Home Blog Page 1341

कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार

कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.  

११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. पुढील तीन दिवस १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.  

सिंधूरत्न कलावंत मंच या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे कोकणातील कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याही वर्षी ११ डिसेंबरपासून रत्नागिरी मधून या महोत्सवाची सुरुवात होत आहे. १६ डिसेंबरला मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा भव्यदिव्य महोत्सव रंगणार आहे. कोकणात निसर्गसंपन्नतेसह उत्तोमोत्तम कलाकार-तंत्रज्ञ आहेत त्यांचे कलागुण जगासमोर यावे आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हाच संस्थेचा निर्मळ हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील यात काही शंका नाही.

विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी तर अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील जेणेकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना असल्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून गेल्यावर्षीप्रमाणेच या ही वर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत.

स्कॅनिया इंडियाने पीपीएस मोटर्ससोबत भागीदारी करतखाण क्षेत्रातील उपस्थिती मजबूत केली

हैदराबाद: स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि.ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री आणि सेवा कार्यांसाठी संपूर्ण भारतभरासाठी असेल. स्कॅनिय इंडियाने नेहमीच तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि नावीन्यपूर्ण तथा टिकाऊ वाहतूक उपाय देण्यावर विश्वास ठेवला आहे. खाणीतील गंभीर बिंदू शोधून, विश्‍लेषण करून आणि सतत ऑप्टिमाइझ करून तयार केलेले सोल्युशन्स कंपनी पुरवते. त्यामुळे उच्च उपलब्धता, वाढीव उत्पादकता आणि ग्राहकांचा अधिक नफा मिळतो. ही नवीन भागीदारी भारतातील नेटवर्क विस्तार आणि ग्राहकांसाठी सहकार्य करण्याच्या स्कॅनियाच्या आश्वासनाचा पुरावा आहे.

नवीन सहकार्याबद्दल बोलताना स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. जोहान पी श्लायटर म्हणाले की, “पीपीएस मोटर्ससोबत करारावर स्वाक्षरी करून आम्ही भारतातील आमच्या खाण टिपर विभागावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रभावी युतीचा पाया घातला आहे. आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, आम्ही भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव योगदान देण्याबद्दल आशावादी आहोत.”

पीपीएसने संपूर्ण भारतामध्ये सहा प्रादेशिक गोदामे यशस्वीरित्या स्थापित केली आहेत. ही गोदामे खाण साइट्सच्या जवळ आहेत आणि एक मजबूत हब-आणि-स्पोक मॉडेल तयार करून, नागपुरातील स्कॅनियाच्या सेंट्रल वेअरहाऊसशी जोडलेले आहेत. हे हब म्हणजे या भागांसाठी स्मूथ, अखंड आणि जलद पुरवठा साखळी मिळते. या तीन अत्याधुनिक कार्यशाळा स्कॅनियाच्या जागतिक खाण मानकांची पूर्तता करतात. कुशल तंत्रज्ञ आणि नऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन कार्यरत आहेत, जेणेकरुन मोठ्या दुरुस्ती, अपघात दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग कार्यक्षमतेने हाताळता येईल.

भागीदारीबद्दल बोलताना पीपीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव संघवी म्हणाले की, “आम्हाला भारतातील खाण ट्रक व्यवसायासाठी स्कॅनियाचे खास वितरक म्हणून भागीदारी करण्यात आनंद होत आहे. स्कॅनियाची उत्पादने आणि सेवांवर ग्राहकांनी दाखवलेला प्रतिसाद आणि विश्वास जबरदस्त आहे. वाहनाच्या संपूर्ण काळात साइटवर उत्पादने आणि सेवांची इकोसिस्टम प्रदान करण्याच्या त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या संभाव्य आणि विद्यमान ग्राहकांच्या सतत संपर्कात असतो. याशिवाय आम्ही सखोल आणि व्यापक कव्हरेज प्रदान करण्यासाठी अतिरिक्त टच पॉइंट तयार करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.”

उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी शाश्वतता आणि नावीन्यपूर्ण प्रगत वाहने विकसित करण्यासाठी स्कॅनिया कठोरपणे काम करत आहे. जागतिक स्तरावर स्कॅनियाने इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि नूतनीकरणयोग्य इंधन, स्वायत्त उपाय, सुरक्षा प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये कौशल्य दाखवले आहे. कंपनीने भारतात तंत्रज्ञानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. व्यवसायांना त्यांचे कार्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहकार्य देण्यासाठी खास डिझाइन केलेली प्रगत वाहने आणि सेवा प्रदान करत आहे. 

पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ६६ खेळाडूंचे पथक सज्ज

पदार्पणात अर्धशतक साजरे करण्याचे लक्ष्य

  • खेलो इंडिया पॅरा स्पर्धा
  • विजय संतान पथक प्रमुख
  • उदय जोशी नोडल अधिकारी
  • सहा क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग

पुणे ७ डिसेंबर २०२३ – क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांचा एकत्रित उपक्रम असलेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी आता सर्वच राज्य सज्ज झाली आहेत. महाराष्ट्राचे खेळाडू देखील तयार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ६६ खेळाडूंचे पथक जाणार असून त्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. या स्पर्धेदरम्यान विजय संतान हे या पथकाचे प्रमुख असतील. संघाचे नाोडल अधिकारी म्हणून उदय जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

ही पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा १० डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. केंद्र सरकार या स्पर्धेसाठी, तर दिल्ली पाहुण्या खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेत सेनादलासह ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून दीड हजारहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तीन मैदानावर पार पडणार आहे. याममध्ये इंदिरा गांधी स्टेडियम, तुघलकाबाद येथील शूटिंग रेंज जवाहरलाल नेहरु या मैदानांचा समावेश आहे.

महाराष्ट्र संघाबरोबर १६ जणांचा सपोर्ट स्टाफही जाणार आहे. संघ व्यवस्थापक म्हणून अरुण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत एकूण सात क्रीडा प्रकारांचा समावेश असून, महाराष्ट्र पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस, पॅरा तिरंदाजी, पॅरा वेटलिफ्टिंग आणि पॅरा नेमबाजी या सहा क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. पर्सी फटबॉल या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार नाही.
या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय आणि साईच्यावतीने खेळाडूंच्या वातानुकुलीत रेल्वे (थ्री टायर एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेऊन यात भर घालून आपल्या खेळाडूंचा प्रवास अधिक सुखकारक व्हावा, यासाठी सर्व खेळाडूंना विमानाने दिल्लीला पाठविण्याचा निर्णय आहे .

राज्याचे खेळाडू उत्तुंग यश मिळवतील – संजय बनसोडे
पॅरा क्रीडा स्पर्धेतील खेळाडू नेहमीच आपल्यातील शारीरिक क्षमतेला आव्हान देत आपले कौशल्य दाखवतात. सरकारच्या या नव्या उपक्रमाने पॅरा खेळाडूंमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण असते. या वेळी या खेळाडूंना खेलो इंडियासारखे भव्य व्यासपीठ मिळाले आहे. या पहिल्या स्पर्धेतील कामगिरींबाबत खेळाडूंइतकीच त्याच्या कुटुंबिय आणि चाहत्यांमध्ये चर्चा आहे. त्यांच्यामध्येही एक वेगळात उत्साह संचारला आहे. हे खेळाडू आपल्या कामगिरीने निश्चितपणे भावी पिढीसमोर कसे खेळायचे आणि कसे जगायचे यासाठी एक प्रेरणा स्त्रोत बनून राहतील, यात शंकाच नाही. यापूर्वीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धा गाजवली आहे. मात्र आता पहिल्यांदाच दिव्यांग खेळाडूंची स्पर्धा होत आहे. त्यामुळे आपले खेळाडू देखिल या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवूनच परत येतील असा विश्वास वाटतो, असे महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील-काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

  • ⁠कामकाज रेटल्याने विरोधकांचा संताप

नागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही. असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

नागपूर येथील अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. पायर्‍यांवर आंदोलन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप केला.

आ.थोरात म्हणाले की, नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 16 जिल्ह्यातील 91 तालुक्यांमधील 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची तीव्रता प्रचंड आहे. द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सरकार मात्र या सर्व बाबींवर चर्चा करायला तयार नाही. आज पंचनामे आणि मदतीची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अवकाळी पावसाला इतके दिवस उलटून गेले तरी अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतावर अद्याप पर्यंत प्रशासन पोहोचले नाही, पंचनामे पूर्ण झाले नाही, असेही थोरात म्हणाले

एकाच वर्षात शेतकरी अवकाळी व दुष्काळी अशा दुहेरी संकटांचा सामना करतो आहे. दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही दिलासा मिळाला नाही. त्यातच अवकाळी पावसाचे संकट येऊन उभे ठाकले आहे. सरकारने नुसती मदत जाहीर करण्याची मलमपट्टी करण्यापेक्षा या शेतकऱ्यांसाठी ठोस उपाय योजना कराव्यात. शेतकऱ्यांना धीर द्यावा यासाठी सभागृहात चर्चेची मागणी आम्ही केली होती मात्र सरकारने सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांचा आवाज दाबला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या सभागृहाचे कामकाज बघतो आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनाकडून मोठ्या आशा आहेत. या अधिवेशनात सरकार आपले म्हणणे ऐकेल आणि आपल्याला मदत करील अशी अपेक्षा शेतकरी बांधवाला आहे. मात्र सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ते अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे, असेही थोरात म्हणाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

नागपूर, दि. ७ डिसेंबर
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर जोरदार घोषणाबाजी करून शेतकरीविरोधी तिघाडी सरकारचा निषेध केला. त्यांनतर विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार गंभीर असते तर विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावावार सभागृहता चर्चा केली असती पण हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याने त्यांनी चर्चा करणे टाळले. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करु म्हणणारे भाजपाचे सरकारच विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चाच करत नाही. हे सरकार १४ कोटी जनतेशी खोटे बोलत आहे. शेतकऱ्यांना मदत करायची आहे की नाही ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत पर्यटनासाठी हे लोक आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.
धानाला एक हजार रुपये बोनस द्या.
विदर्भातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहे. अजून खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत. शेतकऱ्याचे धान व्यापारी ४००-५०० रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या धानाला भावच मिळू देत नाही. धानाला अजून बोनसही जाहीर केलेला नाही. सरकारने धानाला एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

विरोधकांना घाबरवण्यासाठी SIT चौकशी..
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक अधिवेशनाच्या काळात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीचा प्रश्न आणला जातो. आताही त्यांची एसआयटी चौकशी करु असा मुद्दा पुढे आणला आहे. सरकारला प्रश्न विचारू म्हणून अशा पद्धतीने सरकार विरोधी पक्षांच्या आमदारांना घाबरवण्याचे काम करत आहे पण विरोधी पक्ष सरकारच्या अशा धमक्यांना घाबरत नाही, सरकारला जाब विचारण्याचे काम सुरुच राहिल. हा सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना धमकावण्याचा प्रकार आहे पण विरोधकांना घाबरवण्याचे सोडा व जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारविरोधात विरोधी पक्षांची जोरदार घोषणाबाजी..
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांनी गळ्यात संत्र्यांचे हार घालून तिघाडी सरकारचा निषेध केला.

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त उद्या विशेष चर्चासत्र

नागपूर, दि.7  : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त उद्या दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन येथे “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड-१९ महामारीमुळे त्‍यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना दि. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून यानिमित्त जुन्या आठवणींना तसेच विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वाटचालीतील हिवाळी अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रसंगांना उजाळा मिळणार आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिनी जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अनोखी मानवंदना 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चा उपक्रम ; तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग 
पुणे : भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साज-या करण्यात येणा-या सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे साकारण्यात आली. 


संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे यादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे. 

योगेश उर्फ सॅम जगदिश सोनवणे व साथीदारांवर मकोका ची कारवाई

पुणे- योगेश उर्फ सॅम जगदिश सोनवणे व साथीदारांवर मकोकाची कारवाई केल्याचे पोलिसांनी येथे सांगितले. पोलिसांनी असेही म्हटले आहेकी,’खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.४०१/२०२३, भा.द.वि. कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी ह्या त्यांचे कंपनीचे कार्यालया समोरून पायी जात असताना, स्कुटरवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र हात घालुन हिसका मारुन तोडून नेले.
सदर घटनेची तात्काळ दखल घेवुन दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीतांचे दुचाकी गाडीचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे वडगांव-धायरी, सिहंगड रोड, पुणे पर्यंत आरोपीतांचा माग काढत, सदर आरोपी निष्पन्न करुन दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) राहुल मच्छिंद्र कांबळे, वय-२४ वर्षे, रा. पुणे २) योगेश ऊर्फ सॅम जगदिश सोनवणे, वय-२३ वर्षे, रा. पुणे यांना अटक करुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले सोन्याचे मंगळसुत्र आरोपीकडुन हस्तगत करण्यात आले आहे. सदर इसमांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली अॅक्सेस मोपेड त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेली असुन, सदर गाडी ही कोथरुड पोलीस स्टेशनकडील चोरीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे १) राहुल मच्छिंद्र कांबळे २) योगेश ऊर्फ सॅम जगदिश सोनवणे हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. सदर आरोपीतांची पुर्व रेकॉर्डची पाहणी करता, त्यांचेवर खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन, त्यांनी त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन, त्याचे इतर साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी स्वतःची संघटीत टोळी तयार करुन, गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले असुन, त्यांनी जबरी चोरी करणे, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी योगेश ऊर्फ सॅम जगदिश सोनवणे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन, त्यांनी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन, त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील जुमानत नसल्याने तसेच त्याचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने, प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन-१९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परि-०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे, श्री. रंजन शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरिल टोळीविरुध्द खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं.४०१/२०२३, भा.द.वि.कलम ३९२,३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम३(१) (ii)३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०४, श्री. शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती. आरती बनसोडे यांचे मार्गदर्शना खाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, रमेश जाधव, पोलीस अमंलदार, किरण मिरकुटे, महिला पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के यांनी केली आहे.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९४ वी कारवाई आहे

विधानपरिषद शतकमहोत्सव आणि नागपूर हिवाळी अधिवेशनांचे योगदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त हिवाळी अधिवेशन, २०२३ चे औचित्य साधून दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत विधानपरिषद सभागृह, नागपूर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्त्वपूर्ण योगदान” या विषयावरील चर्चासत्राच्या माध्यमातून गत हिवाळी अधिवेशनांमधील महत्त्वपूर्ण संमत विधेयके, ठराव, चर्चा, प्रस्ताव आणि त्यानुषंगाने घेण्यात आलेले निर्णय यांचे संदर्भ नव्याने अधोरेखित होणार आहेत. भारतातील संसदीय लोकशाहीत केंद्रस्तरावर लोकसभा आणि राज्यसभा ही द्विसभागृह पद्धती स्वीकारण्यात आली असली तरी राज्यस्तरावर ६ राज्यांचा अपवाद वगळता सर्व राज्यांमध्ये विधानपरिषद हे दुसरे सभागृह अस्तित्वात नाही. महाराष्ट्र विधानपरिषदेने गत शंभर वर्षाच्या कालकसोटीवर आपली उपयुक्तता आणि महत्व सिद्ध केले असून एरव्ही राजकीय परीघात येण्याची शक्यता नसलेल्या विद्वतजनांचा संसदीय सहभाग विधानपरिषदेमुळे शक्य झाला.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. श्री. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये श्री. नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. अत: सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. भारताच्या घटनात्मक इतिहासातील १९१९-१९२०-२१ नंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९३५ चा भारत सरकार कायदा (Government of India Act 1935) होय. या कायद्याद्वारे संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या कायद्यान्वये विधानसभा आणि विधानपरिषद असे नामाभिदान देऊन मुंबई प्रांतात १९३७ मध्ये दोन सभागृहे अस्तित्वात आली.

दिग्गज सदस्यांची मालिका

विधानपरिषदेचा आरंभबिंदू ठरवायचा झाले तर आपल्याला शंभर पेक्षाही जास्त वर्षे मागे जावे लागेल. २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भूतपूर्व मुंबई प्रातांच्या लेजिस्लेटीव्ह कौन्सिलची (Council of Governor of Bombay) पहिली बैठक भरली होती. १८६२ ते १९३७ या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत –

सर्वश्री जगन्नाथ शंकर शेठ, जमशेटजी जीजीभॉय, सर माधवराव विंचूरकर, रावसाहेब विश्वनाथ, नारायण मंडलिक, रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशाह मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नारायण गणेश चंदावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी दिग्गज सन्माननीय सदस्यांची मालिका विधिमंडळाला लाभली आहे. तेव्हापासून १९२१ चा संदर्भ पुढे नेत आजही विधानपरिषद कार्यरत आहे, उल्लेखनीय योगदान देत आहे. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील ते एक सर्वाधिक जुने सभागृह आहे, ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

वरिष्ठ सभागृह द्धतीवरील टीका एकांगी

विधानसभा हे सभागृह लोकांनी थेट निवडून दिलेल्या सदस्यांद्वारे तयार होत असल्याने तेच जनतेचे खरेखुरे प्रतिनिधी ठरतात. त्यामुळे मग विधानपरिषद या सभागृहाची गरजच काय?  विधानपरिषद हे सभागृह असावे की, असू नये, असा प्रश्न, असे वादविवाद अधूनमधून उपस्थित केले जात असतातच.  “मागल्या दाराने प्रवेश”, “राजकीय सोय लावण्याचा उपाय” असे अनेक प्रवाद विधानपरिषद नामनियुक्त सदस्यत्वासंदर्भात जोडले गेले आहेत तर विधानपरिषदेच्या एकूणच अस्तित्वाच्या विरोधात मतप्रदर्शन करणारा गट नेहमीच विधानपरिषदेच्या बाबतीत “वेळकाढूपणाचे सभागृह”, “कायदयाचा किस पाडणारे सभागृह”, “खर्चिक प्रणाली” अशी मल्लिनाथी करीतच असतो.  परंतु या गोष्टी, यासंदर्भातील टीका ही एकांगी स्वरुपाची आहे.  वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे.  पूर्ण विचारांती या प्रश्नाकडे बघितल्यास लोकशाही संवर्धन व बळकटीसाठी विधानपरिषद किंवा द्विसभागृह पध्दती ही एक आवश्यक अशी संकल्पना आहे, असेच म्हणावे लागेल. It is a ‘Revising Chamber’ and not a ‘Delaying Chamber’- असे माजी सभापती श्री. जयंतराव टिळक यांनी म्हटले आहे ते अगदी योग्यच होय.

संसदीय लोकशाहीत निर्णय प्रक्रियेअगोदर सखोल विचारमंथनाला महत्व आहे. Decision out of Discussion is Important. त्याचप्रमाणे कोणत्याही धोरणात्मक निर्णयापर्यंत पोहचताना त्यासंदर्भातील सर्व मतमतांतरांचा परामर्श घेतला जाणे आवश्यक असते. Diverse views must be acknowlegded. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाच्या अस्तित्वामुळे ही गरज पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्र विधानपरिषदेने आजवरच्या वाटचालीत यादृष्टीने उल्लेखनीय योगदान देत आपली आवश्यकता अधोरेखित केली आहे आणि त्यात नागपूर अधिवेशनांचे महत्वपूर्ण संदर्भ, कामकाज यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.

हिवाळी अधिवेशनांत महत्वपूर्ण कामकाज…

राज्यातील सहकाराचा पाया विस्तृत आणि भक्कम करून ग्रामीण भागात समृध्दीचे वारे खेळविणारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तत्कालीन सहकार मंत्री श्री. बाळासाहेब भारदे यांनी डिसेंबर, १९६० नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडला आणि याच अधिवेशनात विस्तृत चर्चेअंती तो संमत झाला. मा.श्री. भारदे साहेब पुढे १९६२ ते १९७२ असे दोन टर्म विधानसभा अध्यक्ष राहिले होते. जिल्हापरिषद व पंचायत समिती विधेयक माहे डिसेंबर, १९६१, शिक्षण क्षेत्रातील बाबींसंदर्भात श्वेतपत्रिकेवर चर्चा माहे नोव्हेंबर, १९६८, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कायदा माहे डिसेंबर, १९६८, विदर्भ-कोकण-मराठवाडा यांच्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ स्थापन करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण अशासकीय ठरावे माहे नोव्हेंबर, १९६९, हरिजनांवर होणाऱ्या अत्याचाराची मीमांसा करण्यासाठी व त्यावर उपाययोना सुचविण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय – श्री. वि.स.पागे समितीचे गठन माहे डिसेंबर, १९७२, पंढरपूर मंदिरे विधेयक माहे नोव्हेंबर, १९७३, प्राणी रक्षण विधेयक माहे डिसेंबर, १९७६, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आरक्षण विधेयक – पदोन्नतीतील आरक्षण विधेयक माहे डिसेंबर, २००२, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग विधेयक माहे डिसेंबर, २००५, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण विधेयक माहे डिसेंबर, २००८, प्रदीर्घ चर्चा आणि छाननी अंती संमत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण असे अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक माहे डिसेंबर, २०१३ असे नागपूर अधिवेशनांमधील संमत विधेयकांचे महत्त्वपूर्ण योगदान आपल्या डोळ्यासमोर आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात आलेली कापूस एकाधिकार खरेदी योजना तसेच रोजगार हमी योजना अशाच मूलगामी चर्चा आणि विचारमंथनांचे फलित आहे. यावेळी या विधेयकांमधील विधानपरिषदेतील चर्चा, सुचविलेल्या सुधारणा उल्लेखनीय ठरले आहे. त्याचप्रमाणे सन १९६० ते २०२३ या कालखंडात महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण शासकीय ठराव संमत करण्यात आले.

सामंजस्य आणि सहमतीचे दर्शन

आजपर्यंत नागपूर येथील अधिवेशने ही विदर्भातील प्रश्नांबरोबरच राज्यातील महत्वाचे प्रश्न, ध्येयधोरणे, संमत कायदे यादृष्टीने नेहमीच महत्वपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण ठरली आहेत.  कृष्णा-गोदावरी पाण्याच्या वाटपासंबंधातील ठराव, लोकसभेत व विधानसभेत सरळ निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागांच्या एक तृतीयांशपेक्षा कमी नाही एवढया जागा महिलांसाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव, वनसंवर्धन कायदा, मानवी अवयव प्रत्यारोपण  अधिनियम १९९४ मध्ये सुधारणा करणारा ठराव, कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी घटनेत सुधारणा करण्याबाबत, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मा.अध्यक्षांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन यासंदर्भात सभागृहाने संमत केलेला ठराव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एन.टी.सी. च्या मालकीची साडेबारा एकर जागा केंद्र शासनाने देण्याबाबतचा एकमताने संमत झालेला ठराव, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई चा  नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई” असे करण्याबाबत केंद्र सरकारला करण्यात आलेली शिफारस एकमताने संमत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असा नामविस्तार, एल्फीस्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “प्रभादेवी” असे करण्यात यावे अशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली. अशा अनेक संदर्भामध्ये नागपूर अधिवेशनात घेण्यात आलेले हे निर्णय, चर्चा महत्वपूर्ण ठरली आहे.  या सर्व वेळी सभागृहांमध्ये अतिशय सामंजस्य आणि सहमतीचे दर्शन घडले.

महाराष्ट्र, जम्मू – काश्मीर आणि कर्नाटक…

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला.  नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली.
२८ सप्टेंबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेल्या नागपूर करारान्वये “शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित कालावधीकरीता नागपूर येथे हलविण्यात येईल आणि दरवर्षी राज्य विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल”, असे सुनिश्चित करण्यात आले.  अशाप्रकारे दोन ठिकाणी विधीमंडळाचे अधिवेशन गेली अनेक वर्षे भारतात महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीर या दोन राज्यात आयोजित केली जात आहेत. सन २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर, लडाख केंद्रशाषित प्रदेश झाले आहेत.  तसेच  कर्नाटकमध्ये सन २०१२ मध्ये बेळगांव येथे सुवर्ण विधानसभा नावाने नवीन इमारत  बांधण्यात आली असून तेथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. नागपूर करारानुसार १९६० पासून उप राजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे आयोजित केले जाते.  फक्त काही अपवाद वगळता नागपूर कराराव्दारे अंमलात आणली गेलेली ही व्यवस्था अव्याहतपणे सुरु आहे.  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नागपूर येथे घेण्यात न आलेल्या अधिवेशनांची संख्या ६ आहे.  त्यांचे वर्ष आणि कारणे

पुढीलप्रमाणे :-

(१) १९६२ – भारत-चीन युध्दामुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.

(२) १९६३ – तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मारोतराव कन्नमवार यांचे दिनांक २४  नोव्हेंबर, १९६३ रोजी निधन झाल्यामुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ  शकले नाही.

(३)१९७९ – लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे यावर्षी नागपूर येथे  अधिवेशन होऊ शकले नाही.

(४) १९८५ – दिनांक २८ डिसेंबर, १८८५ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना  मुंबई येथे झाली होती.  त्याचा शताब्दी महोत्सव मुंबई येथे आयोजित  करण्यात आल्याने या वर्षी नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.  मात्र १९८६ साली ३ ऐवजी ४अधिवेशने झाली, त्यापैकी जानेवारी,  १९८६ आणि नोव्हेंबर, १९८६ अशी दोन अधिवेशने नागपूरला झाली.  या दोन्ही अधिवेशनाच्या बैठकांची संख्या प्रत्येकी १५ दिवस होती.

(५) सन २०२० (६) सन २०२१ – वैश्विक महामारी कोरोना (कोविड-१९) मुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.

उपरोक्त सहा अपवाद वगळता १९६० पासून दरवर्षी नित्यनेमाने १ अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यात नागपूरातील ४ पावसाळी अधिवेशनांचाही समावेश आहे. (सन १९६१, १९६६, १९७१ आणि अलीकडचे जुलै, २०१८)

बरखास्तीचा ठराव सखोल विचारमंथनाअंती फेटाळला…

महत्वाची बाब म्हणजे नागपुरातील १९६१ च्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह बरखास्त करण्यात यावे असा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. श्री.स.गो. वर्टी (वसई), ठाणे यांनी विधानपरिषद बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करणारा हा ठराव २५ जुलै, १९६१ रोजी विधानसभेत मांडला. ठरावावर बरेच विचारमंथन झाले. हा ठराव ४४ विरुध्द ८४ मतांनी फेटाळण्यात आला. हे कार्यवृत्त जिज्ञासूंनी वाचणे आवश्यक आहे. द्विसभागृह असावे की नसावे आणि असल्यास ते का असावे, यासंदर्भातील सखोल विचारमंथन आपल्याला वाचायला मिळेल. द्विसभागृह पध्दतीसंदर्भातील हा महत्वाचा वैचारिक ठेवा आहे.

भावनिक ऐक्य आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका

विशाल मराठी भाषिक राज्याची निर्मिती आणि नागपूर करार या संदर्भात बोलतांना प्रथम मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी भावनिक ऐक्याला महत्व दिले होते.  नागपूर येथील अधिवशेनाच्या आयोजनासंदर्भात खर्चाचा मुद्दा घेऊन टिका केली जाते  परंतु अधिवेशनामुळे भावनिक ऐक्याचा बंध बळकट होणे आणि अधिवेशन काळात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणे, विकास योजनांना गती मिळणे शक्य झाले आहे.  नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांवर, विकास योजनांवर प्रश्न-लक्षवेधी-ठराव-अर्धा तास चर्चा-अशासकीय ठराव-औचित्याचे मुद्दे-स्थगन प्रस्ताव अशा विविध संसदीय आयुधांव्दारे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सखोल विचारमंथन झाल्याचे आपल्याला मागील अधिवेशनांच्या कार्यवृत्तावरुन दिसून येईल.  दोन्ही सभागृहांचे मा.पीठासीन अधिकारी नागपूर अधिवेशन काळात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी संबंधीत विषयांना, सन्मानीय सदस्यांना अग्रक्रमाने संधी उपलब्ध करुन देत असतात.

नागपूर अधिवेशन आणि राजकीय घडामोडी

नागपूर हिवाळी अधिवेशनांचे महत्त्व सभागृहातील कामकाजाइतकेच या दरम्यानच्या सभागृहाबाहेरील राजकीय घडामोडींना देखील तितकेच आहे. ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्रजी पवार विधानसभा विरोधी पक्षनेते असतांना मुख्यमंत्री श्री. अ.र.अंतुले सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर पर्यंत डिसेंबर, १९८० मध्ये काढण्यात आलेली ऐतिहासिक शेतकरी दिंडी, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असतांना त्यांच्या विरोधात झालेले डिसेंबर १९८२ चे बंड, मंत्रीपदी असतांना ज्येष्ठ नेते श्री. सुशिलकुमारजी शिंदे आणि श्री. विलासरावजी देशमुख यांनी डिसेंबर १९९० चे नागपूर हिवाळी अधिवेशन आटोपताच जानेवारी महिन्यात फडकावलेले बंडाचे निशाण, तत्कालीन आक्रमक शिवसेना नेते श्री. छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत केलेले डिसेंबर १९९१ चे  बंड, त्यामुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेतेपद श्री. मनोहर जोशींकडून श्री. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे याच हिवाळी अधिवेशनात येणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब फुंडकर यांनी काढलेली शेतकरी दिंडी, शिवसेना नेते श्री. दिवाकरजी रावते यांची कापूस दिंडी, ११ डिसेंबर, २०१२ रोजी श्री. नितीनजी गडकरी, श्री. गोपिनाथजी मुंडे, श्री. एकनाथराव खडसे-पाटील, श्री. देवेंद्रजी फडणवीस, श्री. सुधीर मुनगंटीवार, श्री. विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला नागपूर अधिवेशनावरील विराट घेराव मोर्चा आणि त्याचे सभेत झालेले रुपांतर या घटनांची राजकीय इतिहासात नोंद झाली आहे.

विधानपरिषद सदस्यत्वाच्या (विदर्भ पदवीधर सन १९७८ ते ८४ आणि १९८४ ते १९९०) माध्यमातून दमदार कामगिरीद्वारे “विधानपरिषदेतील वाघ” असा लौकिक श्री. गंगाधरराव फडणवीस यांनी प्राप्त केला होता. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत दस्तुरखुद्द नागपुरातील विधानसभा सदस्य असलेल्या श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद आले. या त्यांच्या कारकिर्दीत नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासासंदर्भात सर्वंकष प्रयत्न सभागृहात आणि सभागृहाबाहेर करण्यात आले. ज्याचे दृष्य परिणाम सध्या दिसत आहेत. नागपूर विधान भवन जुन्या इमारतीतील नवीन मंत्री परिषद सभागृहात त्यांनी अधिवेशन कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या विकासकामांच्या संदर्भातील सादरीकरणासह उच्चस्तरीय बैठकांचे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी केली. गतीमान प्रशासनासाठी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

१२५ व्या जयंतीनिमित्त महामानवाला मानवंदना…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर हिवाळी अधिवेशन डिसेंबर, २०१५ मध्ये दोन्ही सभागृहात त्यांच्या कार्याचा गौरव आणि अभिवादन करण्यासाठी विशेष चर्चेचे आयोजनही तत्कालीन मुख्यमंत्री आणि पीठासीन अधिकारी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले. सर्वपक्षीय सन्माननीय सदस्यांनी अतिशय अभ्यासूपणे यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. घटनाकारांना दोन्ही सभागृहांनी अशाप्रकारे केलेले अभिवादन हा विधिमंडळ कार्यवृत्तातील अनमोल ठेवा आहे.

वादे वादे जायते तत्वबोधा:…

ज्येष्ठांचे सभागृह, विद्वानांचे सभागृह असा लौकिक प्राप्त केलेल्या विधानपरिषदेने “वादे वादे जायते तत्वबोधा:” ही उज्वल प्रबोधन परंपरा जपली आहे. या शतक महोत्सवी वाटचालीत सभागृहाचे पीठासीन अधिकारी आणि विरोधी पक्षनेते यांचे विशेष योगदान लाभत आले आहे आणि लाभत राहिल. यंदाचे नागपूर डिसेंबर, २०२३ हिवाळी अधिवेशन या शतक महोत्सवाबरोबरच आणखी दोन कारणांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. दरवर्षी नागपूर अधिवेशनात राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित केला जाणारा अभ्यासवर्ग यंदाचा सुवर्णमहोत्सवी असा ५० वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. त्याचप्रमाणे नागपूर विधिमंडळाची ऐतिहासिक वारसावास्तू आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी प्रसिध्द आहे. या वास्तूची पायाभरणी १७ डिसेंबर, १९१२ करण्यात आली होती ज्याला यंदाच्या वर्षी १११ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या संसदीय वाटचालीत लोकहिताचे प्रभावी कायदे मंजूर करून ते राबविण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या या संस्मरणीय वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे हे कृतज्ञ स्मरण. त्याचप्रमाणे दिवंगतांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

– निलेश मदाने,

जनसंपर्क अधिकारी,

म.वि.स. संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, नागपूर

nilmadane72@gmail.com

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. ७: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी १३ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत, आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज बाद ठरविण्यात येतील, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलन कार्यात उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा-अपर जिल्हाधिकारी अजय मोरे

पुणे, दि. ७: देशाच्या सिमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता प्रकट करून सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात शासकीय कार्यालयासह दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, उद्योगसंस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उस्फुर्तपणे योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) युवराज मोहिते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स. दै. हंगे (निवृत्त), कर्नल समीर कुलकर्णी (निवृत्त) आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, आपल्या देशाची सीमा सुरक्षित आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातील सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. सैनिकांनी देशासाठी दिलेल्या सेवेमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे देशाचे अस्तित्व आहे. महसूल विभागाच्यावतीने सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याला प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहील.

सैनिकांचा त्याग आणि कर्तुत्वाची जाणीव सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. ध्वजदिन निधी हा माजी सैनिक, विधवा, वारस, माजी सैनिकांचे पाल्य यांच्या कल्याणासाठी खर्च होत असल्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त निधी संकलन करण्यात यावे. ध्वजदिन निधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविकात ले. कर्नल हंगे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२२ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी १ कोटी ७४ लाख ५७ हजार ८५२ रुपये इतके उद्दिष्ट साध्य करण्यात असून त्याचे प्रमाण एकूण ६७ टक्के आहे. सन २०२२-२३मध्ये ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, मुली यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजनांसाठी १ कोटी ६ लाख २७ हजार ९३८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. सैनिकी मुलांच्या व मुलींचे वसतिगृहासाठी ७६ लाख ६३ हजार ८५८ रुपये खर्च करण्यात आले आहे.

दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या ८० विधवांना ४२ लाख १० हजार रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजना राबविण्यात येतात. शासकीय नोकरीत माजी सैनिकांना १५ टक्के आरक्षण आहे. विधवांच्या मुलांना मोफत वसतीगृह सुविधा पुरविण्यात येते. ध्वजदिन निधी माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनीदेखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात गेल्यावर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करुन धनादेश वितरण करण्यात आले.

अहो, देवेंद्रभाऊ सरडाही लाजून आत्महत्या करेल!:ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा नवाब मलिकांवरुन फडणवीसांवर निशाणा

पुणे-गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र आज विधानभवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर, सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर ते शेवटच्या रांगेत बसले. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर, फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले होते. आता, या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.

नेमक्या काय म्हणाल्या अंधारे?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. बोले तैसा अजिबात ना चाले त्यासी पाहून सरडेही लाजीले, हे नवे विडबंन सूचत आहे. कारण, विधिमंडळ अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही असा साधा साळसूदपणे प्रश्न विचारला. देवेंद्रभाऊ तुम्हाला आठवते का? पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपनेच केला होता. तमुच्या पक्षातील आक्रस्थाळ्या बायकांना पुढे करत तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला. आणि आमच्या पक्षाने तो राजीनामा घेतला. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? आणि वरुण नवाब मलिकांचा प्रश्न विचारता हे कसे जमते, देवेंद्र भाऊ सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील असा खाेचक टोला त्यांनी लगावला आहे.

अंधारे यांचे ट्विट काय?

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? @Dev_Fadnavis भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!

CII डिजिटलायझेशन, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अवॉर्ड्समध्ये बेलरिस इंडस्ट्रीजला 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक

पुणे  – बेलरिस इंडस्ट्रीज लिमिटेडने व्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) नॅशनल डिजिटलायझेशनरोबोटिक्स आणि ऑटोमेशन (DRA) इंडस्ट्री 4.0 पुरस्कारांमध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्य पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा पुरस्कार उत्पादन क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेमध्ये कंपनीचे नेतृत्व आणि नवनवीन गोष्टींचा समावेश अधोरेखित करतो.

कंपनीने ही उत्कृष्ट कामगिरी गंभीर ते उद्योग 4.0 मधील श्रेणीत केली आहे. यामध्ये स्मार्ट आणि पेपरलेस डेटा मॅनेजमेंटमधील महत्त्वपूर्ण प्रगतीरोबोटिक वेल्डिंगमध्ये IoT चे क्रांतिकारी एकत्रीकरण – मॅन्युअल हस्तक्षेप काढून टाकणे आणि डेटा विश्लेषण सुव्यवस्थित करणे आणि DRA च्या धोरणात्मक अंमलबजावणीद्वारे 100% DPR आणि शून्य QSR ची उपलब्धी यांचा समावेश आहे.

स्पर्धात्मक श्रेणींमध्ये हे पुरस्कार मिळवण्यात आलेले यश हे उत्पादन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामध्ये बेलरिसचा आधुनिक दृष्टिकोन अधोरेखित करते. बेलरिस इंडस्ट्रीज खालुंब्रे प्लांटसाठी ही प्रशंसा विशेषतः महत्त्वपूर्ण आहेही एक सुविधा आहे जी त्याच्या ऑपरेशनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करण्यात आघाडीवर आहे. ही उपलब्धी केवळ कंपनीच्या नाविन्यपूर्ण उत्पादन तंत्रातील नैपुण्य दर्शवत नाही तर भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योग 4.0 ला पुढे नेण्यासाठीचे समर्पण देखील दर्शवते.

बेलरिस इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे म्हणाले, “भारतीय उद्योग महासंघाकडून मिळालेल्या मान्यतेने आम्हाला आनंद झाला आहे. बेलरिसचा विजय हा डिजिटलायझेशनरोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून त्यांच्या ऑपरेशनल क्षमता वाढवण्याच्या कटिबद्धतेचा थेट परिणाम आहे. या तंत्रज्ञान प्रगतीमुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहेउत्पादकता पातळी वाढली आहेआणि वर्धित कार्यक्षमतेने उत्पादनातील उत्कृष्टतेचे एक नवीन युग चिन्हांकित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे प्रगत माध्यमातून रीअल-टाइम मॉनिटरिंग आणि एंड-टू-एंड व्यवसाय प्रक्रियांचे नियंत्रण ऍडव्हान्स डेटा विश्लेषणामुळे सुलभ झाले आहे. बेलरिस उद्योगात आघाडीवर राहील याची खात्री करणारे हे विश्लेषण आहे.”

भारत सरकारच्या “मेक-इन-इंडिया”, “डिजिटल इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” सारख्या दूरदर्शी उपक्रमांशी जोडले जाण्याच्या दिशेने बेलरिसच्या प्रवासात हा पुरस्कार मैलाचा दगड ठरला आहे. नवीन इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे, बेलरिस स्वावलंबी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत औद्योगिक क्षेत्राला चालना देण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात योगदान देत आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत देशाचे स्थान मजबूत होत आहे.

या इव्हेंटचा एक भाग असलेल्या CII च्या Kaizen स्पर्धेत इंडस्ट्री 4.0 च्या पाठपुराव्यात उदयोन्मुख जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम रूपांतर प्रदर्शित केले. हा मंच केवळ उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी एक व्यासपीठ नाही तर क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगती जाणून घेण्यासाठी म्हणूनही काम करतो. विविध प्रकारच्या औद्योगिक घडामोडींमधील सहभागींना डिजिटल उत्पादन/प्रक्रिया डिझाइन, मास कस्टमायझेशन, रोबोटिक्स, लॉजिस्टिक आणि मटेरियल मूव्हमेंटमधील नवकल्पना सादर करण्याची आणि चर्चा करण्याची संधी होती.

मिसेस महाराष्ट्र २०२३ सीझन ७: अडथळ्यांवर मात

पुणे-दिवा पॅजंट्सतर्फे आयोजित मिसेस महाराष्ट्र २०२३चे ७वे पर्व दिमाखात पार पडले. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या
काळात ही भव्य स्पर्धा पुण्यातील प्रतिष्ठेच्या नोव्होटेलमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेने सौंदर्यस्पर्धांच्या विश्वात एक
दखलपात्र मानक तर स्थापन केला आहेच, शिवाय अनेक पारंपरिक कल्पनांच्या चाकोऱ्या लक्षणीयरित्या मोडल्या
आहेत. बुद्धिमत्ता, करिष्मा आणि सामाजिक जबाबदारीचा गौरव ही स्पर्धा करत आली आहे. 
ही सौंदर्यस्पर्धा वैविध्याचा कलायडोस्कोप होती. विविध वयोगटांतील तसेच क्षेत्रांतील विवाहित स्त्रिया स्पर्धेत
सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक स्पर्धकाची अनन्यसाधारण कहाणी होती. लग्न आणि वय हे स्त्रीच्या प्रवासातील
अडथळे नव्हे, तर तो समृद्ध करणारे घटक आहे हे त्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेने समावेशकतेशी राखलेल्या
बांधिलकीचे प्रतीक म्हणजे यामध्ये एक मूकबधीर स्पर्धक सहभागी झाली होती. सौंदर्य व प्रतिभा या कोणत्याही
सीमेच्या अधीन नाहीत याचे हे प्रभावी विधान होते.
दिवा पॅजंट्सचे संस्थापक अंजना व कार्ल मस्कारहान्स यांची या लोकप्रिय सोहळ्याच्या संकल्पनेत व कार्यान्वयनात
महत्त्वाची भूमिका आहे. केवळ सौंदर्य दाखवणारे नव्हे तर स्त्रीला साचेबद्ध कल्पनांमधून बाहेर पडून आदर्श ठरण्यास
सक्षम करणारे व्यासपीठ निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट राहिले आहे. 
या सोहळ्याला सारा जेन डायस, अक्षय वाघमारे, विराट मडके आणि विंध्या तिवारी आदी सेलेब्रिटी उपस्थित होते.
त्यामुळे कार्यक्रमाला एक वलय व प्रेरणा मिळाली. मान्यवर परीक्षक मंडळात दीप्ती चाको बंगेरा यांचा समावेश होता.
या मंडळाने आपले कौशल्य व ज्ञान यांचा उपयोग करून स्पर्धकांचे परीक्षण करण्याचे आव्हानात्मक काम पार पाडले. 
दिवा पॅजंट्स रूपांतरणात्मक ग्रूमिंगसाठी ओळखले जाते. अंतिम फेरीतील स्पर्धकांना चार दिवसांच्या रूपांतरणात्मक
प्रवासामध्ये, दिवा पॅजंट्सद्वारे पुरवल्या गेलेल्या अविचल मार्गदर्शनाची व सातत्यपूर्ण सहाय्याची भूमिका, खूपच
महत्त्वाची होती.  या काळात स्पर्धकांना तपशीलवार प्रशिक्षण व ग्रूमिंगची संधी प्राप्त झाली. त्यामुळे स्वत:ची
सर्वोत्तम बाजू व्यासपीठावर प्रस्तुत करण्याच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी आवश्यक ते रूपांतरण साधण्यात त्यांना खूप
मदत झाली. हा सक्षम करणारा अनुभव त्यांचा आत्मविश्वास, तोल आणि सादरीकरणाची कौशल्ये यांमध्ये सुधारणा
करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आला होता. त्यातून त्यांना भव्य व्यासपीठावर उभे राहण्यासाठी सज्ज होण्यात
मदत झाली. 
या शोचे नृत्यदिग्दर्शन प्रतिभावान कलाकार पूजा सिंग यांनी केले होते. व्यासपीठ उजळून टाकण्यात त्यांचे कौशल्य व
मार्गदर्शन उपयुक्त ठरले. 
चैतन्य राठी यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सोहळ्याचा प्रवाह अखंड व खिळवून ठेवणारा राहावा यासाठी
त्यांची मोहकता व करिष्मा उपयोगात आणला गेला.  
सिसिलिया सन्याल, मृणाली तायडे आणि स्पेंता पटेल यांनी या भव्य सोहळ्याचा समन्वय अचूकरित्या राखला.
त्यामुळे स्पर्धेचे प्रत्येक अंग परिपूर्णतेने कार्यान्वित झाले. टॅलंट राउंडचे सूत्रसंचालन आणि सब-टायटल क्राउनिंगचे
सूत्रसंचालन आमच्या सर्वोत्तम समन्वयकांपैकी एक असलेल्या मृणालिनी भारद्वाज यांनी केले. 
मिसेस महाराष्ट्र २०२३च्या विजेत्या
सिल्व्हर कॅटेगरी
विजेत्या: हिमानी सिंग
१ल्या उपविजेत्या- नेहा परब
२ऱ्या उपविजेत्या: सुप्रिया तांबे

गोल्ड कॅटेगरी
विजेत्या: शिखा सिंग
१ल्या उपविजेत्या: श्वेता शहारे
२ऱ्या उपविजेत्या: वैशाली हिरे रंगा
एलीट कॅटेगरी
विजेत्या: बिंदू उन्नीकृष्णन
१ल्या उपविजेत्या: निशा कपिला
२ऱ्या उपविजेत्या: रोमा व्हाबी
मिसेस महाराष्ट्र बाय दिवा पॅजंट्स ही भारतातील आघाडीच्या सौंदर्यस्पर्धांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील
स्त्रियांमध्ये कायापालट घडवून आणण्यात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी देण्यात या स्पर्धेने महत्त्वाची
भूमिका बजावली आहे. या सोहळ्याची भव्यता आणि यश यामुळे मिसेस महाराष्ट्र स्पर्धेच्या ७व्या पर्वात तिचे
महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची सौंदर्यस्पर्धा हे स्थान भक्कम झाले.

अमित शहांचे नेहरूंविषयीचे विधान म्हणजे गहन अज्ञान -अभय छाजेड ही संतापले,म्हणाले,’दोषारोप करून इतिहास कसा बदलता येईल?

पुणे- संसदेत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी केलेले काश्मीर बाबतच्या विधानावर कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये संतापाची लहर उठली आहे . येथील स्थानिक कॉंग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी याबाबत अमित सहा यांची खरडपट्टी काढली आहे . ते म्हणाले,’इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेहरूंनी संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याआधी युद्धबंदी केली नसती तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भूभागही भारताकडे राहिला असता. ही टीका करताना पंडित नेहरूंवर चूक केल्याचा आरोप करत असता जम्मू-काश्मीरचे तत्कालीन संस्थानिक हरीसिंग यांच्या घोडचुकीकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करून नेहरुंनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा अजेंडा राबवला आहे.

अभय छाजेड पुढे म्हणाले,’ हरिसिंग यांनी भारतात सामील होण्यास विनाकारण विलंब लावला. महात्मा गांधींनी प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन हरिसिंगांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण हरीसिग त्यालाही बधले नाहीत कारण त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. त्यांना तसे भडकावणारे हिंदू महासभेचे एक सर्वेसर्वा होते. हरीसिंगांच्या निर्णय घेण्यातील विलंबाचा गैरफायदा घेत पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले तेंव्हा कोठे हरिसिंग यांना जाग आली व पंडित नेहरूंकडे लष्करी सहाय्याची मदत मागितली. गांधीजींनीही या लष्करी मदतीला अनुमती दिली. तरीही सामील होतांना हरिसिंग यांनी आपला हट्ट सोडला नाही व त्यातूनच त्यांच्याच हट्टाने ३७० कलमाची निर्मिती झाली.

भारतीय सैन्याने पाकपुरस्कृत टोळीवाल्यांना खो-यातून हाकलण्यात यश मिळवले, पण युनोने (नेहरूंनी नव्हे) युद्धविराम घोषित केल्याने पुढील भाग आजतागायत तसाच पाकच्या ताब्यात राहिला. नवजात राष्ट्राला देशातील साडेपाचशे संस्थाने विलीन करून घ्यायची होती आणि अनेक आघाड्यावर संघर्ष करत राष्ट्राची उभारणी करायची होती. तरीही पंडित नेहरूंनी देशाची घटना अंमलात आल्यापासून (१९५०) ३७० कलमांतर्गत येणा-या तरतुदी एकामागून एक रद्द करत नेण्याला सुरुवात केली आणि ते शेवटी नावालाच राहिले.

हरीसिंगांनी भारतात सामील होण्याचा निर्णय बेळीच घेतला असता तर मुळात हा प्रश्नच उद्भवला नसता हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पण या नावालाच राहिलेल्या कलमाला रद्द करून राष्ट्रप्रेमाचा डंका बडवणे एवढेच माहित असलेल्या अमित शहांनी अशा स्थितीत हरीसिंगांच्या भारतात सामील व्हायचा निर्णय पाक आक्रमणाच्या विपरीत स्थितीत व उशीरा घेण्याच्या अदूरदृष्टीला दोष देण्याऐवजी देशाची भक्कम उभारणी करणा-या पंडित नेहरुंना दोष देणे म्हणजे काही लोकांच्या मनात नेहरू द्वेष किती ठासून भरला आहे याचे कुटील दर्शन घडवणे आहे. अमित शहा यांनी इतिहासाचा आणि तत्कालीन राष्ट्रीय आणि जागतिक स्थितीचा थोडा जरी अभ्यास केला असता तर अशी बेजबाबदार विधाने त्यांनी केली नसती असेही अभय छाजेड यांनी म्हटले आहे.