दोन गाण्यांचे रिकॉर्डिंग पूर्ण करत चित्रपट ‘बदनाम गली’ चा मुहूर्त

Date:

प्रतिनिधी -चित्रपटाच्या मुहूर्तावर ‘बदनाम गली’ ह्या आगामी चित्रपटाच्या दोन गण्याचे रिकॉर्डिंग पार पडले , हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. मुहूर्ता वेळी एक रोमँटिक सॉंग , तर दुसरे आयटम सॉन्ग रिकॉर्ड करण्यात आले . रोमॅंटिक सॉन्ग ला अभिजीत कोसंबी आणि  संजीवनी भेलांडे यांनी आपल्या आवाज चा साज चढ़वला आहे तर आइटम सॉन्ग सोनाली पटेल ने गायले आहे .  दोन्ही गाण्याचे चे गीतकार सुबोध पवार आहेत तर मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली आहेत . 
      चित्रपट पोटासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या वारांगणांच्या व्यथेची कथा आहे  . “बदनाम गली” हा सिनेमा शारीरिकतेपेक्षा भावनिक तसेच मानसिक पातळीवर जास्त व्यक्त होतो. ह्या  चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक प्रा. दीपक संभाजी जाधव असून त्रिपुरेश्वर प्रोडक्शन बैनर अंतर्गत निर्माता श्याम चौगले निर्माण करत आहेत तसेच कार्यकारी निर्माता म्हणून पोपट कांबळे काम पाहतायेत .
      सॉन्ग रिकॉर्डिंग वेळी चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक यांनी संगीतकार,गीतकार आणि सर्व गायकां सोबत मुहूर्ताचा एक सुंदर ग्रुप फोटो काढला  .  ह्या क्षणी चित्रपटाची टीम उत्साहित आणि आनंदित दिसून आले .  चित्रपटाची स्टारकास्ट अजुन गुलदसत्यात असून लवकरच जाहिर करण्यात येईल , सध्या चित्रपटाचे संगीत पूर्ण करण्यावर निर्माते आणि दिग्दर्शक यांचा भर आहे। चित्रपटाचा विषय सामाजिक व गंभीर असून स्टारकास्ट ही दमदार असेल यात शंका नाही
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...

पुणे महानगर क्षेत्राला ‘पीडीआरएफ’ व अग्निशमन दलाच्या सुरक्षेचे अभेद्य कवच!

तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये...