Home Blog Page 1340

आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त पुण्यात पालखी सोहळा रविवारी 

पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ.पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा, किल्ले राजगड’ गेली ४२ वर्षे साजरा करण्यात येत आहे. यंदाचे सोहळ्याचे हे ४३ वे वर्ष आहे. यावर्षी पुण्यामध्ये लालमहाल येथे रविवार, दि.१० डिसेंबर २०२३ सकाळी ११  वाजता लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा होईल.
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांचे विद्यार्थी करतील. एच.व्ही.देसाई महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख गणेश राऊत यांचे शिवचरित्रावर व्याख्यान देखील होणार आहे. 
तसेच सालाबादप्रमाणे यावर्षी दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,वक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अ‍ॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आग्र्याहून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.
रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी : ६.०० वा. किल्ले राजगड येथे  सूर्योदयाला ध्वजारोहण  होईल. किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा होणार आहे. तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

अखेर कॅन्सरशी झुंज अयशस्वी, ज्युनिअर महमूद यांचं निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई : मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली. ज्युनिअर महमूद यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी झुंजत होते. जुहू येथील कब्रस्तानात ज्युनिअर मेहमुद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव त्यांना मेहमुद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केलं असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. नैनिहाल हा त्यांचा पहिला सिनेमा होता. परिवार, ब्रह्मचारी, फरिश्ता, प्यार ही प्यार, कटी पतंग, आन मिलो सजना, कर्ज चुकाना है.. या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

ज्युनिअर महमूद यांना फुफ्फुसं आणि लीव्हरमध्ये कॅन्सर होता. त्याशिवाय त्यांच्या आतड्यांमध्येही ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला होता. त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. ते मागील काही दिवस व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी १ वाजता ज्युनिअर महमूद यांच्यावर सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ज्युनिअर महमूद अर्थात नईम सैय्यद यांचा १५ नोव्हेंबर १९५६ रोजी जन्म झाला . ते नऊ वर्षांचे असताना त्यांचा मोठा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत स्टील फोटोग्राफी करीत होता. ते शुटींग करुन आल्यावर त्यांच्याकडून रसभरीत, फिल्मी किस्से ऐकून नईम यांना चित्रपटाविषयी आकर्षण वाटू लागले. नईमच्या हट्टाखातर, मोठा भाऊ त्याला शुटींगच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याला शांतपणे बसायला सांगून तो आपल्या कामात मग्न झाला. शुटींग पहात असताना नईमला असे दिसले की, त्याच्याच वयाचा एक मुलगा, टेकच्या वेळी सारखे संवाद विसरत होता. तो सहज बोलून गेला, ‘एवढे साधे संवाद बोलू शकत नाही?’ हे पाठमोऱ्या दिग्दर्शकाने ऐकले व नईमला विचारले, ‘तू बोलू शकशील का?’ नईमने फक्त होकार दिला नाही तर प्रत्यक्षात, एकही रिटेक न घेता ते काम करुन दाखवले. त्या कामाचे त्याला, रोख पाच रुपये मिळाले.. ही भविष्यातील यशस्वी कारकीर्दीची, त्याची पहिली पायरी होती!
१९६६ चा ‘मोहब्बत जिंदगी है’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ६७ साली ‘नौनीहाल’ मध्ये तो आला. १९६८ पासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही.. त्याचे सलग सहा चित्रपट तुफान गाजले. ‘वासना’, ‘संघर्ष’, ‘सुहागरात’, ‘परिवार’, ‘फरिश्ता’ व ‘ब्रम्हचारी’.
‘ब्रम्हचारी’ चित्रपटात त्याच्यासोबत ११ बाल कलाकार होते, त्यातूनही त्याने केलेली भूमिका अविस्मरणीय ठरली. या चित्रपटातील त्याचे काम पाहूनच मेहमूद यांनी त्याला आपला पट्टशिष्य मानून, ज्युनियर मेहमूद हे नाव दिले…
१९६९ सालामध्ये त्याचे तब्बल नऊ चित्रपट पडद्यावर झळकले. ‘विश्वास’, ‘सिमला रोड’, ‘राजा साब’, ‘प्यार ही प्यार’, ‘नतीजा’, ‘चंदा और बिजली’, ‘बालक’, ‘अंजाना’, ‘दो रास्ते’. यातील ‘दो रास्ते’ चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला.
१९७० साली ज्युनियर मेहमूदने पाच चित्रपट केले. ‘यादगार’, ‘कटी पतंग’, ‘घर घर की कहानी ‘, ‘बचपन’, ‘आन मिलो सजना’. यातील सुपरस्टार राजेश खन्ना सोबतचे ‘कटी पतंग’ व ‘आन मिलो सजना’ यांनी विक्रमी यश संपादन केले. दोन्ही चित्रपटातील नायिका, आशा पारेखच होती. ‘आन मिलो सजना’ मधील ‘पलट मेरी जान…’ या गाण्याला, ज्युनियर मेहमूदने आपल्या मिष्कील अदाकारीने चार चाॅंद लावलेले आहेत..
१९७१ साली ज्युनियर मेहमूदचं वय पंधरा वर्षांचं झालं होतं. आता तो बाल कलाकार राहिलेला नव्हता, तरीदेखील त्याच्या बारीक अंगकाठीमुळे तो दहाबारा वर्षांचाच दिसत होता.. ‘उस्ताद पेट्रो’, ‘रामू उस्ताद’, ‘लडकी पसंद है’, ‘जोहर मेहमूद इन हाॅंगकाॅंग’, ‘कारवाॅं’, ‘हाथी मेरे साथी’, ‘छोटी बहू’, ‘चिंगारी’, ‘हंगामा’, ‘खोज’ व देव आनंदच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटांतून तो दिसला.
१९७२ साली त्याने ‘बाॅम्बे टू गोवा’ या चित्रपटात, सिनियर मेहमूद बरोबर काम केले. या सहा वर्षांत त्याने आपले बालपण विसरुन एखाद्या मोठ्या कलाकारा प्रमाणे रात्रंदिवस काम केले. त्याचे वडील, रेल्वेत नोकरीला होते. त्यांना महिना ३२० रुपये एवढाच पगार होता.. त्याच वेळी ज्युनियर मेहमूदचं मानधन ‘पर डे ३००० रुपये’ होतं! त्या काळी मुंबईत ‘एम्पाला’ या परदेशी कार फक्त बारा होत्या. त्यातील एक ज्युनियर मेहमूदची होती. तो या कारने शुटींगसाठी जात असे. त्याने राज कपूर सोडून देव आनंद, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोजकुमार, इत्यादी सर्व यशस्वी हिरोंसोबत काम केल़ेले आहे. साठ व सत्तरच्या दशकातील कौटुंबिक चित्रपटात आवर्जून लहान मुलांच्या भूमिका असायच्या. त्यांच्या तोंडी गाणं, पॅरोडी असायचीच.
१९७५ पासून ज्युनियर मेहमूदचे आलेले चित्रपट फारसे कुणाच्या लक्षात नसतीलही.. ‘रोमिओ इन सिक्कीम’, ‘आपबिती’, ‘फर्ज और प्यार’, ‘लव्हर्स’, ‘फुलवारी’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘सदा सुहागन’ या चित्रपटांतून, सचिन सोबतचे ‘गीत गाता चल’ व ‘अखियों के झरोखोंसे’ हे चित्रपट मात्र कायमस्वरूपी लक्षात राहिले!
ज्युनियर मेहमूदने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २६५ चित्रपट केले आहेत. १९८५ नंतरचे चित्रपट स्वीकारताना त्याने ‘बी ग्रेड’चे चित्रपट नाकारायला हवे होते. तो ‘शिक्का’ एकदा पडला की, तुम्ही कमावलेले नाव खराब होते. अनेक नामवंत कलाकारांनी, आपल्या कारकीर्दीत अशा चुका केलेल्या आहेत.
ज्युनियर मेहमूदने सहा चित्रपटांची निर्मिती व त्यांतील काहींचे दिग्दर्शनही केले आहे. त्यातील दोन पंजाबी, एक आसामी व तीन मराठी आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ ही कौटुंबिक व मुलांसाठीची ‘तेनालीराम’ या टीव्ही वरील मालिकेत त्याने मुल्ला नसीरुद्दीनची भूमिका साकारलेली आहे. गेल्या चार वर्षांपर्यंत त्याने काम करणे चालू ठेवले होते. नंतर मात्र विश्रांती घेतली होती. अलीकडे वजन झपाट्याने कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासण्या केल्या असता डाॅक्टरांनी हा आजार बळावल्याचे सांगितले..
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना या आजाराने ग्रासलेले आहे. त्यातील काहींनी वेळीच उपचार करुन त्यावर मातही केलेली आहे. याला कारणीभूत ठरते, या सिने कलाकारांची जीवनशैली! अतिश्रम, रात्रंदिवस काम करणे, अवेळी जेवण, व्यसनं, मानसिक ताणतणाव यामुळे उतारवयात त्यांना शरीर साथ देत नाही…
ज्युनियर मेहमूद यांना मी प्रत्यक्ष पाहिलं ते १९९० साली, मुंबईतील कमलीस्तान स्टुडिओमध्ये. त्यावेळी मी ‘सूडचक्र’ चित्रपटासाठी स्टील फोटोग्राफी करीत होतो. लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांच्यावर एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचे नांव होते, ‘मस्करी’! त्याना घेऊन पुण्यातील मोहनकुमार भंडारी यांनी ‘ज्युनियर मेहमूद म्युझिकल नाईट’चे अनेक कार्यक्रम केले होते.

पुणे आयकर अन्वेषण विभागाच्या छाप्यात 1300 कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड, 6 काेटींची राेकड, 4 काेटींचे हिरे जप्त

पुणे-छत्रपती संभाजीनगर येथील अाठ ते दहा बड्या व्यावसायिकांवर सलग पाच दिवस छापे टाकत पुणे आयकर अन्वेषण विभागाने त्यांचे सुमारे १३०० काेटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस अाणले आहेत. सहा काेटींची राेकड व चार काेटींचे दागिने, माैल्यवान हिरे या चीजवस्तू जप्त करण्यात आल्या. अायकर चुकविण्यासाठी माेठ्या प्रमाणात राेखीने व्यवहार करत इतर छाेटे व्यावसायिक व ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या संशयावरून ३० नाेव्हेंबरपासून ते ४ डिसेंबरपर्यंत हे छापे टाकण्यात आले.

गेल्या आठवड्यात गुरुवारी (३० नोव्हेंबर) सकाळी सहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील आठ ते दहा बडे व्यावसायिक झाेपेत असतानाच त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकण्यात अाले. पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील आयकर अन्वेषण विभागाच्या ३०० ते ३५० अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. बहुतांशी अधिकाऱ्यांनी खासगी वाहनांमध्ये येऊन विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांची झडती घेतली होती.

एसीमध्ये पेनड्राइव्ह; कचरा डब्यात दस्तऐवजएका व्यावसायिकाच्या कार्यालयातील दाेन महिला दुपारी अचानक घरी निघून गेल्या. पथकाला संशय आल्याने त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. रात्री या महिलांच्या कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने त्यांच्या घरी जाऊन काही कागदपत्रे असलेली पिशवी व इतर साहित्य दिले. मात्र, पथकाने लगेच त्यांच्या घराची तपासणी केली नाही. तिसऱ्या दिवशी रात्री अचानक पथक या महिलांच्या घरी पाेहाेचले. सर्व घराची कसून तपासणी केली. हाती काही लागत नव्हते. अखेर घरातील फ्रीजखालून व बाहेर जिन्यातील कचऱ्याचा डबा व कागदी खाेके बाजूला केले असता त्याखालून कागदपत्रांनी भरलेली एक माेठी कापडी पिशवी मिळाली. त्यातूनच जवळपास १०० काेटींचे व्यवहार समाेर अाले. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घराचीही कसून तपासणी केली. पथकही चांगलेच कसलेले होते. त्यांना एसीचा एक फ्लॅप उघडा दिसला. तो खोलताच तिथूनही हार्डडिस्क व पेनड्राइव्ह जप्त करण्यात आले.

कर चुकविण्यासाठी राेखीनेच व्यवहार :

उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक, कापड व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. प्रत्येकाकडून दहा-दहा कापडी पिशव्या भरुन २० किलाे वजनाइतकी कागदपत्रे जप्त करण्यात अाली. कर चुकवण्यासाठी सर्व रोखीनेच व्यवहार करत होते. या व्यवहारांच्या पावत्या, बिले, ग्राहक कंपन्या, पुरवठादारांची नावे, रक्कम लिहिलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली.

एका कापड व्यावसायिकाच्या कार्यालयात दिवसभर तळ ठाेकूनही पथकाला माहिती मिळत नव्हती. एक कर्मचारीच व्यवहाराची माहिती देत हाेता. पण, राेखीचे व्यवहारच नसल्याचे सांगून कागदपत्रे दाखवताना माेजक्याच फाइल अाणून दाखवत हाेता. पथकाची त्याच्यावरच नजर होती. रात्री उशिरा त्याने अधिकाऱ्यांची नजर चुकवून एक बॅग एका अालिशान कारच्या डिकीत ठेवली. मालकाला घरी साेडण्याचे कारण देत ताे निघाला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. त्याने क्रांती चाैकातून वेगवेगळ्या मार्गांनी गाडी चालवत मालकाला घरी साेडले. पथक मागे असल्याचे लक्षात अाल्याने तिथून ताे पुन्हा पुढच्या रस्त्याने निघाला. पथकाची दिशाभूल करण्यासाठी गल्लीबाेळातून जात घराजवळ गाडी लावून तो पायी निघाला. पथकाला संशय आला व ते थेट त्या मालकाच्या घरी पोहोचले. तेव्हा कर्मचाऱ्याचे सोंग घेणारा तो त्या व्यावसायिकाचा बंधूच निघाला.

इझी-पे प्रा.लि. कंपनीची 3.50 कोटींची फसवणूक,एजंटचे बिहारी साथीदार पकडले

पुणे-येरवडा येथील इझी पे प्रा.लि. ही कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा नागरिकांना पुरविण्याचे काम करते. सदर कामाकरिता संबंधित कंपनीने देशभरात नाेंदणीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे. व त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. सदर कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणुक करणाऱ्या नोंदणीकृत एजंटचे दाेन साथीदारांना परराज्यातून अटक करण्यात अाल्याची माहिती अार्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली अाहे.

उबेद ऊर्फ अब्देदुल्ला अन्सारी (वय-३६,रा.गया, बिहार) व अायुब बाशीर अालम (रा.बिहार) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११/८/२०२२ पासून सदर कंपनीतील नाेंदणीकृत असलेल्या एजंटपैकी ६५ एजंट यांनी संगनमत करुन कंपनीच्या वेबपाेर्टल अॅप द्वारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या माेबाईल व्यतिरिक्त दाेन ते चार व त्यापेक्षा जास्त वेगवेगळया माेबाईल संचाचा वापर करुन अनाधिकृतपणे सदर माेबाईल द्वारे लाॅग ईन अायडीने लाॅग इन करुन कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला.

कंपनीचे व्हीपीए खात्यातून अन्य ४४ बॅंक खात्यावर एजंटचे कमिशन व्यतिरिक्त तीन कोटी 52 लाख 70 हजार रुपयांची कंपनीची फसवणुक केली. याबाबत सायबर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हयातील अाराेपी अंकित कुमार अशाेक पांडे (रा.दुर्गापूर, पश्चिम बंगाल) व छाेटू ऊर्फ एजाज अालम त्याचे वडील जिअाऊल अन्सारी (रा.बिहार) यांना अटक करण्यात अाली. सदर अाराेपी विराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र देखील सादर करण्यात अाले. सदर अाराेपींच्या तपासात पाहिजे अाराेपी बाबत माहिती घेऊन पाेलीसांनी तपासातील प्राप्त इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील पाहिजे अाराेपी अबेद अन्सारी व अायुब अालम यांचा शाेध घेण्यासाठी सायबर पाेलीस स्टेशनचे वपाेनि मीनल सुपे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक तुषार भाेसे, पाेलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे असे पथक दिल्लीस रवाना झाले.

सदर आरोपी हे त्यांचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत हाेते. त्यानुसार गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी दिल्ली येथून बिहार व तेथून पश्चिब बंगाल येथे गेल्याचे समजल्याने पोलिसांनी सापळा रचून उबेद अन्सारी व अायुब अालम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तपासात गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना काेलकता मधील न्यायालयात हजर करुन पाच दिवसांचा ट्रान्झीट रिमांड घेऊन पुण्यात अाणण्यात अाले. त्यानंतर अाराेपींना पुणे न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांचा पाेलीस काेठडी सुनाविण्यात अाली. सदर अाराेपींकडून चार माेबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात अाले अाहे.

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री घरफोड्या करायचा:सुमारे 250 सीसीटिव्ही चित्रीकरणची पाहणी करून चोरट्याला ठोकल्या बेड्या

पुणे-दिवसा रिक्षा भाडे घेण्याच्या बहाण्याने बंद घरांची पाहणी करून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलीसांनी अटक केली. अनिकेत भाऊराव गायकवाड (वय.२१, रा.नवी सांगवी) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी अब्दुल सय्यद (रा.खराडी) यांनी फिर्याद दिली आहे .याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलिसांनी परिसरातील सुमारे २५० सीसीटिव्ही चित्रीकरणची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनें आरोपी रिक्षा चालकाला अटक केली. त्याच्याकडून रिक्षा जप्त केली आहे.अनिकेत गायकवाड हा मागील काही वर्षांपासून रिक्षा चालवितो. साथीदाराला प्रवाशी म्हणून बसवून गायकवाड शहरात ठिकठिकाणी भाडे घेऊन गस्त घालत होते. भाड्याच्या निमित्ताने दिवसा पाहणी करून रात्री बंद घरे फोडत होते. खराडी परिसरात राहणारे फिर्यादी १४ नोव्हेंबर रोजी घर बंद करून मदुराईला गेले होते. यादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांचे घर फोडून लॅपटॉप, परदेशी चलन आणि नोटा असा एकूण सव्वा दोन लाखांची घरफोडी केली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीषा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, प्रमोद हंबीर, पोलीस अंमलदार, दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम यांच्या पथकाने केली.

महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत -हर्षदा फरांदे

पुणे ७ : दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यास पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आज पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे फरांदे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणी वर कोयत्याने हल्ला केला गेला ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडला ह्या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आल.
महिला मोर्चाच्या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह आरती कोंढरे, भावना शेळके, श्यामा जाधव , वैशाली नाईक , अश्विनी पवार , रुपाली कदम, थोरविना येनपुरे, रागिणी खडके, कोमल कुटे, उज्वला गौड, सरस्वती अडगळे आणि प्रेरणा तुळजापूरकर यांचा समावेश होता

डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांचे नृत्य हा हृदयंगम संवाद: डॉ. लीला पूनावाला

नृत्य हे भावयुक्त त्रिपेडी वेणी : डॉ सुचेता भिडे -चापेकर

पुणे:

ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे – चापेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या शिष्यवर्गाकडून पुण्यात हृद्य सत्काराद्वारे अभिष्टचिंतन करण्यात आले.हा सत्कार सोहळा दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, कोथरुड येथे पद्मश्री डॉ.लीला पूनावाला यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमात डॉ.सुचेता भिडे- चापेकर यांच्या शिष्यानी विविध विलोभनीय नृत्यप्रकार सादर केले.डॉ.चैतन्य कुंटे यांनी डॉ .सुचेता भिडे -चापेकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

डॉ.सतिश आळेकर, पं.सुरेश तळवलकर,शमा भाटे, मनीषा साठे, डॉ. गो. बं. देगलूरकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, मनीषा साबडे, शारंगधर साठे, शुभांगी बहुलिकर, प्रमोद मराठे, रामदास पळसुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.गौरी स्वकुळ यांनी सूत्र संचालन केले.कार्यक्रमाच्या संयोजक अरुंधती पटवर्धन, स्मिता महाजन यांनी स्वागत केले.

‘सुचेताताई शतायू व्हाव्यात, आणि त्यांचे नृत्य पाहण्याची संधी आपल्याला मिळावी’, अशा सदिच्छा डॉ.लीला पूनावाला यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,’आताच्या जगात आस्वादक रसिकांची भूमिका महत्वाची आहे. सर्व भावना नृत्यातून व्यक्त करणे अवघड काम असून सुचेताताईंनी ते लीलया केले आहे. त्यांच्या शिष्य वर्गाने ही परंपरा पुढे नेली आहे. हृदयातील भावना नृत्यातून पोचवणे हे मोठी परंपरा असून ती वर्धिष्णू व्हावी. ‘

कलाकार, गुरु ही वाटचाल होताना त्यांची शिक्षणाची पद्धत, नृत्य प्रशिक्षणाची काळानुरूप बदलत गेलेली व्यवस्था,जीवन प्रवास असे अनेक प्रश्न चैतन्य कुंटे यांनी विचारून डॉ सुचेता भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यातून डॉ. सुचेता भिडे चापेकर यांच्या व्यक्तिमत्वाचे,नृत्य प्रवासाचे अनेक पैलू समोर आले.

डॉ.सुचेता भिडे- चापेकर म्हणाल्या,’पूर्वी नृत्यात तंत्रावर भर असायचा आणि अभिनयावर भर कमी असायचा. मी नृत्य प्रशिक्षणात नृत्याबरोबर अभिनयावर भर दिला. त्यासाठी ग्रंथांबरोबर भोवतालचा अभ्यास केला.शिष्यांमध्ये कलेबद्दल प्रेम निर्माण करणे हे गुरूचे पहिले काम असते. ते केल्याने नृत्याची गोडी वाढली आणि प्रेक्षक वर्ग देखील वाढला. चित्र, साहित्य अशा सर्व कलांचे नृत्याशी नाते आहे.ते मला गवसले, हे भाग्यच म्हणावे लागेल. नृत्य ही त्रिपेडी वेणी आहे.संगीत, तंत्र ,नृत्य जुळून आले पाहिजे.नृत्य हे एक वेळ अभिनय हीन असू शकते, पण भाव हीन असू नये, असेच वाटायचे . भाषेचे संस्कार, संगीताचे ज्ञान देखील नृत्य साधनेत उपयोगी पडते .

‘ नृत्य प्रवासात साथ , उर्जा देणाऱ्या कुटुंबीयांचे,सर्वांचे मी ऋण व्यक्त करु इच्छिते.नृत्य संस्कार करणारे सर्व गुरु विशेषत पार्वतीकुमार, श्री.किटप्पा यांची मुर्ती ह्रुदयात असते. राजे शहाजी यांच्या रचना करतांना अनेकांनी मला मदत केली’, असेही डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी सांगितले.

धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर; नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

0

नागपूर, दि. 7 : नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात भात, कापूस आणि तूर या पिकांचे जवळपास 5 हजार 480 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत आज केली.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारी 3 च्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांच्या शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 335 गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. जवळपास 2 हजार 880 हेक्टरमधील 6 हजार 886 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आतापर्यंत 52 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे आज येथे दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे, रिद्धपूर येथील महंत कारंजेकर बाबा, महंत वाईनदेशकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सहसचिव प्रताप कुंबाळ, संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव,  डॉ. उमेश काकडे, संतोष चव्हाण, प्रशासन अधिकारी डॉ. प्रभू दवणे तसेच आदी यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या जागा उपलब्धतेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांशी चर्चा केली. यावेळी जमीन अधिग्रहणाबाबत श्री. कटियार यांनी पर्याय सुचविले. त्यापैकी ई – क्लास जागा तसेच वनविभागाची जागा अनुकूल नसल्याबाबत कळविण्यात आले. त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी यावेळी दिले .

उपलब्ध जागा ज्या विभागाची आहे त्या विभागाकडून ना हरकत मिळवण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच  जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे. भूमी अधिग्रहणाची कार्यवाहीला वेग द्यावा. मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा मिळविण्यासाठी शोध घेऊन अहवाल सादर करावा . जागा अधिग्रहित करून जून  २०२४ पासून विद्यापीठ सुरु करण्यात येईल, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगणार साहसी एसआरटीएल मॅरेथॉन स्पर्धा…


पुणे: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० पूर्ण झाले असून त्यांच्या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी तसेच इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) किल्ल्यांचे दर्शन घडवण्यासाठी या परिसरात एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा येत्या शनिवारी ९ डिसेंबर रोजी रंगणार आहे. यंदाचे स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. नॉर्वे, आइसलँड, फ्रांस, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, नेपाळ या ७ देशातील खेळाडूंसह,  भारतातील २४ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ९०० हुन अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात घेतली जात आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शर्यतीत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून त्याचबरोबर प्रथामिक सोय सुविधांची व्यवस्था केली गेली आहे. विजयी स्पर्धकांना विशेष सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणारी आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन ही सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची एक रोमांचकारी मॅरेथॉन आहे. स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची सदस्य आहे. एसआरटीएल ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.

छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.
एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, अमर धुमाळ, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव व टीम फाउंडेशनच्या ५०० स्वयंसेवकांनी यासाठी अथक परिश्रम केले आहे. यावर्षी दार्जिलींग चा हेमंत लिंबू व सोमबहाद्दूर आणि महाराष्ट्रातील देव चौधरी या अव्वल धावपट्टूनी एसआरटीएल १०० किमी १० तासात पूर्ण करण्याचे आवाहन स्वीकारले आहे हि चर्चेची बाब बनली. या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच ऍथलेट ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला याचे नैतृत्व कोच योगेश सानप यांनी केले व त्यांना आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती चंद्रशेखर व कोच शामल मोंडल यांनी सहकार्य केले.

नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०७ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी  प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३१ व्या सत्राचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

गोकुळनगरमध्ये राहणाऱ्या २ चोरट्यांना अटक

पुणे- कात्रज ,गोकुळनगर येथे राहणारे , रात्रीचे घरफोडी करणारे २ सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२२/१०/२०२३ रोजी अज्ञात आरोपी यांनी सी जी मार्केटिंग प्रा.लि कंपनीचे ब्रँच, चंदननगर, पुणे याचे लोखंडी जाळीचे गेट कशाचे तरी सहाय्याने वाकवुन त्याचे खालुन प्रवेश करुन नोकीया कंपनीचा मोबाईल व सॅमसंग कंपनीचे ४ टॅब चोरुन नेल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.४९६/२०२३, भा.दं. वि.३८०,४५४,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम, सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व सुमारे २५० सीसीटिव्हि ची पाहणी करुन घरफोडीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) मायकल नवनाथ कांबळे, वय-२८ वर्षे, रा.लेन नं.४, गोकुळनगर, कात्रज, पुणे २) शिवा गोविंद चव्हाण, वय-१९ वर्षे, रा.लेन नं.४, गोकुळनगर, कात्रज, पुणे यांना ताब्यात घेतले असता, त्यांचे ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेले २ टॅब व १ मोबाईल असा एकुण १४,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांचेकडे इतरही चोरीचे ४ मोबाईल मिळुन आलेले असुन त्याचा अधिक तपास करुन पुढील कारवाई चालु आहे. सदरचे आरोपी हे दिवसा फिरुन पाळत ठेऊन रात्रीचे वेळेस घरफोडी करीत असायचे.
सदरची कारवाई हि अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहरसंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती मनिषा पाटील, यांचे दिमतीत तपास पथकाचे सपोनि प्रशांत माने, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउनि प्रमोद हंबीर, पो. अमंलदार दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम, गणेश हंडगर, सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केलेली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसाहेब ….पुण्याच्या माजी उपमहापौरांचे,आठवले गटाचे नेते डॉ. धेंडे यांचे तुम्हाला हे जाहीर सवाल ….

बीआरटी : शेकडो कोटीचा खर्च पाण्यात घालणार काय ?

पुणे- केंद्राच्या, राज्याच्या आणि पुणे महापालिकेच्या सत्तेत सहभागी असलेले पुण्याचे माजी उपमहापौर आणि रिपब्लिकन आठवले गटाचे नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेला खुले पत्र देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जाहीर सवाल केले आहेत.

काय म्हणाले आहेत डॉ. धेंडे हे त्यांच्याच शब्दात वाचा ….

सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाची जीवनदायी असलेला नगररोड येथील बीआरटी मार्ग काढून नागरिकांच्या खिशातून खर्च झालेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.
बीआरटी हा प्रकल्प केवळ पुणे महापालिकेचा नाही. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकल्प आणला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. महापालिकेने राज्य सरकारसोबत करार केलेला होता. त्यामध्ये अटी शर्ती होत्या. शहरीकरणात वाढ होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे काळाची गरज असल्याचे जगाने मान्य केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो आणि बीआरटी मार्गासारखे प्रकल्प राबविले जातात. पुणे महापालिकेची भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्याचे जाळे पाहता केवळ मेट्रो प्रकल्प राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. तर पीएमपीएल सक्षम करणे गरजेचे होते. त्यामुळे बीआरटी प्रकल्प राबवले गेले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही भागात अतिशय सक्षमपणे बीआरटी मार्ग चालू आहे. पीएमपीएलचा वापर विद्यार्थी, वयोवृद्ध, दिव्यांग बांधव, कष्टकरी कामगार आदीसह सर्वसामान्य नागरिक करत असतात. नगररोड दरम्यान बीआरटी मार्गातून दर तासा ४ हजार ५०० प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद आहे. एका दिशेला २ हजार ५०० प्रवासी दर तासाला प्रवास करतात. तर ४० बस दर तासा या मार्गाने धावत आहेत. दिवसाकाठी एक लाख प्रवासी संख्या होत असल्याची नोंद पीएमपीएमएल प्रशासनाकडे नोंद आहे. गेल्या चार वर्षात ही संख्या आणखीनच दुप्पट झाली आहे. प्रवाशी वाढल्याने पीएमपीएमएल प्रशासनाच्या तिजोरीतच भर पडत होती.

सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरात स्वतंत्र व्यवस्था असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने देखील नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील बीआरटी हटवण्याचा आग्रह लोकप्रतिनिधी, शासनाने का केला ? सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार कोणालाच नाही का ? येरवडा नगररोड दरम्यान काही भागात बीआरटी प्रकल्प राबवताना मेट्रोच्या पिलरला अडथळा येत असल्यामुळे तेवढेच बीआरटी मार्ग काढले जातील, असे महापालिका प्रशासन सांगत होते. दरम्यानच्या बीआरटीचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोणाला छेद देण्याचे काम पुन्हा झाले आहे. मध्यंतरी पीएमपीएल प्रशासनाने 300 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. चार्जिंग स्टेशन अभावी त्या सध्या बंद आहेत. आणखीन 600 नवीन इलेक्ट्रिक बस प्रशासनाकडे दाखल होणार आहेत. जर बीआरटी मार्गच काढायचे होते तर येवढ्या बसेसची खरेदी कशाला केली जात आहे ?

नागरिकांनी महापालिकेकडे कर भरले. त्यांच्या खिशातून बीआरटी मार्ग उभारले. त्यावर नागरिकांचा हक्क आहे. महापालिका प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून हे मार्ग उभारणे गरजेचे होते. भविष्यातील अडचणींचा आधीच विचार करायला हवा होता. बीआरटीचे चुकीचे नियोजन हे महापालिकेचे काम आहे.
महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वेळा या मार्गात अपघात झालेत. त्यासाठी बीआरटी मार्ग जबाबदार कसा ? ती सर्वस्वी महापालिकेची जबाबदारी आहे. अपघाताचे कारण देत बीआरटी मार्ग काढले जात असतील तर इतर ठिकाणी अपघात होतच नाहीत का ? बीआरटी बंद करून नागरिकांनी स्वतः वाहने घ्यावित का ? तसे झाले तर शहरात आणखीन वाहनांची भर पडून वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार कोण करणार ? बीआरटी मार्ग काढायचा होताच तर कोट्यवधी रुपये खर्च का केले ? या पैशांची भरपाई कोण देणार ? या पैशांचा हिशोब बीआरटी मधून प्रवास करणारा सर्वसामान्य पुणेकर मागतोय. बीआरटी काढणाऱ्यांनी याचा जवाब द्यावा. भाजपाचे राज्य असलेल्या गुजरात मधील अहमदाबाद येथे बीआरटी मार्ग सक्षमपणे चालविला जातो. पालकमंत्री अजित पवार यांच्या शहरातील काही भागात हा प्रकल्प चालविला जातो. मात्र पुण्यातील नगररोड येथील बीआरटी मार्ग का हटवला जात आहे ? या मुळे रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, कामगारांची, महिला वर्गाची गैरसोय याला जबाबदार कोण ? याचे उत्तर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी द्यावे, ही विनंती.

र्वसामान्य लोकांची जीवनदायनी बीआरटी काढणाऱ्या राज्य शासन, महापालिका, पीएमपीएल प्रशासनाला खुले पत्र…..

सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाची जीवनदायी असलेला नगररोड येथील बीआरटी मार्ग काढून नागरिकांच्या खिशातून खर्च झालेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.
बीआरटी हा प्रकल्प केवळ पुणे महापालिकेचा नाही. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकल्प आणला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. महापालिकेने राज्य सरकारसोबत करार केलेला होता. त्यामध्ये अटी शर्ती होत्या. शहरीकरनात वाढ होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे काळाची गरज असल्याचे जगाने मान्य केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो आणि बीआरटी मार्गासारखे प्रकल्प राबविले जातात. पुणे महापालिकेची भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्याचे जाळे पाहता केवळ मेट्रो प्रकल्प राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. तर पीएमपीएल सक्षम करणे गरजेचे होते. त्यामुळे बीआरटी प्रकल्प राबवले गेले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही भागात अतिशय सक्षमपणे बीआरटी मार्ग चालू आहे. पीएमपीएलचा वापर विद्यार्थी, वयोवृद्ध, दिव्यांग बांधव, कष्टकरी कामगार आदीसह सर्वसामान्य नागरिक करत असतात. नगररोड दरम्यान बीआरटी मार्गातून दर तासा ४ हजार ५०० प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद आहे. एका दिशेला २ हजार ५०० प्रवासी दर तासाला प्रवास करतात. तर ४० बस दर तासा या मार्गाने धावत आहेत. दिवसाकाठी एक लाख प्रवासी संख्या होत असल्याची नोंद पीएमपीएमएल प्रशासनाकडे नोंद आहे. गेल्या चार वर्षात ही संख्या आणखीनच दुप्पट झाली आहे. प्रवाशी वाढल्याने पीएमपीएमएल प्रशासनाच्या तिजोरीतच भर पडत होती.

सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरात स्वतंत्र व्यवस्था असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने देखील नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील बीआरटी हटवण्याचा आग्रह लोकप्रतिनिधी, शासनाने का केला ? सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार कोणालाच नाही का ? येरवडा नगररोड दरम्यान काही भागात बीआरटी प्रकल्प राबवताना मेट्रोच्या पिलरला अडथळा येत असल्यामुळे तेवढेच बीआरटी मार्ग काढले जातील, असे महापालिका प्रशासन सांगत होते. दरम्यानच्या बीआरटीचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोणाला छेद देण्याचे काम पुन्हा झाले आहे. मध्यंतरी पीएमपीएल प्रशासनाने 300 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. चार्जिंग स्टेशन अभावी त्या सध्या बंद आहेत. आणखीन 600 नवीन इलेक्ट्रिक बस प्रशासनाकडे दाखल होणार आहेत. जर बीआरटी मार्गच काढायचे होते तर येवढ्या बसेसची खरेदी कशाला केली जात आहे ?

नागरिकांनी महापालिकेकडे कर भरले. त्यांच्या खिशातून बीआरटी मार्ग उभारले. त्यावर नागरिकांचा हक्क आहे. महापालिका प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून हे मार्ग उभारणे गरजेचे होते. भविष्यातील अडचणींचा आधीच विचार करायला हवा होता. बीआरटीचे चुकीचे नियोजन हे महापालिकेचे काम आहे.
महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वेळा या मार्गात अपघात झालेत. त्यासाठी बीआरटी मार्ग जबाबदार कसा ? ती सर्वस्वी महापालिकेची जबाबदारी आहे. अपघाताचे कारण देत बीआरटी मार्ग काढले जात असतील तर इतर ठिकाणी अपघात होतच नाहीत का ? बीआरटी बंद करून नागरिकांनी स्वतः वाहने घ्यावित का ? तसे झाले तर शहरात आणखीन वाहनांची भर पडून वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार कोण करणार ? बीआरटी मार्ग काढायचा होताच तर कोट्यवधी रुपये खर्च का केले ? या पैशांची भरपाई कोण देणार ? या पैशांचा हिशोब बीआरटी मधून प्रवास करणारा सर्वसामान्य पुणेकर मागतोय. बीआरटी काढणाऱ्यांनी याचा जवाब द्यावा. भाजपाचे राज्य असलेल्या गुजरात मधील अहमदाबाद येथे बीआरटी मार्ग सक्षमपणे चालविला जातो. पालकमंत्री अजित पवार यांच्या शहरातील काही भागात हा प्रकल्प चालविला जातो. मात्र पुण्यातील नगररोड येथील बीआरटी मार्ग का हटवला जात आहे ? या मुळे रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, कामगारांची, महिला वर्गाची गैरसोय याला जबाबदार कोण ? याचे उत्तर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी द्यावे, ही विनंती.

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

वारकरी संप्रदाय विश्वधर्मी व्हावा हभप कृष्णा महाराज यांचे विचार

जागतिक सहिष्णुता सप्ताहातील प्रथम पुष्प

पुणे, दि.७ डिसेंबर :” व्यक्ती स्वतःला विसरल्यामुळे भ्रमिष्ट झाला आहे. संभ्रमामुळे त्याला सतत दुःखाचा सामना करावा लागतो. दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी संत साहित्याचे सतत वर्णन व श्रवण करावे. त्यातून मानवाला स्वतःची ओळख होते. वारकरी संप्रदाय मानवाला विषयांच्या भवसागरातून बाहेर काढू शकतो. तो सर्वश्रेष्ठ असल्याने विश्वधर्मी व्हावा.”असे विचार संतसाहित्याचे गाढे अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे शिष्य हभप कृष्णा महाराज यांनी प्रथम पुष्प गुंफतांना व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच योगगुरू मारुती पाडेकर, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
हभप कृष्णा महाराज म्हणाले,” विषय सागरामध्ये व्यक्ती स्वतःचे स्वरूप विसरला आहे. संतांच्या आर्शीवादाने पुन्हा तो स्वतःला ओळखू शकतो. त्यातूनच आपली मुक्तता सहज सिद्ध होऊ शकते. हे जीवन सार्थकी लावण्यासाठी संतांचे चरित्र व त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. संत हे कपाशी सारखे म्हणजे निरस, शुद्ध, गुणमय असतात. त्यांच्या सान्निध्यात मानवाच्या जीवनाचे कल्याण आहे.”
त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व बीड येथील श्री भगवानबाबा वारकरी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी यांचे कीर्तन झाले. तसेच कलर मराठी वरील सुर नवा ध्यासच्या प्रियंका ढेरे चौधरी व सहकारी यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.
नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

एमआयटी एडीटी’त सजली जपानी संगिताची मैफिल

पुणे ः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या राज कपूर सभागृहामध्ये टोकियो हसेगावा यांच्या नेतृत्वाखालील जपानी म्युझिक ग्रुप ‘स्टोन म्युझिक’च्या जपान-भारत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक विनिमय उपक्रमांतर्गत जपानी संगिताच्या बहारदार मैफि्लीचे आयोजन करण्यात आले होते. 

दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या मैफिलीचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय, ललित कला व परफाॅर्मिंग आर्टस् चे अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रेयसी पावगी, प्रा.तुषार पाणके, प्रा.महेंद्र पोतदार आदी उपस्थित होते. 

मैफिलीची सुरुवात करण्यापूर्वी टोकियो हसेगावा यांनी भारतीय कलाकृतींबाबत व्याख्यानही दिले. ज्यामध्ये त्यांनी, भारतीय चित्रकलेतील प्रकार मिथिला आणि वारली चित्रे त्यांच्या काही विशिष्ट शैलींसह जपानमधील देखील आढळत असल्याचे नमूद केले. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जपानी संगिताचा बहारदार नजराना प्रेक्षकांसमोर सादर केला. यामध्ये मुख्यतः जपानी संस्कृतीवर आधारित संगिताचा प्रामुख्याने समावेश होता. विशेष म्हणजे या संगितासाठी त्यांनी दगड, बांबू, गोरिला यांसारख्या जगभरातून गोळा केलेल्या घटकांचा वापर केला. 

कलाकारांमध्ये टोकियो हसेगावा (रुबार्ब/व्होकल), युकीकानेको (व्हायोलिन), तात्सुरो मुराकामी (गिटार), केइटा इसे (बास गिटार), मुन्ना (इलेक्ट्रॉनिक पर्क्यूशन), केंटारो नागाता(गिटार), हितोमी निशिमुरा (परफॉर्मन्स/स्टोन), डीजे कार्डबोर्ड (परफॉर्मन्स/बांबू), रुका फुजिवारा (परफॉर्मन्स/गोरिला), काझुहारू नाकतानी (ध्वनी अभियंता), मसातो ओकुमुरा आणि शुईची यामदा यांचा सामावेश होता. 

माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक सौ. ज्योती ढाकणे, विश्वशांती कला अकादमीचे सरचिटनीस आदिनाथ मंगेशकर, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.