३० तारखेपर्यंत निवडणुकीबाबत काहीही निर्णय नाही -जरांगे पाटील
अंतरवाली सराटी-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले होते. जरांगेंसोबत लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली. पुढील वाटचाल कशी करायची याबद्दल मंथन झालं. त्याबद्दलची माहिती योग्य वेळी देऊ, असं आंबेडकर या भेटीनंतर म्हणाले आहेत तर ३० तारखेपर्यंत आपण निवडणुकीबाबत काहीही बोलणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत .
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली का? आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.