पुणे -नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता यावर्षीपासून जेईई-मेन प्रवेश परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यामध्ये वेगवेगळ्या सत्रात घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे या वर्षी जेईई-मेन परीक्षेचा पेपर पॅटर्न देखील बदलण्यात आला आहे यापैकी फेब्रुवारी-2021 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई-मेन या देशपातळीवरील प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच आज जाहीर झाला. भारतातून 620978 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेकरिता बसले होते. चारही सत्रामधून मिळून टॉप 250000 विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी आपला रँक मिळवतात त्यांना आयआयटी करिताची जेईई-ॲडव्हान्स प्रवेश परीक्षा देता येते. यामध्ये चाटेंच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून परीक्षेची तयारी करून देखिल घवघवीत असे यश संपादन केले. यावेळी प्रा फुलचंद चाटे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जेईई-मेन परीक्षेमध्ये चाटे समूहातील विद्यार्थ्यांना मिळालेले पर्सेंटाइल स्कोर पुढील प्रमाणे आहेत यामध्ये अनुरूप शेणवी 98.73, अश्विन तरस 98.18, राजवर्धन पाटील 95.62, किशनलाल चौधरी 95.23, प्रतीक फाळके 94.85, हर्षवर्धन साळवे 94.73, शुभम फाळके 94.12, संकेत पाटील 93.99, राजलक्ष्मी पाटील 93.88, शुभम सिंग 93.35, सोहेल आर. 91.43 व रिझील पटेल 90.61 या विद्यार्थ्यांनी विशेष गुण संपादन करत चाटे शिक्षण समूहाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
विद्यार्थी व पालकांना संबोधून बोलताना प्रा. चाटे सर म्हणाले की अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये चांगले करिअर करायचे असेल तर जेईई परीक्षा ही अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना एनआयटी, आयआयआयटी अशा विविध नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अकरावीपासूनच या परीक्षेच्या तयारीला लागणे फार आवश्यक आहे तरच आपण देश पातळीवरील प्रवेश परीक्षांमध्ये उज्वल असे यश संपादन करु शकता. चाटे कॉलेजमध्ये विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षा झाली की लगेच पुढच्या तयारीला लागतात आणि म्हणूनच राज्य असो वा राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांमध्ये चाटेंचे विद्यार्थी हमखास यश मिळवतात. नियोजनबद्ध विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांची तयारी केल्यास नक्कीच यश संपादन करता येईल यात शंका नाही.