पुणे, : ‘क्रीमस्टोन’ या वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीम दालनाचे आज बाणेरमध्ये उद्घाटन झाले. हैद्राबादच्या ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’ कंपनीची ही संकल्पना पुण्यात ‘सुयश मार्ट प्रा. ली.’तर्फे पुण्यात फ्रँचायजी तत्वावर सुरु करण्यात आली असून, आज या पहिल्या दालनाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. के. के. पाठक यांच्या झाले. ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’चे संचालक वीरेन शहा, ‘सुयश मार्ट प्रा. ली.’चे संचालक देवांग काबरा यावेळी उपस्थित होते.
‘क्रीमस्टोन’ची दक्षिण भारतामध्ये हैद्राबाद, चेन्नई, बंगळूरू, विझाग आणि विजयवाडा याठिकाणी दालने आहेत. पुण्यामध्ये प्रथमच सुरु करण्यात आलेले दालन, देशातील १९ वे दालन आहे. उत्कृष्ट चव आणि वैविध्य असणाऱ्या पुण्यातील या दालनामध्ये, आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी खास आल्हाददायक व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये अनेक आइस्क्रीम दालने ही ‘ओव्हर-द-काउंटर’ (ओटीसी) केंद्रे आहेत. मात्र ‘क्रीमस्टोन’चे बाणेर येथील दालन २५०० चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेमध्ये उभारण्यात आले असून, आईसक्रीम खाण्याचा एक वेगळा आनंद याठिकाणी मिळू शकेल. याचबरोबर उत्तम आणि प्रशिक्षित कर्मचारी ग्राहकांना आईसक्रीमची माहिती आणि विनम्र सेवा देण्यासाठी सुसज्ज आहेत. ग्राहकांना या दालनामध्ये गप्पा आणि विरंगुळ्याबरोबर आईसक्रीमचा खास आनंद घेता येऊ शकेल. ‘ब्राऊनीज’, ‘कुकीज’, ‘चॉकोलेट, ‘पेस्ट्रीज’, ‘सिरप, बिस्किटे’ आणि ताजी फळे यांचा सुयोग्य संगम करून परिपूर्ण मिश्रणातून, ‘क्रीमस्टोन’मध्ये विविध प्रकारचे आइस्क्रीम फ्लेवर्स तयार करण्यात येते. यांतील अनेक साहित्याची निर्मिती ‘क्रीमस्टोन’द्वारेच केली जाते किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँड कडून आयात केले जाते. त्यामुळे येथील आईस्क्रीम हे केवळ आईस्क्रीमचा एक वेगळा प्रकार न राहता, पूर्णपणे नवीन संकल्पना म्हणून पुढे येते. हैद्राबादचा ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’ हा भारतातील एक प्रीमियम ब्रँड आहे. त्यांचा ‘स्कूप’ हा ब्रँड दक्षिण भारतातील खवैय्यांमध्ये अनेक वर्षांपासून अतिशय प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या आणि अनोख्या कल्पनांमुळे या ब्रँडचे बाजारामध्ये वर्चस्व आहे. ‘बोन्साय’ आणि ‘सायकॉलॉजी’ हे मुलांमध्ये आवडते असणारे अग्रगण्य ब्रँड ही ‘सुयश मार्ट प्रा. ली.’ची उत्पादने असून, त्यांची कार्यक्षमता आणि स्थानिक बाजारपेठेतील पकड याची ‘क्रीमस्टोन’ला नक्केच मदत होईल. पुण्यातील ‘क्रीमस्टोन’चे दालन बाणेर रस्त्यावर, ‘हॉटेल ग्रीन पार्क’च्या समोर उभारण्यात आले असून, हे दालन सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.