गणेश विसर्जनासाठी पुण्यात ४१६ घाट व कृत्रिम हौदांवरील विद्युत व्यवस्थेचा आढावा

Date:

सुमारे १०० ठिकाणी अतिरिक्त फ्लड लाइट्स; स्पीकर्स आणि तात्पुरते CCTV बसविण्याच्या सूचना

पुणे, दि. २० सप्टेंबर २०२६ : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सुमारे ४१६ विसर्जन घाट आणि कृत्रिम हौदांवरील विद्युत व्यवस्थेचा आढावा पुणे महापालिकेच्या मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर यांनी घेतला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी ज्या विसर्जन घाटांवर प्रकाश व्यवस्था अपुरी आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, पोलीस विभागाने सुचविलेल्या सुमारे १०० ठिकाणी अतिरिक्त फ्लड लाइट्स बसविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विसर्जन घाटांवर नागरिकांना आवश्यक सूचना देता याव्यात यासाठी स्पीकर्सची व्यवस्था करण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात CCTV कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या सर्व कामांवर संबंधित परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचारी देखरेख ठेवत असून, आवश्यकतेनुसार तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पीजी-हॉस्टेलसह भंगार गोडाऊनवर महापालिकेची कारवाई

वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरीतील १३ पीजी आणि ७ भंगार...

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप; ठराव ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा

दोन नॉमिनी संचालक असताना बहुमतासाठी दोघांची संमती आवश्यक; कास्टिंग...

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

महापालिकेच्या तयारीची मंडळ पदाधिकाऱ्यांना माहिती; मेट्रो, पोलिस आणि पालिका...