सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला कापूसकोंडा चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Date:

एक नवीन सदस्य , एक कारस्थान, फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार? २३ ऑक्टोबरला उलगडणार

सत्यघटनेवरून प्रेरित असलेल्या ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. कुत्र्याला घाबरणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याची कथा केंद्रस्थानी ठेवून अनोखी गोष्ट “कापूसकोंडा” चित्रपटातून उलगडणार असून, २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या टीजरला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. यांनी ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांच आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.

‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात अत्यंत अनोखी कथा पहायला मिळणार आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट मिळालेला कुत्रा यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे. एका कुत्र्यामुळे काय काय घडामोडी घडतात, त्यातून मानवी भावभावना, नातेसंबंध कशा पद्धतीनं उलगडत जातात हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. सत्यघटनेवरून ही कथा प्रेरित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उत्तम कथानक, सक्षम अभिनेत्यांची फौज असलेला कापूसकोंडा हा चित्रपट नक्कीच परिपूर्ण मनोरंजनाची हमी देणारा असल्याचं ट्रेलरवरून जाणवत आहे. एक नवीन सदस्य , एक कारस्थान, फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार? हे जाणून घेण्यासाठी आता २३ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाच वर्षांच्या आयरिस डेटाने उघड केला बँक भरती घोटाळा; 180 जण नोकरीत आणि 257 संशयित

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती परीक्षांमध्ये बनावट उमेदवार...

पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’

पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस...

माले ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी; बोगस ग्रामसभा, बनावट कार्यवृत्त-ठरावांच्या आरोपांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी

मुळशी : तालुक्यातील माले ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रार दाखल...