महाराष्ट्राचा विकास झाला नाही मग इथे कामासाठी इतर राज्यातून लोक का येतात? जिथे विकास तिथे काम सरळ आहे , केवळ एका धर्माचा, प्रांताचा, जातीचा प्रचारक नेता बनणे खूप सोपे आहे. अशा शॉर्ट कट ’ने सत्तेच्या खुर्ची पर्यंत पाहोचणे सोपे आहे मात्र, फार काळ ही सत्ता टिकत नाही असे सांगत समाजातील प्रत्येक घटकाचा, धर्माचा, जातीचा, सर्व प्रांतातील लोकांचा विचार करून देशाचा विकास करणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. कॉंग्रेसने सत्तेसाठी कधीही ‘शॉर्ट कट’चा मार्ग न स्वीकारता देशाचा विकास केला आहे असे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व सरिचटणीस गुलामनबी आझाद यांनी येथे सांगितले
पर्वतीविधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवारअॅड. अभय छाजेड यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचामेळावा व अभय छाजेड यांच्या २० कलमी जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात आझाद बोलत होते.त्यांच्या हस्ते अभय छाजेड यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. उपमहापौर आबा बागुल, पी. ए.इनामदार, शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपालतिवारी , रशीद खान, शहर कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्षसंजय बालगुडे,इरफान पठाण,वि जयकांत कोठारी, डॉ. काटकर, मुकेश धीवार आदी यावेळीव्यासपीठावरउपस्थित होते.
आझाद म्हणाले, महाराष्ट्राला महान बनिवण्यामध्ये कॉंग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही मोठे योगदान आहे.टि ळकांसारख्या नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केले.त्यांना स्वातंत्र्यासाठी अनेक युवक, महिला , शेतकरी ,कामगार यांनी सहयोग दिला स्वातंत्र्यानंतर जे जे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री झाले त्यांनी महाराष्ट्राचा विकासच केला.उद्योग, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रात प्रगती झाली. त्यामुळेच देशाच्या इतर इतर प्रांतातील लोककाम मिळवण्यासाठी महाराष्ट्रात येतात.जिथे काम मिळते तिथेच लोक जातात,जिथे विकास होतो तिथेच काम मिळते आणि विकास जिथे असतो तेथे नेतृत्व असते. मोदी आपल्या जाहीर सभांमधून कॉंग्रेसने काहीच केले नाही असे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगत होते त्यावेळी त्यांनागुजरात सोडून इतर प्रांताची माहिती नव्हती. त्यांना कॉंग्रेसने विकास केला नाही हे पढवून पाठवले होते. देशाचा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भारत ही कॉंग्रेसच्याकाळात जगातली मोठी शक्ती बनली आहे हे भाजपा सोयीस्कररीत्या विसरली आहे अशी टीकाही त्यांनी केली.
अभय छाजेड म्हणाले, कॉंग्रेसने अल्पसंख्यांक समाजासाठी गुलाब नबी आझाद यांच्या माध्यमातून मोठे काम केले. अल्पसंख्यांक समाजाला कॉंग्रेसने नेहेमीच न्याय दिला आहे.आपल्या जाहीरनाम्यात रोजगारनिर्मिती , गुंतवणूक, इंटरनेट सुविधा अशा २० कलमी कार्यक्रमांचाअंतर्भाव असून हा जाहीरनामा हा शहराच्या विकासाचाही भाग आहे. आयुष्यभर राजकीय जीवनात काम करताना स्वच्छ प्रतिमा आपण जपली. सर्व थरातील लोकांना बरोबर घेवून सातत्याने काम केले.शेवटचे तीन दिवस उरलेत आता ते मला द्या , मी पाच वर्षे तुमच्यासाठी देईल असेआवाहन त्यांनी केले.
पी. ए. इनामदार म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३३ कोटी होती.,तेव्हा अन्नधान्य आयात करायला लागत होते. आता लोकसंख्या १२५ कोटी झाली असून आपण अन्नधान्यनि र्यात करतो. ही प्रगती कॉंग्रेसने केली आहे. शाळा , महािवद्यालये निघालीत्यामुळे दलित व मुस्लीम समाजातील ६२ टक्के मुली शाळेत जात आहेत. हे सर्व काँग्रेसमुळेझाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी कॉंग्रेसने केली त्यामुळे समाजातीलसर्व घटकांना न्याय मिळाला. ज्याला सर्व समस्या माहिती आहेत, जो उच्चशिक्षित आहे , ज्याचीदिल्लीपर्यंत पोहोच आहे अभय छाजेड यांना प्रचंड मतािधक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
मोदी फार काळ सत्ता टिकवू शकणार नाहीत -गुलामनबी आझाद
Date: