मराठी सिनेमा बदलत चालला आहे, हे आपल्याला सिनेमाच्या प्रमोशनवरून दिसून येतं. सिनेमा तळागाळातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहेत.गणित या विषयवार आधारित असलेला सिद्धांत हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात आले आहेत. त्यातलाच एक फंडा म्हणजे लेझर शो. प्रेक्षकांना आपल्या सिनेमातून नेहमीच काहीतरी नवीन देणाऱ्या ‘नवलाखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन्ही निर्मितीसंस्था पुन्हा एकदा एक आगळा वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सिद्धांत या सिनेमाच्या थीमवर ‘नवलाखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन्ही निर्मितीसंस्थांतर्फे २८ तारखेला एक लेझर शो आयोजित करण्यात आला होता. पुण्याच्या सीटी प्राईड येथे ७:३० ते १० या वेळेत अर्ध्या तासात दर पाच मिनिटांनी हा लेझर शो दाखववला गेला. थ्री डी मॅपींगच्या असणाऱ्या या लेझर शोचा आस्वाद प्रेक्षकांनी भरभरून घेतला. प्रेक्षक अगदी गाड्या थांबवून या लेझर शोचा आनंद घेत होते. एकंदरच सिद्धांतच्या थीमवर असलेल्या लेझर शोला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रमोशन फंडा अपना अपना …’सिद्धांत’ प्रमोशनसाठी लेझर शो.
Date: