पळते जंगल पाहूया…“मामाच्या गावाला जाऊया!”

Date:

पूर्णतः जंगलात चित्रीत झालेला मराठीतील पहिला सिनेमा

पूर्वी सुट्टय़ा लागल्या की आपण मामाच्या गावाला जाण्याची तयारी करायचो. आजी-आजोबा, मामा-मामींकडून होणारे लाड आणि भावंडांसोबत बैलगाडीची रपेट, नदीवर पोहायला जाणे तसेच डोंगर माचीवर हुंदडायची मजा काही औरच होती. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात रमत असू पण, आता ती धम्माल कालौघात विरून गेली आहे. विभक्त कुटुंब पद्दतीमुळे आजी-आजोबांच्या संस्कारापासून दुरावलेल्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला नोकरदार आई-बाबांना इच्छा असून वेळ नाही. त्यात गॅझेट्स, शाळा, ट्युशन आणि होमवर्क या गर्तेत सापडल्यानेमुलांना मैदानी खेळ सोडाच पण साधं मोकळ्या हवेत बागडणेही दुरापास्त झाले आहे.

भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पळणाऱ्या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणे ही काळाची गरज आहे. हाच धागा पकडून निर्माता पंकज छल्लाणी आणि लेखक-दिग्दर्शक समीर हेमंत जोशीयांनी‘मामाच्या गावाला जाऊया’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मामाच्या ओढीने निघालेल्या उच्चभ्रू कुटुंबातील तीन निरागस भावंडांच्या साहसी जंगल सफरीचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट पंकज छल्लाणी फिल्म्स् ह्या कंपनीचा आणि पंकज छल्लाणींचा स्वतंत्र निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे.

पंचवीस दिवस जंगलातील शुटींग. त्यात लहान मूलं…तीही शहरातील…एकशे पंचवीस जणांचा चमू…शूटींगच्या सर्व साहित्यासह डोंगरमाथा चढणं आणि जंगलातील पायी प्रवास…वणवे, ऊन, वारा, गारा, पाऊस… वन्यजीव, कीटक, पक्षी तसेच वनसंपत्तीला जपत आणि त्यापासून संरक्षण ह्या सर्व गोष्टान राखत आणि जंगलातील बऱ्यावाईट गोष्टींचा सामना करत ह्या चित्रपटाचे शूटिंग पार पडले.

या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह बाल कलाकार शुभंकर अत्रे, साहिल मालगे आणि आर्या भरगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे संगीत आणि पार्श्वसंगीत प्रशांत पिल्लाई यांनीदिले असूनसंगीतकार अवधूत गुप्ते यांनी या सिनेमासाठी प्रमोशनल साँग तयार केले आहे. गीतकार संदीप खरे, वैभव जोशी आणि अवधूत गुप्ते यांनी गीते लिहीली आहेत. सिनेमॅटोग्राफर अभिजीत अब्दे यांचे छायाचित्रण असून नृत्य दिग्दर्शन जावेद सनादी यांचे आहे. श्रीरंग परिपत्यदार हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून सुचित्रा साठे यांनी संकलन आणि कला दिग्दर्शन संतोष संखद यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनमोल भावे यांनी ह्या सिनेमाचे ध्वनीलेखन केले आहे आणि जंगलातील वातावरण आवाजाच्या माध्यमातून उभं करताना प्रचंड मेहनत घेतली आहे.

तीन अल्पवयीन भावंडांचे भावविश्व उलगडून दाखवणारा हा सिनेमा आहे. बॉलिवूडप्रमाणे सुनंदा काऴुसकर आणि समीर दीक्षित या अऩुभवी सिनेकर्मींनी सूपरवायझिंग प्रोड्युसरची जबाबदारी सांभाळली आहे. पिकल एंटरटेनमेंट चित्रपटाचे वितरक आहेत.
मामाच्या गावी केलेल्या धमाल, दंगामस्तीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांना निसर्ग, जंगलाची साहसी सफर घडविण्यासाठीमामाच्या गावाला जाऊया अवश्य पाहा. येत्या २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...