Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यातील सहा वर्षांचा अद्वैत ठरला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा सर्वांत छोटा भारतीय

Date:

evrest-1 evrest2

पुण्यातील दोन लहान मुलांनी गेल्या ३ नोव्हेंबरला आपल्या कामगिरीने इतिहास घडवला आहे. अद्वैत आदित्य भारतीय (वय ६) आणि वीरप्रताप राजे भोसले (वय ११) हे दोघे नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी महाराष्ट्रातील सर्वांत छोटी मुले ठरले आहेत. त्यातही अद्वैत हा अशी कामगिरी करणारा सर्वांत छोटा भारतीय ठरला आहे. ही मोहीम यशस्वी पूर्ण करुन ते गेल्या ६ नोव्हेंबरला पुण्यात परतले.

 हे बालवीर पुणेस्थित साहस व पदभ्रमण कंपनी ‘ॲडव्हेंचर पल्ससोबत या मोहिमेवर रवाना झाले होते. अद्वैतसमवेत त्याची आई पायल आदित्य भारतीय व वीरप्रतापसोबत त्याची आई दमयंती राजे भोसले याही होत्या. या संघाने २६ ऑक्टोबरला नेपाळमध्ये काठमांडूतून प्रस्थान केले. खुंबू व्हॅलीतून वाट कापत अखेरीस ते खुंबू हिमप्रपाताजवळ समुद्रसपाटीपासून १७,५९३ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोचले.

 या मुलांनी इतक्या लहान वयात प्रचंड सहनशीलता आणि थक्क करणारी परिपक्वता दाखवल्याने त्यांना या प्रवासातील विविध अडचणींवर मात करणे शक्य झाले, या शब्दांत कौतुक करुन मोहिमेचे नेते व ‘ॲडव्हेंचर पल्सचे सह-संस्थापक समीर पाथम म्हणाले, की ही पदभ्रमण मोहीम यशस्वी पूर्ण करणारी ही महाराष्ट्रातील सर्वांत छोटी मुले ठरली आहेतच, परंतु त्यातही अद्वैत भारतीय हा हिवाळी हंगामात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा सर्वांत लहान भारतीय मुलगा ठरला आहे.

 ही १२ दिवसांची परीक्षा घेणारी पदभ्रमण मोहीम ८९०० फुटांवरील एव्हरेस्ट व्हॅलीच्या तळाशी असलेल्या लुक्ला या छोट्याशा गावापासून सुरु झाली. दूध खोसी नदीच्या काठाने रम्य अशा पाईन वृक्षांच्या जंगलातून पुढे चढाई करत अखेर हा संघ समुद्रसपाटीपासून १७५९३ फूट उंचीवर हिमरेषा सुरु होते तेथे जाऊन पोचला. खरे तर प्रौढ व्यक्तीसाठी या उंचीवर पाऊल टाकणे हीच थक्क करणारी कामगिरी ठरते, कारण केवळ अनेक किलोमीटर्सचे अंतर किंवा पर्वतातील खडतर चढण यापेक्षाही येथे विरळ हवा, वातावरणातील प्राणवायूचे कमी प्रमाण व आठ अंश सेल्शियसपासून प्रसंगी उणे बारा अंश सेल्शियसपर्यंत खाली जाणारे तापमान अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. या मुलांच्या वयाच्या तरुण साहसवीरांसाठी ही मोहीम यशस्वी पूर्ण करणे, ही खरोखर आश्चर्यकारक कामगिरी आहे.

‘ॲडव्हेंचर पल्सची स्थापना समीर पाथम व सूरज झिंगान यांनी केली आहे. यापूर्वीही या संस्थेने वर्ष २०१४ मध्ये पुण्यातील बिशप्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांत मोठा जथा एव्हरेस्ट बेस कॅम्पला यशस्वी नेऊन आणला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढाई मोहीम राबवत असताना नेपाळमधील भूकंप व हिमकडे कोसळल्याने या संस्थेच्या गिर्यारोहकांचा संघ एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अडकून पडला होता. या कसोटीच्या काळातही या सदस्यांनी भूकंपग्रस्तांची सुटका करण्याचे प्रचंड आव्हानात्मक काम करुन सामाजिक बांधीलकीचा प्रशंसनीय प्रत्यय आणून दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...