“अवैध हॉटेल ढाबा व चायनीज सेंटरमध्ये दारू पिणाऱ्या ग्राहकांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका ” …
पुणे- परमिट नसलेले हॉटेल , ढाबे आणि चायनीज च्या हातगाड्या ,ठेले या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दणके द्यायला सुरुवात केली आहे. अशाच एका प्रकरणात हॉटेल चालकाला २५ हजार रुपयांचा दंड भरून कोर्टातून आपली सुटका करवून घ्यावी लागली तर ग्राहकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड भरून सुटका करवून घ्यावी लागली आहे.
दिनांक १८/०२/२०२४ रोजी विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षकचरणसिंग राजपूत उपअधीक्षक सुजित पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग पिंपरी, पुणे या पथकाने मद्यपींना अवैधरित्या मद्य पिण्यास परवानगी देत असलेल्या च-होली बु. परिसरातील च-होली धानोरी रोड च्या डाव्या बाजूस, हॉटेल आराध्य मध्ये च-होली बु. ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी म.दा.का. १९४९ चे कलम ६८ व ८४ अंतर्गत कारवाई करून गुन्ह्याची नोंद केली. हॉटेल चालक १) देवनाथ गंगाधर गायकवाड, वय २८ वर्षे, रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे याच्यावर म.दा.का. १९४९ चे कलम ६८ अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच सदर हॉटेल मध्ये मद्य पिणारे २) विजय कंकन विश्वास, वय-२२ वर्षे, रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे. ३) बिरबल भरत सरकार, वय-२९ वर्षे रा. पठारेमळा, च-होली बु. ता. हवेली जि. पुणे. यांचेवर म.दा.का. १९४९ चे कलम ८४ अन्वये गुन्हा नोंद करून एकूण रुपये २३९०/- किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व आरोपींना आज दि. २०/०२/२०२४ रोजी मे. खडकी न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने हॉटेल चालकास रु. २५०००/- व मद्य पिणाऱ्या आरोपीना प्रत्येकी रु. १०००/- अशी एकूण रु. २७०००/- ची दंडाची शिक्षा सुनावली.
सदर कारवाईत निरीक्षक एस. जे. मोरे, दुय्यम निरीक्षक श्रीमती एम. बी. गडदरे व एस. जी. कोतकर, स.दु.नि. डी. के. पाटील व जवान आर. आर. गायकवाड, ए. एन. बारंगुळे, इत्यादींनी सदर कारवाईत भाग घेतला.
तरी नागरिकांना राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत असे आवाहन करण्यात येते कि, अशा प्रकारच्या अवैध ठिकाणी मद्य सेवन करू नये अन्यथा अशा स्वरूपाच्या न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल.