फेब्रुवारीत गाफील राहिल्याचा परिणाम :कालच्या 24 तासांत 81 हजार नवे रुग्ण

Date:

पुणे- आता कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढल्याचे पाहिल्यावर जागे होणाऱ्या पुढे कोरोनाने पुन्हा मोठे आव्हान उभे केले आहे. देशात गुरुवारी ८१,३८० रुग्ण वाढले. हा यंदाचा उच्चांक आहे. देशात इतके रुग्ण गतवर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीस आढळले होते. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ४३,१८३ रुग्ण आढळले. हा राज्याचा कोरोनाकाळातील सर्वात मोठा आकडा आहे. गुरुवारी देशात ४६८ मृत्यू झाले. हा यंदाचा उच्चांक आहे.फेब्रुवारीतच गाफील राहिल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते . सार्या सरकारी ,निमसरकारी व्यवस्था नागरिकांना दोषी ठरविण्यासाठी नागरिकांकडे बोट दाखवीत असल्या तरी त्यासोबत काही बोटे या व्यवस्थांंकडे वळत आहेत . या संबधित व्यवस्थांनी फेब्रुवारीतच सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करवून दिल्या असत्या तर हि वेळ आली नसती. हे हि तेवढेच खरे आहे . उपचारासाठी आणि काळजीसाठी केंद्रे या व्यवस्थांनी मार्च मध्ये कोरोनाग्रसात्न्चे आकडे वाढल्यावर सुरु केले आहेत. जे त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु करायला हवे होते.

दरम्यान, देशात १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. त्यात ४५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस दिली जात आहे. लसीकरण केंद्रांच्या कमाल क्षमतेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आदेश जारी केला. त्यानुसार एप्रिलमध्ये सरकारी व खासगी केंद्रांवरही दररोज लस दिली जाईल. म्हणजे सरकारी सुट्टीच्या (गॅझेटेड हॉलिडे) दिवशीही लसीकरण केंद्रे खुली राहतील. या महिन्यात चार रविवारसह चार मोठे सण-दिवसही आहेत. २ एप्रिलला गुड फ्रायडे, १३ ला गुढीपाडवा, १४ ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, २१ ला रामनवमीची सुटी आहे. ४ रविवारही आहेत. महावीर जयंती सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी, २५ एप्रिलला आहे.

सक्रिय रुग्ण वाढले : मास्क वापर नाही, ना डिस्टन्सिंग; परिणामी, सक्रिय रुग्ण वाढून सहा लाखांच्याही पार
– देशात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून ६ लाखांपार गेली आहे. सक्रिय रुग्ण म्हणजे रुग्णालय वा घरात उपचार सुरू असलेले लाेक.
– मार्चपासून देशात सक्रिय रुग्ण सातत्याने वाढत आहेत. १८ फेब्रुवारीला १.३६ लाख सक्रिय रुग्ण होते. ३१ मार्चपर्यंत हा आकडा ६.१० लाख झाला.

महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख रुग्णवाढ
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला.
– महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या ५ महिन्यांत ७.३८ लाख जणांना काेरोना झाला. छत्तीसगड, पंजाब, गुजरात व एमपीमध्येही रुग्ण वेगाने वाढतच आहेत.

लसोत्सव : वयाेमर्यादा कमी होताच लागल्या रांगा
गुरुवारपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाल्याने मोठा उत्साह दिसला. अनेक केंद्रांवर रांगा लागल्या.

कोरोनाचा ट्रेंड
फ्रान्स पुन्हा लॉक 
: राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारपासून फ्रान्समध्ये ३ आठवड्यांचा लॉकडाऊन लावला. हा तिसरा लॉकडाऊन आहे.
मध्य प्रदेशात ३ जिल्हे लॉक : छिंदवाडात गुरुवारी, तर खरगोन व रतलाम जिल्ह्यात शुक्रवार ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन केला जाणार आहे.
देशात डिसेंबरनंतर मृत्यू घटले होते. ६ फेब्रुवारीला त्याचा नीचांक होता. यानंतर वेगाने वाढ झाली. मार्चच्या सुरुवातीस रोजच्या मृतांची संख्या १०० पार झाली होती. शेवटच्या आठवड्यापर्यंत मृतांचा आकडा ५०० च्या जवळपास गेला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...

‘या झुंडशाहीची दहशत वेळीच मोडून काढा’; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मतभेद असू...

स्पीकरला विरोध केल्याने आता बापटांना फटके लगावले- महापालिकेतील सभागृहानंतर आता रस्त्यावर दादागिरी

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना...