पुण्यात बेकायदा सावकार आणि वसुलीवाल्यांचा हैदोस -दोघांना ठोकल्या बेड्या

Date:

दोन लाख रुपयांपोटी 14 लाखांची मागणी-कर्जदारास जीवे मारण्याची धमकी-नातेवाईकांना अश्‍लील शिवीगाळ-घरातील साहित्याचीही मोडतोड

पुणे : कर्जदारास दिलेल्या दोन लाख रुपयांपोटी 14 लाखांची मागणी करीत दोन बेकायदा सावकारांनी कर्जदारास जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यावरच न थांबता कर्ज देताना जामीन राहणाऱ्याची दुचाकी जबरदस्तीने काढून नेल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सह्या घेतलेले धनादेश, कोरे मुद्रांक पेपर, वाहनांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.

उमेश चंद्रकांत घारे (रा.सनसिटी, सिंहगड रस्ता), संदिप घारे (रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या बेकायदा सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी कर्ज घेतलेल्या नागरीकाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे (एक) तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस 2019 मध्ये दोन लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांनी खासगी सावकार उमेश घारे आणि संदीप घारे या दोघांकडे पैशांची मागणी केली होती. त्यावेळी उमेश घारे याने फिर्यादीकडून कोरे धनादेश घेऊन चारचाकी वाहन गहाण ठेवल्यानंतर 10 टक्के व्याजदराने फिर्यादीस दोन लाख रुपये दिले. दरम्यान, फिर्यादीस मुद्दल आणि व्याजाची रक्कम देण्यास उशीर झाला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीकडे दोन लाख रुपयांची मुद्दल, 24 महिन्यांचे व्याज आणि दंड अशा एकूण 14 लाख रुपयांच्या रकमेची मागणी करीत होते. त्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना अश्‍लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर आरोपींनी फिर्यादीच्या घरातील साहित्याचीही मोडतोड केली. दरम्यान, फिर्यादीचा एक मित्र या प्रकरणामध्ये जामीन राहीला होता. आरोपीने त्याचीही दुचाकी जबरदस्तीने नेली.दरम्यान, याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दाखल झाल्यानंतर पथकाने त्याची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी दोघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर संबंधीत आरोपी हे बेकायदेशीरीत्या खासगी सावकारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घालून सह्या घेतलेले आणि रक्कमेचा उल्लेख न केलेले धनादेश, कोरे मुद्रांक पेपर, वाहनांची कागदपत्रे, आधार कार्डच्या छायांकित प्रती पोलिसांनी जप्त केल्या. सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.उमेश घारे आणि संदीप घारे हे दोघेही बेकायदेशीर खासगी सावकारी करीत होते. त्यांनी अनेकांना अवैधरीत्या कर्ज देऊन त्यांच्या वसुलीसाठी नागरीकांना त्रास दिला असण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणाची तक्रार असल्यास नागरीकांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाकडे (एक) संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

चार एकर जागेवर पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा;...

नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री

१० व्हेंटिलेटर, १० सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा...

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...