‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम

Date:

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २७ ते २९ जुलै दरम्यान चिंचवड, पुणे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे- दि. २६ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, समरसता साहित्य परिषद यांच्या सहकार्याने तसेच आमदार उमाताई खापरे यांच्या पुढाकारातून ‘नारी शक्ती महोत्सव २०२६’ अंतर्गत २७ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. २७, २८ व २९ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० वाजल्यापासून रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड, पुणे येथे विविध सांस्कृतिक, संगीत, नृत्य आणि भक्तिपर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, महाराष्ट्र राज्य ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते होणार असून, विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा संपन्न होणार आहे. “नारी शक्ती – समाज शक्ती – राष्ट्र शक्ती” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवातून महिलांच्या कर्तृत्वाचा, सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भव्य भजनी सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता नूपुर नृत्यालय यांच्या वतीने डॉ. सौ. सुमेधा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नृत्य गाथा (भक्ती, शक्ती, संस्कृती)’ हा विशेष नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि सहकलाकार ‘भाव सप्तक’ यांच्या ‘सावन सरी’ या पावसावर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने रसिकांना सुरेल संगीताची पर्वणी अनुभवता येणार आहे.

मंगळवार, दि. २८ जुलै रोजी पारंपरिक भव्य मंगलागौरी सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता सुवर्णा बाग यांच्या शिष्यांचा नृत्यांजली कार्यक्रम सादर केला जाईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचा अभंग व शास्त्रीय संगीतावर आधारित गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे.

बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकप्रिय गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा विशेष गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या सुरेल मैफलीने महोत्सवाची सांगता होणार आहे.

महिलांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भारतीय संस्कृतीतील समृद्ध परंपरांचे जतन व संवर्धन करणे तसेच संगीत, नृत्य आणि भक्तीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, संस्कारमूल्ये आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ करणे, या उद्देशाने मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, महाराष्ट्र राज्य ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या तीन दिवसीय महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून, पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साहित्य संमेलन लोकांचा सांस्कृतिक उत्सव ठरेल – कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

साहित्याला लोकचळवळीचे स्वरूप देणार : योगेश सोमण सावित्रीबाई फुले पुणे...

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा  पदभार स्वीकारला

मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जोशी यांनी घेतली आढावा बैठक मुंबई- केंद्रीय मंत्री...

स्मगलिंग: विमानातील शौचकूप, वाहने व भांड्यांमध्ये बनवलेले विशेष कप्पे आणि शरीरात सोने लपवण्यासारख्या अत्याधुनिक पद्धती उघडकीस

मुंबई- सोन्याची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या जाळ्याविरोधातील आपली मोहीम तीव्र...

बनावट ‘एअर सुविधा 2.0’ संकेतस्थळांपासून सावध राहा; प्रवाशांना केंद्र सरकारचा इशारा

सेवा पूर्णपणे मोफत; पैसे मागणाऱ्या अनधिकृत पोर्टलवर माहिती न...