मुंबई, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने आज व्हेटेरन्स डे साजरा केला. ह्या वेळी बँकेने देशासाठी निःस्वार्थपणे झटून आणि त्याग करून देशावर येणाऱ्या सर्व धोक्यांना सामोरे जाणाऱ्या अभिमान आणि सन्मानाने भारतीय सैन्य दलाची सेवा करणाऱ्या जवानांचे स्मरण केले.
हा दिवस कुलाबा युद्ध स्मारकात सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांच्या दिग्गजांसह साजरा करण्यात आला. वेटरन्स मंच, एफओएमए, एओसी एमएओ, जीओसी (एम अँड जी) क्षेत्र आणि एफओसी-इन-सी (वेस्ट) च्या अध्यक्षांनी ह्याक्षणी पुष्पहार अर्पण केले. यानंतर आय.एन.एच.एस. अश्विनी सभागृहात प्रख्यात डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक अफेयर्स विश्लेषक श्री. नितीन ए. गोखले यांनी अॅडमिरल सोमण मेमोरियल सोहळ्याप्रसंगी ‘द न्यू ग्रेट गेम इन द इंडो-पॅसिफिक’ ह्यावर .व्याख्यान सादर केले