पुणे- कात्रज ,गोकुळनगर येथे राहणारे , रात्रीचे घरफोडी करणारे २ सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२२/१०/२०२३ रोजी अज्ञात आरोपी यांनी सी जी मार्केटिंग प्रा.लि कंपनीचे ब्रँच, चंदननगर, पुणे याचे लोखंडी जाळीचे गेट कशाचे तरी सहाय्याने वाकवुन त्याचे खालुन प्रवेश करुन नोकीया कंपनीचा मोबाईल व सॅमसंग कंपनीचे ४ टॅब चोरुन नेल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.४९६/२०२३, भा.दं. वि.३८०,४५४,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम, सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व सुमारे २५० सीसीटिव्हि ची पाहणी करुन घरफोडीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) मायकल नवनाथ कांबळे, वय-२८ वर्षे, रा.लेन नं.४, गोकुळनगर, कात्रज, पुणे २) शिवा गोविंद चव्हाण, वय-१९ वर्षे, रा.लेन नं.४, गोकुळनगर, कात्रज, पुणे यांना ताब्यात घेतले असता, त्यांचे ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेले २ टॅब व १ मोबाईल असा एकुण १४,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांचेकडे इतरही चोरीचे ४ मोबाईल मिळुन आलेले असुन त्याचा अधिक तपास करुन पुढील कारवाई चालु आहे. सदरचे आरोपी हे दिवसा फिरुन पाळत ठेऊन रात्रीचे वेळेस घरफोडी करीत असायचे.
सदरची कारवाई हि अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहरसंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती मनिषा पाटील, यांचे दिमतीत तपास पथकाचे सपोनि प्रशांत माने, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउनि प्रमोद हंबीर, पो. अमंलदार दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम, गणेश हंडगर, सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केलेली आहे.
गोकुळनगरमध्ये राहणाऱ्या २ चोरट्यांना अटक
Date: