पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर यांची आज (बुधवारी) निवड करण्यात आली आहे. करमाळकर हे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी याबाबतची घोषणा केली.
पुणे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. नितीन करमाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली.
डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही प्रमुख नावे या 36 जणांच्या यादीत पाहायला मिळाली होती.
कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर
Date: