पुणे ७ : दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यास पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आज पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे फरांदे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणी वर कोयत्याने हल्ला केला गेला ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडला ह्या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आल.
महिला मोर्चाच्या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह आरती कोंढरे, भावना शेळके, श्यामा जाधव , वैशाली नाईक , अश्विनी पवार , रुपाली कदम, थोरविना येनपुरे, रागिणी खडके, कोमल कुटे, उज्वला गौड, सरस्वती अडगळे आणि प्रेरणा तुळजापूरकर यांचा समावेश होता