मुंबई-उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे या शिवाय ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १६ उमेदवारांनी नावे आहेत. यामुळे आता १७ उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत .औरंगाबादमधून चंद्रकांत खैर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.