नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी विजयाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस 207जागांवर पुढे आहे. तर भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये जल्लोषालाही सुरुवात केली आहे. यात ममतांवर शुभेच्छांचा वर्षावरही सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींना एका विशेष अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट आणि फेसबुक वर पोस्ट करत ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले हा जमीन हलवणारा विजय आहे. यासाठी शुभेच्छा. काय सामना केला. पश्चिम बंगालच्या लोकांनाही शुभेच्छा.
ममता बॅनर्जी यांचे सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता.