Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

Date:

: ‘हत्या की आत्महत्या’ याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य’ हा नवा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पुष्कर जोग, सौरभ गोखले,अनंत जोग,मंजरी फडणीस, उषा नाडकर्णी, आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.

“अदृश्य” हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.

मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले.

सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर्शकाने बनलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्री मंजरी फडणीसने सांगितले.

मला खूप आनंद होत आहे की, मराठीत ओटीटी प्लॅाटफॅार्मवर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे, असे अभिनेता पुष्कर जोग यांनी सांगितले.

हिंदी,  मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘अदृश्य’ या चित्रपटाच्या रुपात मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

“उत्तम कलाकारांनी बांधलेली “ अदृश्य”  ह्या चित्रपटाची रहस्यमय कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. चित्रपटातील रहस्याचं गूढ उलगडताना प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. शिवाय, समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. ‘अल्ट्रा झकास ’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार  सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोपातर्फे तरुणांसाठी तंत्रज्ञानाची मजा देणारे रोबोलँड

पुणे, जून २३ २०२५ – कोपा मॉल या पुण्यातील...

महाकुंभमेळ्यातील आरोग्य शिबीराचा जागतिक स्तरावर सन्मान – नागा साधूंच्या मदतीने पार पडलेल्या उपक्रमाला फ्रान्समध्ये पुरस्कार

पुणे- परमपूज्य नागासाधूंनी नुकतीच नेत्र तपासणीच्या एका विशेष मोहिमेतून लोकांमध्ये...

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा...

मुस्लिम समाजाकडून राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान

पुणे : देशभरातील अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिमांच्या प्रश्नावर अत्यंत प्रभावी...