तिच्या आणि त्याच्या जगण्याचं एकच कारण …. “समर्पण”

Date:

प्रेम हे असेच असते सरल्यावरही उरते उरल्यावरही बहरत राहते. प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो , प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो , जीव देणे नको असते पण  जीवाला जीव लावणे  हवे असते. प्रेम ही भावनाच अमर्याद आहे. प्रेमात आखंड बुडणे, एखाद्या व्यक्तीसाठी  प्रेमात  सर्वस्व त्यागणे हि भावनाच वेगळी आहे . अश्याच काहीश्या विचारांनी बहरलेली “समर्पण “ ही नवीन गोष्ट झी युवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे ..प्रेम हे या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये दिव्येश आणि रमाची अमर कहाणी झी युवावर , येत्या सोमवार ३ एप्रिल आणि मंगळवार ४ एप्रिल रात्री ९ वाजता  ,पाहायला मिळेल .

आरोह वेलणकर म्हणजेच या गोष्टीतला दिव्येश, हा अतिशय श्रीमंत घरातील मुलगा असून अनेक वर्षे अमेरिकेत राहत होता .आधी अमेरिकेत आणि आता  भारतात आल्यावरही त्याची समाजाची नाळ कधीच  तुटली नाही . अतिशय सुस्वभावी आणि सुशिक्षत असा दिव्येश हा अतिशय जीव लावणारा मुलगा.  तर अश्विनी कासार म्हणजेच या गोष्टीतील रिमा , ही मध्यमवर्गीय घरातील पण जबाबदारीची जाणीव असेलेली मुलगी , वडील गेल्यानंतरही खंबीर पाने घर सांभाळणारी दिव्या अतिशय स्वावलंबी आणि निरागस मुलगी आहे . दिव्येश चे वडील मिस्टर कारखानीस म्हणजेच यतीन कारेकर . ही गोष्ट तशी जुनी पण तेवढीच नवीन आहे . यात प्रेम आहे , राग आहे , द्वेष आहे , मत्सर आहे सूड आहे , आणि मुख्य म्हणजे समर्पण आहे . गोष्ट सुरु होते रिमाच्या घरावरून , दिव्येशचे वडील म्हणजेच कारखानीस हे मोठे बिल्डर असून त्यांना रिमाचे घर हवे आहे . वाट्टेल ते मार्ग वापरून ते रिमा आणि तिच्या आईला तिथून काढण्याचा प्रयत्न करत असतात. दिव्येश सुद्धा पहिला बिझिनेस पॉईंट च्या दृष्टीने वडलांना मदत करतो . पण हळू हळू निरागस रिमाच्या प्रेमात  पडतो . रिमालाही दिव्येश आवडू लागतो.पण … या पण च्या पलीकडे असं बरंच काही आहे जे पाहून प्रेम केलेल्या प्रत्येकाचे मन हळहळेल. हि गोष्ट आहे ओंजळ भरलेल्या पाण्यासारखी, नकळत ओंजळ रिकामी होते , मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक आठवणीचा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’ : हर्षवर्धन सपकाळ.

देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा...

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...