6 शेअर्समध्ये अपर सर्किट-
मुंबई-अदानी समूहाचे शेअर्स सोमवारी रॉकेट बनले. समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागले. सर्वात चांगली कामगिरी प्रमुख कंपनी अदानी एंंटरप्रायझेसची राहिली. याचा शेअर दोन दिवसांत (शुक्रवार-सोमवार) २४.१९% वधारला. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी सोमवारचा दिवस सर्वात चांगला राहिला. याचे कारण ठरला सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल. त्यात अदानी समूहाला दिलासा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत सेबीने नियमांचे पालन केले आहे. हा अहवाल गुरुवारी आला होता. त्यानंतर शुक्रवारी समूहाचे शेअर्स वधारले.
दोन दिवसांत वृद्धी
अदानी एंटर. २४.१९%
अदानी विल्मर २०.२%
अदानी ट्रान्स. १५.४%
अदानी गॅस १४.८%
अदानी पाॅवर १४.६%
अदानी ग्रीन १३.८%
अदानी पोर्ट ९.४%
एनडीटीव्ही ९.०%
अंबुजा सिमेंट ७.१%
एसीसी ५.९%
गौतम अदानी यांच्या मालमत्तेमध्ये एकाच दिवसात झाली १० टक्क्यांची वृद्धी
अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये ३२ टक्के भागीदारी असलेल्या गौतम अदानी यांच्या खासगी मालमत्तेमध्ये सोमवारी ३९.७ हजार कोटी रुपयांची (१० टक्के) वाढ झाली आहे. एकूण ४.३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह आता गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांमध्ये २४वे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
प्रवास मोठा आहे… अदानी समूहाचा मार्केट कॅप ८.६४ लाख कोटींनी घटला होता, आतापर्यंत २.९६ लाख कोटींनी वाढला समूहाच्या कंपन्या मार्केट कॅप सर्वात नीचांकी सोमवारी रक्कम लाख कोटींत (२३ जानेवारी) पातळी (फेब्रु.) सकाळी* अदानी इंटरप्रायझेस ४.०१ १.७० २.७० अदानी ग्रीन एनर्जी ३.१९ ०.७७ १.५२ अदानी ट्रान्समिशन ३.१२ ०.८५ ०.९३ अदानी पोर्ट १.७१ १.१० १.६१ अंबुजा सिमेंट १.०४ ०.६९ ०.८१ अदानी विल्मर ०.७४ ०.४७ ०.५९ अदानी टोटल गॅस ०.७३ ०.४५ ०.७९ एसीसी ०.४५ ०.३२ ०.३४ एकूण १४.९८ ६.३४ ९.३० कारण… अहवालातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांबाबत सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून दिलासा
(हे आकडे फोर्ब्जचे आहेत. यात सोमवारी झालेली वाढ समाविष्ट नाही.)