Home Blog Page 1473

पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा 

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील राणी कमलापती स्थानक इथून पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी उपस्थित होते.

आरामदायी आणि उत्तम रेल्वे प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात करत राणी कमलापती-जबलपूर, राणी कमलापती-इंदूर, गोवा (मडगाव)-मुंबई, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू दरम्यान पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आज हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेल्या या वंदे भारत गाड्या राज्यांची  राजधानी आणि इतर शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील. ह्या वंदे भारत गाड्या नव्या भारताचा – विकसित भारताचा संदेश देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत.  

रानी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस

रानी कमलापती – जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निघेल आणि त्याच दिवशी नरसिंगपूर, पिपरिया आणि नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थांबे घेऊन जबलपूर स्थानकावर पोहोचेल.

वंदे भारत रेल्वेगाडी   सुरू झाल्यामुळे मध्यप्रदेशची सांस्कृतिक राजधानी जबलपूर, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि जवळपासची धार्मिक आणि पर्यटन स्थळांमधील संपर्क वाढेल तसेच या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

रानी कमलापती – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस

भोपाळ – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी उज्जैन रेल्वे स्थानकावर थांबून इंदूर स्थानकावर पोहोचेल. रानी कमलापती ते इंदूर दरम्यान वंदे भारत  रेल्वेगाडी चालवण्यामुळे प्रवास सुलभ आणि जलद  होईल आणि या प्रदेशांची संस्कृती, पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्यासाठी, ही गाडी एक महत्त्वाचे माध्यम बनेल. वंदे भारत एक्सप्रेस सुखद आणि उत्तम रेल्वे प्रवाचाही देखील अनुभव देईल.

गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

गोवा (मडगाव)- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस  रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन त्याच दिवशी मडगाव स्थानकात पोहोचेल.

अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे कोकणातील लोकांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या मार्गावरील नवीन वंदे भारत रेल्वेगाडीमुळे पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधांना नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस

रांची- पाटणा नवी वंदे भारत एक्सप्रेस  रेल्वेगाडी पाटणा येथून निघेल आणि त्याच दिवशी गया, कोडरमा, हजारीबाग, बरकाकाना आणि मेसरा रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन रांची स्थानकात पोहोचेल.

विपुल प्रमाणात खनिज संपत्तीचे वरदान मिळालेले रांची हे खनिज आधारित उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. पाटणाशी जलद कनेक्टिव्हिटीसाठी ही  रेल्वेगाडी स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल.

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस  केएसआर बेंगळुरू शहरातून निघेल आणि त्याच दिवशी यशवंतपूर, दावणगिरी आणि हुबळी रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन धारवाडला पोहोचेल.

कर्नाटकात धारवाड – बेंगळुरू वंदे भारत रेल्वेगाडी विद्या काशी धारवाड, वैनिज्य नगरी हुबळी आणि बेंगळुरूला जोडेल. ही वंदे भारत रेल्वेगाडी उत्तर कर्नाटक ते दक्षिण कर्नाटक जोडेल.

वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या अनेक उत्कृष्ट सुविधा देतात. त्यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. या गाड्यांमध्ये असलेल्या ‘कवच’ तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना प्रगत, अद्ययावत आणि अत्याधुनिक सुरक्षा मिळते.  प्रगत अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवास अधिक सुरळीत, सुरक्षित आणि सुखकर होण्याची ग्वाही मिळते.

पॉवर कार्समुळे रेल्वेकडून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते आणि ब्रेक लावण्याच्या प्रगत प्रणालीमुळे सुमारे 30% विजेची बचत होते.  भारतीय रेल्वेला पर्यावरण रक्षण करता येईल अशी या रेल्वेगाड्यांची  रचना करण्यात आली आहे.

गुरुंच्या नावाने पुरस्कार हा आशीर्वादच-ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे उद्गार’श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार प्रदान’

पुणे : ‘गुरुंच्या नावाने शिष्येला पुरस्कार मिळणे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार म्हणजे गुरू श्रीकांत ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. मी नम्रतापूर्वक हा प्रसाद स्वीकारते, असे भावपूर्ण मनोगत ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
‘संवाद, पुणे’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त केळकर यांना ‘श्रीकांत ठाकरे संगीत’ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या.
याप्रसंगी ‘संवाद, पुणे ‘चे सुनील महाजन, निकिता मोघे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, हेमंत संभूस, चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर, योगेश राजापूरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत उत्तराताई म्हणाल्या, ‘मी त्यांच्याकडे अनेक वर्षे शिकले. त्यांनी सर्व संगीत प्रकल्पांमध्ये मला गाण्याची संधी दिली. अतिशय मनापासून गझल, ठुमर्या शिकवल्या. कोणतीही तडजोड न करता, त्यांनी मनाला पटेल तेच काम केले,’.
माडगूळकर यांनीही आठवणींना उजाळा दिला. ‘लाखाची गोष्ट ‘चित्रपटाची सुंदर अर्कचित्रे ठाकरे यांनी तेव्हा ‘मार्मिक’ मध्ये केली होती. श्रीकांत ठाकरे यांनी स्वत:चा वेगळा बाज जपून, निष्ठेने काम केले. ‘लोकप्रिय’ वाटांनी ते कधीच गेले नाहीत. त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, असे माडगूळकर म्हणाले.
अनिल शिदोरे यांनी ‘श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी उपक्रम करावा आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०३० मध्ये श्रीकांत ठाकरे यांचे बहुढंगी व्यक्तिमत्त्व उलगडणारा मोठा समारंभ करण्याचे आवाहन केले.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात ‘स्वरराज’ या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. निकिता मोघे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित ‘स्वरराज’ हा विशेष गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये गप्पागोष्टी आणि आठवणींना उजाळा देखील देण्यात आला.
‘स्वरराज’ या कार्यक्रमात रश्मी मोघे, धनश्री गणात्रा, अजित विसपुते आणि सारंग कुलकर्णी यांनी गीते सादर केली. त्यांना अमृता ठाकूरदेसाई, केदार परांजपे, नितीन शिंदे, अपूर्व द्रवीड, अभय इंगळे यांनी साथसंगत केली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांचा विशेष सहभाग या कार्यक्रमात होता. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
——–

फोटो ओळ : ‘संवाद, पुणे’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘स्वरराज’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार आनंद माडगूळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुनील महाजन, आनंद माडगूळकर, अनिल शिदोरे, हेमंत संभूस, दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते.

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59% वाढली – नितीन गडकरी

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59% वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे  आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

“2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती, जी 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढली  असून  या कालावधीत ही लांबी 59% पेक्षा अधिक  वाढली आहे.”, असे गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या नऊ वर्षांत  चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची  लांबी 18,371 किमी होती जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  अध्यक्ष  संतोष कुमार यादव हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

फास्टॅग  (FASTag ) लागू झाल्यामुळे पथकर संकलनात  लक्षणीय वाढ झाली आहे. पथकारामधून  मिळणारा महसूल 2013-14 मधील  4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 2030 पर्यंत पथकर  महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

फास्टॅगमुळे पथकर नाक्यांवर होणारा खोळंबा  कमी झाली आहे. “2014 मध्ये पथकर नाक्यांवरचा  प्रतीक्षा कालावधी 734 सेकंदांचा होता , तर  2023   मध्ये तो   47 सेकंदांवर आला  आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही हा कालावधी   लवकरच 30 सेकंदांपर्यंत खाली आणू,” , असे नितीन गडकरी म्हणाले.

भारतातील प्रवासाच्या अनुभवांमध्ये  फास्टॅगमुळे  (FASTag) पडलेल्या  परिवर्तनीय प्रभावाबद्दल सांगताना ,  फास्टॅगने पथकर भरण्याच्या  संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे आणि रोख व्यवहारांची गरज संपुष्टात आणली आहे , असे केंद्रीय मंत्री म्हणाले. एका संशोधनानुसार,  या महत्वाच्या उपक्रमामुळे  पथकर नाक्यांवर  वाहने थांबल्यामुळे  वाया जाणार्‍या इंधन खर्चात अंदाजे 70,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

ईशान्य भागात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे, असे गडकरी यांनी सांगितले. या प्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत असे ते म्हणाले. प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने 670 सुविधा विकसित केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) इनव्हिट (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) मॉडेल अंतर्गत रोखे (बॉन्ड) जारी करण्यात आले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले. मुंबई शेअर बाजारात रोखे उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या दिवशीच बाँडचे सात वेळा ओव्हरसबस्क्रिप्शन झाले. इनव्हिट पारंपरिक बँक दरांना मागे टाकून 8.05 टक्के आकर्षक व्याजदर देते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणुकीचा विचार करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

एनएचएआयने सात जागतिक विक्रम केले आहेत, त्यावरून तंत्रज्ञान प्रगतीसाठी एनएचएआयची वचनबद्धता आणि भारतात अमेरिकेनंतरचे जगातील दुस-या क्रमांकाचे रस्ते जाळे तयार करण्याची महत्त्वाकांक्षा दिसून येते असे गडकरी यांनी सांगितले.

हरित उपक्रमांच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले की, एनएचएआयने ने गेल्या नऊ वर्षांत 68,000 हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण केले, तर 3.86 कोटी वृक्षांची लागवड केली. एनएचएआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 15,000 हून अधिक अमृत सरोवरे विकसित केली आहेत, अशी माहिती त्यांनी जल पुनरुज्जीवन उपक्रमांबद्दल बोलताना दिली.

मंत्रालयाने दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत 30 लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी बांबू क्रॅश बॅरिअर्सविषयी माहिती दिली.हे बांबू बॅरिअर्स रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत रस्ते अधिक  टिकाऊ बनवतात असे ते म्हणाले.

शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून गडकरी यांनी पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा दृष्टीकोन मांडला.

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा:- अतुल लोंढे

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदावर्तेवर कारवाई कधी करणार ?

मुंबई, दि. २७ जून २०२३
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
संभाजी भिडेंच्या विधानाचा जाहीर निषेध करुन अतुल लोंढे यांनी भाजपावरही तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी संविधान निट वाचावे म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची ती नांदी होती. जे स्वातंत्र्य मनुस्मृतीने या देशातील बहुजन समाजाला पाच हजार वर्षांपासून नाकारले होते. भाजपा व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही. शामाप्रसाद मुखर्जी यांनी अशा मुस्लीम लिग बरोबर युती केली होती ज्यांनी १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. तशी मांडणी सावरकर यांनीही केली होती, म्हणजे खरा इतिहास आता समोर येत आहे. तुम्ही संविधान दिवस काळा दिवस म्हणून पाळणार ? १९४८ मध्ये तिरंगा पायदळी तुडवला, यातून लक्षात येते की आपणास स्वातंत्र्य व संविधान मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मनुस्मृतीचेच समर्थक आहेत, संपूर्ण बहुजन समाज व स्त्रीयांनी आपल्या पायाखाली राहिले पाहिजे अशी यांची मानसिकता आहे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो व संभाजी भिडेंवर लवकरात लवकर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही लोंढे म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने औरंग्याच्या अवलादी, औरंग्याच्या अलवादी करता. मग त्या गुणरत्न सदावर्तेच्या रुपाने गोडसेच्या औलादी, गोडसेचे फोटो जाहीरपणे नाचवत असतात, ते आपणांस चालते का ? आपल्यात धमक असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या या गोडसेंच्या प्रवृत्तींवरही कारवाई करा, असेही लोंढे म्हणाले..

अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, गृहमंत्र्यांना राजकीय कलगीतुऱ्यातून वेळ मिळत नसावा

पुणे-पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे. अलीकडेच एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची तिच्याच मित्राने निर्घृण हत्या केली. हे प्रकरण ताजं असताना आणखी एका विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. त्यांनी ट्वीट करून ही प्रतिक्रिया दिली.

अजित पवार ट्वीटमध्ये म्हणाले,विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.

मुळा मुठेत राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी

पुणे-मुळा मुठेत राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करा अशी मागणी आता थेट पोलिसांकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी येथे दिली.

मुळा मुठा नदीपात्रात शांतीनगर कडुन ॲम्युनिशन फॅक्टरी,खडकी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शांतीनगर येथील नदीपुलाच्या डाव्या साईड कडील मुख्य नदी प्रवाहात काही समाजकंटकांनी गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास ५०० मीटर चे मुख्य नदी पात्र बुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. राजरोस पणे दिवसरात्र अवैध वाहतूक करुन राडारोडा टाकण्याचा निंदनीय प्रकार काही लोकांकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थानिक रहिवाशांना घेत थेट नदीपात्रात उतरून दोन दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते , नदीचा प्रवाह बाधित होऊन नदीकडील भागात पावसाचे पाणी घुसून भविष्यात पुर स्थिती निर्माण होणार आहे. नदीपात्रात मुख्य नदी प्रवाह बाधित करणार्यांना कडक शासन होऊन संबंधित समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुणे मनपा आयुक्त , पुणे जिल्हाधिकारी कार्यालय , पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन करण्यात आलेली होती , तरीही हे बेकायदेशीर कृत्य थांबले नसल्याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतूत्वाखालील शिष्टमंडळाने सरचिटणीस विनोद पवार, किरण अडागळे यांच्या समावेत पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक यंना निवेदन दिले व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे हादरले:MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीवर भर दिवसा रस्त्यावर कोयत्याने हल्ला,एका तरुणाच्या सतर्कतेने टळली मोठी घटना

यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल याच्या धाडसाचे कौतुक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

पुणे-MPSC टॉपर दर्शना पवारच्या हत्येमुळे अवघ्या महाष्ट्रात खळबळ माजली असताना पुण्यातच MPSC ची तयारी करणाऱ्या आणखी एका मुलीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने पीडित तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला केला. पण 2 विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे या तरुणीचे प्राण वाचले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

पुण्यातील टिळक रोड वरून भरत नाट्य मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याच्या भागात मंगळवारी सकाळी तरुण व तरुणी स्कुटीवरून जात होते. एमपीएसीची तयारी करत असल्याने दोघेही अभ्यासिकच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी शंतनू जाधव नामक आरोपी तरुणाने त्यांना रोखले. हे पाहून तरुणीच्या मित्राने त्याला थांबवण्याचे कारण विचारले. त्यावर शंतनूने आपल्या बॅगमधून कोयता काढून तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तरुणीने धावत जात स्वतःचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. तर तिच्या मित्राने शंतनूला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो ही जखमी झाला आहे.

पीडित तरुणी जखमी अवस्थेत धावत होती. पण कुणीही तिच्या मदतीला पुढे आले नाही. अखेर लेशपाल जवळगे नामक तरुणाने पुढे येत तिला मदत केली. आरोपी शंतनू पीडित तरुणीच्या डोक्यात वार करण्याच्या प्रयत्नांत असताना लेशपालने त्याला रोखले. त्याचा कोयता हातात पकडला. त्यानंतर घटनास्थळावरील इतर नागरिकांनीही धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. पीडित तरुणीवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, आज 10 च्या सुमारास, एसपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी शंतनू व पीडित तरुणीची भेट झाली. या दोघांची पूर्वीपासूनच ओळख होती. दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखत होते. पण काही कारणाने दोघांचे बोलणे बंद झाले होते. पण त्यानंतरही शंतनू तिच्यावर बोलण्यासाठी दबाव टाकत होता. तो तिला वारंवार फोन करत होता. त्याने आजही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अचानक त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात पीडित तरुणीच्या हातावर व डोक्यावर जखम झाली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन माजी खासदार काकडे यांची’मोदी@9′ जनसंपर्क मोहीमेला सुरुवात

पुणे-कसबा आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन माजी खासदार काकडे यांची’मोदी@9′ जनसंपर्क मोहीमेला आज तिसऱ्या दिवशी सुरुवात करण्यात आली. सुहास कुलकर्णी ,शंकर पवार, धीरज घाटे, हेमंत रासने राहुल आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी त्यांच्या समवेत होते .शिवाजी रोड ,महात्मा फुले मंडइ , भांडे आळी,सुभांशा दर्गा नेहरू चौक येथे त्यांनी मंदिरात आलेले भाविक तसेच ग्राहक , व्यापारी ,दुकानदार , वाहनचालक , रिक्षाचालक आदींशी संपर्क साधला आणि पंतप्रधान पदावर ९ वर्षे मोदिनी केलेल्या कामाची माहिती देणारी पुस्तिका दिली, कुठे चर्चा केली तर कुठे गप्पा मारत हि जनसंपर्क मोहीम पुढे पुढे चालतच राहिली.

होंडा इंडियातर्फे ३ कोटी अ‍ॅक्टिव्हा विक्रीचा लक्षणीय टप्पा पार

नवी दिल्ली, 27 जून 2023 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री करणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा या स्कूटर ब्रँडने ३ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करत भारतीय दुचाकी उद्योगात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या लक्षणीय कामगिरीवरून एचएमएसआयचे भारतीय दुचाकी क्षेत्रातील बळकट स्थान तसेच देशात अत्याधुनिक, विश्वासार्ह, दर्जेदारी दुचाकी वाहने पुरवण्याची बांधिलकी दिसून येते.

२००१ मध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा सादर करत कंपनीने भारतीय दुचाकी बाजारपेठेची सगळी समीकरणे बदलली. दैनंदिन प्रवास सोपा करत कंपनीने लाखो ग्राहकांचे आयुष्य उंचावले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार कामगिरी आणि विश्वासार्हता यांमुळे अ‍ॅक्टिव्हाला कायमच भारतीय ग्राहकांची पहिली पसंती मिळाली. आपल्या २२ वर्षांच्या प्रवासात अ‍ॅक्टिव्हाने विविध टप्पे पार करत दैदिप्यमान यश मिळवले. 

३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वप्नांना पंख देण्याचा अ‍ॅक्टिव्हाचा प्रवास

प्रत्येक वर्षागणिक भारताचे अ‍ॅक्टिव्हावर असलेले प्रेम वाढतच गेले. २००१ मधे पर्दापण केल्यापासून केवळ तीन वर्षांत (२००३-२००४) अ‍ॅक्टिव्हाने स्कूटर क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले. त्यानंतरच्या केवळ दोनच वर्षांत या ब्रँडने १० लाख ग्राहकांचा टप्पाही पार केला.

उच्च तंत्रज्ञान आणि भविष्यवेधी विचारसरणीच्या मदतीने अ‍ॅक्टिव्हाने केवळ १५ वर्षांत (२०१५) 1 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला. मागणी वाढली तशी भारतातील स्कूटर बाजारपेठेला आणखी चालना मिळाली व हा ब्रँड भारतीय कुटुंबांच्या सर्वाधिक पसंतीचा ब्रँड ठरला. या ब्रँडची लोकप्रियता इतकी आहे, की  कोटी ग्राहक दुप्पट वेगाने म्हणजेच केवळ सात वर्षांत (२०२३) जोडले गेले.

या ऐतिहासिक कामगिरीविषयी कृतज्ञता व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘आम्हाला होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या या लक्षणीय प्रवासाचा अभिमान वाटतो. केवळ २२ वर्षांत ३ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठणं हे ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवणारं आहे. ग्राहकांना अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘हा विक्रमी टप्पा स्कूटर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे प्रतीक आहे. ब्रँड अ‍ॅक्टिव्हा आणि एचएमएसआयवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही ३ कोटी भारतीय कुटुंबांचे आभारी आहोत. स्थापनेपासून आतापर्यंत ग्राहकांच्या गरजेनुसार अ‍ॅक्टिव्हामध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. ग्राहकांना क्रांतीकारी तंत्रज्ञान व असामान्य अनुभव देण्यावर यापुढेही आमचा भर असेल.’ 

होंडा अक्टिव्हाचा २२ वर्षांचा थरारक प्रवास

वर्षविक्रमी टप्पामहत्त्वाचा टप्पा
२००१-०२ १५ वर्षांत१ एक कोटी ग्राहकांचा टप्पाहोंडातर्फे पहिली दुचाकी –  १०० सीसी अक्टिव्हा, भारतात लाँचया क्षेत्रात पहिल्यांदाच टफ- अप ट्यूब लाँच (होंडाचे पेटंटेड पंक्चर प्रतीरोधक तंत्रज्ञान, ज्यामुळे अचानक पंक्चर होण्याचे प्रमाण ७० टक्क्यापर्यंत कमी होते) या क्षेत्रात पहिल्यांदाचसोप्या देखभालीसाठी क्लिक (कन्व्हिनियंट इंडिपेंडंट लिफ्ट- अप कव्हर) यंत्रणायुनिसेक्स डिझाइन, रिफाइन्ड होंडा व्ही- मॅटिक ट्रान्समिशन, जबरदस्त मायलेज, जास्त सोयीस्करपणा आणि टिकाऊपणामुळे २००१-०२ मधे अक्टिव्हाची विक्री ५५,००० पर्यंत
२००४-०५अ‍ॅक्टिव्हा बनली भारतीय स्कूटर क्षेत्रातील नवी लीडर 
२००५-०६महत्त्वाचा टप्पा – केवळ ५५ महिन्यांत अक्टिव्हाची विक्री १ दशलक्षपर्यंत
२००८-०९अत्याधुनिक अ‍ॅक्टिव्हा सर्वांसाठीच आनंददायीनवे मोठे ११० सीसी इंजिन, ५ टक्के अतिरिक्त मायलेजसहभारतात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान होंडातर्फे कॉम्बी ब्रेक सिस्टीम- इक्विलायझर यंत्रणेसह – भारतात ही यंत्रणा प्रचलित होण्यापूर्वी दशकभर आधी!महत्त्वाचा टप्पा – २००१ मधे ५५,००० वर असलेली वार्षिक विक्री आता प्रती महिना ५०,००० युनिट्सवर
२०१२-१३महत्त्वाचा टप्पा –  अक्टिव्हाची एकत्रित विक्री ५ दशलक्षांच्या टप्प्यावर, मासिक विक्री २०१२-१३ मधे एक लाख युनिट्सपुढे
२०१३-१४तंत्रज्ञानात क्रांती:  होंडा इको टेक्नॉलॉजीचा (एचईटी) भारतात प्रवेशकमी घर्षण, सुधारित कंबशन आणि ट्रान्समिशनसह एचईटीद्वारे तब्बल ६० केएमपीएलचे (होंडा मोडमधे) मायलेजहोंडातर्फे अक्टिव्हा आय लाँच – रोजच्या प्रवासासाठी आटोपशीर स्कूटर
२०१४-१५होंडातर्फे भारतात पहिली १२५ सीसी स्कूटर – अ‍ॅक्टिव्हा 125डिझाइनमधल्या ठळक बदलांसह अक्टिव्हा थ्रीजीचे पर्दापणमहत्त्वाचा टप्पा – बाकीच्या मोटरसायकल्सना मागे टाकत अक्टिव्हा बनली भारतातली पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी!
२०१५-१६ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अ‍ॅक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त  अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती  अ‍ॅक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:   अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अ‍ॅक्टिव्हा  १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०१६-१७पुढील ७ वर्षांत २ कोटी ग्राहक   ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अ‍ॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:  अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३  अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०१७-१८ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त  अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:  अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे  अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३  अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३  अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०१८-१९ब्रँड अक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अक्वटिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:  अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०१९-२०ब्रँड अक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अक्वटिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:  अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०२०-२१ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त  अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:  अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३  अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०२१-२२ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अ‍ॅक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अ‍ॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त  अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:   अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०२२-२३ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अ‍ॅक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर अ‍ॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:   अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 
२०२३-२४ब्रँड  अ‍ॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली  अ‍ॅक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी  महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अ‍ॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवातत्यानंतर  अ‍ॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त  अ‍ॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा:   अ‍ॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अ‍ॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अ‍ॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३  अ‍ॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत 

प्रतिष्ठेच्या राजर्षी शाहू पुरस्काराने ग्रामीण भारतातील आरोग्यसेवेचे प्रणेते पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचा सन्मान

चंद्रकांत पाटलांनी केले बंग दाम्पत्याचे अभिनंदन

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून राजर्षी शाहू जयंतीदिनी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ग्रामीण भारतातील आरोग्यसेवेचे प्रणेते पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला होता. काल कोल्हापूर येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग या दाम्पत्याने केलेले सामाजिक कार्य, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपध्दती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव असे विविध पैलू विचारात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून बंग दाम्पत्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू प्रेमी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती‌ निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली.

यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. तब्बल ९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नुतनीकरण, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील कलादालन, परिसरातील लॅंडस्केपिंग, संरक्षक भिंत, पादचारी मार्ग, वाहनतळ, समाधीवास्तूंची दुरूस्ती, विद्युतीकरण आदी कामे केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आम. जयंत आसगावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, वीरेंद्र मंडलिक, विविध शासकीय पदाधिकारी, वेगवेगळ्या शाळांमधून आलेले विद्यार्थी, शिक्षक व तमाम शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होती.

राष्ट्रवादीची 15 वर्षांची सत्ता मोडीत,पवार समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंकडून पराभव

मुंबई-महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून एकतर्फी बाजी मारली. शरद पवार पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप शिंदे यांच्या कर्मचारी संघटनेच्या पॅनलचा धुव्वा उडाला.

एकतर्फी विजयानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसेचे बॅनर्स झळकावण्यात आले. मुंबईतील कॉटन एक्स्चेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणी पार पडली.

विविध पक्षांच्या प्रस्थापित कामगार संघटनांना दूर करत सदावर्ते यांच्या संघटनेने मुसंडी मारली आहे. सदावर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जादा मतदान घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांचे राष्ट्रीय कामगार सेनेचे पॅनल ७ व्या क्रमांकावर गेल्याचे दिसून आले आहे.

एकूण पदे आणि मतदान
19 संचालक पदे
07 पॅनल, 150+ उमेदवार
65 हजार मतदार
58 हजार जणांनी केले मतदान

सिंघम स्टाईलने महाराष्ट्रात आलेल्या KCR ला तेलंगणात दिला जोरदार धक्का,१२ आमदार कॉंग्रेसमध्ये दाखल .

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले

हैदराबाद-आषाढीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने अख्ख्या मंत्रिमंडळासह आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी सोमवारी सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे ६०० हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांनी रोड शो केला. राव इकडे शक्तिप्रदर्शन करत असताना भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे तेलंगणातील १२ माजी आमदार व मंत्र्यांनी त्यांना धक्का देत दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले. तेलंगणात विधानसभा निवडणूक ६ महिन्यांनी आहे. या पार्श्वभूमीवर राव यांना हा मोठा झटका आहे.पक्षफुटीमुळे केसीआर दिवसभर अस्वस्थ होते. मीडियाशीही फार बोलले नाहीत. त्यांचे चिरंजीव केटीआर एेनवेळी महाराष्ट्राचा दौरा रद्द करून तेलंगणात तळ ठोकून बसले होते.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते केसीआरचे सर्वेसर्वा, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गळाला लागले. त्यामुळे बीआरएस म्हणजे भाजपची बी टीम आहे, अशी संभावना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू झाली. त्यामुळे अजिबात न डगमगता केसीआर यांनी महाराष्ट्रात शिरकावाचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते सोमवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले.

सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार:मॅनहोलमध्ये उतरून सफाई करत होता कामगार,उपचारादरम्यान झाला मृत्यू

यूपीमध्ये 47 तर दिल्लीत 42 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जीव गमावला

मुंबई- एका व्यक्तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेज लाईन साफ ​​करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकर वाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी काल याबाबत माहिती दिली.37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर कार चालवणाऱ्या चालकाचे नाव विनोद उधवानी असे आहे. अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अपघातानंतर कांदिवली पोलिसांनी कार चालक आणि सफाई कंत्राटदाराला अटक केली. आरोपी चालकाविरुद्ध कलम 279, 196, 336 आणि 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे ड्रेनेज साफसफाई करताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याने ठेकेदार अजय शुक्ला याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी गेल्या वर्षी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये 92, 2018 मध्ये 67, 2019 मध्ये 116, 2020 मध्ये 19, 2021 मध्ये 36 आणि 2022 मध्ये 17 सफाई कामगारांचा मृत्यू झाला.केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यूपी, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये 40% स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यूपीमध्ये सर्वाधिक 47, दिल्लीत 42 आणि तामिळनाडूमध्ये 43 जणांचा मृत्यू झाला.याशिवाय हरियाणामध्ये 36, महाराष्ट्रात 30, गुजरातमध्ये 28, कर्नाटकात 26, पश्चिम बंगालमध्ये 19, पंजाबमध्ये 14 आणि राजस्थानमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई मनपा अधिकाऱ्याला मारहाण: 4 शिवसैनिकांना रात्री उशीरा पोलिसांकडून अटक

बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्यावर शिवसैनिक आक्रमक होतीलचआदित्य ठाकरे 

मुंबई-उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या भाषणानंतर सोमवारी शिवसैनिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंताला मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी चार शिवसैनिकांना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती. या प्रकरणी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मनपावर मोर्चा काढत जाब विचारला होता. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये मुंबईतील माजी नगरसेवक सदा परब, हाजी अलीम शेख, उदय दळवी, संतोष कदम या चौघांचा समावेश आहे. त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर सोमवारी एच-पूर्व महापालिका वॉर्ड कार्यालयामध्येच शिवसेना शाखा तोडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेवेळी शिवसेना नेते परब हे मनपा वॉर्ड कार्यालयात उपस्थित होते. २२ जून रोजी वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती.याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा असताना शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर शिवसैनिक आक्रमक होतीलच.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला होता. मनपा अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार रात्री उशिरा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.