निवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी …
मुंबई-८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीच्या साडेसहा वर्षांनंतर पुन्हा नाेटबंदी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नसल्याची घोषणा केली. मात्र, त्या तातडीने बंद केल्या नाहीत. बँकेने म्हटले की २००० च्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात राहतील. बाजारात उपलब्ध नोटा एक तर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बँकेतून बदलून घेता येतील. या नोटांची देवाणघेवाण किंवा त्याद्वारे खरेदी सुरू राहील.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार २३ मेपासून लोक २००० च्या नोटा बँकेत जमा करू शकतील. एका वेळी जास्तीत जास्त २० हजार रु.च्या नोटा (२००० च्या १० नोटा) जमा करता येतील. नोटा जमा करण्याची मर्यादा ठरलेली नाही. ८ नोव्हेंबर २०१६ च्या पहिल्या नोटबंदीत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नवीन ५०० आणि २००० च्या नोटा जारी करण्यात आल्या. तेव्हा आरबीआयने अर्थव्यवस्थेत रोखीची उपलब्धता सुरळीत ठेवण्यासाठी २००० च्या नोटा जारी केल्याचे म्हटले होते. आता २००० रुपयांची नोट बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सूत्रांनुसार, काळ्या धनाच्या रूपात मोठ्या प्रमाणात नोटा जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले.
–आता १९ मे २०२३: २,००० च्या नोटा वैध म्हणजे चलनात राहतील सामान्यांकडे जास्त नसल्याने गोंधळ होणार नाही. नोटा बदलण्यासाठी १३० दिवसांचा वेळ. ५००, २०० व १०० चा पर्याय.
रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेली प्रेस रिलीज –
₹2000 च्या चलनी बँक नोटा – चलनामधून वापर थांबवण्यात येणार; लीगल टेंडर म्हणून सुरू राहतील
- 2000 रुपयांच्या बँक नोटा चलनातून का बंद केल्या जात आहेत?
2000 रुपयांच्या चलनी नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या बँकनोटांचा लीगल टेंडर दर्जा काढून घेतल्यावर अर्थव्यवस्थेमधील चलनाच्या गरजेची पूर्तता वेगाने करण्यासाठी आरबीआय कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. या उद्दिष्टाची पूर्तता झाल्यावर आणि इतर चलनी नोटांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यानंतर 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटांची छपाई थांबवण्यात आली. 2000 रुपयांच्या बहुतेक नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या आणि त्यांच्या अंदाजे 4-5 वर्षांच्या आयुर्मानानुसार या नोटा आयुर्मान समाप्तीच्या स्थितीत आहेत. या चलनातील नोटा सर्वसामान्यपणे फारशा वापरल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर प्रकारच्या चलनी नोटा जनतेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या “ क्लीन नोट पॉलिसी” चा विचार करता 2000 रुपयांच्या चलनी बँक नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- क्लीन नोट पॉलिसी काय आहे?
जनतेला चांगल्या दर्जाच्या बँक नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने अंगिकृत केलेले हे धोरण आहे.
- 2000 च्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा कायम राहणार आहे का?
होय. 2000 रुपयांच्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा पुढे सुरू राहील. - 2000 रुपयांच्या बँक नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरता येतील का?
होय. सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते आणि त्यांना चुकती केलेली रक्कम म्हणून स्वीकारू शकते. मात्र, 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची त्यांना सूचना करण्यात येत आहे.
- लोकांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या 2000 रुपयांच्या चलनी नोटांचे काय करावे?
जनता त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटा त्यांच्या बँकेच्या शाखेत जमा करू शकते किंवा त्या बदलून घेऊ शकते.
2000 रुपयांच्या बँक नोटा आपल्या खात्यात जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट असलेल्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये (ROs) देखील नोटा बदलून घेण्याची सुविधा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे.
- बँक खात्यांमध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटा जमा करण्यावर काही मर्यादा आहे का?
बँक खात्यांमध्ये कोणत्याही मर्यादेविना नो युअर कस्टमर(केवायसी) निकषांनुसार आणि लागू असलेल्या इतर वैधानिक/ नियामक गरजांनुसार नोटा जमा करता येतील. - 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना त्या रकमेवर परिचालनात्मक मर्यादा असेल का?
जनतेला एका वेळी रु. 20,000/- पर्यंत 2000 रुपयांच्या बँक नोटा बदलून घेता येतील.
- 2000 रुपयांच्या चलनी नोटा बिझनेस करस्पॉन्डन्ट (BC ) कडून बदलून घेता येऊ शकेल का?
होय, खातेदारांना बिझनेस करस्पॉन्डन्ट द्वारे दररोज 4,000/- रुपये इतक्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येऊ शकतील.
- कोणत्या तारखेपासून नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल?
बँकांना पूर्वतयारी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नोटा बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 23 मे 2023 पासून बँक शाखा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधावा.
- बँकांच्या शाखांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या बँकेचे खातेधारक असणे आवश्यक आहे का?
नाही, एखाद्या बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकते. एका वेळी केवळ 20,000 रुपयांपर्यंत नोटा बदलून घेऊ शकतात.
- एखाद्याला व्यवसाय किंवा काही इतर कारणांसाठी 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असेल तर काय करावे?
बँकेच्या खात्यात नोटा कोणत्याही निर्बंधांशिवाय जमा करता येतील. 2000 रुपयांच्या बँक नोटा बँक खात्यात जमा करता येतील आणि या ठेवींच्या बदल्यात रोख रक्कम काढता येईल.
1 अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम
₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट – संचलन से हटाया जाना- वैध मुद्रा बने रहेंगे
19 मई 2023
₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट – संचलन से हटाया जाना- वैध मुद्रा बने रहेंगे
₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट नवंबर 2016 में भारतीय रिज़र्व बैंक अधिनियम, 1934 की धारा 24(1) के अंतर्गत जारी किए गए थे। मुख्यतया, ₹500 एवं ₹1000 मूल्यवर्ग के बैंकनोट, जो तब संचलन में थे, के वैध मुद्रा का दर्जा हटाने के पश्चात, अर्थव्यस्था में मुद्रा की आवश्यकता को जल्द पूरा करने के उद्देश्य से इन्हें जारी करने का निर्णय लिया गया था। संचलन में पर्याप्त मात्रा में अन्य मूल्यवर्ग के नोटों के उपलब्ध हो जाने से ₹2000 मूल्यवर्ग के नोट जारी करने का उद्देश्य पूरा हो गया। अतः वर्ष 2018-19 से ₹2000 मूल्यवर्ग के नोटों का मुद्रण बंद कर दिया गया।
- जारी किए गए ₹2000 मूल्यवर्ग के करीब 89 प्रतिशत बैंकनोट 31 मार्च 2017 के पूर्व से संचलन में हैं एवं वे अपनी अनुमानित आयु सीमा, जो कि 4-5 वर्ष है, के अंत में हैं। 31 मार्च 2018 को इन नोटों की अधिकतम मात्रा ₹6.73 लाख करोड़ रुपये (संचलन में नोटों का 37.3 प्रतिशत) थी, जो 31 मार्च, 2023 को घटकर ₹3.62 लाख करोड़ रुपये (जो संचलन में नोटों का 10.8 प्रतिशत) हो गयी है। यह भी देखा गया है कि ₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोट लेन-देन के लिए आमतौर पर उपयोग में नहीं लिए जा रहे हैं। इसके अलावा, अर्थव्यवस्था की आवश्यकता पूर्ति के लिए अन्य मूल्यवर्ग के नोटों की पर्याप्त मात्रा उपलब्ध है।
- उपर्युक्त कारणों से एवं भारतीय रिज़र्व बैंक की ‘स्वच्छ मुद्रा नीति’ को ध्यान में रखते हुए ₹2000 मूल्यवर्ग के बैंकनोटों को संचलन से वापस लेने का निर्णय लिया गया है।
- ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोट वैध मुद्रा बने रहेंगे।
- यह भी उल्लेख है कि भारतीय रिज़र्व बैंक ने इसी प्रकार वर्ष 2013-14 में संचलन से नोटों को हटाने का कार्य किया था।
- तदनुसार, जनसाधारण ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को अपने बैंक खाते में जमा कर सकते हैं/अथवा किसी भी बैंक शाखा पर अन्य मूल्यवर्ग के बैंक नोटों में बदल सकते हैं। बैंक खातों में जमा करने की प्रक्रिया सामान्य रूप में ही रहेगी, अर्थात बिना किसी प्रतिबंध के और वर्तमान अनुदेशों तथा अन्य लागू सांविधिक प्रावधानों के अधीन होगी।
- परिचालनात्मक सुविधा को सुनिश्चित करने की दृष्टि से तथा बैंक शाखाओं के नियमित कार्यकलापों को बाधित किए बिना एक समय में ₹2000 मूल्यवर्ग के ₹20000 तक की राशि को 23 मई, 2023 से किसी भी बैंक में अन्य बैंक नोटों के लिए बदला जा सकता है।
- इस कार्य को समयबद्ध रूप से पूरा करने के लिए तथा जनसाधारण को ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने के लिए पर्याप्त समय देने हेतु सभी बैंक ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने की सुविधा 30 सितम्बर, 2023 तक उपलब्ध कराते रहेंगे। बैंकों को को इस संबंध में अलग से दिशानिर्देश जारी किए गए हैं।
- ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को एक समय में ₹20,000 राशि तक बदलने की सुविधा भारतीय रिज़र्व बैंक के उन 19 क्षेत्रीय कार्यालयों में भी 23 मई, 2023 से उपलब्ध रहेगी जहां निर्गम विभाग1 स्थित हैं।
- भारतीय रिज़र्व बैंक ने बैंकों को सूचित किया है कि वे तुरंत प्रभाव से ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जारी करना बंद कर दें।
- जनसाधारण को प्रोत्साहित किया जाता है कि वे ₹2000 मूल्यवर्ग के बैंक नोटों को जमा करने/अथवा बदलने के लिए 30 सितम्बर, 2023 तक की समयावधि का उपयोग करें। जनसाधारण की सूचना और सुविधा के लिए इस संबंध में प्रायः पूछे जाने वाले प्रश्न(एफएक्यू) को भारतीय रिज़र्व बैंक की वेबसाइट(हाइपरलिंक) पर डाला गया है।
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2023-2024/257