ते यश मिळवून देतील. धान्य सुकवून आणि धुवून स्वच्छ करून पक्षांना खाऊ घाला. किती किमीच्या स्पर्धेत कोणता पक्षी सहभागी करायचा हे पक्षी पालकाला (मालकाला) कळणे महत्वाचे आहे.”गणेश घोष म्हणाले, “संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करते, याचे कौतुक वाटते. या स्पर्धेत, तसेच संघटनेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू.” शैलेंद्र जाधव यांनी स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले, ” १५० ते १००० किमी च्या गटांमध्ये दोन फेऱ्यात ही स्पर्धा झाली . इतक्या प्रदीर्घ अंतरात पक्षी ठरलेल्या वेळेत जाऊन घरी परत येतात. ८०० पक्षी या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. त्यात दर आठवड्याला एका गटातील स्पर्धा होते. पक्ष्यांच्या पायात विशिष्ट टॅग असतो. टॅग काढला की त्याद्वारे पक्षाने किती अंतर कापले, कोण जिंकले हे कळते.”
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पहिल्याच बंधुता भूषण पुरस्कारासाठी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि नामवंत दंतरोपणतज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ जून २०२३ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या पाचव्या बंधुता काव्य महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांनी दिली.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त २ जून रोजी बंधुता दिवस साजरा करण्यात येत असून, त्या निमित्ताने पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध साहित्यक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसंगी डॉ. हरिश्चंद्र गाडसिंग, सुरेशबापू साळुंके, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, शिवव्याख्याते प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी मुक्त पत्रकार व जनसंपर्क क्षेत्रातील उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच निवडक दहा कवींचा बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन होईल. नितीन वायाळ (गुजरात), मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहील. महाराष्ट्रातील नामवंत कवी यामध्ये सहभागी होतील. प्रा. संतोष काळे (पलूस) यांना बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, डॉ. सुशील सातपुते यांना बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार आणि गोपाळ कांबळे (पुणे) यांना बंधुता प्रकाशगाथा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाने महोत्सवाचा समारोप होईल. महाराष्ट्रातील निवडक दहा साहित्यिकांना बंधुता शब्दक्रांती पुरस्काराने गौरविण्यात येईल. प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. सहदेव चव्हाण, प्रा. सदाशिव कांबळे महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष पुढाकार घेऊन परिश्रम घेत आहेत.
पुणे : कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार कार्यक्रम विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.’मनीषा नृत्यालय परिवार’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दि.२७ मे २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह(कोथरूड) येथे सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमात पं.मनीषा साठे या ‘नृत्यार्पिता’ हे एकल नृत्य सादरीकरण करणार आहेत.त्यांना निखिल पाठक,राजीव तांबे,सुनील अवचट,वल्लरी आपटे साथसंगत करतील. तबला वादक निखिल पाठक आणि मधुरा आफळे या पं.मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. पं.मनीषा साठे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रमेश वैशंपायन गुरुजी संस्कृत मधून अभिष्ट चिंतन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे,मात्र सर्व प्रवेशिका आधीच संपल्या आहेत,असे संयोजकांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *’नृत्यार्पिता’ पं.मनीषा साठे…* —————– मनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारताच्या विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.मनीषा साठे यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.साठे ह्या मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. १९ मे) दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही या निर्णयाची खिल्ली उडवली. “आधी ते म्हणाले, दोन हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणत आहेत, दोन हजारांची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल. यासाठी आम्ही म्हणतो की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एक अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगते. त्याला काहीही सजमत नाही. मात्र त्रास तर जनतेला सहन करावा लागतो.”, अशा शेलक्या शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।