Home Blog Page 1122

स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी पुढील पिढीला तयार करू हाच शिवरायांना मानाचा मुजरा -शिवव्याख्याते सौरभ करडे

गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या ‘शिवसूर्य’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा
पुणे : भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही भाग्यवान आहे, कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे लाभले आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एक भाग आहोत, हे भान ठेवून प्रत्येकाने जगले पाहिजे. स्वराज्य त्यांनी दिले, परंतु आता हे स्वराज्य सुराज्य करण्यासाठी पुढील पिढी शिवजयंतीत कशी सामील होईल याची तयारी करू. हाच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरा मानाचा मुजरा असेल, असे मत शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी व्यक्त केले.  

गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या वतीने शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे करण्यात आले. यावेळी हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, अॅड. प्रताप परदेशी, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर,रवींद्र भन्साळी,संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे,विजय चौधरी उपस्थित होते. यावेळी प्रतापराव गुजर, येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारताला दिलेले वरदान म्हणजे आरमार याविषयी त्यांनी माहिती दिली. 

सौरभ करडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य दिले. परंतु हल्ली हिंदवी स्वराज्यातील हिंदवी हा शब्द काढला जातो. औरंगजेब, शहाजान, अकबर यांच्या अनेक पिढ्या गेल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर कोणीही हिंदूत्व या मातीपासून वेगळे करू शकले नाही, असे ही त्यांनी सांगितले. 

अशोक गुंदेचा म्हणाले, आज प्रत्येकजण पैसे कमविण्याचे मागे धावत आहे. परंतु त्यामुळे त्याची समाजाशी नाळ तुटत चालली आहे. माणसाला समाजाशी जोडून ठेवण्याचे काम सामाजिक संस्था आणि मंडळे करतात, असेही त्यांनी सांगितले.

अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी ती अंगावर घेतल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आज तरुणांना कष्टाची सवय नाही. त्यासाठी चांगला मित्र, चांगली सोबत असणे गरजेचे आहे. धर्म टिकला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज घडेल आणि समाज घडला तर राष्ट्र टिकेल असेही त्यांनी सांगितले.

किशोर चव्हाण म्हणाले, शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येते. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.  

पीएन गाडगील ज्वेलर्स लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपनीपैकी एक कंपनी आहे. जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेट्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दुस-या क्रमांकाच्या कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“SEBI”) दाखल केला आहे.

कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10 च्या एकूण मूल्य  8,500 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा आणि दर्शनी मूल्य 10 रुपये असलेल्या 2,500 दशलक्ष रुपयांच्या  इक्विटी समभागांच्या विक्रीची ऑफरचा या ताज्या इश्यूमध्ये समावेश आहे. दर्शनी मूल्य 10 रुपये असलेले एकूण 11,000 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा यात समावेश आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये SVG बिझनेस ट्रस्टच्या (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) 2,500  दशलक्ष रुपयांच्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

IPO द्वारे उभारलेला निधी महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड किंवा पूर्व-पेमेंटसाठी, सामान्य कॉर्पोरेट  खर्चाच्या निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.

पी एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलर्सपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेटसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. FY21 आणि FY23 मधील महसुलाच्या वाढीवर आधारित, कंपनी भारतातील प्रमुख संघटित ज्वेलर्समध्ये सर्वात वेगाने वाढणारा ज्वेलरी ब्रँड आहे. कंपनीने FY21 आणि FY23 दरम्यान 56.50% ची EBITDA वाढ मिळवली. तसेच FY23 मध्ये प्रति चौरस फूट सर्वाधिक महसूल मिळवला, जो भारतातील प्रमुख संघटित ज्वेलरी खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे.

31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीने 33 स्टोअर्सपर्यंत विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील 18 शहरांमध्ये 32 स्टोअर्स आणि यूएस मधील एक स्टोअरचा समावेश आहे. याचे एकूण किरकोळ क्षेत्र अंदाजे 95,885 चौरस फूट आहे. सर्व स्टोअर्स चालवल्या जातात आणि व्यवस्थापित केल्या जातात. 23 मालकीची स्टोअर्स आणि 10 फ्रँचायझी स्टोअर्स आहे. फ्रँचायझी मालकीची आणि कंपनी संचालित (“FOCO”) मॉडेलवर हे स्टोअर्स चालवले जातात. या स्टोअर्सपैकी, 19 स्टोअर्स मोठे स्टोअर्स आहेत (2,500 चौ. फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाची), 11 स्टोअर्स मध्यम स्वरूपाची आहेत (1,000 चौ. फूट ते 2,500 चौ. फूट दरम्यानचे क्षेत्रफळ असलेली) आणि 3 स्टोअर्स लहान आहेत (1,000 चौ. फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले). याव्यतिरिक्त कंपनीने मार्च 2022 मध्ये मोबाइल ॲप्लिकेशन “PNG ज्वेलर्स” लाँच केले आहे. डिजिटल उपस्थितीमुळे ग्राहकांना नवीन डिझाइन्स आणि कलेक्शन्सबद्दल अपडेट ठेवता येते आणि त्यांना उत्पादन पोर्टफोलिओची ओळख करून देता येते. ज्यामुळे ग्राहकांचा स्टोअरमधील अनुभव वाढतो. सर्व दागिन्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील आणि बाहेरील 75 पेक्षा जास्त अनुभवी आणि कुशल कारागीर  करतात. ब्रँडचा प्रचार करण्यासाठी त्यांनी सध्या माधुरी दीक्षितला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

‘पीएनजी’ ब्रँडने त्याचा वारसा ‘पी एन गाडगीळ’ ब्रँडकडून घेतला आहे, ज्याचा 1832 पासूनचा समृद्ध वारसा आहे आणि एक शतकाहून अधिक काळाचा वारसा आहे. ‘पीएनजी’ ब्रँडची परंपरा आणि वारसा जपत कंपनीने महाराष्ट्रात एक मजबूत ब्रँड निर्माण केला असून, आपली उपस्थिती वाढवली आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरी यासह मौल्यवान धातू / दागिन्यांची उत्पादने विविध किंमती आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. जे ग्राहकांच्या गरजा भागवतात आणि विशेषत: विवाहसोहळे, एंगेजमेंट, वर्धापनदिन आणि सण, तसेच दररोज परिधान केलेले दागिने यासारख्या खास प्रसंगांसाठी डिझाइन केलेले संग्रह समाविष्ट करतात. प्रवर्तक, सौरभ विद्याधर गाडगीळ हे सहाव्या पिढीतील उद्योजक आहेत आणि त्यांना भारतातील ज्वेलरी उत्पादन उद्योगात 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी पारंपारिक कौटुंबिक व्यवसायाला समकालीन ब्रँडमध्ये रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलवाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

हडपसर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

पुणे दि. २७- लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारंसहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हडपसर येथील साधना विद्यालय येथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी यांच्या हडपसर येथे आयोजित बैठकीत करण्यात आले.

बैठकीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी नागनाथ भोसले यांनी नेमण्यात आलेले भरारी पथक, मतदान केंद्र आणि सहाय्यकारी मतदान केंद्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.

निवडणूक शांततेत, निर्भयपणे आणि मुक्त वातावरणात पार पडावी आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रीया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. त्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख आणि गणेश इंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बहुल भागात मतदार जागृती

पुणे,दि.27 – शिरुर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजजवळील आदिवासी बहुल भागात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी समाजातील विविध घटकांच्या सहभागाने प्रशासनातर्फे विविध जनजागृतीचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मतदान प्रक्रियेत मतदानाचे प्रमाण व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढावा यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला असून मतदार जनजागृतीसाठी ग्रामीण भागामध्ये उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शिरुर मतदारसंघात व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.‘युवकांचे मतदान-राष्ट्र निर्माणातील योगदान’ जागृत नागरिक होऊ या-अभिमानाने मत देवू या, या व अशाप्रकारच्या विविध घेाषणा फलकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेविषयी आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आदिवासी भागात पथकाने मार्गदर्शन केले. मतदानाचा दिनांक, मतदानाचा कालावधी तसेच मतदान केंद्रावरील सुविधा याबाबत नव मतदार, तरुण, वयोवृद्ध नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी अंबेगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आंबेगाव येथे मतदारांकडून मतदान करण्याबाबत संकल्पपत्र भरून घेण्यात आले. तसेच त्यांना मतदान केंद्राची माहिती कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातर्फे मतदार जागृती फेरी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्चअखेर सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

पुणे, दि. २७: नवीन वाहन नोंदणी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार २९ मार्च ते रविवार ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील महसूली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने गुड फ्रायडे २९ मार्च, शनिवार ३० मार्च व रविवार ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगीक करवसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभागाचे (महसूल जमा होणारे कामकाज) कामकाज कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.

जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी सुमारे ३९ लाख रुपये महसूल जमा

पुणे, दि. २७: पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ११ वाहनांचा ६ मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला असून त्यामध्ये ३८ लाख ९० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

कर न भरलेली व गुन्ह्यात अटकावून ठेवलेली १३ वाहने ई- लिलावासाठी उपलब्ध होती. यात बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या मालकांनी वेळोवेळी संधी देऊनही थकीत कर भरणा केला नसल्याने या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई- लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी ११ वाहनांना ऑनलाईन बोली प्राप्त झाली व त्यानुसार महसूल प्राप्त झाला आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत जाहीर ई-लिलावाद्वारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय महसूल वसूल करण्याची कार्यवाही केली आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीकरीता यापुढेही ई-लिलाव केले जातील याची नोंद घेऊन थकीत मोटार वाहन कर भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा-कविता द्विवेदी

पुणे, दि.२७: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राबाबत सूक्ष्म नियोजन करावे आणि स्थलांतरीत कामगारांचे मतदान सुलभ होईल यासाठी कृतीयोजना तयार करावी, अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपायुक्त समिक्षा चंद्राकार, बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमावर अधिक भर द्यावा. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मतदानाबाबत माहिती द्यावी, यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निश्चित करून त्याची माहिती सादर करावी. अशा मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील आणि अत्यंत सुलभपणे मतदान होईल अशी व्यवस्था करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.

यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण, टपाली मतदान, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

पुणे महापालिकेने ठेकेदारांचे लाड थांबवावे ; आम आदमी पक्षाची मागणी

पुणे- महानगरपालिका हे शहरांमध्ये विविध कामे करताना टेंडर प्रक्रिया पार पाडून ठेकेदारांना टेंडरच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळी कामे देवू करते परंतु ही कामे करताना ठेकेदारांकडून मात्र टेंडरच्या अटी शर्तींचे उल्लंघन होताना सर्रास दिसून येते. असा आरोप करत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 महात्मा फुले पेठ भागातील सहस्त्रअर्जुन नागरी सहकारी पतसंस्था ते सावधान मंडळ या ठिकाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण केले आहे. सध्या परिस्थितीत या ठिकाणी सार्वजनिक शौचालया च्या ड्रेनेज लाईनचे काम झाले असून, ते एकदम निकृष्ट दर्जेचे झालेले असून सदर कामासाठी वापरलेले सिमेंट तसेचं डस्ट पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निघाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.अशी तकरार आम आदमी पार्टीने केली आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा निषेध नोंदविण्यात आला असून याबाबतची माहिती क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क करून वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून सदर तक्रारी बाबत ठेकेदाराच्या विरुद्ध कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याने ठेकेदार हे महापालिकेचे जावई आहेत का ? असा प्रश्न विचाण्यात येतो आहे .या ड्रेनेज लाईनच्या निकृष्ट दर्जाच्या कामा संदर्भात महानगरपालिकेमधील कोणताही अधिकारी दखल घेत नसल्याचे ठेकेदारांचे व महापालिकेतील अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे चित्र निर्माण होत आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे जर होणार असतील तर महापालिकेने अशी कामे त्वरित थांबवावी. कारण कामाचा दर्जा पाहता सदरील ड्रेनेज लाईन निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यामध्ये मैला पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना सदर गोष्टींचा त्रास होईल अशी शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता लागण्या अगोदर जो महापालिकेने कामाचा धडका चालू केला व गडबडीत टेंडर पास करून घेतले त्या सर्व घाईगडबडीमुळेच ठेकेदार कामे नीट करत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे यांनी केला. ते पुढे म्हणाले, आता हे बघावे लागेल की भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हा रोड दुरुस्ती करण्यासाठी त्याच ठेकेदाराला काम करायला सांगणार आहे का दुरुस्तीसाठी नवीन टेंडर काढणार आहे ?

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप..

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.. त्यांच्या गावभेट दौऱ्याची सुरुवात बारामती शहरातून करण्यात आली.. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आले.दरम्यान, समाजकारणातील कामगिरीनंतर सुनेत्रा पवार या आता पक्ष संघटनेतही सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी:’वंचित’ने 8 उमेदवार केले जाहीर

अकोले-प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मविआला धक्का बसला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी आपण वंचितसाठी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले नाही, अजून वेळ आहे त्यांनी मविआसोबत यावे असे म्हटले होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडी राज्य समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणासर आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज्य समितीने घेतला आहे. 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल.बहुजन महासंघाचा अविश्वसनीय अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकर यांनी यापूर्वी यशस्वी करुन दाखवला होता. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी या पॅटर्नला कोणत्याही पक्षाला दुर्लक्षित करता आलेले नाही. गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ दिले.आम्ही जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते-मविआ नेत्यांवर आरोप -प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले होते. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळमधील महापौरांची बेपत्ता झालेली मुलगी गोव्यात सापडली

नेपाळमधील धनगढी शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आरती दोन दिवसांनी सापडली आहे. उत्तर गोव्यातील मंद्रेम येथील एका हॉटेलमध्ये आरती सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओशोंची अनुयायी असलेली 36 वर्षीय आरती गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात ध्यान करत होती. सोमवारपासून (25 मार्च) ती बेपत्ता होती.सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ती अश्वेम पुलाजवळील एका वेलनेस सेंटरमध्ये अखेरची दिसली. आरतीचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी शोधमोहीमही सुरू केली होती. मुलीचा शोध घेतल्यानंतर महापौर गोपाल यांनी सोशल मीडियावर लोकांचे आभार मानले आहेत.वडिलांनी लोकांच्या मदतीबद्दल आभार मानलेपोस्टमध्ये त्यांनी लिहिले- आरती सध्या खूपच अशक्त आहे. माझ्या मुलीचा शोध घेणाऱ्या सर्व लोकांचे तसेच गोव्यात राहणाऱ्या मदतनीस नेपाळी बंधू-भगिनींचे मी आभार मानतो. सोमवारी रात्री 9.30च्या सुमारास उत्तर गोव्यातील अश्वेम पुलाजवळ आरती शेवटची दिसली.

तिची धाकटी बहीण आरजू हमाल सोशल मीडियावर म्हणाली – काही कॉलरनी मला माहिती दिली आहे की आरतीला सिओलिमजवळील पुलावर शेवटचे पाहिले होते. नेपाळमधील वृत्तपत्र हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार, आरती काही काळ ओशो ध्यान केंद्राशी संबंधित होती.महापौर गोपाल यांनी आपल्या मुलीची माहिती देण्यासाठी नंबर शेअर केला होता.

यापूर्वी महापौर गोपाल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते – “माझी मुलगी, आरती ही एक ओशो ध्यानी आहे जी काही महिन्यांपासून गोव्यात राहते. मला तिच्या मैत्रिणीचा मेसेज आला की, ती गेल्या दोन दिवसांपासून केंद्रातून बेपत्ता आहे. माझी दुसरी मुलगी आरजू आणि जावई आरतीचा शोध घेण्यासाठी गोव्याला जात आहेत. माझ्या मुलीबद्दल काही माहिती असल्यास 9794096014 / 8273538132 / 9389607953 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

मेडिटेशन सेंटरचे व्यवस्थापक आनंद प्रेम कटिपाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ही महिला गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहत होती. ती एकटीच फिरत होती आणि अनेकदा सुट्टीसाठी गोव्याला जात असे. काल रात्री ती पुलाजवळ दिसली. सकाळी ती परत न आल्याने आम्ही तिच्या कुटुंबीयांना तसेच पोलिसांना कळवले होते.

केजरीवाल अटकेचे विविध राष्ट्रात पडसाद -भारताने म्हटले,ढवळाढवळ नको:अमेरिकन राजदुतांना भारताचे समन्स

दिल्ली- येथील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेच्या वक्तव्यानंतर एका दिवसानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी अमेरिकन मुत्सद्दी ग्लोरिया बारबेना यांना समन्स बजावले. दुपारी 1.10 वाजता त्या परराष्ट्र मंत्रालयात पोहोचल्या. ही बैठक 40 मिनिटे चालली.यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकेच्या वक्तव्याचा विरोध केला. म्हणाले, भारतातील कायदेशीर कारवाईबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे विधान चुकीचे आहे. मुत्सद्देगिरीमध्ये देश एकमेकांच्या अंतर्गत समस्या आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील अशी अपेक्षा असते.खरं तर, जर्मनीनंतर मंगळवारी अमेरिकेनेही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.परराष्ट्र मंत्रालय पुढे म्हणाले – जर दोन देश लोकशाहीवादी असतील, तर ही अपेक्षा वाढते, अन्यथा अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतातील कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर आधारित आहे. त्याची निंदा करणे किंवा प्रश्न उपस्थित करणे मान्य केले जाणार नाही.

अमेरिकेने म्हटले होते – कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते – आमचे सरकार केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आम्हाला आशा आहे की या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असेल. या काळात कायदा आणि लोकशाहीच्या मूल्यांचे पालन केले जाईल.यापूर्वी 23 मार्च रोजी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानेही केजरीवाल यांच्या प्रकरणाबाबत निवेदन दिले होते. ते म्हणाले होते- आम्ही हे प्रकरण लक्षात घेतले आहे. केजरीवाल यांची निष्पक्ष आणि योग्य चाचणी झाली पाहिजे.जर्मनीने म्हटले होते- केजरीवाल प्रकरणात लोकशाहीची तत्त्वे पाळली पाहिजेत
जर्मनीने पुढे म्हटले होते- भारत हा लोकशाही देश आहे. आम्हाला आशा आहे की येथील न्यायालय स्वतंत्र आहे. केजरीवाल यांच्या बाबतीतही लोकशाहीची तत्त्वे पाळली जातील. केजरीवाल यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कायदेशीर मदत मिळेल. दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष मानण्याचे कायदेशीर तत्व पाळले पाहिजे.जर्मनीच्या या वक्तव्यावर भारताने आपल्या दूतावासाच्या उपप्रमुखाला समन्स बजावले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते- जर्मनीने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. आम्ही अशा विधानांना आमच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप मानतो, अशा विधानांमुळे आमच्या न्यायालयांच्या निःपक्षपातीपणावर आणि स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण होतात.भारताने म्हटले होते-

आमच्या कारभारात ढवळाढवळ करू नका
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले होते – भारत एक शक्तिशाली लोकशाही आहे, जिथे कायद्याचे पालन केले जाते. इतर प्रकरणांप्रमाणे या प्रकरणातही (केजरीवाल यांना अटक) कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणी बनावट अंदाज बांधून विधाने करणे योग्य नाही.मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. ते 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवाल ईडीच्या कोठडीतूनच सरकार चालवत आहेत. न्यायालयात हजेरी लावली त्यावेळी त्यांनी राजीनामा देणार नाही आणि गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर-जरांगे पाटील यांची रात्री भेट

३० तारखेपर्यंत निवडणुकीबाबत काहीही निर्णय नाही -जरांगे पाटील

अंतरवाली सराटी-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले होते. जरांगेंसोबत लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली. पुढील वाटचाल कशी करायची याबद्दल मंथन झालं. त्याबद्दलची माहिती योग्य वेळी देऊ, असं आंबेडकर या भेटीनंतर म्हणाले आहेत तर ३० तारखेपर्यंत आपण निवडणुकीबाबत काहीही बोलणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत .

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली का? आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून केली अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा

मुंबई-उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे या शिवाय ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १६ उमेदवारांनी नावे आहेत. यामुळे आता १७ उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत .औरंगाबादमधून चंद्रकांत खैर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.

वॉशिंग मशीनमध्ये सापडली नोटांची बंडले

ईडीने देशभरातील पाच शहरांमध्ये छापेमारी केली असून, यातून २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एके ठिकाणी केलेल्या छापेमारीत चक्क वॉशिंग मशीनमध्ये नोटांची बंडले लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे धाडी टाकल्या आहेत. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या टाकलेल्या धाडीत २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच काही कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच यासंबंधित ४७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी पाठवले

कंपनीचे संचालक आणि पार्टनर संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्याशी संबंधित काही ठिकाणीही धाड टाकण्यात आली. यामध्ये लक्ष्मीटन मेरिटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लि., स्टवार्ट अलॉयज इंडिया प्रा. लि., भाग्यनगर लि., विनायक स्टील्स लि., वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदींचा समावेश आहे. या ठिकाणांवर छापेमारी केव्हा करण्यात आली याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. सिंगापूरच्या गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक आणि हॉरिझॉन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपन्यांच्या मदतीने तसेच FEMA कायद्याचे उल्लंघन करून भारताबाहेर परकीय चलन पाठवण्यात या कंपन्या सामील आहेत. तसेच या कंपन्याचे व्यवस्थापन अँथनी डी सिल्वा यांच्या वतीने केले जाते. शेल कंपन्यांच्या मदतीने सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवण्यात आले, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, सिंगापूर येथील कंपनीला पैसे पाठवण्यासाठी मेसर्स नेहा मेटल्स, मेसर्स अमित स्टील ट्रेडर्स, मेसर्स ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, मेसर्स एचएमएस मेटल्स आदी बनावट कंपन्यांच्या मदतीने बनावट व्यवहार दाखविण्यात आले.