मुंबई – आता सध्या म्हणजे रविवारी ९ नोव्हेंबर रोजी शिवसेनाभवनावर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ‘ भाजप हाय हाय ‘ च्या घोषणा देण्यात येत आहेत .शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत.शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सेना भवनात आगमन झाले आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे भाजपाबाबत ची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहे.
विधानसभा गटनेता निवडीसाठी ही बैठक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. राज्यसभा खासदार अनिल देसाई मंत्रीपदाची शपथ न घेता -शपथविधीवर बहिष्कार टाकून दिल्लीहून रविवारी दुपारी परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यामुळे शिवसेनेकडून होणार्या या शक्ती प्रदर्शनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांकडून ‘भाजप हाय हाय’च्या घोषणा दिल्या जात आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. रविवारी मोदींच्या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट, 14 राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न झाल्याचे खासदार आनंदराव अडसुळ यांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई दिल्ली विमानतळावरुनच मुंबईला परतले आणि थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या असल्याचे चित्र आहे. मातोश्री येथील बैठकीनंतर सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना झाले.
रविवारी दुपारी शिवसेनेच्या खासदारांची सेना भवनात बैठक होणार होती . या बैठकीत केंद्रात भाजपसोबत राहायचे की नाही, यावर निर्णय घेणार असल्याची चर्चा होती . शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनाही आज सायंकाळ पर्यंत राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याऐवजी सेना विरोधीपक्षात बसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपचे दगाबाजीचे राजकारण सुरूच – शिवसेना भवनावर गर्दी
Date: