Home Blog Page 1198

‘इशरे,पुणे’ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार

‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स कडून गौरव

पुणे :

द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) च्या पुणे शाखेला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हॉटेल ली मेरिडियन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचशेहुन जास्त सभासद असलेल्या विभागात पुणे चॅप्टर ला २०२३-२४ चा सर्वोत्तम चॅप्टर म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इशरे ,पुणे चॅप्टर तर्फे हा पुरस्कार अध्यक्ष नंदकिशोर कोतकर आणि नियोजित अध्यक्ष आशुतोष जोशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर यांच्याकडून स्वीकारला. इशरेची संपूर्ण देशात वाढ, प्रगती आणि समृद्धी करण्याकरिता इशरे पुणे चॅप्टर चे माजी अध्यक्ष रमेश परांजपे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इशरे पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष जयंत देशपांडे, दीपक वाणी, वीरेंद्र बोराडे, सदस्य सौ अनुश्री रिसवाडकर आणि सुबोध मुरकेवार याना पुणे चॅप्टर करीता उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला इशरे पुणे चे नंदकिशोर माटोडे, चेतन ठाकूर, सुभाष खनाडे, अमित गुलवाडे, उल्हास वटपाळ ,विमल चावडा , शामकांत मिराशी ,श्री .शशीधर , देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय इशरे चॅप्टर चे १०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. इशरे मुख्यालयाचे पंकज धारकर ,अनुप बलानी , मनीष गुलालकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद

२५ फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजन

पुणे :

‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद रविवार, दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे,सादरीकरणे,खुली चर्चा असे या एकदिवसीय परिषदेचे स्वरूप आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक,अधिकारी सहभागी होणार आहेत.’पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष रवींद्र जायभाये यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

परिषदेत सहभागी होण्यासाठी विनामूल्य पूर्व नोंदणी आवश्यक असून https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeT3qV6Jss4EQGWXOonz0TC0lSFDzBGLFso6npPZ89-DGGghw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&fbclid=IwAR37l-76Sp8k9kbXxMfCRBQ81gY_w4xkW08UJTUTZ5H18wBb9wBr4vNMjng या लिंकवर विनामूल्य नोंदणी करावी किंवा ९८२२८३०७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता होणार असून सत्रासाठी डॉ. दि. मा. मोरे( निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग ),एकनाथ डवले(प्रधान सचिव, ग्रामविकास), सुनील चव्हाण( सचिव, जलसंधारण विभाग), प्रकाश मिसाळ( मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग ) ,शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स), संग्राम गायकवाड ( आयकर आयुक्त,पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.

‘जलयुक्त शिवार / पाणलोट विकास कार्यक्रम – सद्यस्थिती, उपयुक्तता आणि मर्यादा’ या विषयावर सकाळी 10.35 ते 12.00 या वेळॆत चर्चासत्रात राजेंद्र भोसले(संचालक, मृदसंधारण व पाणलोट विकास व्यवस्थापन, पुणे),डॉ. अविनाश पोळ(मुख्य सल्लागार, पाणी फांऊडेशन, सातारा),सुनील कुशिरे(व्यवस्थापकीय संचालक, जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर) हे मार्गदर्शन करणार आहेत.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार हे असणार आहेत.

दुपारी 12.10 ते 01.35 या वेळेत ‘नदीजोड / नदी वळण प्रकल्प-गरज, संधी आणि आव्हाने’ या चर्चासत्रात विनय कुलकर्णी(
निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग), रजनीश शुक्ल(निवृत्त मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग),डॉ. भारत पाटणकर(श्रमिक मुक्ती दल) हे सहभागी होणार आहेत.व्ही.एम.रानडे (निवृत्त सचिव,जलसंपदा विभाग) हे अध्यक्षस्थानी असतील.

दुपारी 02.15 ते 03.40 या वेळेत ‘महाराष्ट्रातील साध्य सिंचन क्षेत्र आणि प्रत्यक्ष भिजणारे क्षेत्र यातील तफावतीची कारणमीमांसा आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात प्रदीप पुरंदरे(माजी प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर), हनुमंत गुणाले(मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे),डॉ. राजेश पुराणिक(प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर)सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे हे अध्यक्षस्थानी असतील.

दुपारी 03.50 ते 05.25 या वेळेत ‘बिगर शासकीय घटकांद्वारे पाणी व्यवस्थापनः धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. एस. ए. कुलकर्णी(निवृत्त सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण), शहाजी सोमवंशी(वाधाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था), रविंद्र उलंगवार(उपाध्यक्ष व प्रमुख -पाणी व्यवस्थापन विलो म्यँथर व प्लॅट पंप्स),प्रांजल दीक्षित(टाटा समाज विज्ञांन संस्था, मुंबई) सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी असतील.

संध्याकाळी 05.25 ते 6.20 या वेळेत समारोप सत्र होणार असून त्यात डॉ. संजय बेलसरे(सचिव, जलसंपदा विभाग),सुनील चव्हाण(सचिव, जलसंधारण विभाग ),शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स),सनदी अधिकारी समीर उन्हाळे हे सहभागी होणार आहेत.

‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ विषयी

शासकीय धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियांमध्ये शासन, नागरी समुदाय, अभ्यासक तसेच सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. अशा प्रक्रियांमध्ये दर्जेदार आणि क्रियाशील सहभाग नोंदवण्यासाठी ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली.

स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करियर्स (एसआयएसी) या संस्थेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ ही संस्था स्थापन केली आहे. नव्वदच्या दशकामध्ये यूपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी कुठलीही शासकीय अथवा खाजगी व्यवस्था महाराष्ट्रात नसताना महाराष्ट्र शासनाने एसआयएसी ही संस्था मराठी टक्का वाढवण्यासाठी स्थापन केलेली होती. या संस्थेतून मार्गदर्शन घेतलेल्या बऱ्याच जणांची राज्य किंवा केंद्रीय शासनामध्ये शासकीय सेवांमध्ये निवड झाली तर काही जणांनी बिगर शासकीय क्षेत्रामध्ये करिअर केले. गेल्या काही वर्षांपासून हा गट अनौपचारिक स्वरूपात कार्यरत आहे. एसआयएसीचेच माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक श्री विजय जाधव यांच्या अकाली मृत्यूनंतर ‘विजय जाधव प्रतिष्ठान’ या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या अंतर्गत सांस्कृतिक आणि स्वयंसेवी स्वरूपाचे विविध उपक्रम या गटाने हाती घेतलेले होते. या उपक्रमांचा पुढचा टप्पा म्हणून ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली आहे. भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ठोस धोरणे आणि अंमलबजावणीच्या रचना सुचवणारे अनेक उपक्रम संस्थेकडून प्रस्तावित आहेत.

मेट्रो, सायन्स पार्कच्या सफरीने हरखली मुले

पुणे : मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी…चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल… समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे… सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून अवकाशात मारलेला फेरफटका… लढाऊ विमानाची प्रतिकृती… मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरखलेली मुले… असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला.
वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग, फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले. तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
जनता वसाहत, दांडेकर पूल, अप्पर-सुप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड आदी १५ वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला. यावेळी २०० मुले व ५० हून अधिक पालक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली. मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर म्हणाल्या, “मागील ३८ वर्षांपासून समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी काम करत असलेल्या वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभिरुची वर्गात मुलांना जीवन कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव, पोषक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सहल,चित्रकला,हस्तकला इ. विविध उपक्रमातून केला जातो. नैसर्गिक साधन संपत्तीचा आनंद घेण आणि तिची जोपासना करण, रक्षणं करणं इ. मूल्यशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून मुलांना मिळतात. छोट्याप्रमाणेच मोठ्यांनाही या सफरीतून त्यांचे बालपण पुन्हा अनुभवायला मिळाले.
प्रथमच मेट्रोमध्ये बसणाऱ्या या मुलांना मेट्रोची माहिती, चढते-उतरते सरकते जिने, चेकइन इ. शिस्तबद्ध प्रणाली अनुभवता आली. सायन्स पार्कमध्ये विज्ञान खेळणी, थ्रीडी शो आणि तारांगणाचा अद्भुत अनुभव घेतला. कोणत्याही दडपणाखाली नसलेली, मुक्तपणे बागडणारी मुले आपसूकच या सारख्या उपक्रमांतून शिस्त, नियोजन, अशा विविध गोष्टी शिकतात. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते, असेही त्यांनी नमूद केले.
फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे, अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालीया यांसह अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तर सहलीचे नियोजन तेजस्विनी थिटे यांनी केले.

रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला

0
  • उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी

  • उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीतरसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

अमीन सयानींचा आवाज कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील

0

मुंबई, दि. २१ : अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक आणि आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील.” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणतात की, रेडिओ विश्वातील आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. भारतात आकाशवाणीला लोकप्रिय बनविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ‛बिनाका गीतमाला’ च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात त्यांचा आवाज पोहोचला होता. अलीकडेच त्यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेऊन एका दिग्गज कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाले. रेडिओ विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, लिविंग लिजेंड अवार्ड, पर्सन ऑफ द इयर, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने आवाजाच्या कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

अमीन सयानी यांना राज्यपालांची श्रद्धांजली

0

मुंबई, दि. २१ : राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आकाशवाणी व रेडिओ सिलोनवरील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अमीन सयानी यांनी हजारो सांगीतिक कार्यक्रम व जिंगल्स द्वारे जगभरातील रसिकांची मने जिंकली. ‘बहनो और भाईयो’ ही त्यांची उद्घोषणा देखील अतिशय लोकप्रिय ठरली.

 त्यांच्या अनोख्या शैलीमुळे रेडिओ सिलोनवरील गीतमाला व इतर कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या निधनामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील एक शैलीदार रेडिओ उद्घोषक व आवाजाचा जादूगार गमावला आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज … अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

0

जी हां भाइयों और बहनों, मैं हूं आपका दोस्त अमीन सयानी और आप सुन रहे हैं बिनाका गीतमाला’ रेडीओ वरील या आवाजाने भारत आणि भारताबाहेर देखील ज्यांनी जादुई पद्धतीने बॉलीवूड च्या गाण्यांची घरोघर मैफिल जमविली ,असेरेडिओ/ विविध भारतीचे सर्वांत प्रसिद्ध अनाऊंसर आणि टॉक शोचे निवेदक अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अमीन सयानी (Ameen Sayani passed away) यांचा मुलगा राजिल सयानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.यानी यांच्या निधनाव रराष्ट्रपती द्रौपदी मूर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी शोक व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी सहा वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांचं निधन झालं. रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.अमीन सयानी (Ameen Sayani passed away) यांनी जवळपास 19 हजार जिंगल्सना आपला मधुर आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. त्यांना दर आठवड्याला जवळपास 65 हजार पत्रं यायची.

देशातील मोठी कारवाई:पुणे पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत साडेतीन हजार कोटीचे अंमली पदार्थ पकडले -८ जणांना अटक,आता मोर्चा सांगलीवर …

पुणे- पावणेदोन किलो साठा पकडण्याची पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता 1700 किलो एमडी चा साठा जप्त करण्यापर्यंत पोहोचली असून आतापर्यंत 3500 कोटी रूपये किंमतीचे MD पकडण्यात आलेआहे. पुणे कुरकुंभ आणि दिल्लीमध्ये केलेल्या कारवाई नंतर आता सांगली जिल्ह्यात पुणे पोलिसांनी छापे सुरु केले असल्याची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे. देशभर पुणे पोलिसांच्या नावाची जबर दहशत या कारवाईने निर्माण होणार असून देशातील लक्षणीय कामगिरी पुणे पोलीस करत आहेत. ही कारवाई पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) राजधानी दिल्लीमध्ये छापेमारी (Pune Police Raids In Delhi) करून तब्बल 970 किलो एमडी जप्त केले असून त्याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. दिल्ली येथील कुरिअर कंपनीमधून लंडन येथे देखील पार्सलने एमडी Mephedrone (MD) गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील विश्रांतवाडी, पुणे ग्रामीणमधील कुरकुंभ आणि दिल्लीमधून एकुण 1700 किलो एमडी जप्त केले असून त्यामध्ये 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका केमिकल एक्सपर्टचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पुणे शहरातील विश्रांतवाडी आणि इतर भागातून तसेच पुणे जिल्हयातील कुरकुंभ येथील एका कारखान्यातून पुणे पोलिसांनी एकुण 717 किलो एमडी जप्त केले आहे तर दिल्लीमधून 970 किलो असे एकुण 1700 किलो एमडी जप्त केले असून त्याची किंमत ही 3500 कोटी रूपये आहे. पुणे पोलिसांची पथके देशातील 12 ते 15 शहरात सर्च ऑपरेशन करीत आहेत. सांगली येथे देखील पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे.आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात एकुण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हे ऑपरेशन अजून देखील सुरू असून याची व्याप्ती वाढत जात आहे. पुणे पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.ड्रग्ज रॅकेट चालविणार्‍यांची पाळमुळं शोधल्याशिवाय पुणे पोलिस गप्प बसणार नाहीत. दरम्यान, दिल्ली येथील कुरिअर कंपनीमधून देशाबाहेर देखील ड्रग्ज सप्लाय झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित

‘ही अनोखी गाठ’१ मार्च रोजी

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले असून यानिमित्ताने गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे.

या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, “अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्याला संगीतही त्याच ताकदीचे लाभले आहे. या गाण्यात अनेक भावना दडल्या आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिच्या हावभावातून अनेक गोष्टी व्यक्त होतात. या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे चित्रपटाचा आत्मा असतो, त्यामुळे चित्रपटाच्या कथेइतकेच महत्व गाण्यांनाही आहे आणि ही जबाबदारी वैभव जोशी आणि हितेश मोडक यांनी लीलया पार पाडली आहे. संगीतप्रेमींना ही गाणेही आवडेल, यात शंका नाही.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. वेगळ्या धाटणीची आहेत. या गाण्यातही प्रेम, विरह अशा विविध भावना आहेत. त्यात या गाण्याला मोहक नृत्य अदाकारी लाभली आहे.

जिल्हा न्यायालयात सामाजिक न्याय दिवस साजरा


पुणे दि.20- जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, पुणे व फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्राम, एनएलयू दिल्ली तसेच पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अशोका हॉल येथे जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी नांदेडकर, एस. जी. वेदपाठक व ए. एस. वाघमारे, फेअर ट्रायल फेलोशिपच्या ऑपरेटिंग डायरेक्टर श्रीमती मेधा देव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे पुरस्कार प्राप्त ‘चिरभोग’ ही लघुचित्रफीत दाखवून करण्यात आली.

यावेळी न्या.महाजन यांनी मार्गदर्शन करतांना समाजातील भेदभाव दूर करण्याविषयी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सचिव श्रीमती पाटील यांनी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी ‘एससी-एसटी मित्र सेल’ स्थापन केल्याचे घोषित केले. सेलच्या कामकाजाची जबाबदारी ॲड.के. एन. पुजारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एससी-एसटी मित्र सेलमार्फत नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी श्रीमती पाटील यांनी केले.

‘सामाजिक न्याय’ या विषयावरील समूह चर्चेत ॲड. नीलिमा वर्तक ॲड. राहुल देशमुख व ॲड. देवानंद शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर

पुणे, दि.२०: माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी माध्यमांना निवडणूक प्रक्रीयेविषयी माहिती देण्यासोबत दिलेल्या जबाबदाऱ्याप्रमाणे चोखपणे काम करावे, असे आवाहन लोकसभा निवडणूक माध्यम समन्वयक तथा माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे सद्सय सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचे माध्यम समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पाटोदकर म्हणाले, लोकसभा निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भात माहिती संकलन करणे, समाजमाध्यमाद्वारे मतदार जनजागृती करणे, पत्रकारांना प्राधिकार पत्र देण्याची कार्यवाही, पेडन्यूज, जाहिरात प्रमाणीकरण आदी कामे करण्यात येतात. पेड न्यूजबाबत संशयास्पद वृत्त अथवा प्रमाणिकरण न केलेल्या जाहीरातीसंदर्भात समन्वयक अधिकाऱ्यांनी तात्काळ समितीला अवगत करावे.

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीविषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याची प्रसिद्धी करावी. सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या समन्वयाने माध्यम कक्ष स्थापन करावे. माध्यमांना आपापल्या मतदारसंघात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे डॉ. मोघे यांनी सांगितले.

नागरिकांना निवडणूक प्रक्रीयेविषयी माहिती देण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यावर भर द्यावा अशा सूचना देतानाच त्यांनी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांची कार्ये व जबाबदाऱ्या, त्यांनी करावयाच्या कामकाजाविषयी डॉ.मोघे यांनी माहिती दिली.
0000

अवैध हॉटेल मध्ये मद्यपान करणाऱ्या ग्राहकांची प्रत्येकी हजार रुपयांच्या दंडावर कोर्टातून झाली सुटका …

“अवैध हॉटेल ढाबा व चायनीज सेंटरमध्ये दारू पिणाऱ्या ग्राहकांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका ” …

पुणे- परमिट नसलेले हॉटेल , ढाबे आणि चायनीज च्या हातगाड्या ,ठेले या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दणके द्यायला सुरुवात केली आहे. अशाच एका प्रकरणात हॉटेल चालकाला २५ हजार रुपयांचा दंड भरून कोर्टातून आपली सुटका करवून घ्यावी लागली तर ग्राहकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड भरून सुटका करवून घ्यावी लागली आहे.
दिनांक १८/०२/२०२४ रोजी विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षकचरणसिंग राजपूत उपअधीक्षक सुजित पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग पिंपरी, पुणे या पथकाने मद्यपींना अवैधरित्या मद्य पिण्यास परवानगी देत असलेल्या च-होली बु. परिसरातील च-होली धानोरी रोड च्या डाव्या बाजूस, हॉटेल आराध्य मध्ये च-होली बु. ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी म.दा.का. १९४९ चे कलम ६८ व ८४ अंतर्गत कारवाई करून गुन्ह्याची नोंद केली. हॉटेल चालक १) देवनाथ गंगाधर गायकवाड, वय २८ वर्षे, रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे याच्यावर म.दा.का. १९४९ चे कलम ६८ अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच सदर हॉटेल मध्ये मद्य पिणारे २) विजय कंकन विश्वास, वय-२२ वर्षे, रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे. ३) बिरबल भरत सरकार, वय-२९ वर्षे रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे. यांचेवर म.दा.का. १९४९ चे कलम ८४ अन्वये गुन्हा नोंद करून एकूण रुपये २३९०/- किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व आरोपींना आज दि. २०/०२/२०२४ रोजी मे. खडकी न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने हॉटेल चालकास रु. २५०००/- व मद्य पिणाऱ्या आरोपीना प्रत्येकी रु. १०००/- अशी एकूण रु. २७०००/- ची दंडाची शिक्षा सुनावली.
सदर कारवाईत निरीक्षक एस. जे. मोरे, दुय्यम निरीक्षक श्रीमती एम. बी. गडदरे व एस. जी. कोतकर, स.दु.नि. डी. के. पाटील व जवान आर. आर. गायकवाड, ए. एन. बारंगुळे, इत्यादींनी सदर कारवाईत भाग घेतला.
तरी नागरिकांना राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत असे आवाहन करण्यात येते कि, अशा प्रकारच्या अवैध ठिकाणी मद्य सेवन करू नये अन्यथा अशा स्वरूपाच्या न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल.

छत्रपती संभाजी साहित्य संमेलन १२ मार्च रोजी सासवडला

संमेलनाचे मुख्य प्रवर्तक दशरथ यादव यांची माहिती

पुणे, दि. १८ : राज्यस्तरीय पंधरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२४ रोजी सासवडला होणार आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून, संमेलनात ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन,. कविसंमेलन, नाट्यप्रयोग उद्घाटन समारंभ असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव , विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे डॉ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, दत्ता भोंगळे, संजय सोनवणे, दिपक पवार, अरविंद जगताप, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, विजय तुपे, डॉ भालचंद्र सुपेकर आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कथाकार, कलावंत यांनी 9881098481 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे.

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा एतिहासिक निर्णय• चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वागत

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ते ट्वीटर् वरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात ते म्हणाले, की आजचा हा निर्णय अंत्योदयाला न्याय्य मिळवून देणारा आहे. गेली काही वर्षे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची आग्रही मागणी सरकारने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली.

मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे, मात्र ते देताना सरकारनेओबीसी व इतर कोणत्याही समाजावर अन्याय करू नये ही आमची मागणी होती. त्या मागणीचा सन्मान सरकारने ठेवला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

सरकारने गेल्या चार महिन्यात अतिशय पारदर्शी व प्रामाणिक प्रयत्न यासाठी केले. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग नेमला. महसूल विभागाकडून अतिशय शास्त्रीय राज्यव्यापी सर्वेक्षण केले. अखेर, आज शेवट गोड झाला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महायुती सरकारने बहाल केले.

आजचा दिवस खूप मोलाचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, हेच लोककल्याणकारी सरकारचे प्रथम कर्तव्य असते, ते आज या सरकारने सिद्ध केले. पूर्वीच्या त्रुटी दूर करून न्यायालयाने आखून दिलेल्या मर्यादेबाहेर जाऊन आरक्षण दिले.. बहुजन हिताय असा नारा बुलंद करत आरक्षणाची तटबंदी अधिक मजबूत केली.
असे धाडसी निर्णय घेण्यासाठी विलक्षण राजकीय इच्छाशक्ती असावी लागते.. सरकार जनतेचे असावे लागते, ते आज बावन्नकशी उजळून निघाले. कायद्याच्या चौकटीत राहून व कसोटीवर घासून सरकारने सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त केला. सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला, त्याबद्दल मी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो.

जिल्ह्यातील नागरिकांना ‘शिवगर्जना’ महानाट्य पाहण्याची संधी -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. २०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पुणे जिल्ह्यात ‘शिवगर्जना’ महानाट्याचे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी, प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे २४ ते २६ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वाजता आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पाहण्यासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार या महानाट्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे.

जवळपास तीनशे कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर, चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंगातून खराखुरा निखळ आणि धगधगत्या इतिहासाची आठवण या महानाट्यातून होणार आहे. तीन तासात संपूर्ण इतिहासाचे दर्शन, नेत्र सुखद अतिषबाजी, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्रमुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिट्ये आहेत.

अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराजांची हत्या, शिवजन्म, युद्ध कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सूरतची लूट, कोकण मोहीम, पुरंदरचा वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरेंचे बलिदान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा हे प्रसंग महानाट्यात समाविष्ट आहेत. महानाट्य पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.