पुण्यात पीजी-हॉस्टेलसह भंगार गोडाऊनवर महापालिकेची कारवाई

Date:

वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरीतील १३ पीजी आणि ७ भंगार दुकाने-गोडाऊन बंद करण्याचे आदेश

पुणे, दि. २० सप्टेंबर २०२६ : पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार शहरातील पीजी, हॉस्टेल तसेच भंगार दुकाने आणि गोडाऊनची अग्निसुरक्षाविषयक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजीत वाघमोडे यांच्या पथकाने सलग तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणी तपासणी केली.

शहरातील बांधकाम आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांची पाहणी करताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंगार साठवणूक करणारी दुकाने, गोडाऊन तसेच भंगारावर प्रक्रिया करणारे युनिट आढळून आले. या ठिकाणी आवश्यक अग्निशमन यंत्रणा, सुरक्षिततेची साधने, बांधकाम परवानग्या तसेच योग्य विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले.

या गोडाऊनमध्ये प्लास्टिक, कागद, पोती, स्टील, लोखंडाचा भंगार आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळला. अनेक ठिकाणी पत्र्याची शेड उभारून ही आस्थापने थेट रहिवासी भागात सुरू असल्याचेही समोर आले.

आज वडगाव बुद्रुक, नऱ्हे आणि धायरी परिसरातील १३ पीजी आणि ७ भंगार दुकाने-गोडाऊन यांची तपासणी करण्यात आली. बीडीपी झोन, अरुंद रस्ते, अग्निशमन यंत्रणा, अधिकृत विद्युत पुरवठा, ड्रेनेज आणि कर आकारणीसंबंधी आवश्यक परवानग्या आढळून न आल्याने या आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनेक आस्थापना भाडेतत्त्वावर चालवल्या जात असल्याने त्यावर योग्य नियंत्रण नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृत आणि विनापरवाना आस्थापनांवर गुन्हे दाखल करून त्या तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या तसेच विनापरवाना सुरू असलेल्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असून, अग्निशमन दलाची तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश विसर्जनासाठी पुण्यात ४१६ घाट व कृत्रिम हौदांवरील विद्युत व्यवस्थेचा आढावा

सुमारे १०० ठिकाणी अतिरिक्त फ्लड लाइट्स; स्पीकर्स आणि तात्पुरते...

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप; ठराव ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा

दोन नॉमिनी संचालक असताना बहुमतासाठी दोघांची संमती आवश्यक; कास्टिंग...

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

महापालिकेच्या तयारीची मंडळ पदाधिकाऱ्यांना माहिती; मेट्रो, पोलिस आणि पालिका...

शिक्षकांसाठी व्यावसायिक मानकांवर कार्यशाळा उत्साहात संपन्न

एससीईआरटी महाराष्ट्र आणि स्टरलाइट एडइंडिया फाउंडेशन पुणे यांचा पुढाकार पुणे...