पुणे – औषधांची ऑनलाइन विक्री, ई- फार्मसीजच्या निषेधार्थ ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एआयओसीडी) शुक्रवारी (ता. 28) पुकारलेल्या बंदमध्ये पुण्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.
ऑनलाइनमुळे अनेक औषधांची बेकायदेशीर विक्री होण्याचा धोका आहे. अशाप्रकारे विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून औषध कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा दावा संघटनेने केला आहे. गुंगी आणणाऱ्या औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री केली जात असून, त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. यामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे साडेसात हजार सदस्य सहभागी होणार असल्याचे सुशील शहा, अनिल बेलकर यांनी सांगितले.