मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जोशी यांनी घेतली आढावा बैठक
मुंबई-
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज कर्तव्य भवन येथे अधिकृतपणे शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्विकारला. जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय उर्जा या केंद्रीय मंत्रालयांचीही जबाबदारी आहे.
जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली, ज्यामध्ये त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरीही या आढावा बैठकीला उपस्थित होते.
उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव टी. के. अनिल कुमार यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

