स्पीकरला विरोध केल्याने आता बापटांना फटके लगावले- महापालिकेतील सभागृहानंतर आता रस्त्यावर दादागिरी

Date:

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र निषेध केला आहे. बापट हे ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा नाही. तो नागरिकांचे आरोग्य, शांततेने जगण्याचा अधिकार आणि कायद्याचे पालन याच्याशी संबंधित आहे. या प्रश्नावर मतभेद असल्यास युक्तिवाद, चर्चा आणि लोकशाही मार्गाने उत्तर देता येते.

एखाद्याच्या भूमिकेला उत्तर देता येत नसेल म्हणून त्याच्यावर हात उचलणे, धक्काबुक्की करणे किंवा धमकावणे हा लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे, असे देशमुख यांनी म्हटले.

बापट यांच्या भूमिकेशी मतभेद असल्यास ते तथ्यांच्या आधारे मांडावेत. मुद्दे खोडता येत नसतील तर हिंसेचा आधार घेणे ही धोकादायक प्रवृत्ती आहे. आज ध्वनीप्रदूषणाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीवर हात उचलला जात असेल, तर उद्या कोणताही नागरिक अन्याय, अंधश्रद्धा, प्रदूषण, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्यास घाबरेल, अशी भीती अंनिसने व्यक्त केली.मतभिन्नतेला हिंसेने उत्तर देण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी परंपरेला मान्य नाही, असा महाराष्ट्र अंनिसचा ठाम विश्वास आहे.

या घटनेची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल तपास करावा, अशी मागणी अंनिसने केली आहे. हल्ला, धक्काबुक्की, धमकी किंवा इतर कायदेशीर गुन्हे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

या घटनेमागे आणखी कोणी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास त्यांचीही चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असेही अंनिसने म्हटले आहे.

अशा घटनांमध्ये केवळ अटक करून प्रकरण संपू नये, तर कायद्याचे राज्य दिसेल अशी प्रभावी कारवाई होणे गरजेचे आहे. सामाजिक किंवा राजकीय दबावामुळे हिंसेचा मार्ग स्वीकारूनही काहीही परिणाम भोगावा लागणार नाही, असा संदेश समाजात जाता कामा नये, असे अंनिसने स्पष्ट केले.

शासन आणि पोलीस प्रशासनाने या घटनेत कायद्याची कडक अंमलबजावणी करून एक स्पष्ट संदेश द्यावा. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आणि लोकहितासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांना मारहाण किंवा धमकी देऊन गप्प बसवता येणार नाही, असे अंनिसने म्हटले आहे.

महाराष्ट्र अंनिस विद्यानंद बापट यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न असो वा अन्य कोणताही लोकहिताचा प्रश्न, मतभेद असू शकतात; पण हिंसेला कोणतेही समर्थन असू शकत नाही, असे अंनिसने ठामपणे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीधारकांचे हक्क आणि पुनर्वसन प्रक्रिया

पात्रता, मोफत सदनिका, संक्रमण निवासापासून सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनापर्यंतची प्रक्रिया सुरक्षित...

सर्पदंश व्यवस्थापनासाठी पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

१५ हजारांहून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवनदान देणारे तज्ज्ञ डॉ....

उपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा

हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ रस्ते, वाहतूक, पाणी, वीज,...