पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपनीपैकी एक कंपनी आहे. जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेट्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दुस-या क्रमांकाच्या कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“SEBI”) दाखल केला आहे.
कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10 च्या एकूण मूल्य 8,500 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा आणि दर्शनी मूल्य 10 रुपये असलेल्या 2,500 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी समभागांच्या विक्रीची ऑफरचा या ताज्या इश्यूमध्ये समावेश आहे. दर्शनी मूल्य 10 रुपये असलेले एकूण 11,000 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा यात समावेश आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये SVG बिझनेस ट्रस्टच्या (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) 2,500 दशलक्ष रुपयांच्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
IPO द्वारे उभारलेला निधी महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड किंवा पूर्व-पेमेंटसाठी, सामान्य कॉर्पोरेट खर्चाच्या निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
पी एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलर्सपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेटसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. FY21 आणि FY23 मधील महसुलाच्या वाढीवर आधारित, कंपनी भारतातील प्रमुख संघटित ज्वेलर्समध्ये सर्वात वेगाने वाढणारा ज्वेलरी ब्रँड आहे. कंपनीने FY21 आणि FY23 दरम्यान 56.50% ची EBITDA वाढ मिळवली. तसेच FY23 मध्ये प्रति चौरस फूट सर्वाधिक महसूल मिळवला, जो भारतातील प्रमुख संघटित ज्वेलरी खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीने 33 स्टोअर्सपर्यंत विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील 18 शहरांमध्ये 32 स्टोअर्स आणि यूएस मधील एक स्टोअरचा समावेश आहे. याचे एकूण किरकोळ क्षेत्र अंदाजे 95,885 चौरस फूट आहे. सर्व स्टोअर्स चालवल्या जातात आणि व्यवस्थापित केल्या जातात. 23 मालकीची स्टोअर्स आणि 10 फ्रँचायझी स्टोअर्स आहे. फ्रँचायझी मालकीची आणि कंपनी संचालित (“FOCO”) मॉडेलवर हे स्टोअर्स चालवले जातात. या स्टोअर्सपैकी, 19 स्टोअर्स मोठे स्टोअर्स आहेत (2,500 चौ. फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाची), 11 स्टोअर्स मध्यम स्वरूपाची आहेत (1,000 चौ. फूट ते 2,500 चौ. फूट दरम्यानचे क्षेत्रफळ असलेली) आणि 3 स्टोअर्स लहान आहेत (1,000 चौ. फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले). याव्यतिरिक्त कंपनीने मार्च 2022 मध्ये मोबाइल ॲप्लिकेशन “PNG ज्वेलर्स” लाँच केले आहे. डिजिटल उपस्थितीमुळे ग्राहकांना नवीन डिझाइन्स आणि कलेक्शन्सबद्दल अपडेट ठेवता येते आणि त्यांना उत्पादन पोर्टफोलिओची ओळख करून देता येते. ज्यामुळे ग्राहकांचा स्टोअरमधील अनुभव वाढतो. सर्व दागिन्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील आणि बाहेरील 75 पेक्षा जास्त अनुभवी आणि कुशल कारागीर करतात. ब्रँडचा प्रचार करण्यासाठी त्यांनी सध्या माधुरी दीक्षितला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
‘पीएनजी’ ब्रँडने त्याचा वारसा ‘पी एन गाडगीळ’ ब्रँडकडून घेतला आहे, ज्याचा 1832 पासूनचा समृद्ध वारसा आहे आणि एक शतकाहून अधिक काळाचा वारसा आहे. ‘पीएनजी’ ब्रँडची परंपरा आणि वारसा जपत कंपनीने महाराष्ट्रात एक मजबूत ब्रँड निर्माण केला असून, आपली उपस्थिती वाढवली आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरी यासह मौल्यवान धातू / दागिन्यांची उत्पादने विविध किंमती आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. जे ग्राहकांच्या गरजा भागवतात आणि विशेषत: विवाहसोहळे, एंगेजमेंट, वर्धापनदिन आणि सण, तसेच दररोज परिधान केलेले दागिने यासारख्या खास प्रसंगांसाठी डिझाइन केलेले संग्रह समाविष्ट करतात. प्रवर्तक, सौरभ विद्याधर गाडगीळ हे सहाव्या पिढीतील उद्योजक आहेत आणि त्यांना भारतातील ज्वेलरी उत्पादन उद्योगात 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी पारंपारिक कौटुंबिक व्यवसायाला समकालीन ब्रँडमध्ये रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलवाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.