मुंबई, 9 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आयुश पुजारी, कर्नाटकाच्या एम दिगंत यांनी तर, मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मेहक कपूर यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत आयुश पुजारी अव्वल मानांकित रुद्र बाथमचा 2-6, 6-2, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कर्नाटकाच्या एम दिगंत याने सहाव्या मानांकित तेलंगणाच्या शशांक कर्णातीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफ़ुले याने आपला राज्य सहकारी क्वालिफायर दक्ष पाटीलचा 6-3, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या मेहक कपूर हिने सातव्या मानांकित हरियाणाच्या स्वस्ति सिंगचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:आयुश पुजारी(महाराष्ट्र)वि.वि.रुद्र बाथम(मध्यप्रदेश)(1) 2-6, 6-2, 6-0; अयान शेट्टी(महाराष्ट्र)वि.वि.वीर महाजन(महाराष्ट्र) 6-2, 6-1;
अनुज सरडा(उत्तरप्रदेश)वि.वि.अधिवन देशवाल(दिल्ली)6-2, 6-0;हित कांदोरिया(गुजरात)वि.वि.शाश्वत मिश्रा(महाराष्ट्र) 6-1, 7-6(5);
ओजस मेहलावट(दिल्ली)(3) वि.वि.नविन राजसुंदरम(तामिळनाडू)6-1, 6-3;
फझल अली मीर(तामिळनाडू)वि.वि.अम्रित वत्स(पश्चिमबंगाल) 6-0, 6-0;एम दिगंत(कर्नाटक)वि.वि.शशांक कर्णाती(तेलंगणा)(6) 6-4, 6-4; शिवतेज शिरफ़ुले(महाराष्ट्र)वि.वि.दक्ष पाटील(महाराष्ट्र)6-3, 6-1; मुली:
दिव्या शर्मा(हरियाणा)(1)वि.वि.व्रण्डिका राजपूत(महाराष्ट्र) 6-1, 6-4;सृष्टी किरण(कर्नाटक)वि.वि.सान्वी मिश्रा(कर्नाटक)6-3, 6-4;
मेहक कपूर(महाराष्ट्र)वि.वि.स्वस्ति सिंग(हरियाणा)(7) 7-6(2), 6-2;
शान्विता नुकाला(तेलंगणा)वि.वि.अविका(हरियाणा)6-1, 6-0;