Home Blog Page 1534

2000 ची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा; 23 मेपासून 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येणार

निवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी …

 मुंबई-८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीच्या साडेसहा वर्षांनंतर पुन्हा नाेटबंदी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नसल्याची घोषणा केली. मात्र, त्या तातडीने बंद केल्या नाहीत. बँकेने म्हटले की २००० च्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात राहतील. बाजारात उपलब्ध नोटा एक तर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बँकेतून बदलून घेता येतील. या नोटांची देवाणघेवाण किंवा त्याद्वारे खरेदी सुरू राहील.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार २३ मेपासून लोक २००० च्या नोटा बँकेत जमा करू शकतील. एका वेळी जास्तीत जास्त २० हजार रु.च्या नोटा (२००० च्या १० नोटा) जमा करता येतील. नोटा जमा करण्याची मर्यादा ठरलेली नाही. ८ नोव्हेंबर २०१६ च्या पहिल्या नोटबंदीत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नवीन ५०० आणि २००० च्या नोटा जारी करण्यात आल्या. तेव्हा आरबीआयने अर्थव्यवस्थेत रोखीची उपलब्धता सुरळीत ठेवण्यासाठी २००० च्या नोटा जारी केल्याचे म्हटले होते. आता २००० रुपयांची नोट बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सूत्रांनुसार, काळ्या धनाच्या रूपात मोठ्या प्रमाणात नोटा जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले.

आता १९ मे २०२३: २,००० च्या नोटा वैध म्हणजे चलनात राहतील सामान्यांकडे जास्त नसल्याने गोंधळ होणार नाही. नोटा बदलण्यासाठी १३० दिवसांचा वेळ. ५००, २०० व १०० चा पर्याय.

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेली प्रेस रिलीज –

₹2000 च्या चलनी बँक नोटा – चलनामधून वापर थांबवण्यात येणार; लीगल टेंडर म्हणून सुरू राहतील

  1. 2000 रुपयांच्या बँक नोटा चलनातून का बंद केल्या जात आहेत?

2000 रुपयांच्या चलनी नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या बँकनोटांचा लीगल टेंडर दर्जा काढून घेतल्यावर अर्थव्यवस्थेमधील चलनाच्या गरजेची पूर्तता वेगाने करण्यासाठी आरबीआय कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. या उद्दिष्टाची पूर्तता झाल्यावर आणि इतर चलनी नोटांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यानंतर 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटांची छपाई थांबवण्यात आली. 2000 रुपयांच्या बहुतेक नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या आणि त्यांच्या अंदाजे 4-5 वर्षांच्या आयुर्मानानुसार या नोटा आयुर्मान समाप्तीच्या स्थितीत आहेत. या चलनातील नोटा सर्वसामान्यपणे फारशा वापरल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर प्रकारच्या चलनी नोटा जनतेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या “ क्लीन नोट पॉलिसी” चा विचार करता 2000 रुपयांच्या चलनी बँक नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  1. क्लीन नोट पॉलिसी काय आहे?

जनतेला चांगल्या दर्जाच्या बँक नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने अंगिकृत केलेले हे धोरण आहे.

  1. 2000 च्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा कायम राहणार आहे का?
    होय. 2000 रुपयांच्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा पुढे सुरू राहील.
  2. 2000 रुपयांच्या बँक नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरता येतील का?

होय. सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते आणि त्यांना चुकती केलेली रक्कम म्हणून स्वीकारू शकते. मात्र, 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची त्यांना सूचना करण्यात येत आहे.

  1. लोकांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या 2000 रुपयांच्या चलनी नोटांचे काय करावे?

जनता त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटा त्यांच्या बँकेच्या शाखेत जमा करू शकते किंवा त्या बदलून घेऊ शकते.

2000 रुपयांच्या बँक नोटा आपल्या खात्यात जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट असलेल्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये (ROs) देखील नोटा बदलून घेण्याची सुविधा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे.

  1. बँक खात्यांमध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटा जमा करण्यावर काही मर्यादा आहे का?
    बँक खात्यांमध्ये कोणत्याही मर्यादेविना नो युअर कस्टमर(केवायसी) निकषांनुसार आणि लागू असलेल्या इतर वैधानिक/ नियामक गरजांनुसार नोटा जमा करता येतील.
  2. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना त्या रकमेवर परिचालनात्मक मर्यादा असेल का?

जनतेला एका वेळी रु. 20,000/- पर्यंत 2000 रुपयांच्या बँक नोटा बदलून घेता येतील.

  1. 2000 रुपयांच्या चलनी नोटा बिझनेस करस्पॉन्डन्ट (BC ) कडून बदलून घेता येऊ शकेल का?

होय, खातेदारांना बिझनेस करस्पॉन्डन्ट द्वारे दररोज 4,000/- रुपये इतक्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येऊ शकतील.

  1. कोणत्या तारखेपासून नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल?

बँकांना पूर्वतयारी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नोटा बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 23 मे 2023 पासून बँक शाखा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधावा.

  1. बँकांच्या शाखांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या बँकेचे खातेधारक असणे आवश्यक आहे का?

नाही, एखाद्या बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकते. एका वेळी केवळ 20,000 रुपयांपर्यंत नोटा बदलून घेऊ शकतात.

  1. एखाद्याला व्यवसाय किंवा काही इतर कारणांसाठी 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असेल तर काय करावे?

बँकेच्या खात्यात नोटा कोणत्याही निर्बंधांशिवाय जमा करता येतील. 2000 रुपयांच्या बँक नोटा बँक खात्यात जमा करता येतील आणि या ठेवींच्या बदल्यात रोख रक्कम काढता येईल.

1 अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम

₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट – संचलन से हटाया जाना- वैध मुद्रा बने रहेंगे
19 मई 2023

₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट – संचलन से हटाया जाना- वैध मुद्रा बने रहेंगे

₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट नवंबर 2016 में भारतीय रिज़र्व बैंक अधिनियम, 1934 की धारा 24(1) के अंतर्गत जारी किए गए थे। मुख्यतया, ₹500 एवं ₹1000 मूल्यवर्ग के बैंकनोट, जो तब संचलन में थे, के वैध मुद्रा का दर्जा हटाने के पश्चात, अर्थव्यस्था में मुद्रा की आवश्यकता को जल्द पूरा करने के उद्देश्य से इन्हें जारी करने का निर्णय लिया गया था। संचलन में पर्याप्त मात्रा में अन्य मूल्यवर्ग के नोटों के उपलब्ध हो जाने से ₹2000 मूल्यवर्ग के नोट जारी करने का उद्देश्य पूरा हो गया। अतः वर्ष 2018-19 से ₹2000 मूल्यवर्ग के नोटों का मुद्रण बंद कर दिया गया।

  1. जारी किए गए ₹2000 मूल्यवर्ग के करीब 89 प्रतिशत बैंकनोट 31 मार्च 2017 के पूर्व से संचलन में हैं एवं वे अपनी अनुमानित आयु सीमा, जो कि 4-5 वर्ष है, के अंत में हैं। 31 मार्च 2018 को इन नोटों की अधिकतम मात्रा ₹6.73 लाख करोड़ रुपये (संचलन में नोटों का 37.3 प्रतिशत) थी, जो 31 मार्च, 2023 को घटकर ₹3.62 लाख करोड़ रुपये (जो संचलन में नोटों का 10.8 प्रतिशत) हो गयी है। यह भी देखा गया है कि ₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट लेन-देन के लिए आमतौर पर उपयोग में नहीं लिए जा रहे हैं। इसके अलावा, अर्थव्यवस्था की आवश्यकता पूर्ति के लिए अन्य मूल्यवर्ग के नोटों की पर्याप्त मात्रा उपलब्ध है।
  2. उपर्युक्त कारणों से एवं भारतीय रिज़र्व बैंक की ‘स्वच्छ मुद्रा नीति’ को ध्यान में रखते हुए ₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोटों को संचलन से वापस लेने का निर्णय लिया गया है।
  3. ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोट वैध मुद्रा बने रहेंगे।
  4. यह भी उल्लेख है कि भारतीय रिज़र्व बैंक ने इसी प्रकार वर्ष 2013-14 में संचलन से नोटों को हटाने का कार्य किया था।
  5. तदनुसार, जनसाधारण ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को अपने बैंक खाते में जमा कर सकते हैं/अथवा किसी भी बैंक शाखा पर अन्य मूल्यवर्ग के बैंक नोटों में बदल सकते हैं। बैंक खातों में जमा करने की प्रक्रिया सामान्य रूप में ही रहेगी, अर्थात बिना किसी प्रतिबंध के और वर्तमान अनुदेशों तथा अन्य लागू सांविधिक प्रावधानों के अधीन होगी।
  6. परिचालनात्मक सुविधा को सुनिश्चित करने की दृष्टि से तथा बैंक शाखाओं के नियमित कार्यकलापों को बाधित किए बिना एक समय में ₹2000 मूल्यवर्ग के ₹20000 तक की राशि को 23 मई, 2023 से किसी भी बैंक में अन्य बैंक नोटों के लिए बदला जा सकता है।
  7. इस कार्य को समयबद्ध रूप से पूरा करने के लिए तथा जनसाधारण को ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने के लिए पर्याप्त समय देने हेतु सभी बैंक ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने की सुविधा 30 सितम्बर, 2023 तक उपलब्ध कराते रहेंगे। बैंकों को को इस संबंध में अलग से दिशानिर्देश जारी किए गए हैं।
  8. ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को एक समय में ₹20,000 राशि तक बदलने की सुविधा भारतीय रिज़र्व बैंक के उन 19 क्षेत्रीय कार्यालयों में भी 23 मई, 2023 से उपलब्ध रहेगी जहां निर्गम विभाग1 स्थित हैं।
  9. भारतीय रिज़र्व बैंक ने बैंकों को सूचित किया है कि वे तुरंत प्रभाव से ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जारी करना बंद कर दें।
  10. जनसाधारण को प्रोत्साहित किया जाता है कि वे ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने के लिए 30 सितम्बर, 2023 तक की समयावधि का उपयोग करें। जनसाधारण की सूचना और सुविधा के लिए इस संबंध में प्रायः पूछे जाने वाले प्रश्न(एफएक्यू) को भारतीय रिज़र्व बैंक की वेबसाइट(हाइपरलिंक) पर डाला गया है।

(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/257

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सॉफ्टवेअरचे २२ मे रोजी लोकार्पण

पुणे, दि.१९: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे लोकार्पण व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या यशोगाथेचे प्रकाशन २२ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पुणे येथे सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच यावेळी समान संधी केंद्राच्या प्राचार्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती परंतू विद्यार्थ्यांना सुलभरित्या अर्ज करता यावे म्हणून योजनेचे ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले.

सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे या कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, विमान व इमाव इत्यादी प्रवर्गासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक कल्याणकारी योजना राबविली जाते. स्वाधार योजनेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १० कोटी ९ लाख ३८ हजार खर्च करण्यात आला. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये माहे एप्रिल २०२३ अखेर ६ कोटी ५६ लाख ७२ हजार खर्च करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वाधार योजनेसाठी रु. ८ कोटी ८० लाख ३ हजार इतकी तरतूद प्राप्त झालेली आहे.

स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहायक आयुक्त समाज कल्याण संगिता डावखर यांनी आवाहन केले आहे.

सान्या मल्होत्राचा बॉलीवुड मधील सात वर्षाचा प्रवास !

सान्या मल्होत्रा सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.2016 च्या स्पोर्ट्स ड्रामा ‘दंगल’मधून पदार्पण केल्यापासून तिने इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या वास्तविक जीवनातील कथेवर आधारित नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपटाने मल्होत्राला प्रसिद्धीच्या झोतात आणले आणि बॉलीवूडमधील सर्वात यंग स्टर अभिनेत्री म्हणून तिने स्वतःची ओळख संपादन केली.

दंगलमधील दमदार परफॉर्मन्सनंतर या अभिनेत्रीने अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स केले.LUDO, Pagglait मधील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. अभिनयाचं कौतुक होत असताना तिने आयुष्मान खुरानासोबत बधाई हो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या हृदयावर सुपर हिट ठरला. लव्ह हॉस्टेल, पटाखा, मीनाक्षी सुंदरेश्वर, हिट: द फर्स्ट केस, फोटोग्राफ, अश्या अनेक प्रोजेक्ट्स मधून तिने प्रेक्षकांची मन जिंकली आणि आता तिच्या नवीन  आगामी  कठल तिने तिच्या चाहत्यांसाठी ऑन-स्क्रीन काहीतरी नवीन घेऊन आली आहे.

या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री तिच्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक बोलताना म्हणते ” पोलिसाची भूमिका साकारणे सोपे नव्हते, खरे सांगायचे तर. मला या व्यक्तिरेखेमध्ये उत्तम काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. माझी भूमिका चोख करण्याचा प्रयत्न करताना बर्‍याच गोष्टी. मला हे देखील आवडले की माझे पात्र ग्रामीण भारतीय वातावरणात महिला पोलिस कसे होते, जे सहसा पाहिले जात नाही. अभिनेत्री आणि कलाकार म्हणून हा  रोल खूप शिकवून जाणारा होता”

सान्या तिच्या अभिनया वर आणि तिच्या कलेवर लक्ष केंद्रित करत राहिली जे तिच्या नवीन  चित्रपट कठल मध्ये प्रतिबिंबित होते. हा चित्रपट अशोक मिश्रा यांनी लिहिला आहे आणि यशोवर्धन मिश्रा यांनी नेटफ्लिक्स, दिग्दर्शित केला आहे. , जो 19 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे. शाहरुख खान आणि नयनतारा, मिसेस, अभिनीत अॅक्शन चित्रपटात  जवान मध्ये ती दिसणार असून बायोपिक सॅम बहादूरमध्ये, विकी कौशलने सॅम माणेकशॉची भूमिका साकारली आहे.

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी  दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.

प्रस्तावासाठीच्या आवश्यक अटी : 1.शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक 2.मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक 3.शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक 4.शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे  मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल 5.विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र 6.शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या  सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल 7.प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत 8.शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लोगो आणि टी-शर्टचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण

  • मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार २९, ३० आणि ३१ मे रोजी
  • राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भिडणार क्रिकेटच्या मैदानात

पुणे :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट लिगाच्या लोगो आणि सहभागी टीमच्या टी-शर्ट चे  अनावरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

यावेळी शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब बोडके, आर पी आय चे परशुराम वाडेकर,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षाचे गजानन थरकुडे,भाजप चे धीरज घाटे, मनसे चे सागर पाठक,सामाजिक संस्था तर्फे लिज्जत पापड चे सुरेश कोते, कलाकार तर्फे अभिनेत्री प्रिया बेर्डे, चेतन चावडा,अभिजित कोठवालकर आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन,संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन,रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग यांच्यासह जितेश दामोदरे, भारत भोसले, गणेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अनेकदा दैनंदिन आयुष्यात राजकारणात भाष्य करताना एकमेकांबद्दल मनात कटुता नसतानाही कडू बोलावं लागतं. ही कटूता संपावी या उद्देशाने भीम योद्धा फाउंडेशनच्या वतीने राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्ष कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट लीग बद्दल माहिती देताना ॲड मंदारभाऊ जोशी म्हणाले, या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा  येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे  सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे.

संरक्षण उत्पादनाने प्रथमच ओलांडला 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा

मुंबई-

संरक्षण मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संरक्षण उत्पादनाच्या मूल्याने प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या हे मूल्य 1,06,800 कोटी रुपये इतके असून उर्वरित खाजगी संरक्षण उद्योगांकडून आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर त्यात आणखी भर पडेल. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संरक्षण उत्पादनाचे सध्याचे मूल्य 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांहून अधिक वाढलेले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात हे मूल्य 95,000 कोटी रुपये इतके होते.

संरक्षण उद्योग आणि त्यांच्या सहयोगी संघटनांसमोरील आव्हाने दूर करण्यासाठी तसेच देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. व्यवसाय सुलभ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरवठा शृंखलेत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्ट-अप्सच्या एकत्रीकरणासह अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या धोरणांमुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्ट-अप्ससह उद्योग संरक्षण डिझाइन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात पुढे येत आहेत आणि गेल्या 7-8 वर्षांत सरकार द्वारे उद्योगांना जारी करण्यात आलेल्या संरक्षण परवान्यांच्या संख्येत जवळपास 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या उपाययोजनांमुळे देशातील संरक्षण औद्योगिक उत्पादन परिसंस्थेला चालना मिळाली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत.

स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने पुण्यात प्रथमच ‘खासदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

पुणे 19 मे 2023 : स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने पुण्यात प्रथमच ‘खासदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.या स्पर्धेत पुणे शहरातील 16 संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा सहकारनगर येथील शिंदे हायस्कुल मैदानावर 20 व 21 मे 2023 रोजी होणार आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उद्या शनिवार 20 मे रोजी सकाळी 7:30 वाजता प्रसिद्ध क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर, खासदार प्रकाश जावडेकर व आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. समारोप व बक्षीस समारंभ 21 मे रोजी दुपारी 4 वाजता सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री चंदू बोर्डे, पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील व खासदार श्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेत एस एम जी चॅम्पियन(सांगवी), आलम भाई पठाण क्रिकेट क्लब (वारजे), हमराज – मृत्युंजय (कोथरूड), युवराज गोगावले प्रतिष्ठान (शिवगंगा खोरे), रहीम इलेव्हन (खराडी), यशवंत भाऊ पासंगे प्रतिष्ठान (शिरूर), सचिन भाऊ शेळके युवा मंच (धनकवडी), मैत्री प्रतिष्ठान (कोथरूड), श्री तेज इलेव्हन (भोसरी), इंदिरानगर क्रिकेट क्लब (इंदिरानगर), स्व.संजय शेळके व स्व. ऋषिकेश वांजळे प्रतिष्ठान (कोथरूड), कर्णवीर केसरी प्रतिष्ठान (कराड), मैत्री ग्रुप (मंचर), सह्याद्री प्रतिष्ठान (सहकारनगर), गणेश भाऊ जाधव इलेव्हन (कात्रज), राजमुद्रा ग्रुप (कोथरूड) हे 16 संघ झुंजणार आहेत. तसेच, ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

देशामध्ये 171 हुन अधिक लोकसभा व राज्यसभा खासदारांनी विविध खेळांच्या स्पर्धा भरावल्या व त्याला युवकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 75000 रुपये, उपविजेत्या संघाला 50000 रुपये व करंडक आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला करंडक व 25000 रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज व सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांना प्रत्येकी 5000 रुपये आणि करंडक, तर मालिकावीराला करंडक व 11000 रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नेहमी आग्रह आहे कि राजकारण हे मूळ समाजकारणच असले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ यशस्वी करायची असेल तर सर्वत्र युवकांना खेळण्याच्या अधिक सुविधा व संधी मिळाल्या पाहिजेत. स्वतः प्रधानमंत्री विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यान बरोबर संवाद करतात व त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी फोन करून अभिनंदन करतात. मेरी कोम व पी.टी. उषा अशा खेळाडूंना राज्य सभेत नियुक्त करण्यात आले. खेलो इंडिया स्पर्धांना फार मोठा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी तो वाढत आहे. ‘देश खेलेगा तो देश खिलेगा’, हे प्रधानमंत्र्यांचे धोरण आहे.

भारत जगातील सर्वोच्च संवर्धित कोळंबी उत्पादक राष्ट्रांपैकी एक, तर मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर : परशोत्तम रुपाला

मुंबई-भारताला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण मत्स्यसंपत्तीचे वरदान लाभलेले असून देशात विविध प्रकारच्या माशांचे उत्पादन केले जाते, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले. मासे हा भारतातील अन्न, पोषण, रोजगार आणि उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे त्यांनी सांगितले. मासे हे आरोग्यदायी प्राणीजन्य प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक परवडणारा आणि समृद्ध स्रोत असल्याने भूक भागवण्याची आणि कुपोषण कमी करण्याची त्यात अफाट क्षमता आहे, असेही ते म्हणाले. हे आश्वासक क्षेत्र प्राथमिक स्तरावर 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना तसेच मूल्य शृंखलेत लाखो लोकांना उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता पुरवते अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले की, भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र हळूहळू विकसित होत असून हे क्षेत्र देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे.    भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात पूर्णपणे पारंपारिक उद्योग म्हणून सुरू झालेल्या या क्षेत्राचे गेल्या 75 वर्षांत व्यावसायिक उपक्रमात रूपांतर झाले असून मत्स्य उत्पादनात 22 पटीने वाढ झाली आहे. 1950-51 मध्ये केवळ 7.5 लाख टनांवरून 2021-22 मध्ये मत्स्य उत्पादनात 10.34% वाढीसह भारताचे एकूण मत्स्य उत्पादन विक्रमी वार्षिक 162.48 लाख टन इतके झाले आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, जगातील सर्वाधिक मासळी उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आज भारत तिसऱ्या क्रमांकावर असून जागतिक पातळीवरील एकूण मासळी उत्पादनामध्ये भारताचा वाटा सुमारे 8% आहे. आपला देश मत्स्यशेती उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असून कल्चर्ड कोलंबीचे उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी एक देश आहे अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी नुकताच सागर परिक्रमा यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ केला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून 17 मे 2023 रोजी  सुरु झालेली ही परिक्रमा  रायगड जिल्ह्यातील करंजा या किनारपट्टी प्रदेशातून मार्गक्रमण करत 18 मे 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेल्दूर येथे पोहोचली आणि त्यानंतर गोव्यातील वास्को, बायना, मडगाव, काणकोण असे टप्पे पार करत आज 19 मे 2023 रोजी तिची सांगता झाली.

सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्यात आज तिसऱ्या दिवशी वास्को मासेमारी बंदराला भेट देण्यात आली. केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, गोवा राज्य सरकारमधील मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हलर्णकर यांच्यासह इतर मान्यवरांनी, वास्को बंदरावर उपस्थित असलेले मत्स्य शेतकरी, मच्छीमार यांसारख्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, मच्छिमारांनी त्यांच्या समस्या मांडण्यात मोठी उत्सुकता दाखवली तसेच त्यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) आणि किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) यांसारख्या योजना आणि कार्यक्रम  सरकारी यांच्या बाबतीत जागरूकता निर्माण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्र्यांनी  स्वयंसेवकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल मच्छिमार समुदायात जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले जेणेकरून आपले मच्छिमार, मत्स्य शेतकरी  किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेऊ शकतील आणि आपले जीवनमान  सुधारण्यासाठी स्वतःची मदत करू शकतील.

सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याला भरघोस यश मिळाले.

समाजमंदिरं आणि अभ्यासिकांची अर्धवट कामे पूर्ण व्हावीत-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – जिल्ह्यामधील समाजमंदिरं आणि अभ्यासिका यांची अर्धवट पडलेली कामं पूर्ण व्हावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषय आमदार शिरोळे यांनी मांडले.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अर्धवट अवस्थेत पडलेली समाजमंदीरं आणि आभ्यासिका आहेत. काही समाजमंदिरं आणि अभ्यासिका गेल्या १० वर्षांपासुन अर्धवट अवस्थेत आहेत. आमदार निधीच्या खर्चाकरीता मार्गदर्शक सूचना असतात. त्यानुसार या कामांकरिता निधी देता येत नाही. मात्र, अशी कामे पूर्ण करण्याची मागणी सतत होत असते. याकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी, अशी अर्धवट अवस्थेतील समाजमंदिरं आणि अभ्यासिका यांची समस्या केवळ माझ्या मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातच आहे. तरी या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

महावितरणच्या विविध डीपी, ट्रान्सफॉर्मर करिता महावितरणचे एस्टिमेट झाल्यावर त्वरित मान्यता द्यावी. तसेच आय पास ची वेबसाईट सतत बंद असल्यामुळे आमदार निधी खर्चाचे स्टेट्स समजत नाही. तरी यावरही लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशाही मागण्या आमदार शिरोळे यांनी बैठकीत केल्या.

येत्या दोन महिन्यात घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर दि १९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय कार्यालयात आज नरखेड व काटोल तालुक्यातील उपविभागीय आढावा बैठक झाली. खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर,अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, राज्य व  केंद्र शासनाच्या घरकुल योजनाअंतर्गत राज्यात दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी पूरक ठरणारे पट्टे वाटप काटोल आणि नरखेड तालुका प्रशासनाने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे. या उद्दिष्ट्य पूर्तीच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहील. आजच्या आढावा बैठकीत सादरीकरण करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व योजना येत्या काळात वेगाने पूर्ण करा. पालकमंत्री म्हणून या कामातील अडचणी दूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

सरासरीपेक्षा कमी पावसाची परिस्थिती लक्षात घेता. त्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीक नियोजन आणि पेरण्यांच्या तारखांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ‘अटल भूजल योजना’ व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना गती दिल्यास कमी पावसातही पिके जगवता येतील,असे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनीची गरज आहे. नापीक, पडीक जमिनीचा यासाठी उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती द्या, सौर पॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती झाल्यास दिवसाच्या ओलीतासाठी वीजेचा अतिरिक्त साठा निर्माण होईल, यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा लाविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सादरीकरण केले.यात त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार,अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्यित योजना, गाव तिथे स्मशानभूमी, आपले सरकार सेवा केंद्र आदींची माहिती दिली.

आमदार सर्वश्री अनिल देशमुख, आशिष जायस्वाल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सूचना केल्या. आज बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि सादरीकरणात झालेली चर्चा पूर्णतः अंमलबजावणीत आली पाहिजे याबाबतचे निर्देशही त्यांनी बैठकीच्या शेवटी केले.

काटोल ,नरखेड आणि मोहाड नगरपरिषदेच्या विविध कामांचा आढावाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता  

मुंबई दिनांक १९  : देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सादरीकरण केले.

आज मान्य करण्यात आलेल्या सुशासन नियमावली २०२३ मध्ये नागरिकांना सुलभरीत्या सेवा मिळण्यावर भर देण्यात आला आहे.

देशातली पहिलीच सुशासन नियमावली

शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा. यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी व अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्या होत्या.

निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, यांची समितीही नेमण्यात आली होती.

या समितीने तयार केलेली देशातील अशा स्वरूपाची ही पहिलीच नियमावली असून यामध्ये २०० हून अधिक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १६ अध्याय असून ही नियमावली तयार करताना समितीच्या ४३  बैठका झाल्या आहेत तसेच ३५ विभागांना भेटी देऊन, मंत्रालयीन अधिकारी तज्ञ व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी चर्चा करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

सुशासनाचे निर्देशांक

यामध्ये विभागनिहाय १६१ निर्देशांक तयार करण्यात आले असून अगदी जिल्हा पातळीपर्यंत या निर्देशांकाच्या आधारे सुशासनाची कामगिरी तपासली जाईल.

ऑनलाईन सेवा कालमर्यादेत

यामध्ये एंड टू एंड ऑनलाईन सेवा कालमर्यादेत देण्याची सोय असेल.  आपले सरकार सेवा केंद्र आणि त्याची व्याप्ती वाढवून नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निपटारा करण्यात येतील.  आपले सरकार पोर्टल अद्यावत करण्यात येईल. शासकीय कामकाज ई-ऑफिसद्वारे करण्यात येईल. पब्लिक रेकॉसार्वजनिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. जेणेकरून जलद गतीने कामे होतील व कार्यक्षमता वाढेल.

कुठल्याही फाईलचा प्रवास चार स्तरापेक्षा जास्त स्तरांवर न होण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, असेही सुजाता सौनिक यांनी सांगितले.

वातावरणीय बदलासाठी स्वतंत्र कक्ष

या सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचा देखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय निर्णय प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल

या सुशासन नियमावलीला सर्व विभागांना पाठवून यावर कार्यवाही करण्यास सांगण्यात येईल असेही यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले. यासंदर्भातील कायद्याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी,निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा

मुंबई दिनांक १९: नागरिक आपल्या सूचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन आणि माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज यांनी यासंदर्भात सादरीकरण केले.नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेल, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमातून शासनाकडे सूचना, तक्रारी, निवेदने पाठवित असतात. त्यावर कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना त्या पाठवणे, पाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागरिकांना योजनांची माहिती

राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपल्याला राज्य किंवा केंद्राच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो हे आता पोर्टलवरून सहजपणे कळू शकणारी केंद्राप्रमाणे माय स्कीम हे पोर्टलही तयार होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळात देखील अमुलाग्र बदल करण्यात येत असून त्यातून सहज आणि त्वरित आवश्यक माहिती मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे.

प्रकल्पांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम

राज्यात विविध प्रकल्प सुरु असतात. त्यांच्या कामांवर लक्ष ठेऊन ते त्यांची सद्यस्थिती कळण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम तयर करण्यात येत आहे

गोल्डन डेटा (सुवर्ण विदा)

राज्यातील सर्व विभागांचा आणि एकूणच शासनातील सर्व डेटा एकत्रितरीत्या ठेवण्यासाठी गोल्डन डेटा (सुवर्ण विदा) व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

ड्रोनसाठी धोरण

ड्रोनची अनेक कारणांसाठी उपयुक्तता असून शासनात देखील याचा वापर विविध विभाग करतात. यासाठी एक सर्वंकष ड्रोन धोरणही अंतिम होत असून त्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

न्यायालयीन प्रकरणे

एकूणच राज्य शासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती तसेच सद्यस्थिती व इतर बाबींची माहिती एका क्लिकमध्ये कळण्यासाठी लिगल ट्रॅकिंग सिस्टिम देखील तयार होत आहे याविषयी सांगण्यात आले.

याशिवाय ई ऑफिसच्या माध्यमातून फाईल्सचा निपटारा कशा रीतीने करणे सुरु झाले आहे हेही सांगण्यात आले. भारतनेट चे जाळे राज्यभर पसरविण्याचे काम २६ जिल्ह्यांत मिळून ७७ टक्के झाले आहे याची माहिती देऊन प्रधान सचिव पराग जैन म्हणाले की, २७५१ ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बीएसएनएल कार्यवाही करते आहे.

मुख्यमंत्री डॅश बोर्ड

याशिवाय मुख्यमंत्री डॅश बोर्ड, मुख्यमंत्री हेल्पलाईनविषयी माहिती देण्यात आली. हेल्पलाईनमध्ये चॅटबॉट तसेच व्हॉटसएपचा अंतर्भाव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचा संदेश नागरिकांना द्यायचा असल्यास त्याचीही सोय असेल.

नारी शक्तीचा उदय होत आहे : डॉ. एल. मुरुगन

सध्या सुरु असलेल्या कान चित्रपट महोत्सवात आजच्या चौथ्या  दिवशी इंडिया पॅव्हिलिअनमध्ये  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील महिलांची भूमिका यावर  प्रभावी सत्र पार पडले.  ‘शी शाइन्स’ अशा यथायोग्य शीर्षकाच्या या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता निर्मात्या खुशबू सुंदर यांनी केले तर  अभिनेत्री ईशा गुप्ता, ग्रीक-अमेरिकन दिग्दर्शक डॅफ्ने श्मॉन यांच्यासह महिला केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आणि सुधीर मिश्रा हे वक्ते होते.

भारतीय चित्रपट एका सुंदर टप्प्यातून मार्गक्रमण करत असून यामध्ये महिला केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर निर्मात्या, दिग्दर्शिका आणि तंत्रज्ञ म्हणून महत्वाच्या भूमिका पार पाडत आहेत, असे सांगत अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी या संवादाचे प्रास्ताविक केले. 

नारी शक्तीसह  सर्जनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना भांडारकर म्हणाले की जेव्हा तुमच्याकडे चित्रपटाची नायक एक महिला  असते, तेव्हा निधी उभारणे हे एक आव्हान असते, मात्र मी ज्या चित्रपटांची निर्मिती केली , त्या सर्वानी बॉक्स ऑफिस वर चांगली कामगिरी केली आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले, त्यामुळे एका अर्थी मी भाग्यवान आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या चित्रपटात तुम्हाला अपेक्षित बजेट मिळत नाही पण जगभर अशीच परिस्थिती आहे.”

“आम्ही अनुपम खेर आणि कुमुद मिश्रा यांच्याबरोबर माझी स्वतःची महिला पोलीस अधिकारी म्हणून मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट करत होतो. मात्र या चित्रपटासाठी निधी मिळवणे अतिशय कठीण झाले होते, जेव्हा हा चित्रपट, चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने अजिबात चांगली कमाई केली नाही मात्र जेव्हा तो नेटफ्लिक्स वर आला तेव्हा तो मोठ्या प्रमाणावर बघितला गेला. म्हणजे प्रेक्षकांना महिलांच्या कथा बघायला आवडते, हे यावरून दिसून येते.”असे ईशा गुप्ता यांनी आपला अनुभव कथन करताना सांगितले.

श्रुती हासनसोबत ‘द आय’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या डॅफ्ने श्मॉन म्हणाल्या,” चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांपैकी 51 टक्के महिला असतात, हे मान्य करणे खरोखरच महत्वाचे आहे. आम्ही आमच्या कथा पडद्यावर पाहणे गरजेचे  आहे. आपण महिला दिग्दर्शक आणि अभिनेत्री असलेल्या चित्रपटांवर असण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आम्ही दरवर्षी 10 महिलांची निवड करतॊ आणि त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना वित्त  पुरवठा करण्यासाठी सहाय्य करतो. एक कलाकार म्हणून पुरुष आणि महिलांना समान पातळीवर पाहणे महत्त्वाचे आहे.”

विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कशाप्रकारे योगदान देत आहे याविषयी भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी माहिती दिली, “महिला खरोखर झळकत आहेत आणि चित्रपटांमध्ये त्या कायमच चमकदार कामगिरी करत राहतील. मी चित्रपटांकडे  पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान म्हणून पाहत नाही, मगलीर मट्टुम (केवळ महिला) नावाचा एक तमिळ चित्रपट होता ज्यामध्ये महिलांची मध्यवर्ती पात्रे होती आणि तो चित्रपट  खरोखरच चांगला चालला. महिला निर्मात्यांना समर्पित असा शी शॉर्ट फिल्म लघुपट महोत्सव आहे, ऐश्वर्या सुंदरने तयार केलेल्या अॅनिमेशन फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, आणि गुनीतला ऑस्कर पुरस्कार मिळाला. मला वाटते, चित्रपट क्षेत्रात एक सुंदर जागा तयार करण्यात आपल्या महिला आधीच यशस्वी झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारी शक्तीचा उदय होत आहे.”

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एन एफ डी सी ने 100 पेक्षा  अधिक महिला निर्मात्यांना दिलेले प्रशिक्षण आणि 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो म्हणजेच उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ या कार्यक्रमात 70 टक्क्यांहून अधिक सहभाग महिलांचा होता, याविषयी डॉ मुरुगन यांनी माहिती दिली.

“महिला शक्तीला समर्पित केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत.” असे सांगून त्यांनी आपल्या संभाषणाचा समारोप केला.

पुन्हा अवतरतेय हेल्मेटचे भूत… जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार

वर्षानुवर्षे भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी ,आणि कॉंग्रेस सह सर्वच राजकीय पक्षांच्या सह सामाजिक संस्थांनी विरोध करूनही हेल्मेटचे भूत काही पुण्यातून नाहीसे झाले नाही , रस्त्यावर मानगूट पकडणारे भूत सीसी टीव्ही तून मोबाईल द्वारे लोकांना छळू लागले आणि लोक अदालत लादू लागले … आता निवडणुका तोंडावर असताना हेच हेल्मेट चे भूत पुन्हा अवतरत आहे ..पुणेकर त्याचा कसा सामना करणार .. कि त्यापुढे हाथ टेकणार .. हे येणारा काल निश्चित सांगेल ,पण हेल्मेटच्या भुताने या सर्व राजकीय पक्षांच्या मुखवट्यावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात १०० टक्के यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे…

शहरातील खासदार ,आमदार, अनेक लोकप्रतिनिधी यांनी देखील वारंवार हेल्मेट ला विरोध केला, शहरात गर्दी एवढी आहे ,कोंडी एवढी आहे इथे सक्ती नको ,हवे तर महामार्गावर सक्ती करा अशी भूमिका वारंवार स्पष्ट केली पण अनेक आयपीएस आणि आय ए एस अधिकाऱ्यांना हेल्मेटच्या सक्तीचा वारंवार मोह झाला, हि लढाई गेली गेली २० वर्षे सुरूच आहे…पण प्रशासन मात्र तेवढेच हट्टाला पेटत आले आहे.

पुणे, दिनांक १९: हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्ह्यात २४ मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करीत असले तरी त्यांनी हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी, जनतेस मार्गदर्शक ठरावे आणि स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २४ मे रोजी हेल्मेट परिधान करून ‘लाक्षणीक हेल्मेट दिवस’ साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’ भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेही यात अंतर्भूत आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.

सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरुन येणारे अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याबाबतच्या सुचना आपल्या स्तरावरुन पारित कराव्यात. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचारी व नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असेही कळवण्यात आले आहे.

दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्यात येईल, असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

विधानभवन येथे आयोजित बैठकीस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाबाबत स्वतंत्र बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल. शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्यात येईल, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

इंद्रायणी मेडिसिटीबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन वेळेवर करावे. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.