Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सौमित्र यांच्या काव्यवाचनाने निखिलला सलाम

Date:

काव्यवाचन हा नेहमीच एक हृदयस्पर्शी अनुभव असतो. शब्द आणि त्याचे सामर्थ्य यांची जाण असलेले रसिक काव्यवाचनाच्या निखळ आनंदाची अनुभूती नक्कीच घेऊ शकतात. असाच एक तरल अनुभव  ‘निखिल फिल्म्स प्रस्तुत’ ब्रेव्हहार्ट या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना घेता येणार आहे. या चित्रपटासाठी प्रतिभावान कवी आणि अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी आपल्या खास शैलीत एका विशेष कवितेचे काव्यवाचन या चित्रपटासाठी केले आहे.

 

ऐल तटावर जीवन अवघे… पैल तटावर पूर्णविराम

मधे वाहते संघर्षाची… नदी अनाहत, तिला प्रणाम..!

 

अशी अर्थपूर्ण काव्यरचना किशोर कदम यांच्या धीरगंभीर आवाजात ऐकणे प्रेक्षकांसाठी सुखद अनुभूती ठरणार आहे. चित्रपटाचा नायक निखिलच्या जिद्दीला सलाम करणारी ही कविता श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून चित्रपटाचे पटकथा-संवाद व गीतेही त्यांनीच लिहिली आहे. सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी यांनी ब्रेव्हहार्ट चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन दासबाबू यांनी केले आहे.

 

संग्राम समेळ व धनश्री काडगांवकर ही युवा जोडी ब्रेव्हहार्ट मधून आपल्यासमोर येतेय. अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु. अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर आदी कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....